फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeblogजेफ्री एपस्टीन आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प

जेफ्री एपस्टीन आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प

Advertisements
(एपस्टीन फाईल्स -भाग २)

जेफ्री एपस्टीन (Jeffrey Epstein) हे नाव आता जगभर कुख्यात आणि कुप्रसिद्ध झालं आहे.हा एक कुख्यात अमेरिकन उद्योगपती असून, एपस्टीन फाईल्स म्हणजे लहान-लहान मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणाशी संबधित न्यायालयाचे गोपनीय दस्तावेज.या फाईल्समध्ये जागतिक नेते,राजकारणी,
खेळाडू,कलावंत,वैज्ञानिक आणि सेलिब्रिटींसह अनेक बड्या नेत्यांच्या अय्याशीची आणि मनोविकृतीची गुपिते दडली आहेत.या फाईलमध्ये अतिशय लहान वयातील अल्पवयीन मुलींचे विकृत लैंगिक शोषण व मानवी तस्करींचेच दस्तावेज नाही तर,२१ सा व्या शतकातला अर्थात आधूनिक युगातला माणूस आज ही मानवी मांस भक्षण करण्यात कसा ‘आदिमयुगात‘ वावरतोय याची थक्क करणारी कृती उलगडली आहे.
एपस्टीनच्या खासगी बेटावर ज्याला ‘पीडोफाइल आयलंड’म्हटले जाते,अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणासाठीचे ते धरणीवरचे नरक होते.अनेक लहान-लहान मुली ज्या,या भीषण अत्याचार सहन करु शकल्या नाहीत,त्यांचे मृतदेह त्याच ठिकाणी दफन करण्यात आले आहेत.याहून महत्वाचे म्हणजे ज्या देशात हे सगळं घडत हाेतं तो देश स्वत:ला जगातील सर्वात सुसंस्कृत,प्रगत आणि विकसित देश म्हणून मिरवित असतो.त्याच देशाच्या न्यायालयाच्या आदेशानुसार दररोज उघड होणा-या या देशातील कथा मात्र, संपूर्ण जगाला वेदना आणि संतापाच्या उद्वेगात बुडवित असल्याचे विरोधाभासी चित्र दाखवतात.
स्वत:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प,ब्रिटेन राजघराण्याचा दिवटा पूत्र प्रिंस अँड्रयू माऊंटबेटन-विंडसर,माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, जगाला आपल्या नृत्यातून वेड लावणारा मायकल जॅक्सन,संगीतकार मिक जॅगर,अब्धाधीश बिल गेट्स,मार्क जुबेर पासून तर नोबल विजेता वैज्ञानिक स्टीफन हॉकिन्स देखील एपस्टिन फाईल्समुळे ,चारित्र्याने उघडे पडले.यात इस्त्राईलचे भूतपूर्व पंतप्रधान ऐहूद बराक यांचा देखील समावशे आहे. 
याहून महत्वाचे म्हणजे या फाईल्समधून जी-जी नामांकित व प्रतिष्ठित नावे दररोज बाहेर निघत आहेत,त्यांच्यावर कोणताही गुन्हा नोंदवला जात नसून फक्त नैतिक कुचंबनेतून अनेकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे,एवढंच!एपस्टीन सारख्या या भूतळावरील अतिशय घृणित विकृतीसोबत संबंध ठेवल्याची व हजारो चिमुकल्यांच्या शारीरिक,मानसिक,भावनित शोषणाच्या मोबदल्यात त्यांना फक्त इतकीच शिक्षा पुरेशी आहे का?असा प्रश्‍न आता मोठ्या प्रमाणात उपस्थित केला जात आहे.
अमेरिकेच्या न्याय विभागाने(यूएस जस्टिस डिपार्टमेंट)जेफ्री एपस्टीन संबंधित सर्व दस्तावेज,पिडीतांची ओळख लपवून व्हिडीयो फूटेज,छायाचित्रे जारी करण्याचे आदेश दिले आहे.जेफ्री एपस्टिनची सर्व कागदपत्रे जगासाठी खुली करावी असा जनतेच्या दबावा पुढे अमेरिकन काँग्रेसने कायदा केला आहे.
महत्वाचे म्हणजे जेफ्री एपस्टिनच्या या सर्व गडद काळ्या कृत्यात एक महिलाच बरोबरीने सहभागी होती ती म्हणजे जेफ्रीची गर्लफ्रेण्ड गिलीन मॅक्सवल.जी जेफ्रीच्या बेटावर बंदिस्त लहान-लहान मुलींना मसाजच्या नावावर ‘ओरल सेक्स’करण्यासाठी प्रशिक्षण देत होती.मूळात तीच लहान-लहान मुलींची खूप मोठी तस्कर होती.तिला दररोज दहा लहान नव्या मुलींना बेटावर आणण्याचा तनाव राहत होता,हे एका पिडीतेने मुलाखतीत सांगितले.तिच्यावरचे आरोप २०२१ मध्ये सिद्ध झाले आणि तिला  दोषी ठरवून २० वर्ष जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
कोण होता जेफ्री एपस्टीन?
हा न्यूयार्क मध्ये जन्माला आलेला एक अगदी सामान्य व्यक्ती असून १९७० च्या दशकात न्यूयार्कच्या डार्टन शाळेत तो गणित आणि भौतिकशास्त्राचा शिक्षक होता.१९८२ मध्ये त्याने स्वत:ची खासगी ‘जे. एपस्टीन ॲण्ड कंपनी’ सुरु केली.ही कंपनी एक अब्ज डॉलरपेक्षा अधिक मालमत्ता असणा-या श्रीमंतांसाठी ॲसेट मॅनेजमेंट करायची.या द्वारेच एपस्टीनची ओळख राजकारण,उद्योग ,खेळ आणि मनोरंजनाच्या क्षेत्रातील नामांकित विभूतींसोबत झाली होती.याच ओळखीतून त्याला हे कळून चूकलं की बाहेर समाजासमोर या विभूतींचं वागणं हे खूप वेगळं होतं मात्र,त्यांचा आणखी एक चेहरा आहे जो नेहमीच झाकलेला असतो.यातूनच तो एक असं नेटवर्क उभारु लागला जे फक्त त्याच्यासाठीच नव्हे तर जगभरातल्या अनेक मोठ्या व्यक्तिंसाठी अडचणीचं ठरणार होते.
२००८ मध्ये एका १४ वर्षाच्या मुलीच्या पालकांनी पोलिसात तक्रार केली एपस्टीनने त्याच्या फ्लोरिडामधील पाम बीच येथील भव्य वास्तूमध्ये तिचं लैंगिक शोषण केलं.पोलिसांनी त्या घराची झाडाझडती घेतली तर तिथे संपूर्ण वास्तूत फक्त अल्पवयीन मुलींची अनेक नग्न छायाचित्रे ,पेंटिंग्स व शिल्पे सापडली.
यानंतर एपस्टीनवर सेक्स ऑफेंडर म्हणून गुन्हा नोंदविण्यात आला.पण पुढील काळा एपस्टीनने फिर्यादींसोबत वाटाघाटी करीत मोठा तुरुंगवास टाळला.त्यानंतरही अनेक मुलींनी आपलंही शोषण एपस्टीनच्या बेटावर झालं आहे,अशया तक्रारी केल्या.ज्यामुळे या एकूणच गंभीर प्रकरणाची व्याप्ती वाढली.
पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून अनेक पुरावे ताब्यात घेतले.शोषण झालेल्या पिडीतांच्या मुलाखती ऑन कॅमरा घेतल्या.एपस्टीनवर ११ वर्षांनंतर लैंगिक सुखासाठी अल्पवयीन मुलीं पुरविण्यासाठी नेटवर्क चालवण्याचा गुन्हा दाखल झाला.जेफ्री एपस्टीनला जेव्हा अटक झाली तेव्हा अत्यंत मगरुरीतून तो हेच म्हणाला,’मी फक्त नियम मोडणारा गुन्हेगार आहे!’.
१९९८ मध्ये एक अमेरिकन सामान्य माणूस आठ मिलियन डॉलर्सने एक संपूर्ण बेट विकत घेतो.७५ एकरचा हा बेट केरेबियन मध्ये,युनाटेड स्टेट्स वर्जिन आयलॅण्डचा एक भाग होता.या बेटाचं नाव होतं ‘लिटील सेंट जेम्स’.बाहेरुन बघता हे खासगी बेट कोणत्या स्वर्गापेक्षा कमी सुंदर दिसत नव्हतं. सुंदर किनारे,खूप सारी हिरवळ,मधात एक आलिशान बंगला,हेलिपॅड,दोन मोठे स्वमिंग पूल,जिम,चारही बाजूने आलिशान कॉटेज होते.मात्र,याच स्वर्गाच्या आतमध्ये एक खूप भयंकर काळे सत्य दडले होते.एक असं बेट ज्याला आजूबाजूच्या बेटावरील लोक ‘पी-डोफाईल बेट’संबाेधित होते.या बेटावर अवघ्या १२ ते १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलींना पळवून आणल्या जात होतं व त्यांना लैंगिक वासनेचं बळी बनवलं जात होतं.या मुली या बेटावरुन कुठेही पळून जाऊ शकत नव्हती कारण,चारही बाजूने समूद्र होता.एकदा एका पंधरा वर्षाच्या मुलीने पोहून जात पळून जाण्याचा प्रयत्न केला पण,तिला पकडण्यात आलं.
अनेक वर्ष लहान-लहान मुलींचं जगभरातील अरबपतींकडून मांस नोचण्याचं काम विना अडथळ्यांचे सुरु होतं.तक्रार करणा-या एका पिडीतेने सांगितल्याप्रमाणे एपस्टीनसोबत पाहूणचार करणारे पाहूणे देखील खूप चवीने लहान मुलींचे मांस खात होते.एपस्टीन फाईल्समधून समोर आलेल्या एका छायाचित्रात त्याच्या डायनिंग टेबलवर दोन कोंबडे,संपूर्ण छिललेले आणि मधात एक दहा महिन्याचे बाळ,भाजून काढलेले दिसून पडत आहे…..!कोंबडीचं मांस ज्या आवडीने जग खातं तितक्याच आवडीने त्या दहा महिन्याच्या बाळाचं भाजून काढलेलं मांस चवीने खालल्या गेलं होतं….!वीस वर्षात….असे किती तरी बाळ,किती तरी लहान-लहान,निरागस,निष्पाप मुलींचं मांस एपस्टिन व त्याचे पाहूणे खात होते….!

पंधरा वर्षांपूर्वी एका मॉडेलने अमेरिकेत ओरडून ओरडून सांगितले की एपस्टीनच्या बेटावर लोक लहान-लहान मुलांचे मांस खात आहे.लोकं वेडी झाली आहे. ते मृतदेहांना भाजून खातात आहेत.ते रक्त पितात आहेत.मानवी देह खातात आहेत.असं लॉस एंजलिसमधून बाहेर पडलेली ती मॉडेल जगाला ओरडून ओरडून सांगत होती.त्यावेळी लॉस एंजलीस व फ्लोरिडामध्ये सर्वाधिक प्रभावी नेटवर्क हे एपस्टीनची भागीदार मॅक्सवेलचं होतं.त्या मॉडेलने जगा पुढे आणलेले वास्तव प्रभावशाली व्यक्तींमुळे आवाज दाबला गेला होता.
२००२ साली डोनाल्ड ट्रम्पने न्यूयार्क मासिकला एपस्टिनच्या प्रोफाईलसाठी एक मुलाखत दिली होती.‘मी जेफ्रीला १५ वर्षांपासून ओळखतो.तो एक टेरिफिक माणूस आहे.त्याच्यासोबत वेळ घालवण्यात मजा येते.मला जश्‍या सुंदर महिला आवडतात तश्‍याच त्याला ही आवडतात असं म्हटल्या जातं.त्यातल्या अनेक ब-याच तरुण असतात….!

पण मार्च २००५ साली फ्लोरिडाच्या पाम बीच भागातील एका स्थानिक पोलिस ठाण्यात एक १४ वर्षांची मुलगी तिच्या पालकांसोबत तक्रार दाखल करते की या बेटावर तिचे लैंगिक शोषण झाले. पिडीता सांगते की रॉयल पाम बीच शाळेत तिच्यासोबत  शिकणारी एक मुलगी तिला एका खूप श्रीमंत माणसाकडे घेऊन गेली.तिला सांगण्यात आलं की त्या माणसाचं फक्त मसाज करायचं आहे आणि याचे तिला २०० ते ३०० डॉलर मिळतील.पण,तिथं गेल्यावर वेगळंच घडलं.एपस्टीन या मुली समोर फक्त टॉवल घालून येतो.तो या चिमुरडीला स्वत:चे कपडे काढण्यासाठी सांगतो व तिच्यावर बलात्कार करतो.
या तक्रारीनंतर या पिडीतेला पोलिसांनी विचारलं की आणखी कोणी अशी मुलगी आहे का जी एपस्टीनकडे गेली आहे,तिने दोन मुलींची नावे सांगितली.या दोन मुलींकडे पोलिसांनी चौकशी केल्यावर आणखी दोघींची नावे समोर आली.यानंतर पोलिस स्वत: थक्क झाले,एपस्टीकडे जाणा-या मुलींची साखळी थांबण्याचे नावच घेत नव्हती.पोलिस जोपर्यंत एका पिडीतेपर्यंत पोहोचत होती,दोन आणखी पिडीत समोर येत होते.काहीच दिवसात पाम बीच पोलिस प्रमुखांनी अश्‍या ३५ पिडीतांची ओळख पटवली आणि अद्याप शेकडो पिडीतांची ओळख अजून बाकी होती…!
या सर्व पिडीतांची कहाणी मात्र,अगदी एकसारखीच होती.या सर्व पिडीतांना मसाजचा बहाणा करुन बोलावण्यात आले होते.सर्वाधिक पिडीत या फक्त १२ ते १६ वर्षांच्या होत्या आणि खूप गरीब कुटूंबातून येत होत्या.अनेकांचे पालक ही नव्हते व त्या बेघर संस्थांमध्ये राहत होत्या.प्रत्येक मुलीला आणखी नव्या मुलींना आणून देण्यासाठी २०० डॉलर देण्यात येत होते.पोलिसांनी बघितले की ही केस दिसते तशी लहानशी नाही तर खूप सुनियोजित पद्धतीने राबविण्यात येणारी पिरामिड स्कीम होती.
२००६ साल उजाडला व पाम बीच पोलिसांनी एपस्टीनच्या विरोधात एक मजबूत आरोपतत्र तयार केले.केस इतकी मजबूत होती की जुलै २००६ मध्ये एफबीआयने देखील तपास सुरु केला व ५६ पानाचं आरोपपत्र तयार झाले ज्याला ’ऑपरेशन बीप ईयर’असे नाव देण्यात आले होते.फ्लोरिडा पासून तर न्यूयार्क,न्यू मेक्सिकोपर्यंत पिडीतांचे बयाण नोंदवण्यात आले.एपस्टीनवर यानंतर आंतराष्ट्रीय सेक्स ट्रेफिकिंगचा गुन्हा दाखल झाला.३६ अल्पवयीन पिडीत,शेकडो साक्षीदार,एफबीआयचा तपास आणि इतके गंभीर गुन्हे.जेफ्री एपस्टीनसारखा माणूस यामुळे जन्मठेपेचा कैदी सिद्ध झाला असता.पुढील ११ वर्षात अनेक चिमुकल्यांचे शोषण व हत्याकांड थांबले असते.मात्र,असं घडलं नाही.
पडद्या मागे दूसरंच काही तरी घडत होतं.मायामीचे फेडरल ॲटर्नी अलैक्झेंडर एकोस्टा हे एपस्टीनच्या वकीलांसोबत एक सिक्रेट डील करत होते.ही डील एपस्टीनला वाचवण्यासाठी केली जात होती.एपस्टीनवर फक्त प्रोस्टीट्यूशनसारखे एक दोन लहानसहान गुन्हे दाखल करण्यात येणार होते व त्या बदल्यात एपस्टीन व त्याच्या सहयोगींना सगळ्या गंभीर गुन्ह्यांपासून सूट देण्यात येणार होती.धक्कादायक गोष्ट म्हणजे या डीलला सील करण्यात आले होते.पिडीतांनाही या डील विषयी सांगितले गेले नाही,मात्र, अमेरिकेच्या कायद्यानुसार पिडीतांना अश्‍या कोणत्याही डील विषयी सांगणे हे बंधनकारक होते.पण…कोणी काहीच करु शकले नाही.
३० जून २००८.एपस्टीन कोर्टात हजर झाला.डीलनुसार दोन साधारण गुन्ह्यात स्वत:चा गुन्हा कबूल करतो ज्यासाठी त्याला फक्त १८ महिन्यांची शिक्षा दिली जाते.ही शिक्षा त्याने त्याच्या खासगी भव्य कार्यालयातच भोगली कारण त्याला आठवड्यातून ६ दिवस १२-१२ तास स्वत:च्या कार्यालयात काम करण्याची सूट मिळाली होती.फक्त रात्रीच तो झोपण्यासाठी तुरुंगात येत होता.त्यातही १८ महिन्यांमधूनही जुलै २००९ मध्ये शेवटच्या पाच महिन्यांची शिक्षा त्याची माफ करण्यात आली…..!हे सगळं शक्य झालं त्या डीलमुळे जी अलेक्झेंडर डिकोस्टाने त्याला करुन दिली होती.
यानंतर हाच डिकोस्टा ट्रम्पच्या पहील्या राष्ट्रपती राजवटीत ‘सक्रेटरी ऑफ लेबर बनतात.’पुढील अनेक वर्ष एपस्टीन आपले जीवन तश्‍याच विकृत अय्याशीतच जगत राहतो.खासगी जेटमध्ये जगभराची सैर करतो.आपल्या खासगी बेटावर लॅविश पार्टी अरेंज करत राहतो आणि जगभरातील प्रभावशाली विभूतींना त्यात सहभागी करीत राहतो.
अमेरिकेत एक महिला पत्रकार धाडसाने पिडीतांच्या मदतीसाठी धावते.सगळे पुरावे गोळा करते.तिच्या अहवालानंतर संपूर्ण अमेरिकेत तीव्र संताप उमटतो.अमेरिकन जनतेचा उद्रेग बघून यावेळी एपस्टीनला देशाचा राष्ट्रपतीही पाठीशी घालू शकला नाही व जुलै २०१९ मध्ये एपस्टीनला त्याच्या खासगी विमानातून उतरल्याबरोबर पोलिस अटक करतात व तुरुंगात टाकतात.यावेळी त्याच्यावर सरळ सेक्स ट्रॅफिंकिंगचा गुन्हा नोंदवला जातो,ज्यामध्ये किमान ४५ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा आहे.
२०२५ च्या अमेरिकेच्या न्याय विभागाच्या आदेशानुसार फेडलर ब्यूरो ऑफ इनव्हेस्टीगेशनने(एफबीआय)एपस्टिनच्या त्या बेटातून ३०० गीगाबाईट्स डेटा तसेच कागदोपत्री पुरावे गोळा केले यालाच ‘एपस्टीन फाईल्स’संबाेधल्या जात आहे.यात शोषण झालेल्या पिडीतांची छायाचित्रे आणि व्हिडीयोज,आणि खूप महत्वाचा पुरावा म्हणून महत्वाच्या जागतिक विभूतींसोबत देवाण-घेवाण केलेले ईमेल्स आहेत.
सुरवातीला या फाईल्स प्रसिद्ध करण्यात आल्या नव्हत्या.मात्र,नोव्हेंबर २०२५ मध्ये अमेरिकन काँग्रसच्या दोन्ही सदनांनी ’एपस्टीन फाईल्स ट्रांसपरेसी एक्ट’बहूमताने मंजूर केला.त्यानंतर याच शोषणात स्वत: अनेक वेळा सहभागी असलेल्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली.या कायदानुसार १९ डिसेंबर २०२५ पर्यंत या फाईल्स मधल्या गुन्हेगारी तपासाचे तपशील जाहीर करण्याचे आदेश दिले.३० जानेवरी २०२६ रोजी अमेरिकेच्या जस्टीज डिपार्टमेंटनेही या फाईल्समधील अनेक तपशील जाहीर केले.नेमके किती तर.. ३० लाख पाने,एक लाख ८० हजार छायाचित्रे व २ हजारपेक्षा जास्त व्हिडीयोज…!
मात्र,एपस्टीनला अटक झाल्यावर तुरुंगात कोणतीही न्यायालयीन कारवाई सुरु होण्यापूर्वीच तो त्याच्या सेलमध्ये मृत आढळून येतो! त्याने चादरीने तुरुंगात गळफास घेतल्याची कथा तुरुंगाचे सुरक्षा रक्षक सांगतात.महत्वाचे म्हणजे याच वेळी तुरुंगातील सीसीटीव्ही कॅमरे बंद असतात,त्यात तांत्रिक बिघाड झाला होता त्यामुळे त्या रात्री नेमके काय झाले होते याचे व्हीडीयो फूटेज देखील मिळू शकले नाहीत,दर अर्धा तासांनी एपस्टीनवर नजर ठेवणारे सुरक्षा रक्षकही नेमके त्याच वेळी गाफिल राहतात.इतकंच नव्हे तर एपस्टीनसोबत सेलमध्ये असलेल्या इतर कैदीला आदल्या रात्रीच दुस-या सेलमध्ये स्थानांतरित केल्या जातं!
यानंतर,त्याने आत्महत्या केली नसून हत्या झाली असल्याचा संशय मोठ्या प्रमाणात व्यक्त होऊ लागला.हा संशय मोठ्या प्रमाणात ट्रम्पचे समर्थक करीत हाेते.स्वत: ट्रम्प यांनी बिल क्लिंटनवर संशय व्यक्त करणारे ट्वीट रिट्वीट केले होते. एपस्टिनकडे बिल क्लिंटनविषयी खूप सारे पुरावे होते,असा दावा त्यांनी केला.ट्रम्पच्या समर्थकांनी ’एपस्टिन Din’t Kill himself’ही मोहिमच राबवली जाते.इतकंच नव्हे तर २०२४ च्या अध्यक्षीय निवडणूकीत ट्रम्प याला एक खूप मोठा मुद्दा बनवतात.ते अमेरिकन जनतेला वचन देतात ते अध्यक्ष म्हणून निवडून आले तर एपस्टिनच्या सगळ्या फाईल्स ते खुल्या करतील.अनेक मुलाखतीत त्यांनी ते तसे करणार असल्याचे सांगितले.

जानेवरी २०२५ मध्ये ट्रम्प पुन्हा अमेरिकेचे अध्यक्ष बनतात.आता सगळ्यांना याची वाट होती की एपस्टीन फाईल्स कधी खुल्या होतील.ट्रम्पचे समर्थक देखील याची वाट बघत होते.मात्र,जुलै २०२५ मध्ये ट्रम्प सरकाच्या न्याय विभागाने घोषित केले की एपस्टीनच्या क्लाईंटची कोणतीही फाईल्स एक्झीट्स करतच नाही आणि यासंबधती कोणतीही फाईल खुली होणार नाही.ट्रम्पने देखील यू-टर्न घेतले व एपस्टीन फाईल्सला ते ‘बोअरिंग’मुद्दा सांगू लागले.यामुळे ट्रम्पचे समर्थक देखील बुचकळ्यात पडले.स्वत: एलॉन मस्क याने ट्वीट करत ’ट्रम्प’ चे नाव एपस्टीन फाईल्समध्ये असल्याने या फाईल्स खुल्या केल्या जात नाही’ ट्टीट केले मात्र,यानंतर मस्कने ते ट्टीट डिलिट केले.मग अमेरिकन लोकांनी ट्रम्प आणि एपस्टीनच्या नात्याचा शोध घेण्यास सुरवात केली तर त्यांचे खूप जुने नाते जगा समोर येऊ लागले.
न्यूयार्क टाईम्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार ट्रम्प आणि एपस्टीन २० वर्षांपर्यंत मित्र होते.१९८० मध्ये या मैत्रीची सुरवात झाली.१९९० मध्ये ही मैत्री इतकी गहन झाली की दोघेही एकाच विमानात प्रवास करु लागले.एकदुस-यांच्या बंगल्यात,कार्यालयात,हॉटेल,ट्रम्पच्या प्लाझा हॉटेल आणि कसिनोमध्ये एकसाथ दिसू लागले होते.जवळपास प्रत्येक पार्टीमध्ये एपस्टीन ट्रम्पसोबत दिसत होता.एका जवळच्या सहका-याने सांगितल्यानुसार १९९० मध्ये ट्रम्प आणि एपस्टीन आठवड्यातून तीनवेळा तरी एकमेकांशी फोनवर बोलत होते.अनेक वेळा एपस्टीन ट्रम्पला स्पीकरवर ठेऊन बोलत होता.त्यांच्या या बोलण्यात नेहमी एकच मुद्दा असायचा त्यांनी कोणत्या महिलेसोबत नेमके काय,कसे केले,याची फुशारकी असायची……!
टेसी नावाच्या एका महिलेने सांगितले की १९९३ मध्ये जेव्हा ती एपस्टीनची प्रेयसी होती तेव्हा एकदा त्याने तिला ट्रम्पसोबत ट्रम्प टावरमध्ये भेटवले.त्या भेटीत ट्रम्पने तिला जवळ ओढले व तिच्या शरीराला ठिकठिकाणी अश्‍लील स्पर्श केला.एपस्टीन हे सगळं बघत होता व त्याला हे सगळं आवडत होतं कारण त्याच्याकडे एक अशी मॉडल होती जी ट्रम्पला आवडत होती…!याशिवाय आणखी एका पिडीतेने सांगितले की ज्या पार्टीमध्ये एपस्टीनसोबत ट्रम्प राहत होते,ट्रम्पसोबत तिला शारीरिक संबंध ठेवण्यास एपस्टीन मजबूर करत होता.इतकंच नव्हे तर ट्रम्प एपस्टीनच्या खासगी जेट विमानात देखील प्रवास करीत होते जे विमान लहान-लहान मुलींनी भरलेले असायचे. विमानात देखील एपस्टीन व ट्रम्प लहान मुलींचे लैंगिक शोषण करीत होते.
ट्रम्पने आपल्या आत्मचरित्रात ’ट्रम्प यार्ड ऑफ कमबॅक’मध्ये एपस्टीनसाठी एक स्वाक्षरी केली होती.‘Jef you are the Greastest’….!त्यामुळेच ट्रम्प आणि एपस्टीनच्या घनिष्ट नात्यांविषयी जगाला कळू लागले.त्यामुळे एपस्टीन फाईल्स खुल्या करण्यासाठी जनतेचा दबाव इतका वाढला की अमेरिकन काँग्रेसने एक बिल आणले आणि न्याय विभागाला ३० दिवसांच्या आत एपस्टीनच्या सगळ्या फाईल्स जनतेसाठी खुल्या केल्या जाईल,असा निर्णय घ्यावा लागला.यावर अमेरिकन काँग्रेसमध्ये मतदान झाले.जेव्हा अमेरिकन संसदेत यासाठी मतदान झाले,तेव्हा अमेरिकेच्या इतिहासात एक खूप वेगळा प्रसंग जगाने पाहिले की सत्ताधारी आणि विरोधक म्हणजे रिपब्लिकन आणि डेमोक्रेटीक पक्षाच्या सदस्यांनी या बिलाच्या समर्थनार्थ मतदान केले….!
१९ डिसेंबर रोजी अमेरिकेच्या न्याय विभागाने काही हजार फाईल्स खुल्या केल्या.यानंतर २३ डिसेंबर रोजी देखील ३० हजार आणखी फाईल्स खुल्या झाल्या मात्र,यात बिल क्लिंटन विषयी कमी परंतू, डोनाल्ड ट्रम्पच्या नावाचाच वारंवार एपस्टीन फाईल्समध्ये खुलासा झाला होता.एक इमेलमध्ये स्पष्ट झाले की ट्रम्पने एपस्टीनच्या खाजगी जेट विमानात आठ वेळा प्रवास केला असल्याचे सत्य जगाला कळले.एका मेलमध्ये एपस्टीन सांगतो की ट्रम्पने मॅक्सवेलला(एपस्टीनची महिला भागीदार)हे सगळं आता बंद करण्यास सांगितलं होतं.याचा अर्थ एपस्टीनच्या बेटावर काय चाललं आहे हे ट्रम्प याला माहिती होतं.तरी पण ते गप्प बसले,पोलिसांकरवी एपस्टीनला तुरुंगात डांबले नाही किंवा त्या निरागस मुलींचे शोषण थांबवले नाही.
एक कॉल अमेरिकेतील तपास संस्था एसबीआयला आला होता.हा कॉल एका लेमोझिन ड्रायव्हरने अमेरिकन अध्यक्ष पदाच्या निवडणूकी पूर्वी २७ ऑक्टोबर २०२० मध्ये केला होता.१९९५ मध्ये जेव्हा तो ट्रम्पला टॅक्सस विमानतळावर घेऊन जात होता तेव्हा ट्रम्प हा फोनवर जेफ्री,जेफ्री म्हणत असनाता कोण्या मुलीसाठी खूप घाणेरडे बोलत होता.कॉल रेकॉर्डनुसार या ड्रायव्हरने १९९९ मध्ये म्हणजे चार वर्षांनी जेव्हा एका महिलेला या घटनेविषयी सांगितले तेव्हा ती नि:शब्द झाली.तिने सांगितले की ट्रम्प आणि एपस्टीन दोघांनी तिचा बलात्कार केला आहे.महिलेने ड्रायव्हरला सांगितले की एक मुलगी तिला एका फॅन्सी हॉटेलमध्ये घेऊन गेेली,जिथे तिच्यावर बलात्कार झाला.
एपस्टीन फाईल्समध्ये आणखी एक पत्र होते.हे पत्र जेरी नसारला लिहल्या गेलं होतं.यातील शब्द होते’आमच्यात एक गोष्ट समान आहे,तरुण मुलींसाठी आमचं प्रेम.आमचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आमच्यासारखंच तरुण मुलींशी प्रेम करतात पण आम्ही तुरुंगात जेवत आहोत आणि ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत.जीवन खूप पक्षपाती आहे…!२०१९ मध्ये जेव्हा हे पत्र लिहल्या गेलं होतं तेव्हा ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते.
महत्वाचे म्हणजे अमेरिकेचा न्याय विभाग ज्याला निपक्षपाती राहणे गरजेचे होते ते ट्रम्पच्या खासगी वकीलांप्रमाणे वागत होती.ट्रम्पवरील बलात्काराच्या आरोपांना ते खोटे व सनसनाटी निर्माण करणारे आरोप सांगत राहीली.मात्र,ज्या ट्रम्पने एपस्टीन फाईल्सचा, निवडणूक जिंकण्यासाठी हत्यार म्हणून वापर केला तेच आता पूर्णपणे यात फसलेले दिसून पडले. ३० लाखांपेक्षा जास्त फाईल्स आतापर्यंत खुली करण्यात आली आहे.मात्र,पिडीतांची ओळख समोर येऊ नये तसेच इतर अनेक कारणांसाठी त्या सगळ्या फाईल्समधील प्रत्येक पानावर अर्ध्याहून जास्त शब्दांना, छायाचित्रांना,व्हीडीयोजला काळ्या पट्टीने झाकण्यात आले आहे.
९० च्या दशकात व २००० च्या सुरवातीच्या काळात ट्रम्प,बिल क्लिंटनचे एपस्टीनसोबत खूप घनिष्ट संबंध होते…!म्हणजे राष्ट्राच्या सर्वोच्च प्रभावशाली राष्ट्राध्यक्षच एपस्टीनच्या हातातील कठपुतली बनले होते कारण,एपस्टीनकडे त्यांच्या काळ्या कृत्यांची संपूर्ण कुंडली होती.बिल गेट्सचे नावही अनेक इमेल मध्ये असून भारतासह जगभरातील त्याच्या सामाजिक व परोपकारी देणगीलाही लहान-लहान चिमुकल्यांच्या रक्तांचा गंध लागला असल्याचे स्पष्ट झाले. या इमेल्सचा वापर माझे नाव खराब करण्यासाठी वापरण्यात येत असल्याचा आरोप बिल गेट्सने केला आहे.
थोडक्यात, एपस्टीनच्या बेटांवर लहान-लहान मुलींसोबत जे गुदरलं ते शब्दात मांडता येत नाही.ज्या देशाचा सर्वात प्रभावशाली राष्ट्रपतीच त्यांच्यावर बलात्कार करीत होता,त्यांनी न्याय तरी कुठे मागावा?
(वाचा भाग-३ मध्ये महिला पत्रकार जिने अनेक धमक्यांनतरही एपस्टीन फाईल बाहेर काढली)
(एपस्टीन भाग-४ एपस्टीन आणि भारत(समाप्त)
………………………………………………………
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या