

रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तबलीघी जमातशी निगडीत संशयित करोना रुग्ण रुग्णालयातल्या स्टाफसोबत अत्यंत चुकीच्या पद्धतीनं वागत आहे. जमातचे काही लोक वारंवार अश्लील कृत्य करताना आढळले आहेत. नर्सेससमोरच कपडे बदलणं किंवा छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं करत रुग्णालय डोक्यावर घेताना हे लोक दिसत आहेत.
गाझियाबाद जिल्हा प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यांना तुरुंगात किंवा बरॅकमध्ये टाकण्याचाही विचार सुरू आहे.
उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वी दिल्लीमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अंगावर थुंकणं किंवा आयसोलेशन सेंटरमध्ये वादंग निर्माण करणं अशा प्रकारची कृत्य केल्यानं ‘जमात’चे कार्यकर्त्यांवर मोठी टीकाही झाली होती. बिहारमध्ये जमातच्या कार्यकर्त्यांनी चौकशीसाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक केल्याचंही समोर आलं होतं.




आमचे चॅनल subscribe करा
