फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजनागपूरात आणखी पाच कोरोनाचे रुग्ण: बंधितांची संख्या १४३ वर

नागपूरात आणखी पाच कोरोनाचे रुग्ण: बंधितांची संख्या १४३ वर

Advertisements

नागपूर,१ मे: अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यातील ४५ वर्षीय महिला ही उपचारासाठी नागपूरात आली असता, तिच्या करोना चाचणीचा अहवाल हा पॉझीटीव्ह निघाला. या महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टर्स सांगतात आहे. या रुग्णासह’ एम्स’ च्या प्रयोगशाळेत ४ रुग्णांचे अहवाल हे देखील पॉझीटीव्ह आल्याने शहरात करोना बधितांची संख्या ही आता १४३ झाली आहे.

वरुड येथील ही महिला २९ एप्रिल रोजी पहाटे अडीच वाजता मेडिकलमध्ये पोहोचली. ताप,सर्दी, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याची लक्षणे त्यांच्यात आढळली.

त्याच दिवशी नमुना घेऊन मेडीकल प्रयोगशाळेत तपासणी केली असता,आज शुक्रवार दि.१ मे रोजी त्यांचा अहवाल पॉझीटीव्ह आला. या महिलेची प्रवासाची कोणतीही पार्श्वभूमी नाही. याशिवाय कोणत्याही कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्या नसल्याचे त्यांच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे.

‘एम्स’ च्या प्रयोगशाळेत ज्या ४ संशयितांचे अहवाल हे पॉझीटीव्ह आलेत,त्यांचे वय व पार्श्वभूमीची माहिती प्रशासनाकडून प्राप्त होऊ शकली नाही.

आणखी २ रुग्णांनी केली कोरोनावर मात-

शांतीनगर येथील २८ वर्षीय महिला व कामठी रोड येथील ३३ वर्षीय पुरुष यांनी कोरोनावर मात केली असून १९ एप्रिल रोजी या दोघांचेही अहवाल हे पॉझिटिव्ह आले होते. दोघांनाही मेडिकल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. १४ दिवसां नंतर २४ तासांच्या अंतराने तपासण्यात आलेले दोघांचेही नमुने निगेटीव्ह आल्याने दोघांनाही मेडिकल मधून सुटी देण्यात आली. पुढील १४ दिवस त्यांना मात्र घरातच विलगीकरणात राहणे बंधनकारक आहे. नागपूरात आतापर्यंत ४५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे,हे विशेष!

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या