Homeनागपूर मनपामनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या लॉक डाऊन वाढ आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या लॉक डाऊन वाढ आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान

Advertisements
Advertisements

मद्यविक्री चालू करण्याची मागणी

नागपूर,ता.४ मे: लॉक डाऊनच्या तिस-या टप्प्यात राज्य व केंद्र शासनाने प्रतिबंधित क्ष्ेत्र वगळता सर्वच झोनमध्ये अटींसह शिथिलता दिली आहे. मात्र या आदेशाला न जुमानता नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एक वेगळा आदेश काढून कुठलीही शिथिलता देणार नसल्याचे स्पष्ट केले.या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. शहरातील वकील प्रकाश जयस्वाल,किशोर लांबट, कमल सतुजा,मनोज साबळे तसेच श्रीरंग भांडारकर यांनी ही याचिका दाखल केली आहे. यावर उद्या मंगळवार दि. ५ मे रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेली टाळेबंदी वाढवून १७ मे पर्यंत करण्यात आली आहे. मात्र या तिस-या टप्प्यात विविध अटींसह प्रतिबंधित क्ष्ेत्र वगळता तिन्ही झोनमध्ये काही दुकानांना उघडण्याची परवानगी तसेच मद्यविक्रीचा या शिथिलतेत समावेश आहे.

परंतु नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सदर आदेशाला न जुमानता ३ मे रोजी स्वत: वेगळा आदेश काढून मनपा हद्दीत बंदी ‘जैसे थे’ असल्याचे जाहीर केले.सोबतच मुंबई आणि पुण्यात जे नियम लागू आहेत त्याचप्रमाणे नागपूरात देखील लागू करण्यात येईल,असे स्पष्ट केले.

केंद्राच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने १ मे रोजी आदेश जारी करुन पुढील लॉक डाऊन काळात ‘सुरक्ष्ति अंतर’पाळून ३३ टक्के कर्मचा-यांसह,खाजगी कार्यालये सुरु करण्यास तसेच मद्यविक्रीस परवनानगी दिली आहे.
मात्र मुंढे यांनी‘ रेड झोनचे’ कारण देत एक नवीन आदेश काढून बंदी पूर्वीप्रमाणे असल्याचे जाहीर केले.या विरोधात दाखल याचिकेत मनपाचे आदेश रद्द करुन ३३ टक्के उपस्थितीसह खाजगी कार्यालय सुरु करण्यात यावे व सुरक्ष्ति अंतरासह मद्यविक्रीला परवानगी द्यावी,अशी मागणी करण्यात आली आहे.

Latest बातम्या