फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजतुकाराम मुंढे यांचा शिस्तीचा बडगा : अधिकाऱ्यांना भरली धडकी

तुकाराम मुंढे यांचा शिस्तीचा बडगा : अधिकाऱ्यांना भरली धडकी

तुकाराम मुंढे यांचा शिस्तीचा बडगा : अधिकाऱ्यांना भरली धडकी

डॉ. ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर: बहूचर्चित,सुविख्यात,शिस्तप्रिय आणि प्रामाणिक अशी ज्यांची महाराष्ट्रात ख्याती आहे ते सनदी अधिकारी तुकाराम मुंडे अखेर नागपूर महानगरपालिकेत मंगळवारी २८ जानेवारीला आयुक्त पदी रुजू झालेत मात्र दोनच दिवसांच्या कार्यकाळात त्यांच्या शिस्तप्रिय कामकाजाची चांगलीच धडकी अधिकाऱ्यांमध्ये भरली असल्याचे चित्र महापालिकेतील नवीन ईमारतीत ठलकपणे दिसून पडले.

काल पासून सर्वच विभागाच्या बैठका वर बैठका ते घेत असून रुजू झाल्याचा दुसऱ्या दिवशीही ते बैठकीतच व्यस होते. ‘शासकीय नियमात’ बसणाऱ्या अनेक ‘सूचना’त्यांनी अधिकारी वर्गाला केल्या एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर ड्रेसकोड, स्वच्छता व शिस्त यांचा नितांत अभाव असणाऱ्या मनपामध्ये त्यांनी या तिन्ही गोष्टींसाठी फक्त ‘सूचना’ दिल्या नाहीत तर अाधी अधिकाऱ्यांना खूप खडे बोल सुनावल्याची चर्चा मनपामध्ये आज चांगलीच रंगली.

वैधकीय अधिकारी,कर्मचारी व परिचारिका यांना पांढरा अप्रान घालून येण्याच्या सूचना आयुक्तांना द्यावा लागतात खरे तर याचेच नवल उपस्थितांना वाटले. पुरुषांनी दाढी करुन यावी, स्वच्छ वस्त्र परिधान करावे, महिलांनी जीन्स घालून कार्यालयात येऊ नये, १० वाजता मुख्यालयाचे मुख्य द्वार बंद होईल व ते कोणासाठीही नंतर उघडले जाणार नाही, कामानिमित्त बाहेर जावे लागणार असल्यास नोंदवहीत जाण्याची व येण्याची वेळ नोंदवून कोणत्या कामासाठी कार्यालयीन वेळेत बाहेर पडला हे कारण देखील यापुढे अधिकारी व कर्मचार्यांना नोंदवहीत नोंदवण्याच्या सूचना त्यांनी केल्या. तसेच सर्कूलरच त्यांनी प्रत्येक विभागाकडे पाठवल्याची माहिती आहे.

अनेक विभाग प्रमूखांकडून त्यांनी आज प्रेझेंटेशन घेतले असल्याची माहीती आहे. सूमार सादरीकरणावर ते अनेक विभागप्रमूखांवर चांगलेच बसरले. सर्वात गंभीर प्रश्‍न हा मनपा शाळा आणि मनपाच्या दवाखान्यांचा असून शहरातील सामान्य नागरिकांशी संबधीत या दोन्ही जीवनावश्‍यक बाबीमध्ये मुंडे यांना चांगलीच सुधारणा करावी लागणार आहे. अनेक मनपा शाळेत फक्त ८ मुले असून शिक्ष् कांची संख्या मात्र ४-५ आहे.मनपा दवाखाने,हेल्थपोस्ट,युपीएचसी केंद्रे, आंतर रुग्णालयांची संपूर्ण झाडाझडती घेऊन या विभागाच्या प्रमुखाला आयुक्तांनी चांगलेच खडे बोल सुनावले असल्याची चर्चा बाहेरपर्यंत रंगली. त्यांनी आयुक्तांच्या सूचनेबरहूकूम सर्व वैद्यकीय अधिकारी यांच्या नावे निर्देश पत्रच काढले.

यात मनपा दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी,परिचारिका,कर्मचारी यांनी दवाखान्यांच्या नियमित वेळेत हजर राहावे.दवाखाना व दवाखान्याचा परिसर स्वच्छ राहील याची काळजी घ्यावी अन्यथा या संबंधीची जवाबदारी इन्जार्च वैद्यकीय अधिकारी रयांच्यावर राहील. वैद्यकीय अधिकारी,कर्मचारी व परिचारिका यांनी स्वच्छ अप्रानमध्ये हजर राहावे,दवाखान्यातील आवश्‍यक नोंदवह्या,रजिस्टर अद्यावत राहील याची दक्ष् ता घ्यावी,दवाखान्यातील औषधी साठा अद्यावत ठेवावा,कामासंबधी बाहेर जाण्याचे असल्यास याबाबतची नोंद नोंद वहीत दिनांक,वेळ व कारणासह करावी अश्‍या सूचना देण्यात आल्या आहेत.आयुक्त हे अकस्मात भेट देणार असल्याचीही स्पष्ट सूचना यात अंतर्भूत आहे.

आयुक्त पदी मुंढे रुजू होताच दुसऱ्याच दिवशी आयुक्त इमारतीतील बायोमेट्रिक मधीन ही चमत्कारीरित्या दुरुस्त झाली,वरिष्ठ पदाधिकारी ते चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांनी अनेक वर्षांच्या कालखंडानंतर आपले ‘बोट’ मशीन वर ठेवल्याचे किस्सा ही चर्चिला जात होता. पूर्वी एकदा पंचिंग झाली की कार्यालयीन वेळ ही अनेक कर्मचाऱ्यांसाठी खाजगी वेळ होऊन जातं होती. कोणी बँकेत पैसे भरायला जात होते,कोणी दवाखाण्याचा नंबर लावून आलेले होते,कोणाला मुलांच्या शाळेत काम होते,पगार मात्र हजारोंच्या घरात खाजगी कामे केल्यावरही मिळतच होता. या बेशिस्तीला आयुक्तांनी पहिल्याच दिवशी लगाम लावल्यामुळे अनेकांचे धाबे दणाणल्याचे चित्र मनपा मुख्यालयात दिसत होतं

आरोग्य केंद्राची वेळ दोन पाळी मध्ये होण्याची शक्यता-आता मनपा कर्मचारी व राजकीय नेते काेणती भूमिका घेणार? वैद्यकीय अधिकार्यांचा सवाल
या पुढे मनपा,एन.यु. एच.एम,आरोग्य केंद्रांची वेळ २ पाळी मध्ये सुरु करण्याबाबत प्रस्तावित असल्याची सूचना उपसंचालक(आरोग्य)यांच्याकडून प्राप्त होताच नुकतेच मनपात घडलेल्या किस्स्यावर दिवसभर खल झाला. अप्पर आयुक्त राम जोशी यांच्या सूचनेनुसार आरोग्य केंद्रांची वेळ सकाळी ८ ते २ ऐवजी ८ ते ४ करण्याची सूचना एका वैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आली होती. अप्पर आयुक्तांच्या सूचनेनुसार त्या वैद्यकीय अधिकारी यांनी तसा सर्कूलर काढला यावर कर्मचारी तसेच राजकीय नेत्यांनी त्या वैद्यकीय अधिकारीला चांगलेच फैलावर घेतले होते. फक्त दोन तासांचा वेळ वाढवला होता ते ही अप्पर आयुक्तांच्या सूचनेनूसार मात्र कोणतीही चूक नसताना बैठकीत त्या वैद्यकीय अधिकारीला अत्यंत अपमानास्पद वागणूकीला सामोरे जावे लागले होते. आज उपसंचालकांनी काढलेल्या या निर्देश पत्रानूसार आता तर मनपाच्या सर्वच आरोग्य केंद्राची वेळ दोन पाळीमध्ये सुरु होणार आहे. आता कर्मचारी व राजकीय नेते यावर काय भूमिका घेणार?असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केल्याची चर्चा आहे.

आयुक्तांनी अद्याप घेतली नाही महापौरांसोबत अनौपचारिक भेट!
सनदी अधिकारी हे आयुक्त पदी रुजू होताच पहील्याच दिवशी ते महापौरांची अनौपचारीक भेट घेत असतात. याला कट सी भेट म्हणतात  शेवटी महापालिकेचे सर्व निर्णय हे प्रशासकीय व जनतेचे प्रतिनिधी म्हणून राजकीय स्तरावरच निर्धारित होत असल्यामुळे दोघांच्याही कामात समन्वय असावा,यासाठी आयुक्त हे महापौरांच्या कक्ष्ात जाऊन त्यांची अनौपचारीक भेट घेत असण्याचा पायंडा पडला आहे. आजवर मनपात आलेल्या सर्वच माजी आयुक्तांनी हा पायंडा पाळला आहे मात्र मुंडे यांना मनपात आयुक्त पदी रुजू होऊन दाेन दिवसांचा कालावधी लोटला असला तरी त्यांनी अद्याप महापौरांची भेट घेतली नसल्याची देखील चर्चा मनपात रंगली होती. यामागे वेगवेगळे तर्कही लढवले जात असल्याचे दृष्य मनपात दिसून आले.

पायपोस व पदाधिकाऱ्यांची कोंडी!

आयुक्त तुकाराम मुंडे यांनी संपूर्ण नवीन प्रशासकी इमारत पिंजून काढण्यासाठी कंबर कसली असून त्यांच्याच मजल्यावरी एका पदाधिकार्यांच्या कक्ष्ासमोर भला मोठा ‘पायपोस’त्यांना दिसला. हा पायपोस का ठेवण्यात आला?असा प्रश्‍न मुंडे यांनी त्या पदाधिकाऱ्यांना विचारताच त्यांच्या कक्ष्ात चिखलाचे पाय घेऊन लोकं येतात,असेच उत्तर पदाधिकारी यांना सूूचले या उत्तरावर त्यांना चांगलेच ‘प्रतिउत्तर’ मुंडे कडून एेकून घ्यावे लागले व शेवटी तो ‘पायपोस’तेथून उचलण्यात आला. आयुक्तांच्या मजल्यावर प्रवेश द्वारावरच भला मोठा ‘पायपोस’ ठेवण्यात आला असून ,तिथूनच पांतस्थ आत येतात त्यामुळे या अतिरिक्त ‘पायपोस’ची गरजच काय होती?या प्रश्‍नाचे उत्तर आज दिवसभर मनपाचे कर्मचारीच शोधत होते!

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या