Advertisements

(पदवीधर निवडणूक विशेष)
डॉ.ममता खांडेकर
(मुख्य संपादक ‘सत्ताधीश’)
नागपूर,ता. २९ ऑक्टाबर २०२६: नागपूरात पदवीधरचा निकाल हा धक्कादायक नव्हता,या निवडणूकीत काँग्रेसचे उमेदवार ॲड.अभिजित वंजारी यांनी अवघ्या ३ हजार २७१ मतांनी ही निवडणूक जिंकली.ज्यावेळी भाजपकडून माजी आमदार सुधाकर कोहळे यांचे नाव महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळेंच्या आग्रहाखातर जाहीर झाले त्याच वेळी अर्धी निवडणूक भाजपच्या हातून निसटली होती कारण सुधारकर कोहळे हे नाव भाजपच्याच अनेक आजी-माजी आमदारांना चालणारे नव्हते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात पदवीधरसाठी काँग्रेसच्याच एका विद्यामान आमदाराचे नाव होते.तब्बल २५ वर्षे भाजपचा हक्काचा मतदारसंघ असणारा पदवीधर मतदारसंघ २०२० मध्ये महाविकासआघाडीने हिसकावून घेतला होता.त्यामुळे भाजपला काँग्रेसचा उमेदवार भाजपात घेऊन हा गड पुन्हा सर करायचा होता. मात्र,भाजपच्याच एका ‘तेली’जातीच्या कद्दावर नेत्याला काँग्रेसच्या त्या आमदारांचा भाजप प्रवेश धोक्याची घंटा ठरणार होता कारण त्या आमदाराने विजयी झाल्यावर मंत्रीपदाची मागणी केली होती,अशी चर्चा आहे.भाजपच्या त्या कद्दावर व महाराष्ट्रातील क्रमांक तीन च्या नेत्याला आपल्याच जातीचा दुसरा स्पर्धक पक्षात नको होता,त्यामुळे तब्बल तीन महिने ‘वेटिंग’वर राहील्यानंतर काँग्रेसच्या त्या आमदाराचा भाजप प्रवेश प्रस्ताव रद्द नव्हे तर रद्दीत जमा झाल्यानंतर त्यांनी भाजपचा ’नाद’सोडून आपल्याच पक्षाकडून लढण्याचा निर्णय ‘पक्का‘केला.
स्वत:मुख्यमंत्री यांनी आपल्या एका भाषणात बोलताना,भाजपच्या त्या कद्दावर मंत्र्यांनी ‘स्वत:लावलेलं झाड स्वत: कापले असल्याची’कोटी केली होती!सुधाकर कोहळे यांची बावणकुळे यांनी ७ सप्टेंबर २०२५ रोजी विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या नोंदणी प्रमुखपदी निवड केली.तेव्हाच पदवीधरसाठी कोहळे हेच उमेदवार असतील यावर पक्षाच्या आतील गोटात शिक्कामोर्तब झाले होते.मात्र,हे नाव भाजपचेच नागपूरातील किमान तीन आमदार यांना चालणारे नव्हते.यामुळे ही निवडणूक घोषित झाल्यावर कोराडीतील नैवेद्यममध्ये पार पडलेल्या बैठकीत फडणवीस यांनी भाजपच्या सर्व आमदार,नेते व पदाधिका-यांना सज्जड दम दिला होता.या निवडणूकीत ज्यांनी मनापासून काम केले नाही त्यांचा हिशेब निवडणूकी नंतर घेतला जाईल,त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा विचार केला जाईल,असे फडणवीस म्हणाले.मात्र,त्यांच्या या दमदाटीचा कितपत उपयोग झाला,हे नागपूर पदवीधरच्या निकालाने स्पष्ट केले.
आता भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी नागपूरसह पुणे व अमरावतीच्या पराभवाचे सखोल विश्लेषण करुन देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना अहवाल पाठवणार असल्याचे घोषित केले.मात्र,मतदानच्या दिवशी २३ ऑक्टोबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: नागपूरातील अनेक बूथवर फिरले व त्यांच्या उपस्थितीमुळे भाजप नेते व पदाधिकारी यांनी धावपळ करीत गाड्याच्या गाड्या भरुन प्रत्येक मतदान केंद्रांवर पदवीधर उमेदवारांच्या रांगा लावल्या,तरीही भाजपचा पराभव झाला, त्याचे विश्लेषण रविंद्र चव्हाण नेमके कसे करणार?हा यक्ष प्रश्न आहे.
रांगा तर लागल्या मात्र,हजारो पदवीधरांनी मतप्रत्रिकेत कोहळे यांच्या समोर २ हा आकडा टाकून मोकळे झाले!पदवीधर निवडणूकीत १ हा आकडा लिहणे अनिवार्य असतानाअन्यथा मतपत्रिका बाद होत असते हे माहिती असताना देखील, कोहळे यांना मिळालेल्या मतांच्या तब्बल ९ ते साडे नऊ हजार मतपत्रिका बाद होत असतील तर याचे ‘नियोजन’ बूथस्तरावरच कश्याप्रकारे झाले,हे सिद्ध होतं.
पदवीधर मतदार हे ग्राम पंचायतीचे मतदार नव्हते,ग्राम पंचायतीचे मतदार देखील सरपंच व सदस्य निवडून आणताना मतदानात चुका करीत नाही,येथे तर हजारो मतपत्रिकांवर कोहळे यांच्या समोर फक्त २ हा आकडा टाकण्यात आल्याचे निर्दशनास आले.याचा अर्थ कोहळे यांच्या पराभवा मागे भाजपचेच नियोजन होते का?हा प्रश्न उपस्थित होतो.स्वत:कोहळे यांनी काल रात्री माध्यमांना प्रतिक्रिया देताना हे मान्य केले की त्यांच्या नावा समोरील २ या आकड्याने घात केला अन्यथा विजयाचे दृष्य वेगळे राहीले असते.
अर्थात भाजपसाठी एक समाधानकारक बाब म्हणजे यंदा सुधाकर काेहळे यांना पहील्या व दुस-या पंसती क्रमांकांची एकूण ६७ हजार २३१ मते मिळाली असून संदीप जोशी यांना ४२ हजार ७९१ मते पडली होती.याचा अर्थ भाजपने यंदा वीस हजार मतांची आघाडी घेतली आहे.असे असले तरी भाजपला या वाढीव मतांचा कोणताही फायदा झाला नाही.
जात फॅक्टर पुन्हा चालला…
पदवीधरसारख्या मतदारसंघात किमान ‘जातीपातीच्या’ नावावर मतदान होने हे पुरोगामी महाराष्ट्रात ‘अशोभनीय’ व तितकीच ’शोचनीय’ बाब असली तरी देखील कोहळे यांच्या विरोधात ब-याच प्रमाणात ‘तेली’मते एकवटली अशी चर्चा आहे.भाजपमधीलच बहूतांश तेली मते वंजारींकडे वळली हे पण सत्य असले तरी वंजारी यांना सर्वच घटकांमधून मतदान झाले आहे हे देखील मान्य करावे लागेल.विशेषत: अनुसूचित जाती-जमातीच्या मतदारांनी अर्वाजून दुस-या पसंदी क्रमांकाची मते ही वंजारी यांच्या झोळीत घातली.उदाहरणार्थ,अपक्ष थूल यांनी सव्वा तीन हजार पहील्या पसंतीची मते घेतली असून थूल यांच्याच मतदारांनी तब्बल ६५० दुस-या पसंतीची मते वंजारी यांच्या पारड्यात टाकली होती त्यामुळे वंजारी यांना बाद फेरीत कोहळे यांच्या ४ हजार ४८ मतांचे मताधिक्याचे अंतर कमी-कमी करण्यात यश मिळत राहीले.अनुसूचित जाती-जमातीची मते ही कधीही भाजपच्या पारड्यात पडत नाहीत त्यामुळेच भाजप हा बहूजनांचा पक्ष असल्याचा दावा कश्याच्या आधारावर करतो?याचे देखील विश्लेषण रविंद्र चव्हणांना करावे लागेल.
यात ही एका अपक्ष उमेदवाराच्या नावासमोर पहील्या पसंतीची एक हजार मते त्या उमेदवाराला मिळाली असली तरी किमान ३०० मते अशी होती जी एकाच ‘पॅर्टन’ची होती!पहीली पसंत त्या उमेदवाराला,दूसरी कोहळे!याचाच अर्थ डमी उमेदवार निवडणूकीत कश्याप्रकारे उतरवले जातात,कश्याप्रकारे नितीमत्ता शून्य नियोजन केले जाते,याचे ही उदाहरण पदवीधरांच्या निवडणूकीत बघायला मिळाले.महत्वाचे म्हणजे त्या उमेदवाराच्या मतपत्रिकेत ३०० ची बेरीज कोहळे यांना गेल्यानंतर काँग्रेसची धडधड वाढली होती.जर सव्वा तीन हजार मते घेणा-या थूल यांच्याही बाबतीत हे घडले असते तर काँग्रेस समोर फार मोठे संकट उभे झाले असते मात्र,थूल यांना मतदान करणा-या मतदारांनी वंजारी यांना तब्बल साढे सहाशे मत देऊन कोहळे यांची आघाडी कमी करण्यास मोलाची मदत केली.
भाजपचा अतिआत्मविश्वास:दुस-या क्रमांकाची मते मागितलीच नाही!
केंद्र व राज्यात बलशाली व सत्ताधारी असलेल्या भाजपचा अतिआत्मविश्वास पदवीधरमध्ये भाजपला तिस-यांदा (बिहारच्या बांकीपूरमध्ये निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा विजय,गोकुळ दूधसंघाची अटीतटीची निवडणूक तसेच नागपूर पदवीधर निवडणूक) नडला व आम्ही पहील्याच पसंतीच्या फेरीत तब्बल ९० हजार मतांनी जिंकून येऊ असा फाजील आत्मविश्वास बावणकुळे तसेच कोहळे यांनी वर्तवला.संपूर्ण निवडणूक प्रचारात मुख्यमंत्र्यांपासून तर मंत्री,नेत्यांपर्यंत भाजपने दुस-या,तिस-या पसंतीची मते मतदारांना मागीतलीच नाही,ते त्यांच्या भटजी-शेठजीच्या मनोवृत्तीलाच जणू तडा जाणारी असल्याने भाजप कधीही दुस-या क्रमांकाची मते मागत नसल्यानेच २०२० मध्ये संदीप जोशी व २०२६ मध्ये सुधाकर कोहळे यांच्या पराभवाला कारणीभूत ठरल्याची चर्चा मतमोजणी केंद्रावर देखील ऐकू आली.२०२० च्या निवडणूकीतून कोणताही बोध न घेता,पहील्या पसंतीचीच मते आम्हाला भरभरुन पडणार या अतिआत्मविश्वासात भाजप नेते वावरत राहीले.ही पदवीधरची निवडणूक बॅलेट पेपरवर होत असून ईव्हीएम नाही,या निवडणूकीत दुस-या व तिस-या पसंती क्रमांकालाही विजयाचे गणित बदलण्यासाठी तितकेच महत्व आहे याचा विसरच भाजपच्या अति अहंकारी मनोवृत्तीला मान्य नसल्यानेच ,’भाजपचा ‘दयनीय पराभव मुख्यमंत्र्यांच्याच शहरात भाजपला पाहायला मिळाला,यात शंका नाही
दुसरीकडे काँग्रेसने मतदानाच्या तीन दिवस आधीपासून वंचितसह,अनुसूचित जाती-जमातीच्या अनेक संघटना व मतदारांना वंजारी यांना दुस-या क्रमांकाची मते देण्यासाठी विनंती केली होती.याचा ही परिणाम कोहळे यांच्या पराभवात दिसून पडला.
२०२० च्या निवडणूकीतून कोणताही बोध न घेता,पहील्या पसंतीचीच मते आम्हाला भरभरुन पडणार या अतिआत्मविश्वासात भाजप नेते वावरत राहीले.ही पदवीधरची निवडणूक बॅलेट पेपरवर होत असून ईव्हीएम वर नाही,या निवडणूकीत दुस-या व तिस-या पसंती क्रमांकालाही विजयाचे गणित बदलण्यासाठी तितकेच महत्व आहे याचा विसरच भाजपच्या अति अहंकारी मनोवृत्तीला पडला असल्याने भाजपचा ‘दयनीय’ पराभव मुख्यमंत्र्यांच्याच शहरात भाजपला पाहायला मिळाला,यात शंका नाही
युट्यूबर मतदारांनी केला घात-
या निवडणूकीत भाजपच्या उमेदवारांचा सर्वाधिक घात जर कोणी केला असेल तर ते आहेत तरुण पिढीचे पदवीधर मतदार.महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार नीतेश कराळे यांना तब्बल २४ हजार मतांचे दान पदवीधरांनी झोळीत घातले.इतकी प्रचंड मते कराळे मास्तर घेतील याचा अनुमानही भाजप व काँग्रेसवाल्यांना नव्हता.मात्र,कोहळे यांच्या दूर्देवाने मास्तर हे ‘गेम चेंजर‘ठरले.क-हाळे यांना मतांचे भरभरुन दान देणा-या पदवीधरांनी अगदी आठवणीने दुस-या पसंतीची मते वंजारी यांना देण्याची फार मोठी खेळी खेळली.याच मतांनी कोहळे यांना पराभवाच्या दारात नेऊन ठेवले.याशिवाय शरद पवार यांनी जरी त्यांना ऐन मतदानाच्या आदल्या रात्री पक्षातून काढणयाची खेळी केली व मास्तर सोशल मिडीयावर ढसाढसा रडले असले तरी ग्रामीणमध्ये अनेक भागात मास्तरांसाठी राष्ट्रवादीचेच बूथ लागले होते.ज्यांनी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्यास मोलाची भूमिका बजावली.
इतकंच नव्हे तर मास्तरच भाजपकडून ‘प्रायोजित’ होते,अशी देखील खमंग चर्चा आहे.मास्तर यांनी वंजारी यांनाच अडचणीत आणले होते मात्र,मास्तरांच्या पदवीधर मतदारांनी वंजारी यांना दुस-या पसंतीची मते देऊन मास्तरांचाच ‘गेम’केला!विविध समविचारी राजकीय पक्षांच्या मंचावरील मास्तरांची वैदर्भिय भाषणे आणि नाट्याभिनय हा ‘वैचारिक’पेक्षा ’व्यवसायिक’असतात असा देखील आरोप होत असतो!
युट्यूबर मतदारांनी केला घात-
या निवडणूकीत भाजपच्या उमेदवारांचा सर्वाधिक घात जर कोणी केला असेल तर ती आहे युट्यूबर पिढी पदवीधर मतदार.महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार नीतेश कराळे यांना तब्बल २४ हजार मतांचे दान पदवीधरांनी झोळीत घातले.इतकी प्रचंड मते कराळे मास्तर घेतील याचा अनुमानही भाजप व काँग्रेसवाल्यांना नव्हता.मात्र,कोहळे यांच्या दूर्देवाने मास्तर हे ‘गेम चेंजर‘ठरले.क-हाळे यांना मतांचे भरभरुन दान देणा-या पदवीधरांनी अगदी आठवणीने दुस-या पसंतीची मते मात्र,वंजारी यांना देण्याची फार मोठी खेळी खेळली.कारण या मतदारांना माहिती होते युट्यूबर क-हाळे सभागृहात आपले प्रश्न मांडू शकणार नाही परिणामी, त्यांनी दुस-या पसंतीची मते वंजारी यांच्याकडे वळती केली.याच मतांनी कोहळे यांना पराभवाच्या दारात नेऊन ठेवले.
जेन-झी आंदोलनाचाही परिणाम-
दिल्लीच्या जंतर मंतरवर २३ जुलै रोजी गृहमंत्री अमित शाहांच्या पोलिसांनी जेन-झीवर जो पाशवी लाठीमार केला,त्यामुळे देशभरातील तरुणाई ही भाजपवर प्रचंड संतापलेली आहे.पालक वर्ग ही स्वाभाविकपणे यात भरडला गेला..भाजपची लोकप्रियता ही जेन-झी ने गल्ली पासून तर दिल्लीपर्यंत अक्षरश:जमिनीवर आणली आहे.भाजपची घसरलेली लोकप्रियता ही देखील पदवीधरांच्या नापंसदीला कारणीभूत ठरली.स्वत:मुख्यमंत्री जेव्हा काेराडीच्या नैवेद्यममध्ये पदाधिकारी व कार्यकर्ते यांना ‘याद राखा’असा सज्जड दम देतात तेव्हा कार्यकर्त्यांनी देखील हेच ‘याद’ठेवले व आठवणीने घात केला.
याशिवाय भाजपचे बंडखोर अनिल सोले यांच्या घरी जाऊन मुख्यमंत्र्यांनी ‘एकदिलाचा’जो ‘मेलोड्रामा’केला व सोले यांना साश्रू नयनांनी माघार घ्यायला लावली,ती मुख्यमंत्र्यांच्या एकाधिकारशाहीची घटना देखील पदवीधर मतदारांच्या मनावर खोलवर बिंबवली गेली होती व मुख्यमंत्र्यांच्याच शहरात मुख्यमंत्र्यांचाच उमेदवार पाडण्याच्या मनस्थितीपर्यंत पोहोचली होती.त्यामुळेच,नागपूरचा पराभव हा भाजपच्या ‘शटर डाऊन’ची सुरवात आहे,सोशल मिडीयावर अश्या मिम्सचा महापूर कोसळला आहे.
मूळात कोहळे हा विषयच या निवडणूकीत नव्हता.नागपूरात जे पदवीधरचे मतदार नव्हते त्यांची देखील उत्सुकता भाजप हरावी यासाठी शिगेला पोहोचली होती.अगदी पोलिस विभाग असो किंवा प्रशासकीय विभाग असो किंवा सर्वसामान्य जनतेपर्यंत, ४० ते ४२ तास भाजपचा
पराभव ऐकण्यासाठी आसुसलेली असल्याचे वास्वत अनेक माध्यमकर्मींनी देखील अनुभवले.एवढी प्रचंड चीड भाजपविषयी सर्वसामान्य जनतेमध्ये होती.
मात्र,देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नेहमीसारखीच यशाचे श्रेय घेण्याची इतकी घाई झाली होती की,निकाला पूर्वीच त्यांनी ट्टीट करुन काँग्रेसची खिल्ली उडवली की भाजप बॅलेट पेपरवरही जिंकून येते व काँग्रेस ‘झिरो’वर राहते.मोदी यांचे हे ट्टीट मुख्यमंत्री फडणवीस यांनाही रिट्टीट करण्याची इतकी घाई झाली होती त्यांनी देखील त्यावर काँग्रेससाठी उपहासात्मक शेरा लिहून ते रिट्टीट केले मात्र,मोदी यांच्या मतदारसंघ वाराणशीत व मुख्यमंत्री यांच्या नागपूरमध्ये भाजपचा पराभव होताच मोदी व फडणवीस यांच्यावर ट्टीट डिलिट करण्याची नामुष्की ओढवली.
यातच भाजपने या निवडणूका कश्या ‘ईव्हेंट’ सारख्या लढल्या याची प्रचिती येते.एक लाख ऐंशी हजार पदवीधर मतदार आम्ही नोंदवले याचा ढोल बडवणा-या भाजपाला ५६ हजार मतांवर थांबावे लागले.पैशांचा प्रचंड पाऊस या ही निवडणूकीत धो-धो बसरला.प्रत्येक मतदार जोडणीमागे ४०० रुपये वाटणा-या पक्षाला अगदी रामदासपेठेतील व लक्ष्मी नगर येथील पंचतारांकित हॉटेलमधील बैठकींमध्ये उच्च विद्याभूषित डॉक्टर्स,अभियंते,प्राध्यापक,शिक्षक यांना मार्गदर्शनासाठी मात्र आठवी पास बूथ प्रमुख सापडले!
मूळात पदवीधरसाठी भाजपच्या प्रभारी पासून निवडणूक प्रमुखांपर्यंतचे शिलेदारच पदवीधरचे मतदार नव्हते….! म्हणूनच भाजपने ही निवडणूकही शक्तीने जरी लढली तरी युक्तीने लढली नाही .पदवीधरची निवडणूक उमेदवारांच्या नावा पुढे चक्क व फक्त २ हा आकडा टाकणा-या अनपढ पदवीधर व शिलेदारांवर सोडल्यामुळे भाजपचा दारुण पराभव, संघाच्या शताब्दी वर्षात संघाच्याच भूमीत झाला,हे काँग्रेसच्या विजयाचे सर्वात मोठे गमक ठरले.
(वाचा उद्याच्या बातमीत ज्याच्या नावातच जीत आहे असे ‘अभिजित’)
(बातमीशी संबंधित व्हिडीयोज sattadheesh official युट्युब चॅनलवर उपलब्ध)
…………………………………………