Homeनागपूर न्यूजदिवसभरात आज १२ पॉझिटीव्ह रुग्णांची भर: बाधितांचा आकडा पोहोचला २८१ वर

दिवसभरात आज १२ पॉझिटीव्ह रुग्णांची भर: बाधितांचा आकडा पोहोचला २८१ वर

रामेश्‍वरी,पार्वती नगर येथील रुग्ण पॉझिटीव्ह

नागपूर,ता.९ मे: मागील तीन दिवसात शहरातील कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यांनी उच्चांकी गाठत २६९ पर्यंत मजल मारली होती.काल शुक्रवार दि. ८ मे हा नागपूरकरांसाठी काहीसा दिलासा देणारा दिवस ठरला होता. काल शुक्रवारी अाणखी एक रुग्ण हा कोरोनाबधित असल्याचे निष्पन्न झाले होते मात्र शनिवारी शहरात आणखी १२ रुग्णांचे अहवाल हे पॉझिटीव्ह आल्याने बाधितांची संख्या ही आज शनिवार दि.९ मे रोजी २८१ पर्यंत पोहोचली आहे.

आज कोरोना पॉझिटीव्ह आलेल्यांपैकी १० हे मोमिनपुरा येथील आहे. १ पार्वतीनगर तर १ रामेश्‍वरी येथील संशयिताची चाचणी ही पॉझिटीव्ह आल्यामुळे निश्‍चितच प्रशासनाची धास्ती वाढली आहे. ५ नमुने हे एम्समध्ये तर ७ नमुने हे मेयाेमध्ये तपासण्यात आले आहेत.काल पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णाला पाचपावली येथील पोलीस क्वार्टरमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले होते.विशेष म्हणजे प्रभाग क्र ३४ मध्येही काशीनगर टेकाडे हायस्कूल परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने मनपा आयुक्त तुकराम मुंढे यांनी काल या भागातील अभयनगर मार्ग,अभयनगर उद्यान,श्‍याम बार ॲण्ड रेस्टारेन्ट,बेलतरोडी रोड,शताब्दी चौक ते श्‍यामबारपर्यंतचा रिंग रोड हा प्रतिबंधित क्ष्ेत्र म्हणून घोषित केले होते.

मेयोमध्ये आज शनिवारी एकूण २६४ नमुने तपासले गेले. यात ८ पॉझिटीव्ह निघाले. शनिवार पर्यंत एकूण ८६ रुग्ण हे मेयाेमध्ये भरती होते,त्यातील ५ रुग्णांना आज सुटी होणार होती,त्यामुळे मेयोमध्ये आता ८१ रुग्ण हे उपचार घेत असल्याची माहिती मेयोचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलिया यांनी दिली.

पार्वतीनगर येथील आणखी एक तरुण हा कोरोना बाधित आढळ्याने तम्बाकू चाळ ही रिकामी केल्या जात असल्याचे सांगितले जात आहे.या साठी प्रशासनातर्फे ३ बसेस त्या ठिकाणी उभ्या होत्या. विशेष म्हणजे रामेश्‍वरी,पार्वतीनगर,काशीनगर,बाबूळखेडा,जयभीमनगर परिसरात ड्रोनद्वारे पाळत ठेवण्यात येत आहे.

पार्वतीनगरातील मृताच्या संपर्कातील दीडशे जण निगेटीव्ह-
शुक्रवारी नागपूरकरांना एक मोठा दिलासा देणारी बाब ठरली ती म्हणजे पार्वती नगर येथील मृत २२ वर्षीय तरुणाच्या संपर्कातील १५० जणांचा तपासणी अहवाल हा निगेटीव्ह आला.परिणामी प्रशासनावरील ताण हा बराच कमी झाला. या भागातील सुरवातीला १५० व नंतर ८० लोकांचे विलगीकरण करण्यात आले होते. विलगीकरणातील संशयितांचा अहवाल हे पॉझिटीव्ह आले असते तर सतरंजीपुरा,मोमिनपुरा नंतर पार्वती नगर हा नवा ‘हॉट स्पॉट’ठरण्याची शक्यता होती. इतरांचे अहवाल अद्याप प्रतिक्ष्ेत आहेत. त्यांचेही अहवाल निगेटीव्ह यावे असे मनोमन नागपूरकर करुणा भाकीत आहेत. एकूण तिन वेळा चाचणीचा अहवाल हा निगेटीव्ह यावा लागतो,हे विशेष.
या संपूर्ण भागात आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कडक प्रतिबंध लावून संपूर्ण ३ किलोमीटरचा परिसर हा प्रतिबंधित केला होता. एक साथ दीडशे लोकांचा पहीला चाचणी अहवाल हा निगेटीव्ह आल्याने आज शनिवारी मात्र या प्रतिबंधित क्ष्ेत्रात थोडी सूट देण्यात आली.जिवनावश्‍यक वस्तूंची दूकाने काही ठराविक तासांसाठी काही भागात उघडण्यात आली होती.

पार्वतीनगरातील मृत तरुण याचे मोमिनपुरा कनेक्शन!
पार्वतीनगर येथील २२ वर्षीय मृत तरुण हा कबुतरबाजी करायला माेमिनपुरा भागात जात असल्याची या भागातील नागरिकांमध्ये चर्चा आहे. काल मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी देखील व्हीडीयोच्या माध्यमातून सतरंजीपुरा व मोमिनपुरासारख्या प्रतिबंधित क्ष्ेत्रात शहरातील इतर भागातील तरुणाई जाणे-येणे करते याचे आश्‍चर्य व्यक्त करीत,या पुढे अश्‍या क्ष्ेत्रात फिरताना आढळल्यास सरळ विलगीकरण कक्ष्ात पाठविण्याचे कडक आदेश पोलीस विभागाला दिले होते हे विशेष.

आश्‍चर्य म्हणजे गेल्या ३५ दिवसांपासून शहरातील हे दोन्ही क्ष्ेत्र हे कोरोनाचा संसर्ग होण्याचे हॉट स्पॉट ठरले असताना, पार्वतीनगर सारख्या सुरक्ष्ति ठिकाणाहून हॉट स्पॉट भागात कबुतरबाजी करण्यासाठी त्या मृत तरुणाने केलेले धाडस याबाबत पार्वतीनगर,रामेश्‍वरी भागातील नागरिक हे संताप व्यक्त करताना आढळत आहेत. हे संपूर्णपणे प्रशासनानेच अपयश असल्याचे आता बोलले जात आहे.

मृत तरुणाचे दोन मित्र कोरोनाबाधित-
आज शनिवारी पार्वतीनगर व रामेश्‍वरी येथून कोरोना बाधित असल्याचे चाचणीत स्पष्ट झालेले दोन तरुण हे मृत तरुणाचे मित्र असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे प्रशासनाने केलेल्या आवाहना नंतर मृत तरुणाच्या संपर्कात आल्याचे व कोरोनासारखी लक्ष् णे दिसत असल्याने त्या दोघांनीही स्वत:हून पाेलिसांकडे माहिती दिल्याचे सांगितले जात आहे.या दोघा तरुणांच्या बाधित असल्याच्या अहवालामुळे आज शनिवारी बाधितांची संख्या ही १२ वर पोहोचली असून ‘मोमिनपुरा संपर्क साखळीतून’ आणखी किती बाधितांचा आकडा पुढे येतो याची चिंता आता नागपूरकरांना लागली आहे.

यात दिलासा देणारी बाब म्हणजे २८१ बाधितांपैकी ७१ रुग्ण हे पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत.

सारीच्या रुग्णात कोरोनाची लक्ष् णे-
मेडिकलच्या कोरोना वॉर्डात उपचार घेणा-या सारीच्या तीन(सिव्हियर ॲक्युट रस्पिरेटरी इन्फेक्शन) रुग्णांमध्ये कोरोनाची लक्ष् णे आढळल्यामुळे पुन्हा तीन बाधितांची भर काल शुक्रवारी बाधितांच्या आकड्यात पडली. गुरुवारी मध्यरात्री त्यांचा अहवाल हा पॉझिटीव्ह आढळला.

पांढराबोडीत कोरोनाचा शिरकाव-
पाचपावली येथील विलगीकरण कक्ष्ात असणा-याला पांढराबोडीतील रुग्णाचा अहवाल शुक्रवारी पॉझिटीव्ह आला.परिणामी पांढराबोडी या मोठ्या वस्तीतही कोरोनाचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले. गुरुवारी मध्यरात्रीनंतर कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आलेल्या सारीच्या तीन रुग्णांपैकी पांढराबोडी,शताब्दीनगर चौक व मोमिनपुरा येथील टोकावरचा आणखी एक भाग नव्याने जोडला गेला.त्यामुळे कोरोना आता शहराच्या चारही बाजूने विळखा घालत असल्याचे दिसून पडतंय.
पाचपावली विलगीकरणा केंद्रातून शुक्रवारी पॉझिटीव्ह आलेला २३ वर्षीय तरुण पार्वतीनगरातील मृत कोरोनाबाधिताच्या संपर्कातील असल्याचे सांगितले जात आहे.

रामनगर येथे संशयित महिलेचा मृत्यू-
रामनगर परिसरातील एका महिलेचा प्रकृती अस्वास्थयामुळे मृत्यू झाला. रश्‍मी अरिवंद कोन्ड्रा(वय वर्षे ३३)रामनगर असे या महिलेचे नाव आहे. त्या काही दिवसांपासून आजारी होत्या.त्यांना ह्दयविकार व मूत्रपिंडाचा त्रास होता. शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. मात्र कोव्हिड-१९ च्या दृष्टिकोणातून वैद्यकीय खबरदारी म्हणून त्यांच्या नाकातील व घशातील स्वॅबचा नमुदना घेण्यात आला असून तो तपासणीला पाठवण्यात आला आहे.

याशिवाय मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही याच प्रकारचा मृत्यू सामोरे आला आहे.अरुणा परसराम ढबाले(वय वर्षे ६८) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या शुक्रवारी मृतावस्थेत आढळून आल्या.त्यांच्यशही नाक आणि घशातील स्वॅबचा नमुना घेण्यात आला असून तो तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.पोलिसांनी या दोन्ही प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. आज शनिवारपर्यंत या दोघा मृतांचा कोरोना चाचणी अहवाल आला नव्हता.

 

Latest बातम्या