Homeनागपूर न्यूजप्यारे खान विरोधातील आंदोलनात सिख समुदायाचा अपमान!

प्यारे खान विरोधातील आंदोलनात सिख समुदायाचा अपमान!

Advertisements
बोले सो निहाल…हा जयकारा मोर्चे,आंदोलनासाठी नाही,हा सिख धर्माचा अपमान
गोल्डी तुलीवर सिख समुदाय संतप्त:कठोर कारवाईची केली मागणी

नागपूर,ता.२९ ऑक्टोबर २०२६: महाराष्ट्र अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांच्या विरोधात विश्‍व हिंदू परिषद व बजरंग दल नागपूरात वेळोवेळी आंदोलने करीत आहे.याच्याशी सिख समुदायाचा काहीही संबंध नाही मात्र,शिवाजी पुतळा महाल येथे झालेल्या आंदोलनात गोल्डी तुली याने स्वत:च्या राजकीय फायदासाठी दोन-चार सिख बंधूंना सहभागी करीत,गुरुद्वारा समितीसोबत कोणताही सल्ला विमर्श न करता सिख समुदायासाठी अत्यंत पवित्र असणारी ‘बोले सो निहाल,सत् श्री अकाल’हा जयकारा दिला. हा संपूर्ण सिख धर्मियांचा घोर अपमान असून गोल्डी तुली याच्यावर कठोर कारवाईची मागणी आज पत्रकार परिषदेत गुरुद्वारा श्री गुरु तेग बहादूर साहिब समितीच्या पदाधिका-यांनी केली.
सिख समुदायाची प्रतिमा अश्‍या राजकीय व धार्मिक आंदोलनात मलीन केल्या विरोधात, सिख समुदायाच्या बांधवांनी गुरु अंगद भवन गुरुद्वारा बाबा बुड्ढा जी,टेका नाका येथे विरोध प्रदर्शन ही केला.याप्रसंगी बोलताना,समितीच्या सदस्यांनी सांगितले की,काही लोक स्वत:च्या आर्थिक व राजकीय फायदासाठी प्यारे खान यांच्यावर खोटे आरोप करीत आहेत.प्यारे खान हे राज्याच्या अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष आहेत आणि सिख समुदाय हा अल्पसंख्यांक आहे.मात्र,आमचा प्यारे खानला कोणताही विरोध नाही.असे असताना गोल्डी तुली याने काही सिख बांधव घेऊन बजरंग दलाच्या आंदोलनात सहभागी होऊन सार्वजनिक ठिकाणी आमचा पवित्र जयकारा, नारेबाजीसाठी करणे हा सिख धर्माचा घोर अपमान आहे.आमच्या सिख धर्मियांचा जयकारा फक्त आमच्या धार्मिक कार्यक्रमात दिला जातो,कोणत्याही मोर्चा,आंदोलनात ‘बोले सो निहाल…’हा जयकारा दिला जात नाही.आम्ही गोल्डी तुली याच्या या कृत्याचा तीव्र निषेध करतो,असे ते म्हणाले.
प्यारे खान हे संवेदनशील मनाचे असून आपल्या समाजसेवीवृत्तीमुळे करोना काळात जगभरात गाजले.एकीकडे प्राणवायू अभावी करोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू होत असताना त्यांनी मोठ्या प्रमाणात गरजूंच्या एका कॉलवर अहोरात्र झटून आपल्या लहानश्‍या वाहनातून ऑक्सीजन पुरवठा केला.आपल्या याच सेवाभावी वृत्तीतून त्यांची जगभरात ‘ऑक्सीजन मॅन’म्हणून ख्याती झाली.एखादा व्यक्ति गरीब पार्श्वभूमीतून आपल्या चांगल्या स्वभाव व परिश्रमातून वर आला तर त्याचा विरोध, धर्माच्या आधारावर का?असा प्रश्‍न त्यांनी केला.प्यारे खान यांनी कधीही धर्माच्या आधारावर भेदभाव केला नाही उलट सर्व अल्पसंख्यांक समुदायाला सोबत घेऊन चालण्याचा ते प्रयत्न करतात.अशा वेळी हिंदूत्ववादी संघटनांच्या प्यारे खान विरोधात आंदोलनात सिख समुदाय देखील सहभागी आहे,हे दाखवण्याचा गोल्डी तुली याचा प्रयत्न अत्यंत निंदनीय असल्याचे गुरुद्वारा समितीचे सदस्य म्हणाले.
महत्वाचे म्हणजे,त्या आंदोलनात प्यारे खान यांचा पुतळा जाळण्यात आला.मुस्लिम धर्मियांमध्ये मृत्यू नंतर दफनविधी होतो,त्यांच्यात जाळण्याची प्रथा नाही.असे असताना एका मुस्लिम धर्मिय व्यक्तीचा पुतळा दहन होने,ही देखील अतिशय निंदनीय बाब असल्याचे त्यांनी सांगितले.मुळात गोल्डी तुली हा सिख समुदायाचे प्रतिनिधित्व करीत नाही,त्याच्या मागे त्याचे कुटूंबिय सोडून कोणताही सिख बांधव किंवा शिख समित्या नाहीत.या पत्रकार परिषदेत विविध शिख समुदाय समितीचे अध्यक्ष,सचिव सगळे उपस्थित असल्याचे त्यांनी सांगितले.
आमची शिख कौम,भाईचाराचा संदेश घेऊन चालणारी कौम असून आमचा कोणत्याही व्यक्ति विशेष विरोधात संघर्ष नाही.आमच्या कौमचा प्यारे खान विरोधात देखील कोणताही संघर्ष नाही.प्यारे खान यांच्यावर हिंदूत्ववादी संघटना भ्रष्टाचार,जमीन व्यवहार इत्यादी सारखे गंभीर आरोप करीत राजीनामा मागत आहेत मात्र,आम्ही प्यारे खान यांना व्यक्तिगतरित्या ओळखत असल्याने व आमच्या सिख समुदायासाठी अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष म्हणून ते करीत असलेल्या कार्यामुळे,आम्हीच हे आज आव्हान करतो की त्यांचा एक ही भ्रष्ट कारभार हिंदूत्ववादी संघटनांनी पुराव्यासह समोर आणावा,असे झाले तर आम्ही पण हिंदूत्ववादी संघटनेला साथ देऊन प्यारे खान यांचा राजीनामा मागू,असे आवाहन त्यांनी केले.
आरोप लावणे फार सोपे असते मात्र,कोणताही पुरावा ते देत नाहीत व प्यारे खान विरोधात फक्त आंदोलने करतात.विश्‍व हिंदू परिषद किंवा बजरंग दलाचे पदाधिकारी प्यारे खान यांच्या विरोधात जे जनआंदोलन करीत आहेत त्यांनी देखील त्यांच्या या कृतीचा विचार करावा,असे आवाहन त्यांनी केले.मूळात आमचा विषय प्यारे खान नसून गोल्डी तुली हा आहे.त्याने जो प्रकार केला त्या विरोधात नागपूरातील सिख समुदाय हा पेटून उठला आहे.गोल्डी तुली हा आमच्याच सिख समुदायात फूट पाडण्याचे कार्य करीत राहतो.आमच्या विविध गुरुद्वारा समितीत भांडणे लावण्याचे कामच हा गोल्डी तुली करीत असतो.इतकंच नव्हे तर गुरुद्वारा समितीतील पदाधिका-यांच्या अनेक महिलांवर देखील खोट्या एफआयआर तो दाखल करीत सुटतो,असा अारोप त्यांनी केला.
महाराष्ट्र सरकारने नागपूरात जो अतिशय लोकप्रिय झालेला ‘हिंद की चादर’कार्यक्रम आयोजित केला होता,त्या कार्यक्रमात मी अध्यक्ष होतो व सर्व सिख समित्यांनी मिळून तो कार्यक्रम सादर केला. त्या कार्यक्रमातही या गोल्डी तुलीने खूप अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला.आमच्या व कार्यक्रमा विरोधात जिल्हाधिकारीपर्यंत त्याने अनेक निवेदन दिले,हा गोल्डी तुली नावाचा माणूस नागपूरातील कोणत्याही सिख समितीशी जुळलेला नाही ना तर तो सदस्य आहेत.तो फक्त नागपूरातील काही श्रीमंत व्यक्तिंसोबत जुळून लाभ पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करतो,त्यांची कामे काढून देतो,सर्वसामान्य लोकांमध्ये आपला दरारा निर्माण करण्याचा प्रयत्न करणारा तो एक विकृत माणूस असल्याची जहाल टिका याप्रसंगी सिख समिती पदाधिका-यांनी केली.त्याचे एकच धोरण आहे,‘फूट डालो और राज कर‘.असे ते म्हणाले.
आता तर प्यारे खानचा जो पुतळा जाळण्यात आला त्यात गोल्डीचा हाच उद्देश्‍य होता की नागपूरात सिख आणि मुसलमांनामध्ये संघर्ष व्हावा,दंगली घडाव्या,असा गंभीर आरोप त्यांनी केला.जगभरात नागपूरची शांतिप्रिय शहर म्हणून ओळख आहे.गोल्डीसारख्या मनोविकृत माणसामुळे सिख समुदाय शहरातील शांति भंग होऊ देऊ इच्छित नाही, त्यामुळेच गोल्डी तुलीवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी.आमचा समुदाय एकजुट आहे.या पुढे असे घडले तर त्याला पुरजोर उत्तर दिले जाईल,असा इशारा त्यांनी दिला.मूळात गोल्डी तुलीची नजर प्यारे खानच्या पदावर आहे कारण ते दोघेही एकाच राजकीय पक्षाचे असल्याचा आरोप त्यांनी केला.
व्यक्तिगत शत्रूत्व काढण्यासाठी सिख समुदायाचा पवित्र जयकारा रस्त्यांवर आंदोलनात केला जात नाही.जे अल्पसंख्यांक समुदायाचे आहेत त्यांनी देखील अश्‍या प्रवृत्तीचा विरोध केला पाहिजे,असे आवाहन त्यांनी केले.प्यारे खानसोबत गोल्डी तुलीचे व्यक्तिगत शत्रूत्व असले तरी त्यासाठी सिख समुदायाचे पवित्र जयकारे, मोर्चे-आंदोलनात देण्याची सूट तुली याला देता येणार नाही.सिख समुदायाला बदनाम करण्याचे कृत्य गोल्डी तुलीने केले आहे.सिख समुदाय हा ‘भूके को खाना खिलानेवाला व बेघर को घर देनेवाला समाज है’,ना तर सिख समुदाय कोणाचा विरोध करतो ना माणूसकीला विभाजीत करण्याचे काम करतो,असे ते म्हणाले.गोल्डीसारखा माणूस स्वत:च्या धर्माचा झाला नाही तर हिंदू लोकांचा काय होईल,असा टोला त्यांनी हाणला.
आम्ही कोणतेही काम करताना आमच्या विविध सिख समित्यांची बैठक घेत असतो.ही घटना घडली त्यानंतर आमची बैठक झाली व गोल्डी तुलीच्या या कृत्याचा निषेध नागपूरातील चौदा गुरुद्वारा समितीतर्फे करण्याचा निर्णय आम्ही घेतला.यासाठीच आजची पत्रकार परिषद आम्ही आयोजित केली असल्याचे समितीच्या पदाधिका-यांनी सांगितले.आम्ही कोणाच्याही बाजूने नाही किंवा कोणाच्याही विरोधात नाही.फक्त जर असाच आमचा पवित्र जयकारा कोणाच्या विरोधातील आंदोलनात लावला जाईल किंवा शहरात हिंदू-मुस्लिम किंवा सिख-मुस्लिम दंगली घडवण्याच्या उद्देशाने लावला जाईल,त्याचा निषेध करणे आमची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
(बातमी संदर्भातील व्हिडीयो sattadheesh official युट्युब चॅनलवर उपलब्ध)

Latest बातम्या