

नागपूरात आज ५९ नव्या करोनाबाधितांची भर:एकूण संख्या पोहोचली २६५ वर
नागपूर,ता,७ मे: शहरात कोरोनाचा कहर हा मार्चच्या तिस-या आठवड्यापासूनच सुरु झाला मात्र कारोनाबाधितांच्या वाढीमध्ये आतापर्यंत दक्षिण नागपूर हे सर्वाधिक सुरक्षित राहीले.मात्र मंगळवार दि.५ मे रोजी दक्षिण नागपूरात येणा-या पार्वतीनगर येथील २२ वर्षीय तरुणाच्या मृत्यूने आता शहरातील सर्वच झोनमध्ये काेरोनाचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले.मृत पावलेला युवक हा सातत्याने अनेकांच्या संपर्कात आला होता.त्याचा सामाजिक वावर हा फार विस्तारित असल्यामुळे प्रशासनासमोर आता या बाधिताच्या संपर्क-साखळीचा शोध घेण्याचा गंभीर प्रश्न उभा राहीला आहे.संपर्क साखळीचा हा आकडा कुठपर्यंत जाईल?याची धास्ती मनपा प्रशासनाने देखील घेतली असल्याचे बोलले जात आहे.
[मध्यरात्री १२.३१ मिनिटांवर नुकत्याच हाती आलेल्या नमुना चाचणीत आणखी ३ बाधितांची भर पडली असून आता नागपूरात गुरुवार दि.७ मे च्या मध्यरात्रीपर्यंत नागपूरात एकूण कोरोना बाधितांची संख्या ही २६८ झाली आहे]

मृत युवकाचा कोरोना चाचणी अहवाल हा बुधवारी दूपारी पॉझिटीव्ह आल्याबरोबर मनपा प्रशासनाने संपूर्ण पार्वतीनगर,रामेश्वरीसह ३ किलोमीटरचा परिसर हा काल दूपारपासून सील केला. विशेष म्हणजे हा युवक अत्यंत उत्साही आणि सतत कार्यरत असणारा एक फूटबॉलपटूही होता,परिणामी त्याचा संपर्क दररोज युवा मित्रांसोबतच यायचा.अनेक सामाजिक उपक्रमातील व्यक्तिंसोबत देखील तो संपर्कात येत असल्याची माहिती तेथील एका स्थानिक रहीवाशी यांनी दिली. त्या प्रभागातील एका नगरसेवकाच्या अन्नदान वाटप उपक्रमात मृत युवकाचा हिरीरिने सहभाग असायचा,या शिवाय अजनी येथील मैदानात त्याच्या गप्पांच्या मैफिली मित्रांसोबत जमायच्या.
परिणामी, या युवकाच्या एकूण किती नागरिक संपर्कात आले होते,हे शोधणे महापालिका प्रशासनासमोर दिव्य ठरले आहे. काल बुधवारी मृत युवकाच्या घराजवळील,कुंटंबिय तसेच संपर्कात आलेले नातेवाईक असे १५० नागरिकांना मनपाने तातडीने विलगीकरण कक्ष्ात हलवले. आज गुरुवार दि. ७ मे रोजी याच भागातील आणखी ८० नागरिकांचे विलगीकरण करण्यात आल्याची माहिती मनपा प्रशासनाने प्रसिद्ध केली.या युवकाचे काका पोलीस दलात असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मृत युवकाच्या काकांसह ११ पोलीस कर्मचारी यांना देखील विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
मृत युवकाचे काका बेलतरोडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.परिणामी पोलीस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्याय यांनी बेलतरोडी पोलीस ठाण्यातील सर्वच अधिकारी व कर्मचारी यांच्या वैद्यकीय तपासणीचे निर्देश दिले होते. एकूण ८० अधिकारी व कर्मचारी यांची थर्मल स्क्रीनिंग करण्यात आली मात्र अद्याप कोणामध्येही कोराना विषाणूची प्राथमिक लक्ष् णे आढळली नसल्याची माहिती पोलीस रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप शिंदे यांनी दिली.याशिवाय मृत युवकाच्या संपर्कात आलेल्या अजनी पोलीस ठाण्याच्या ४ पोलीस कर्मचा-यांनाही विलगीकरणात पाठविण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, या युवकाचा मृत्यू मेडीकल रुग्णालयात झाला असताना त्याचे स्वॅब हे शवगार गृहात घेण्यात आले होते.परिणामी शवागार गृहातील आरोग्य कर्मचारी हे देखील संपर्क साखळीत ओढल्या गेले. या युवकाला ताप,सर्दी,खोकला,हगवण इ.चा अनेक दिवसांपासून त्रास असताना व कोराेनाबाबत प्रशासनाकडून वांरवार जनजागृतीपर आवाहन करण्यात आले असताना या युवकाने कोराना सदृष्य लक्ष्णे दिसत असतानाही प्रशासनाला कोणतेही सहकार्य केले नाही उलट तो मित्रासोबत कबुतरे उडवत व फूटबॉल खेळत असल्याची माहिती आहे.मंगळवारी रात्री उपचारासाठी दाखल केल्यावर ज्या वैद्यकीय पदाधिकारी,कर्मचारी व आरोग्य सेवक हे त्याच्या संपर्कात आले त्यांनाही तातडीने विलगीकरणात ठेवण्यात आले असून ही सर्व संपर्कात आलेल्यांची ‘दृष्य साखळी’ठरली आहे.
मात्र या मृत युवकाच्या संपर्कात आलेले व संपर्कातून ’संपर्क‘ साखळीत’ येणारे एकूण किती कोरोना बाधित असावे,याचा मनपा प्रशासन आता युद्धपातळीवर शोध घेत असली तरी खरे आव्हान प्रशासनासमोर हेच आहे.सतरंजीपुरा,मोमिनपूरा येथील पहील्या मृत कोरोना बाधिताच्या संपर्कात येणारे सतरंजीपुरा येथील एकूण १७५० तर मोमिनपुरा येथील कोरोना संपर्क साखळीत येणारे एकूण ६०० नागरिकांचे आतापर्यंत विलगीकरण करण्यात आले आहे.
बुधवारी मध्यरात्री एकूण २४ सतरंजीपुरा येथील संशयितांचे नमूने हे पॉझिटीव्ह आले होते. गुरुवार दि. ७ मे रोजी दूपारी २५ तर सायंकाळी आणखी १० संशयित हे पॉझिटीव्ह निघाले. आज शहरात कोरोना बाधितांची एकूण संख्या ही २६५ अशी चिंताजनक झाली आहे. हे सर्व ५९ बाधित सतरंजीपुरा व मोमिनपूरा येथील असून मनपातर्फे नव्याने अनेक प्रभाग आज सील केले. काल बुधवारी एकूण ८७ चाचण्या घेण्यात आल्या त्यातील ७६ पॉझिटीव्ह हे मोमिनपुरा तर उर्वरित ताजबाग,गणेशपेठ इत्यादी भागातील आहेत.
नागपूरातील प्रशासनाने ठरवून दिलेल्या विविध चाचण्या केंद्रांमध्ये अहोरात्र संशयितांचे नमुने तपासण्याचे काम हे युद्धपातळीवर चालत असून सकाळी १० वाजेपर्यंतचे आकडे हे माध्यमांना सुरवातीला उपलब्ध करुन दिल्या जातात.यानंतर सायंकाळी ७ वा.पर्यंत मेयो-मेडीकलमध्ये किती रुग्णांना भरती करण्यात आले याची आकडेवारी माध्यमांना दिली जाते.आज गुरुवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत मेयोमध्ये एकूण १४ कोराना बाधितांना भरती करण्यात आले असल्याची माहिती मेयोचे अधिष्ठाता डॉ.केवलिया यांनी दिली तर काल ६८ पॉझिटीव्हपैकी ८ रुग्णांचे अहवाल मेया,२६ रुग्णांचे मेडीकल,नीरीमधून १६ एम्समधून ९ तर माफसूमधून ९ चाचण्या या पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती मेडीकलचे वैद्यकीय अधिक्ष् क डॉ.अजय गावंडे यांनी दिली. आज गुरुवारी मेयोमधून ७,मेडीकलमधून १९,नीरीमधून ६,माफसूमधून ३ असे एकणू ३५ नमूने पॉझिटीव्ह आले असल्याचे त्यांनी सांगितले.
पार्वतीनगर येथील नागरिकांचे काळजाचे ठोके चूकले-
पार्वतीनगर येथील मृत युवक हा कोरोना बाधित निघाल्याने हे संपूर्ण क्ष्ेत्र प्रतिबंधित घोषित करुन मनपातर्फे सील करण्यात आले आहे.मात्र या क्षेत्रातील नागरिक हे खोलवर तनावात आले आहे. अनेकांच्या घरात ज्येष्ठ मंडळी असून रात्री-अपरात्री ज्येष्ठांना रुग्णालयात दाखल करावं लागतं.मात्र हा संपूर्ण परिसर सील करण्यात आल्यामुळे दूचाकी,चारचाकी कुठूनही नेण्याची शक्यताच नाही,ज्येष्ठांसोबतच कुटुंबिय हे अत्यंत तनावात आले आहे. घरात कोणी साधं शिंकलं तरी काळजात धस्स होतं. काहीही झाले तरी कुटुंबात कोणालाच सर्दी,खोकला,ताप यायलाच नको,असा अनाकलनीय अट्टहास कोरोनाच्या धास्तीने नागपूरकर नागरिक धरताना दिसत आहेत. पार्वतीनगर हा प्रभाग क्र.३५ चा भाग असून यात पार्वतीनगर,जोगी नगर,जयभीम नगर,धारीवाल ले-आऊट,अजनीचा काही भाग येतो. मनपा प्रशासनातर्फे काल हे संपूर्ण क्षेत्र सील करण्यात आले असून आजही दिवसभर येथील नागरिकांमध्ये मृत युवक व त्याच्या संपर्क साखळीचाच विषय चर्चिला जात होता.
प्रतिबंधित क्षेत्रात राहणारे नागरिक यांची व्यथा आणि भीती ही खूप वेगळी असून या क्षेत्रातील कोरोना बाधिताच्या संपर्क साखळीमध्ये त्यांचा समावेश होऊ नये म्हणून अक्ष् रश: प्रतिबंधित क्षेत्रातील नगारिक हे करुणा भाकीत राहतात.एकीकडे कोरोनाची लागण होण्याची भीती,दूसरीकडे संपर्कसाखळीत आल्यास विलगीकरण कक्ष्ात राहण्याची भीती तर तिसरीकडे मृत्यूचीही शक्यता अश्या विचित्र कोंडीत अश्या क्षेत्रातील नागपूरकर नागरिक जगताना दिसतोय. संपर्क साखळीत एक जरी नागरिक आढळ्यास त्याच्या कुटुंबातील ७ ते ८ कुटुंबिय हे विलगीकरणात पाठवले जातात,शेजारचे मिळून ७० नागरिक हे कोरोनाच्या टप्प्यात सहजच येतात.या शिवाय प्रतिबंधित क्षेत्र घोषित झाल्यावर या क्षेत्रात दूध,भाजी,वृत्तपत्रे सगळ्याच जिवनाश्यक गोष्टींवर बंधने येतात.
नागपूरात कोरोना बाधितांची सातत्याने वाढणारी संख्या,दररोज मनपा प्रशासनातर्फे खबरदारीचा ‘एकमेव उपाय’ म्हणून योजिले जाणारे वेगवेगळे क्षेत्र प्रतिबंधित म्हणून होणारी घोषणा,यामुळे नागपूरकर नागरिक हे चांगलेच धस्तावले असून,कोरोना विषाणूने जगभरात जो काही कहर केला असेल तो असेल,नागपूरात मात्र नागपूरकर नागरिकांना कोरोनाने गेल्या तीन महिन्यांपासून फक्त आणि फक्त ‘भीती’आणि ’तनाव’च्या खाईत लोटले असल्याचे पार्वतीनगर येथील एका नागरिकाने खास ‘सत्ताधीश’ला सांगितले.
महाराष्ट्रात आज गुरुवारी १६,५७८ पर्यंत कोरोना बाधितांचा आकड्याने उच्चांक गाठला असून आतापर्यंत महाराष्ट्रात ६७१ लोकांचा मृत्यू झाला आहे.देशात महाराष्ट्र हा कोरोनाची लागण होणा-या राज्यात अव्वल स्थानी आहे,यामुळेही उपराजधानीत तनाव हा वाढला आहे.
आज गुरुवारी मनपा प्रशासनातर्फे पुढील क्षेत्रात कोरोनाबाधित आढळल्यामुळे प्रतिबंधित करण्यात आलेले क्षेत्र-
मंगळवारी झोन क्र.१०-पूर्वेस बोदेले यांचे घर,उत्तरेस-फर्निचर गोडाऊन,उत्तर पश्चिमेस-विष्णू ढोणे यांचे घर,
दक्षिण-पश्चिमेस- कापसे क्लिनिक,
दक्षिणपूर्वेस- विरेंद्र वर्मा यांचे घर, पूर्वेस- कविता शाहू यांचे घर.
धंतोली,झोन क्र.४ अंतर्गत येणारे क्षेत्र- उत्तरपश्चिमेस-फुटपाथ वरील दरगाह,
दक्षिण-पश्चिमेस-एस.टी.क्वार्टस,दक्षिणपश्चिमकॉर्नर,दक्षिणपूर्वेस- एस.टी.स्टॅण्ड कॉर्नर, उत्तर पूर्वेस-मुरारका मार्ग
नेहरुनगर झोन क्र.५ अंतर्गत येणारे क्षेत्र-(निराला सोसायटी उमरेडर रोडच्या अनुषंगाने)
उत्तर पश्चिमेस- लक्की चिकन सेंटर उमरेड रोड,द
दक्षिण-पश्चिमेस- बारा खोली जनरल स्टोअर्स,दक्ष्णिपूर्व- क्युअरईट हॉस्पीटल रिंग रोड,उत्तर पश्चिमेस- दिघोरी चौक
(ताजाबाद,आझाद कॉलोनीच्या अनुषंगाने)
उत्तर पश्चिमेस- स्टेट बँक ऑफ इंडिया उमरेड रोड,
दक्षिणपश्चिमेस- मोहम्मद गुलाबअली यांचे घर ठाकुर प्लॉट,
दक्षिण- नाला ब्रिज आझाद कॉलोनी,
दक्षिणपूर्व-आझाद कॉलोनी येथील मस्जिद,उत्तरपूर्व- ताज मिनार बेकरी उमरेड रोड.




आमचे चॅनल subscribe करा
