

नागपूर ‘डेंजर झोन’मध्ये: करोना बाधितांची संख्या सत्तरीच्या पार
नागपूर: रविवार दि. १९ एप्रिल हा दिवस नागपूरकरांसाठी ‘धोकादायक वार’ ठरला. रविवारी सकाळीच संतरंजीपु-यातील मृत करोना बाधिताच्या संपर्कात आलेल्या ९ जणांचा करोना चाचणी अहवाल हा पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्रसिद्ध झाली.रात्री ८.३० नंतर आणखी एका व्यक्तीचा अहवाल हा पॉझिटिव्ह आल्याची माहिती आहे. या ९ जणांपैकी ५ रुग्णांना मेडीकल तर ४ रुग्णांना मेयोमध्ये भरती करण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसात बाधितांच्या संख्येने रविवारी मात्र उच्चांक गाठला, आता नागपूर शहरात करोना बाधितांची संख्या ही ७३ झाली आहे.
आज ज्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला त्यांना आधीच आमदार निवासात विलगीकरणात ठेवण्यात आले होते. याचा करोना चाचणीचा अहवाल प्राप्त होताच त्यांची रवानगी मेयो व मेडीकल रुग्णालयात करण्यात आली आहे. संतरजीपुरा येथील मृत करोना बाधिताच्या संपर्कात आलेले एकूण १८९ लोकांना संसर्गाची भीती असल्याचे मत स्वत: मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनीच व्यक्त केले असून यावरुन झपाट्याने करोना बाधितांची वाढणारी संख्याच ही भीती, सार्थ असल्याची. साक्ष् देते. रात्री उशिरा ज्या व्यक्तिचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला त्याविषयी मेडीकल व मेया रुग्णालयाचे अधिष्ठाता व वैद्यकीय अधिक्ष् क हे मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांच्यासोबत व्हीडीयो कॉन्फरेन्सद्वारा झालेल्या बैठकीत व्यस्त असल्याने माहिती मिळू शकली नाही.
शहरात १२ एप्रिल रोजी एकाच दिवशी १४ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. यानंतरच्या रविवारी १९ एप्रिल रोजी एकाच दिवशी १२ लागणग्रस्तांची नोंद झाली. दर रविवारी कोरोनाचा प्रादुर्भाव अचानक वेग घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. एकाच दिवशी उपराजधानीतील १० जणांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल आल्यामुळे प्रशासन हादरले आहे. दर दिवसाला एका नवीन वस्तीमध्ये शिरकाव करीत असून शांतीनगर, गिट्टीखदाननंतर आता कुंदनलाल गुप्त नगरात कोरानाने शिरकाव केला आहे. यामुळे उपराजधानीवर कोरोनाचे संकट गडद होत असून बाधितांची संख्या ७२ वर पोहचली आहे.
रविवारी मेयोच्या प्रयोगशाळेतून आलेल्या ९ कोरोनाबाधित सतरंजीपुरा, शांतीनगर, कुंदनलाल गुप्त नगरमधील असून ५ महिला, ४ पुरुषांचा समावेश आहे. बाधितांमध्ये १३ वर्षीय मुलीसह २९, ३३, ३५ आणि ३६ वर्षाच्या महिलांचा समावेश आहे. तर १३ आणि १५ वर्षाच्या मुलासह ३३ आणि ३५ वर्षाच्या युवकांचा समावेश आहे. सर्वजण आमदार निवासातील विलगीकरणात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मेयोच्या प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालात कोरोना बाधित आलेले सर्व रुग्ण हे सहवासात आलेल्यांपैकी आहेत. सतरंजीपुऱ्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तयार झाली आहे. रविवारी आढळून आलेल्या कोरोनाबाधितांमधील सर्व पुरूषांना उपचारासाठी मेयोत तर महिलांना मेडिकलमध्ये तातडीने हलवण्यात आले. कुंदललाल गुप्त नगरात प्रथमच कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला, यामुळे या भागातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. आरोग्य विभागाकडून या १० ही रुग्णांकडून त्यांना विलगीकरणात आणण्यापुर्वी संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेणे सुरू आहे. त्यांनाही तातडीने खबरदारीचा उपाय म्हणून सक्तीच्या विलगिकरणात ठेवण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
८० टक्के रुग्ण सतरंजीपुरा येथील
रविवारी कोरोना तपासणीत ९ बाधित निघाले. यातील दोघे शांतीनगरातील आहेत. तर काही जण कुंदनलाल गुप्त नगरातील रहिवासी आहेत. त्यामुळे करोनाची लागण झालेल्या भागात नवे ठिकाण जोडले गेले आहे. विशेष असे की, नागपुरातील ७२ बाधितांपैकी सतरंजापुरा झोनमधील ८० टक्के रुग्ण आहेत. मंगळवारी झोन मधील ६ रुग्णांसह बजाजनगर, अभ्यंकर नगर, खामला, जरिपटका, एम्प्रेस सिटी, मोमिनपूरा, दलालपुरा, शांतीनगर, गिट्टीखदान भागात कोरोनाच्या प्रादुर्भावाचे २० टक्के रुग्ण आढळून आले आहेत. रविवारी कुंदनलाल गुप्त नगरची भर पडली. यामुळे नव्या बाधिताच्या सहवासातील रुग्णांची साखळीत ही साखळी शोधून काढण्यासाठी महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी परिश्रम घेत आहेत.
२ मिनिटात जनसंपर्क विभागाच्या व्हॉट्स ॲप ग्रूपवरुन आयुक्तांचे अवाहन गायब!
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मृत पावलेल्या सतरंजीपुरा येथील करोना बाधितामुळे १८९ लोकांना त्यांच्या संपर्कात आल्याने संसर्ग होण्याची शक्यता वर्तवून प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहान प्रसिद्ध करण्यात आलेले पत्रक हे लगेच मनपा जनसंपर्क व्हाॅट्स ॲप ग्रूपमधून २ मिनिटात डीलीट केल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.
नागपूर जिल्हा रेड झोनमध्ये असल्याने लॉक डाऊनमधून सूट नाहीच-
पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साेमवार २० एप्रिल पासून काही उद्योगांना काही प्रमाणात सूट देण्याची घोषणा केली होती. मात्र नागपूर जिल्हा हा‘ रेड झोनमध्ये’ असल्याकारणाने नागपूरकरांची सध्या तरी लॉक डाऊनमधून सुटका होण्याची सूतराम शक्यता नाही. नागपूर शहरात ‘मरकज’प्रकरणामुळे बाधितांची दररोज वाढणारी संख्येने नागपूरला डेंजर झोनमध्ये आणले असून गेल्या २९ दिवसांपासून लॉक डाऊनमध्ये जगणारे नागपूरकर आता चांगलेच निराश झाले आहेत. दिल्लीच्या केजरीवाल सरकारने देखील दिल्लीतील लॉक डाऊनमध्ये कोणत्याही प्रकारची सूट उद्योग धंधांना देण्यात येणार नसल्याचा सूतोवा केला आहे. परिणामी ३ मे नंतर तरी नागपूरकर हे आस लाऊन बसले आहेत त्यांना थोडा तरी दिलासा मिळेल. मात्र नागपूरातील काही विशिष्ट भागातील करोना संसर्गितांची संख्या ही दररोज अशीच वाढत गेल्यास जून पर्यंत नागपूरकरांना घरातच अडकून राहवे लागणार असल्याची शक्यता खाजगीत मोठे अधिकारी हे देखील वर्तवित आहेत.
जिल्हा प्रशासनाकडून रविवारी प्रसिद्ध झालेला अहवाल–
दैनिक संशयित : ५६
एकूण संशयित : ११२९
सध्या भरती संशयित : ८८
एकूण भरती संशयित : २२९०
एकूण भरती सकारात्मक रुग्ण- ५९
दैनिक तपासणी नमुने: ६२
एकूण तपासणी नमुने: १६४५
आतापर्यंत पॉझिटिव्ह नमुने :७२
घरी सोडलेले सकारात्मक रुग्ण :
घरी सोडलेले संशयित : ११०१
आज अलगीकरण केलेले संशयित: २७
अलगीकरण कक्षात भरती संशयित: ५७३
अलगीकरण कक्षातून घरी पाठविलेले संशयित : २७
पाठपुरावा सुरु असलेले एकूण संशयित :४६८




आमचे चॅनल subscribe करा
