Homeनागपूर न्यूजविधान परिषद पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरळीत

विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरळीत

Advertisements
१४ मतदान केंद्रांवर ८२३ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
२२ जून रोजी होणार मतमोजणी

नागपूर, दि. १८ : महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६ अंतर्गत नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदार संघ पोटनिवडणुकीचे मतदान आज सुरळीत पार पडले. १४ मतदान केंद्रांवर ८३६ पैकी ८२३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. नागपूर शहर ११ व उमरेड, कामठी प्रती एक अशा १३ सदस्यांनी मतदान केले नाही. या निवडणुकीत एकूण सुमारे ९८.४४ टक्के मतदान झाले. या निवडणुकीत भाजपा तर्फे राजीव पोतदार आणि इंडियन नॅशनल कॉंग्रेस तर्फे अतुल लोंढे हे दोन उमेदवार आहेत.
नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी ८३६ मतदार होते. यात ४१९ पुरुष मतदार तर ४१७ महिला मतदार होते. मतदानासाठी एकूण १४ मतदान केंद्र तयार करण्यात आली होती. यात नरखेड तहसील कार्यालय येथे नरखेड व मोवाड नगरपरिषदेच्या मतदारांनी मतदान केले.
नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी २५ मे रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सोमवार १ जून पर्यंत होती. अर्जांची छाननी मंगळवार, २ जून रोजी करण्यात आली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख गुरूवार, ४ जून अशी होती. या पोटनिवडणुकीसाठी मतदान गुरूवार १८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत घेण्यात आले. मतमोजणी सोमवार, दि. २२ जून रोजी करण्यात येणार आहे.
मतपेटयासाठी बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर येथे स्ट्रॉंग रुम तयार करण्यात आली आहे. याच ठिकाणी सोमवार दिनांक २२ जून रोजी मतमोजणी होईल.
काटोल तहसील कार्यालय येथे काटोल नगरपरिषद व कोंढाळी नगरपंचायतच्या मतदारांनी, कळमेश्वर तहसील कार्यालय येथे कळमेश्वर-ब्राम्हणी नगरपरिषद व मोहपा नगरपरिषदेच्या मतदारांनी, सावनेर तहसील कार्यालय येथे सावनेर नगरपरिषद व खापा नगरपरिषदच्या मतदारांनी, पारसिवनी तहसील कार्यालय येथे पारसिवनी नगरपंचायतच्या मतदारांनी. नगरपरिषद कन्हान पिंपरी येथे नगरपरिषद कन्हान पिंपरी व नगर पंचायत कांद्री येथील मतदारांनी, रामटेक तहसील कार्यालय येथे रामटेक नगरपरिषदेच्या मतदारांनी, मौदा तहसील कार्यालय येथे मौदा नगर पंचायतच्या मतदारांनी, कामठी तहसील कार्यालय येथे कामठी नगरपरिषद, महादुला नगर पंचायत, येरखेडा नगर पंचायत, बीडगाव नगर पंचायत, गोधणी नगर पंचायत, बहादुरा येरखेडा नगर पंचायत, कान्टोनमेंट बोर्ड कामठी येथील मतदारांनी, नागपूर शहर तहसील कार्यालय येथे महानगरपालिकेच्या मतदारांनी, नगरपरिषद वानाडोंगरी येथे वानाडोंगरी व वाडी नगरपरिषद, निलडोह नगरपंचायत, डिंगडोह नगरपरिषद आणि हिंगणा नगर पंचायतच्या मतदारांनी, बुटीबोरी नगरपरिषद येथे बुटीबोरी व नगर पंचायत बेसा-पिंपळाच्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
……………………………………………..
Advertisements
Advertisements

Latest बातम्या