फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर मनपाइतरांना नियम शिकवणारे मनपा आयुक्त यांचाच नियमबाह्य कारभार!

इतरांना नियम शिकवणारे मनपा आयुक्त यांचाच नियमबाह्य कारभार!

वाहन चालकाला बनवले स्वीय सहाय्यक

नागपुर 16 मार्च 2020: नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी रुजू होताच तुकाराम मुंढे यांनी प्रशासनात अनेक बदल केले. अनेकांच्या बदल्या केल्या, अनेकांना बडतर्फ केले हे सर्व त्यांनी नियमांचा दाखला देऊन केलं. शिस्तीचा आणि नियमांचा बडगा उगवणारे आयुक्त यांनी मात्र स्वतः नियमाला कसं खुंटीवर टांगले आहे याची खमंग चर्चा महापालिकेत ऐकायला मिळतेय. तुकाराम मुंढे हे मनपात नवीन असल्याने संपूर्ण कारभार समजून घेण्यासाठी त्यांना कोणीतरी अगदी जवळचा विश्वासपात्र माणूस असणे गरजेचे होते आणि योगायोगाने वाहनचालक हे बघता बघता एका महिन्यात आयुक्तांचा अतिशय विश्वसनीय व्यक्ती बनला. या वाहनचालकाला मुंढे यांनी कोणत्याही नियमात बसत नसताना कनिष्ठ लिपिक पदावर बढती दिली, इतरांची बदली करणारे आयुक्त यांनी मात्र आपल्या लाडक्या वाहनचालकाची बदली न करता त्यांना फक्त बढती दिली. ज्या पदावर बढती दिली त्या पदावर काम न करता हे वाहन चालक आयुक्तांचे सरळ आता’स्वीय सहाय्यक’ बनले आहेत, विशेष म्हणजे आयुक्त कार्यालयाचा संपूर्ण कारभार या वाहनचालकाच्या मुठीत असून सामान्य प्रशासन विभागाचा विभाग प्रमुख हेदेखील त्या वाहन चालकासमोर मिंध्ये कसे होतात, याची खमंग चर्चा महापालिकेत रंगली आहे.

या वाहनचालकाला आयुक्त कार्यालयातील एक डाटा ऑपरेटर महिला कर्मचारी संपूर्ण बातम्या पुरवते असे सांगितले जात आहे. या दोघांच्या सलगीची देखील खमंग चर्चा महापालिकेत रंगली आहे.विशेष म्हणजे इतरांची बदली करणारे तुकाराम मुंढे यांनी या महिला डाटा ऑपरेटर ची बदली फक्त दाखवण्यापुती आरोग्य विभाग (मेडिसिन)येथे करोना रुग्णांच्या नोंदणीसाठी केली आणि वाहन चालक याच्या सांगण्यावरून ‘दीड तासात’ ती बदली रद्द करून पुन्हा आयुक्त कार्यालयात त्याच पदावर त्या डेटा ऑपरेटरला पुनर्नियुक्ती दिली याची देखील खमंग चर्चा आज मनपात चांगलीच रंगली.

विशेष म्हणजे आयुक्त यांनी आज बजेट सादर केले. बजेट सादर करताना आयुक्त सातत्याने नियमांवर बोट ठेवत होते मात्र त्यांच्याच नाकाखाली त्यांचे वाहन चालक कशा प्रमाणे संपूर्ण आयुक्त कार्यालाय वेठीस धरून मनमानी कारभार करीत आहे याचीच चर्चा आज मनपात कर्मचाऱ्यांमध्ये बजेट नंतर चांगलीच रंगली होती. वाहन चालकाला स्वीय सहाय्यक पद देणे हे मनपाच्या कोणत्याही नियमात बसत नाही मात्र नियमात बसविण्याकरिता आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘कनिष्ठ लिपिक’ पदावर त्यांची बढती केली, बढती सोबत मात्र बदली करण्यास ते विसरले!

हेच स्वीय सहाय्यक पगार मात्र कनिष्ठ लिपिक पदाचा मनपाकडून घेत आहे मात्र गंभीर बाब ही आहे भ्रष्टाचारावर सातत्याने बोट ठेवणारे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या स्वतःच्या नाकाखाली स्वीय सहाय्यक करीत असलेला भ्रष्टाचार याची देखील चर्चा दबक्या आवाजात केली जात आहे.आयुक्तपदी अभिजीत बांगर असताना त्यांच्या घरी रेशनचा तो कोटा जायचा त्यातील तेलाचे दोन डबे बांगर यांच्या घरी जात होते एक डबा हा वाहन चालकाच्या घरी पोहोचायचा असे खाजगीत, नाव न छापण्याच्या अटीवर सूत्रांनी माहिती दिली. आयुक्त पदी मुंढे रुजू झाल्यानंतर या वाहन चालकाने मुंढे यांना चांगलेच ‘गेअर’मध्ये घेतलं असल्याचे सांगितले जात आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिस्तीचा आणि नियमांचा सतत ढोल पिटणारे आयुक्त हे अतिशय कानाचे कचचे असल्याची उपरती एका महिन्यात नागपूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना झाली हे विशेष. कानाचे कच्चे आयुक्त असे विशेषण एका महिन्यात नागपूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आयुक्त मुंढे यांना बहाल केले असल्याचे खासगीत सांगितले जात आहे. विशेष म्हणजे आयुक्त कार्यालयात असणारी दुसऱ्या डेटा ऑपरेटर हिची आठ वर्षात चार बदल्या करण्यात आल्या आणि आज आरोग्य विभाग मेडिसीन मध्ये करोना रुग्णांचे डिटेल्स घेण्यासाठी नियुक्ती देण्यात आली.

सकाळी आठ ते रात्री दहा अशी कामाची वेळ ठरवून देण्यात आली. मुळात ही डेटा ऑपरेटर महानगरपालिकेत कर संग्राहक पदावर नियुक्त झाली असताना देखील तिला डेटा ऑपरेटिंग चे काम देण्यात आले सोबतच डिस्पॅच हीदेखील जबाबदारी तिच्यावर सोपवण्यात आली. दोन्ही कामे करीत असताना अचानक मुंढे यांनी स्वीय सहाय्यकाच्या सांगण्यावरून या डेटा ऑपरेटरची बदली आरोग्य विभागात (मेडिसिन) मध्ये केली मात्र दुसरी डेटा ऑपरेटर हिची आठ वर्षात पहिल्यांदा बदली झाली ती ही बदली अवघ्या दीड तासात रद्द करून लगेच पुन्हा आयुक्त कार्यालयात त्याच पदावर तिला रुजू करण्यात आले, यामागे स्विय सहाय्यक आणि डेटा ऑपरेटर यांची सलगी याची देखील खमंग चर्चा आज महानगरपालिकेत चांगलीच रंगली होती.

विशेष म्हणजे जगभर ज्या ‘ करोना’ विषाणूने धुमाकूळ घातला आहे,मनपाआयुक्त अश्या रोगाप्रति किती गंभीर आहेत याची झलक त्यांनी आरोग्य विभागात केलेल्या नियुक्त्यावरून दिसून पडली.आरोग्य विभागातील(मेडिसिन) विजय जोशी यांची आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘समन्वयक’ म्हणून नियुक्ती केली,नियमानुसार त्यांना अशी नियुक्ती करता येत नाही कारण यासाठी एमबीबीएस असणे गरजेचे आहे. जोशी यांच्याकडे प्राकृतिक चिकित्सक ही पदवी असून त्यांना डॉक्टर ही उपाधी देखील लावता येत नाही.मनुष्यबळ अभावी आयुक्तांनी ही नियुक्ती केली असावी असा कयास जरी लावला तरी त्यांच्या दिमतीला मनपाकडून लाखो रुपये दरमहा पगार घेणारे दोन सहायक वैद्यकीय अधिकारी यांचे स्वतःचे धंतोली येथे प्रशस्त रुग्णालय व एकाची प्रशस्त पॅथॉलॉजी लॅब असताना ‘ करोना’ साठी हे दोन्ही सहायक वैद्यकीय अधिकारी किती वेळ आणि परिश्रम देणार? याची देखील दबक्या आवाजात आज चर्चा ऐकू आली. सतत नियमांचे डोज पाजणारे मनपा आयुक्त हे स्वतः मनमानेल त्या पद्धतीने व नियमात न बसणारा कार्यभार करीत असल्याची चांगलीच नाराजी अनेक कर्मचाऱ्यांनी खासगीत बोलून दाखवली.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या