फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeblogजाने वो कैसे लोग थे जिनके प्यार काे प्यार मिला...

जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार काे प्यार मिला…

(वेलेंटाईन डे स्पेशल(भाग-५)

नागपूर,ता.११ फेब्रुवरी २०२६: हिंदी सिनेसृष्टितील प्रेम संबधातील सर्वात माेठी शोकांतिका जी घडली ती गुरुदत्त-वहिदा रहमान यांच्या नात्यातली सांगितली जाते.प्रेेमभंग झाल्यानंतर या नात्यात गुरुदत्त सारख्या दिग्गज अभिनेता व दिग्दर्शकाने चक्क मृत्यूला कवटाळले तर सुप्रसिद्ध पार्श्व गायिका असलेली त्याची पत्नी गीता दत्त यांचे ही आयुष्य गुरुदत्तनंतर होरपळून निघाले.
गुरुदत्त आणि वहिदा रहमान हे हिंदी चित्रपटसृष्टितील बहूचर्चित व लोकप्रिय कलाकार होते.गुरुदत्त खूप संवेदनशील मनाचे कलावंत असून त्यांनी दिग्दर्शित केलेली ‘प्यासा’,चौदहवी का चांद’’कागज के फूल’ आणि ‘साहिब बीबी और गुलाम’ही चित्रपट जगातील अजरामर कृती समजली जाते. अनेक शतकांच्या इतिहासात ज्याप्रमाणे आग्र्याचा ‘ताजमहल’ ही एकमेव शाहजहां-मुमताजच्या प्रेमाची निशाणी मानली जाते त्याचप्रमाणे गुरुदत्तने निर्मित केलेले चित्रपट पुन्हा कधीही सिनेजगताला निर्मित करता आले नाही.
गुरुदत्त यांचा जन्म ९ जुलै १९२५ मध्ये झाला.त्यांचं खरं नाव वसंत कुमार शिवशंकर पादूकोण होतं.गरिबीमुळे गुरुद्त दहावीनंतर शिक्षण घेऊन शकले नाहीत,पण सुरवातीपासून त्यांना संगीत आणि चित्रपटांमध्ये खूप रुची होती.त्यामुळे त्यांनी शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर उदय शंकर इंडिया कल्चरल केंद्रात प्रवेश घेतला.येथे ते नृत्य शिकले आणि कोरिओग्राफर बनले.आपल्या कारकीर्दीची सुरवात त्यांनी कोरिओग्राफर त्यानंतर दिग्दर्शक म्हणून केली.
गुरुदत्त यांच्या आईचे नाव वसंती पादूकोण आणि वडीलांचे नाव शिवशंकर पादूकोण होतं.त्यांचा परिवार कलकत्तामध्ये रहात होता.त्यांच्यावर तेथील बंगाली संस्कृतीचा इतका खोल परिणाम झाला की त्यांनी आपलं नाव वसंत शिवशंकर पादूकोण ऐवजी ‘गुरुदत्त’ ठेवले.
सिनेनगरीत येण्या पूर्वी गुरुदत्तच्या जीवनातील काही अफेअर्स व दोन लग्नाची देखील चर्चा विकिपिडीयामध्ये वाचायला मिळते.१९४२ मध्ये अलमोडा येथे नृत्याचे शिक्षण घेत असताना याच नृत्य केंद्रातील एका प्रमुख महिलेसोबत गुरुदत्तचे नाव जुळले.. यामुळे अवघ्या दोनच वर्षात १९४४ मध्ये गुरुदत्त यांना या नृत्य केंद्रातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
या नंतर टेलिफोन ऑपरेटर म्हणून कलकत्तामध्ये काही काळ काम केले.१९४७ साली त्यांच्या आईने एका खासगी कंपनीत सह कार्यकारी व्यवस्थापक म्हणून नोकरी मिळवून दिली पण,या पण नोकरीत  विद्या नावाच्या एका सहकारी सोबत गुरुदत्तचे प्रेम संबंध जुळले,असा दावा केला जातो की,गुरुदत्त विद्याला पळवून घेऊन जाऊन लग्न करणार होते.विद्याचा साखरपुडा झाला होता व विद्याच्या भावी जोडीदाराने गुरुदत्तला पोलिस कार्यवाहीची धमकी दिली.यानंतर गुरुदत्त विद्याला सोडून पळून गेला.यानंतर हे प्रकरण शांत झाले.विकीपिडीयामध्ये देखील या घटनेचा उल्लेख आहे मात्र,त्यात कितपत सत्यता आहे,हे कोणीही सांगू शकत नाही.
गुरुदत्त यानंतर १० महिने बेरोजगार होते व मुंबईत माटूंगामध्ये आपल्या कुटूंबियांसोबत राहत होते.गुरुदत्तने याच काळात पुण्यातील ‘विजया’नावाच्या एका तरुणीसोबत लग्न केलं होतं,मात्र,त्यांचा संसार फूलू शकला नाही व विजया गुरुदत्तच्या आयुष्यातून निघून गेली.यानंतर आपल्या आई-वडीलांच्या आग्रहातून त्यांच्याच नात्यातील ‘सुवर्णा‘नावाच्या तरुणीसोबत त्यांचे लग्न झाले जी हैदराबादमध्ये राहत होती.परंतू,गुरुदत्तचे हे दोन्ही लग्नाचे नाते फसले.

या नंतर चित्रपटात कोरिओग्राफर म्हणून त्याने आपली कारर्कीर्द सुरु केली व याच काळात काही चित्रपटात छोट्या-छोट्या भूमिकाही साकारल्या.यानंतर १९५१ मध्ये दिग्दर्शक म्हणून पहीला चित्रपट ‘बाजी’ची शुटिंग सुरु झाली.१९५५ मध्ये गुरुदत्त आपल्या ‘सी.आय.डी’चित्रपटासाठी नवीन चेहरा शोधत होते.याच वेळी वहिदा रहमान साऊथच्या चित्रपटांमध्ये काम करीत होती.तेलगू,तमिल,बंगाली यासारख्या बहूभाषिक सिनेमांमध्ये काम करुन वहिदाने आपली ओळख निर्माण केली होती. पण व्यवसायिक आयुष्यापेक्षा गुरुदत्तसोबतचे प्रेम संबंध व त्याची आत्महत्या यामुळेच वहिदा ही सिनेजगतात तिचा अभिनय,चित्रपट तसेच गुरुदत्तसाठी आज देखील चर्चित आहे…! 

हैदराबादमध्ये एका कार्यक्रमात गुरुदत्त व वहिदाची भेट झाली.हैदराबादमध्ये भेटल्यानंतर गुरुदत्त यांनी वहिदा यांना हिंदी चित्रपटात आणले व लकवरच ही जोडी प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली.गुरुदत्त यांनी वहिदा रहमान यांना १९५६ मध्ये ‘सी.आय.डी’मध्ये संधी दिली.या चित्रपटात देव आनंदला नायक म्हणून घेण्यात आले होते.गुरुदत्त हे वहिदा रहमानला आपली ’प्रेरणा’ मानत होते आणि वहिदाने गुरु दत्तला आपले ‘गुरु’ मानले होते.
‘सी.आय.डी’साठी गुरुदत्तने आधी वहिदाची स्क्रीन टेस्ट घेतली होती.याच सिनेमाच्या चित्रीकरणाच्या वेळी गुरुदत्त व वहिदा एकमेकांच्या जवळ येऊ लागले.’प्यासा‘च्या चित्रिकरणापर्यंत त्यांच्या मधील हे भावनिक नातं इतकं गहिरं झालं की ‘प्यासा’चित्रपटात वहिदा रहमानच्या सोबत दिलीप कुमार यांच्यासोबत नायक म्हणून अनुबंध केला होता,तो मोडून गुरुदत्त यांनी स्वत: या सिनेमात भूमिका केली.‘प्यासा‘चित्रपट पाहिल्यानंतरच भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी वेश्‍याव्यवसाय प्रतिबंध कायदा देशात लागू केला होता.या दोघांच्याही प्रेमाचे किस्से हळूहळू सिनेजगतात चर्चिले जाऊ लागले.गुरुदत्त स्वत: वहिदासाठी ‘खास’ सीन्स लिहू लागले.परंतु,गुरुदत्त विवाहित होते,गीता दत्त सोबत आधीच त्यांचा प्रेमविवाह झाला होता.१९५३ साली त्यांनी गीता दत्तसोबत विवाह केला होता.

वहिदासोबतच्या नात्याने गीता दत्तच्या हसत्या खेळत्या संसारात भूकंप आणला.सगळ्या फिल्मी पत्रिकांमध्ये गुरुदत्त व वहिदा यांच्या रोमांसचे किस्से छापल्या जाऊ लागले.या विषयावर जेव्हा ही गीता दत्त गुरुदत्तला प्रश्‍न विचारत होती तेव्हा गुरुदत्तचा पारा चढत होता.भांडणे होत होती.
गुरुदत्त व गीता दत्तची पहीली भेट ही एका गाण्याच्या रेकाॅर्डिंच्या वेळी झाली होती. एका गाण्याची रेकॉर्डिंग मुंबईच्या महालक्ष्मी स्टूडियोमध्ये सुरु होती.हे गाणं होतं ‘तबदीर से बिगडी हूयी तकदीर बना ले..अपने पे भरोसा है तो एक दांव लगाले’,’२१ वर्षीय गीता घोष रॉय चौधरी ही त्यावेळी पार्श्वगायनात इतक्या उंचीवर होती की गुरुदत्तची पोहोच तिच्यापर्यंत होऊच शकत नव्हती.ती एका घरंदाज आणि जमीनदार कुटूंबातील तरुणी होती व ५०० पेक्षा अधिक गाणी विविध भाषेत तिने तोपर्यंत गायली होती.भव्य लिवोजिन कारमध्ये ती येत होती आणि अनेक संगीतकार तिच्याकडून गाणी गाऊन घेण्यासाठी रांगेत उभे रहात असे.‘ठंडी हवा काली घटा आ ही गई झूम के’ हे गीता दत्तचे गाणे लोकप्रियतेच्या उच्चांकावर होते व संगीत प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवत होते.आपल्या मुलायम आवाजाने हिंदी तसेच बंगाली चित्रपटसृष्टित वेगळे स्थान निर्माण करणारी गायिका म्हणजे गीता दत्त.२३ नोव्हेंबर १९३० रोजी बांगलादेशाच्या बेजनिपुरा गावात जन्मलेल्या गीताने आपल्या छोट्याशा फिल्मी करिअरमध्ये अनेक सुमधूर व गाजलेली गाणी गायली आहेत.याच चित्रपटाच्या शुटिंग आणि रेकाँर्डिंगच्या वेळी गुरुदत्त आणि गीतादत्तची जवळीक वाढली व यानंतर त्यांनी बंगाली रिती रिवाजाने लग्न केले.त्यांना तरुण,अरुण आणि नीना नावाचे तीन अपत्ये झाली.
गीता दत्त यांनी ललिता पवार यांचे पती व संगीत दिग्दर्शक हनुमान प्रसाद यांच्याकडून गायनाचे धडे गिरवले होते.त्यांनीच या बहूप्रतिभाशाली गायिकेला हिंदी सिनेसृष्टित पहिले गाणे दिले.१९४७ साली हनुमान प्रसाद यांच्या ‘भक्त प्रहलाद’या पौराणिक चित्रपटातील ‘सुनो-सुनो हरी की लीला सुनाए’हे गाणे गीता यांनी गायले.खरं तर यात त्यांना दोनच ओळी गायला मिळाल्या होत्या पण,या दोनच ओळींनी रसिकांना मंत्रमुग्ध केले होते.यानंतर एस.डी.बर्मन यांनी गीताला एकाहून एक सरस गाणे दिले.‘मेरा सुंदर सपना बित गया’,बाबूजी धीरे चलना’,ना जाओ सैय्या छूडाके बैय्या’अशी अविट गोडीची एकूण ७२ गाणी गीताने एस.डी.साठी गायली.या पैकी ४३ गाणी ही सोलो होती.१९४७ ते १९४९ हा काळ पार्श्वगायनात गीता दत्तचा काळ मानला जातो.
मात्र,लग्नाच्या काही वर्षानंतर या नात्यातील विश्‍वास आणि सुखं हरवलं.यासिर उस्मानने लिहलेल्या ‘टेन यर्स विथ गुरुदत्त’  पुस्तकात सांगितले की,लग्नानंतर गुरुदत्तने गीता दत्तला त्याच्या चित्रपटांशिवाय इतर प्रोडक्शनच्या चित्रपटांमध्ये गाण्यापासून रोखले.समाज आणि जिवनातील गंभीर मुद्दांवर चित्रपट बणवणारा गुरुदत्त, गीता दत्तवर त्याने इतकी जास्त बंधने लादली की,फक्त त्याच्याच चित्रपटापर्यंत तिचे गायन बंदिस्त झाले.‘वक्त ने किया क्या हंसी सितम..तूम रहे ना तूम हम रहे ना हम!’गीता गुरुदत्तसाठी पत्नी व त्याच्या मुलांची आई या नात्यापेक्षाही अधिक एक ‘ट्रंप कार्ड’होती,जी फक्त त्याच्या चित्रपटांसाठी गाणी गाऊ शकत होती,गीता दत्तच्या गाण्यांचा गुरुदत्तचे चित्रपट सुपरहिट होण्यातही खास रोल राहत असे.
हळूहळू गीता दत्त आपल्या पतीच्या एकाधिकारशाही वर्चस्वाखाली जगण्यास भाग पडू लागली……विरोधाभास तर हा होता की जेव्हा इतर दिग्दर्शक त्या काळातील अभिनेत्रींचे घराच्या चार भिंतीत बंंदिस्त आयुष्य चित्रित करीत होते त्यावेळी गुरुदत्त महिलांच्या चार भिंतीबाहेरील व आत्मनिर्भर आयुष्य दाखवूण समाजाला आपल्या चित्रपटातून एक नवी दिशा दाखवित होते!मात्र,ही शिकवण त्यांच्या स्वत:च्या आयुष्यात कुठेही नव्हती.त्यांचा हा पुरुषी अट्टहास होता पत्नीने आपल्या स्टारडमचा त्याग करुन फक्त त्याची घर- गृहस्थी सांभाळावी, जेव्हा की गीता दत्त त्या काळातील क्रमांक एकची लोकप्रिय पार्श्वगायिका होती.‘ये लो मैं हारी पिया हूयी तेरी जीत रे,काहे का झगडा बालम तेरी मेरी प्रित रे!’
याच काळात गुरुदत्तने चित्रपटसृष्टित नव्या असलेल्या वहिदा रहमानसोबत एकूण चार चित्रपटांचा करार साईन केला.हे चित्रपट होते ‘,सीआयडी’,प्यासा,कागज के फूल आणि साहब,बिबी और गुलाम’.
गुरुदत्त पहील्यापासून विवाहित होते आणि तीन मुलांचे पिता होते.हे वहिदा रहमानलाही माहिती होते तरी देखील वहिदाने या नात्याला इतक्या पुढे नेण्या मागे काय कारण होते?जाणकार सांगतात की,वहिदा रहमानने आपल्या फिल्मी करिअरला पुढे नेण्यासाठी गुरुदत्तचा वापर केला.तिच्या याच व्यवसायिक स्वार्थाने गीता दत्तच्या संसारावर आघात केला.वहीदाला या गोष्टीतून काहीच फरक पडत नव्हता की तिच्यामुळे कोणाच्या तरी हसत्या खेळत्या संसारावर भयंकर संकट उद् भवले आहे. .एक स्त्री,एक पत्नी,पतीच्या विश्‍वासघाताच्या वेदनेत होरपळत आहे,तीन चिमुकले जीव आई-वडीलांच्या भांडणात आपलं बालपण गमवत आहे!गुरुदत्त तर वहीदाच्या प्रेमात सगळं काही लृटवायला तयार बसले होते.
१९५७ मध्ये अखेर गीता दत्त व गुरुदत्त यांच्या जीवनात असा भूकंप आला ज्यातून हे दोघेही वेगळे झाले.चित्रपट ‘प्यासा’च्या शुटिंगच्या वेळी या दोघांचेही संबंध खूप खराब झाले आणि गीता कलकत्ताला निघून गेली होती.गीता दत्त यांची नणद ललिता लाजमीनी दोघांच्या या भांडणाला दोघांच्याही ‘इगोचं‘ भांडण असल्याचं एका मुलाखतीत सांगितलं.मात्र,ललिताने त्यांच्या भांडणाचे खरे कारण सांगितलं नाही की ते कारण वहिदा रहमानसोबत गुरुदत्तचं नातं होतं…!
एकीकडे गुरुदत्त प्रेयसी वहिदा रहमानच्या करिअरला यशाच्या सर्वोच्च स्थानावर पोहोचवण्यासाठी दिवस रात्र प्रयत्नरत होते तोच गुरुदत्त आधीच यशाच्या सर्वोच्च स्थानावर असलेल्या आपल्या पत्नीसाठी निर्मित करीत असलेल्या ‘गौरी‘चित्रपटाची शुटिंग, मुर्हूत केल्यानंतर अवघ्या दोनच दिवसात थांबवून मोकळा झाला.गीता शुटिंगच्या सेटवर माझ्याशी भांडते असे कारण सांगितल्याने ,गीता दत्तची चित्रपटसृष्टित खूप बदनामी झाली आणि तिच्या कारर्कीदीवरही याचा खूप वाईट परिणाम झाला.
गुरुदत्तने एक चित्रपट बनवला ‘कागज के फूल’.या चित्रपटाची कहाणी खूपशी या तिघांच्याही आयुष्याशीच मिळती-जुळती होती पण,गुरुदत्तने या चित्रपटात नायिकेला अश्‍यारितीने सादर केले की,चित्रपटातील श्रींमत पत्नी आपल्या वेगळ्या झालेल्या पतीला आपल्या मुलीशी भेटू देत नव्हती.या चित्रपटात गुरुदत्तने आपल्या पत्नीलाच ‘खलनायिकेच्या’ रुपात दाखवले जी आपल्या मुलीला तिच्या पित्यासोबत भेटू देत नव्हती.परिणामी,जगाला या तिघांच्या नात्यांवर ‘गॉसिप’ करण्याची चांगलीच संधी मिळाली तर दूसरीकडे गीता दत्तचा संयम ही संपुष्टात आला.गंमत म्हणजे या चित्रपटातीलही सगळी गाणी गीता दत्तनेच गायली होती जी वहिदा रहमानवर चित्रित झाली होती…!
चित्रपटातील नायिका वहिदा रहमान जितक्या दु:खात ही गाणी अभिनित करीत होती त्यापेक्षाही जास्त वेदना.. गीता दत्त यांच्या आवाजात रेकाँर्डिगमध्ये उमटत होती…!

 

वहिदा रहमान गुरुदत्तच्या जीवनात आल्यानंतर त्याचं गीतासोबत खूप भांडण होऊ लागलं.वहिदाच्या प्रेमात तो इतका आकंठ बुडाला होता की आपली पत्नी व कुटूंबाला पार विसरुन गेला होता.गुरुदत्त व वहिदा यांना रंगे हात पकडण्यासाठी गीता दत्तने वहिदा यांच्या नावाने गुरुदत्तला एक पत्र पाठवलं,जेव्हा गुरुदत्त त्याचा मित्र अबरारसह पत्रात नमूद केलेल्या ठिकाणी पोहोचला तिथे गीता तिच्या मित्रासह पोहोचली.गुरुदत्त या घटनेने खूप नाराज झाला,त्यांनी तिथेच गीतावर हात उचलला…!

या घटनेनंतर पती-पत्नी दोघेही वेगळे झाले. २०२१ साली यासिर उस्मान लिखित.‘गुरु दत्त द अनफिनिश्‍ड स्टोरी‘या पुस्तकानुसार,गीता दत्तने एकदा वहिदा हिच्यावर आपला राग काढला आणि म्हणाल्या,‘तू आमच्या आयुष्यात आल्यापासून जीवन नरक बनलं आहे’,गीता दत्त आपल्या तिन्ही मुलांसह माहेरी निघून गेली.आयुष्याच्या शेवटच्या काळात गुरुदत्त खूप एकाकी पडले होते.त्यांनी दारुलाच आपल्या एकाकीपणाचा साथीदार बनवला होता.
नव-याचे घर सोडल्यानंतर गीता दत्त हळूहळू नैराश्‍यात जाऊ लागली.गुरुदत्त जेव्हा जेव्हा आपल्या मुलांना भेटण्यासाठी जात होते तेव्हा तेव्हा त्यांच्यात खूप भांडणे होत होती.गीता या सर्व परिस्थितीचा सामना करु शकत नव्हती,या सगळ्यांचा परिणाम तिच्या गायनावर देखील होत होता.ती रेकॉर्डिंगवर उशिरा पोहोचू लागली,शून्यात हरवत होती आणि आता तिने दू:खापासून पळवाट शोधण्यासाठी दारुचा सहारा घेतला होता.संगीतकार पण तिच्या उशिरा येण्यामुळे त्रासले होते व हळूहळू तिची जागा आशा भोसले घेत राहीली.अखेरच्या काळात गीता दत्तचा अति मद्यसेवनामुळे स्मृतिभ्रंश झाला होता,आर्थिक अडचण व गंभीर आजारपणाने सुवर्ण युगातील या गान कोकिळेला ग्रास घेतला…अखेरच्या काळात तर तिने स्वत: जन्माला घातलेली तिन्ही मुले देखील ती ओळखत नसे…!
कौटूंबिक समस्या या जीवनावर व कलेवर खूप भारी पडल्याने गीता यांनी हळूहळू गाणे कमी केले होते.या काळात त्यांच्या हातून अनेक प्रोजेक्ट्स निघून गेले.खूप स्वाभाविक आहे,ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं,त्याच्या तीन मुलांची आई झाले,जिची सृजनशीलता,मनाची तृप्ती व जीवनातला आनंदच गुरुदत्त होता,तोच एका अभिनेत्रीच्या नादी लागला होता,अश्‍या नात्यामागे धाव घेतली ज्या नात्याने त्यांच्या लग्नाच्या,विश्‍वासाच्या नात्याच्या मूळावरच घाव घातला…!केवळ ११ वर्षच गुरुदत्त व गीता दत्त यांचा संसार बहरला मात्र,वैवाहिक जीवनातील विसंवाद व प्रेम संबधात आलेले नैराश्‍य यामुळे गुरुदत्त पण नैराश्‍याच्या गर्तेत पाहोचला होता.
.

गुरुदत्त यांनी आत्महत्या केल्यावर गीता दत्त यांनी देखील स्वत:ला दारुच्या आहारी झोकून दिलं.दिवस रात्र त्या दारु पित असे.रफी सोबतच्या एका रेकाँर्डिंगच्या वेळी त्या इतक्या मद्यप्राशन करुन होत्या की नीट त्यांना माईक समोर उभं ही राहता येत नव्हतं.परिणामी,गीता दत्त यांना ऑफर झालेली गाणी आशा भोसले यांना मिळू लागली.यामुळे घर चालवण्यासाठी गीताला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला.चित्रपटात काम मिळत नसल्याने ती लहान-मोठे स्टेज शो करायला लागली.अखेर लिव्हरच्या आजारामुळे १९७२ मध्ये तीने देखील या निष्ठूर आणि व्यवहारी जगाचा निरोप घेतला…!१० ऑक्टोबर १९६४ साली गुरुदत्त हे जग सोडून निघून गेेला होता…त्याच्या निधनानंतर ९ वर्षांनी २० जुलै १९७२ रोजी गीता दत्तचे देखील सूर कायमचे हरवले…!
गीता दत्त व गुरुदत्त यांचे नाव समोर येताच आठवतं,बाजी,आरपार,सीआयडी,प्यासा,कागज के फूल,चौदहवी का चांद हे चित्रपट आणि …बाबूजी धीरे चलना,ये लो मै हारी पिया हूयी तेरी जीत रे…ए दिल मुझे बता दे तू किस पे आ गया है.(भाई भाई)’.न ये चांद होगा ना तारे रहेंगे मगर हम हमेशा तुम्हार रहेंगे(शर्त)कोई कैसे जिए जहर है जिंदगी(बादबान),ख्यालो मे किसी के इस तरह आया नही करते(बावरे नैन)जाने कहां मेरा जिगर गया जी(मिस्टर ॲण्ड मिसेस ५५)जाता कहां है दिवाने(सीआयडी),आज सजन मोहे अंग लगा ले(प्यासा)मेरा नाम चिन चिन चू(हावडा ब्रिज)वक्त ने किया क्या हंसी सितम(कागज के फूल)…..!
गीता दत्त यांच्यावर फक्त गुरुदत्तनेच नव्हे तर सिनेसृष्टितील संगीतकाराने देखील अन्याय केला.‘सुजाता’चित्रपटातील ‘तूम जियो हारो साल,साल के दिन हो पचास हजार’या गीताचे पार्श्वगायन गीता दत्तने केले असतानाही श्रेय नामाावलीत आशा भोसलेंचे नाव टाकण्यात आले.हा चित्रपट रिलिज झाल्यावर २७ वर्षांनंतर आशा भोसलेंनी याचा खुलासा केला की,हे गाणं मी नव्हे गीता दत्तने गायलं आहे….!२७ वर्षांंनंतर….!हे गाणे ए.डी.बर्मन यांनी गीता व आशा या दोघींकडून गाऊन घेतले पण गीता यांचे गाणे सिलेक्ट झाले.पण ग्रामोफोन कंपनीला आशा यांचे नाव गेले..!
दूसरीकडे गुरुदत्त पण दारु व सिगारेटमध्ये बूडून गेले होते.गुरुदत्तच्या जीवनातील हा काळ इतका वाईट होता की,एकीकडे बायको-मुले घर सोडून गेली होती त्यामुळे त्याचे घर हे घर राहीले नसून फक्त भिंती राहील्या होत्या तर दूसरीकडे वहिदा रहमानसोबतही त्याचं नातं हे वाईट होत चाललं होतं.
गुरुदत्त वहिदाला घेऊन इतका जास्त पझेसिव्ह झाला होता,की तिच्या चित्रपटांचे निर्णय देखील तोच घेऊ पाहत होता.ती कोणत्या निर्मात्याचे चित्रपट करेल,कोणत्या नाही,शेड्यूल,शुटिंग,आऊट डोर टूर पण…! वहीदा भले ही दूस-या प्रोडक्शन हाऊसचे चित्रपट करीत होती पण गुरुदत्तच्या प्रोडक्शन हाऊसच्या मेकअप रुममध्ये तयार होण्यासाठी येत होती.आता पर्यंत आपल्या प्रेमीकडून व्यवसायिक फायदा उकळणा-या वहिदाला आता त्याची,तिच्या जीवनात इतकी जास्त दखलअंदाजी आणि पाबंदी सहन होत नव्हती.हळूहळू त्यांच्यातही भांडणे होऊ लागली आणि वहिदा रहमानने गुरुदत्त पासून अंतर राखण्यास सुरुवात केली.‘मिली खाक मे मुहब्बत जला दिल का आशियाना!’
गुरुदत्तसारख्या वृत्तीच्या पुरुषाला हे सहन होणे शक्यच नव्हतं..आधी आपली पत्नी व नंतर आपल्या प्रेयसीच्या जगण्याला ‘कंट्रोल’ करण्याचा प्रयत्न करणा-या गुरुदत्तचा आता स्वत:च्याच जीवनावरील कंट्रोल संपत चालला होता.पत्नी,मुले सोडून निघून गेले होते,प्रेयसीचे इप्सित साध्य होऊन त्याच्या आयुष्यातून निघून चकाकणा-या सिनेसृष्टित ती कुठे तरी त्याच्यापासून खूप दूर हरवून गेली होती, आता गुरुदत्त जवळ जर काही होते तर ते होते मद्य आणि झोपेच्या गोळ्या. नैराश्‍यात खोल खोल खोल तो जात होता.. …आणि स्वत:ला सांभाळण्याच्या पलीकडे पोहोचला होता.. .‘ये लृटते हूये कारवां जिंदगी के..जला दो फक डालो ये दूनिया,ये दूनिया अगर मिल भी जाये तो क्या है!‘
मृत्यूच्या एक रात्री पूर्वी नेमके काय घडले याचा उल्लेख गुरुदत्तचे मित्र आणि त्याच्या बहूतांश चित्रपटाचे लेखक अबरार अली यांनी ‘टेन यर्स विथ गुरुदत्त’मध्ये केला आहे.९ ऑक्टोबर १९६४ रोजी जेव्हा ते गुरुदत्तला भेटण्यासाठी गेले तेव्हा तो मद्य पित होता.याच दरम्यान गुरुदत्तचं फोनवर गीता दत्तसोबत भांडण झालं होतं.गुरुदत्त आपल्या अडीच वर्षाच्या मुलीला भेटण्यासाठी आतूर झाला होता पण,गीता आपल्या मुलीला गुरुदत्तकडे पाठविण्यास तयार नव्हती कारण,एक तर गुरुदत्त सतत नशेत राहत होता आणि दूसरं कारण खूप रात्र झाली होती.
यानंतर गुरुदत्तने गीता दत्तला धमकी दिली जर माझ्या मुलीला तू पाठवले नाही तर माझं मेलेलं तोंड पाहशील…हे सगळं ताे नशेत असताना घडलं होतं.रात्री १ वाजता अबरार व गुरुदत्त सोबत जेवले व अबरार स्वत:च्या घरी निघून गेला.दूपारी अबरारकडे एक फोन आला आणि अबरारने गुरुदत्तच्या घराकडे धाव घेतली.त्याने पाहिले गुरुदत्त पलंगावर झाेपले आहेत,टेबलवर ग्लास ठेवला आहे ज्यात एक गुलाबी रंगाचं लिक्वीड दिसत होतं आणि गुरुदत्तचे श्‍वास थांबले होते….!
असं सांगितलं जातं की गुरुदत्तने मद्यासोबतच झोपेच्या जास्त गोळ्या खाऊन घेतल्या होत्या त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला.अबरार अल्वीने सांगितले की गुरुदत्त आत्महत्येच्या विविध प्रकारांबाबत त्यांच्याशी आधी देखील बोलला होता!दोन वेळा गुरुदत्तने आत्महत्येचा प्रयत्नही केला होता त्यामुळेच गुरुदत्तने आत्महत्या केल्याच्या चर्चेला बळ मिळालं.१९६४ मध्ये वयाच्या ३४ व्या वर्षी गुरुदत्त या महान अभिनेता व दिग्दर्शकाने या जगाला ‘पॅक अप’म्हटले.‘बिछडे सभी बारी..बारी!‘.त्याच्या मृत्यूच्या बातमीने सिनेजगताला स्तब्ध केले.सामान्य दर्शकापासून तर सिनेजगतातील शीर्षस्थ जगापर्यंत अनेक चर्चा त्याच्या मृत्यूला घेऊन रंगू लागल्या,जी आजपर्यंत सुरुच आहे.
महत्वाचे म्हणजे,या महान कलाकाराच्या मृत्यूसाठी कोणी वहिदा रहमानला दूषणे देतात तर काही जण ‘जैसी करनी वैसी भरनी’म्हणून गुरुदत्तच्या आत्महत्येला जगरहाटीचे नियम लागू करताना दिसून पडतात. हा एक दू:खद अंत होता,अश्‍या अभिनेत्याचा जो हिंदी सिनेमाचा नायाब रत्न होता.गुरुदत्त जर आणखी काही काळ जगला असता तर त्याने भारतीय हिंदी सिनेमाला आणखी सर्वोच्च स्थानावर पोहोचवले असते,यात शंका नाही.
मात्र,खासगी आयुष्यात घेतलेले चुकीचे निर्णय आणि त्यापासून निर्माण झालेले हालात, त्याच्या कलासक्त व अहंकारी मनाला झेपू शकले नाही आणि सगळं काही संपलं.वहिदा रहमान तर आपल्या फिल्मी दूनियेत पुढे जात राहीली पण,गीता दत्त गुरुदत्तच्या जाण्याने कोसळून पडली…!
ही आणखी एक शोकांतिका होती की गीता दत्तच्या मृत्यू नंतर दहा वर्षांनी गीताचा मोठा मुलगा तरुण दत्त याने देखील आत्महत्या केली.त्याच खोलीत..ज्यामध्ये गीता,गुरुदत्तचा फोटो होता..आपल्या हसत्या खेळत्या मुलांसोबत…!

वयाच्या ३९ व्या वर्षी गुरुदत्तने झोपच्या गोळ्या खाऊन स्वत:ला संपवले.१० ऑक्टोबर १९६४ रोजी पेडर रोड या ठिकाणी असलेल्या त्यांच्या बंगल्यात त्यांचा मृतदेह आढळून आला होता.२० जुलै १९७३ रोजी गीतानेही वयाच्या ४१ सा व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला.१९४६ ते १९६६ या वीस वर्षांच्या काळात गीताने अनेक प्रकारची,वेगवेगळ्या ढंगाची,मूड्सची गाणी गायली.तिच्या अवीट गोडीची गाणी आजही रसिक श्रोत्यांच्या मनाला भूरळ घालत असतात…..!
वहिदा रहमानच्या कारकीर्दीत बर-याच सुपरहिट सिनेमांनंतर एक काळ नावलौकिकाच्या ओहोटीचा पण लागला.हळूहळू तिची जाूद ओसरत जात होती.जेव्हा फारसे सिनेमे हाती नव्हते व आयुष्यात कोणीतरी जोडीदार हवा असे तिला वाटू लागले,वहिदा रहमान यांनी त्यावेळी हैदराबादचे नवाब फरीद अहमद सिद्दीकी यांच्यासोबत साखरपुडा केला.मात्र,एका निनावी पत्रातून या नवाबाचे चारित्र्यहीनतेचे पुरावे तिला मिळाल्यानंतर तिने हा सारखरपुडा मोडला.
लग्नाचे हे स्वप्नं मोडले असतानाच अचानक त्यांच्या जीवनात शशी रेखींची एण्ट्री झाली.कोणताही गाजावाजा न करता वहिदा यांनी शशी रेखींसोबत लग्न केले.पण,त्यात ही वहिदा यांच्या बहीणीने वाद निर्माण केला.लग्न इस्लाम धर्मानुसार व्हावे अशी अट तिने घातली.शेवटी शशी यांनी माघार घेऊन इस्लामी धर्मानुसार लग्न केले.
वहिदा रहमान यांनी देखील पुढील काळात शशी रेखा उर्फ कमलजीत या अभिनेत्यासोबत विवाहगाठ बांधली.शशी रेखी उर्फ कमलजीत हे ६०-७० च्या दशकातले सुप्रसिद्ध अभिनेते होते ज्यांनी अनेक चित्रपटात काम केलं होतं.यात शगुन,तमाचा,हिर रांझा,मिस्टर इंडिया,सन ऑफ इंडिया सारखे चित्रपट आहे.वहीदा रहमान सोबत त्याचं नातं ती गुरु दत्तपासून दूर गेल्यानंतर सुरु झालं होतं.वहीदा रहमान आणि कमलजीतने काही काळ एकमेकांसोबत घालवल्यानंतर १९७४ मध्ये लग्न केले.कमलजित हे अभिनेत्री प्रिया राजवंशचे बंधू होते.प्रिया राजवंशने देव आनंदचा भाऊ आणि चित्रपत्र निर्माता चेतन आनंदसोबत लग्न केलं होतं.वहीदाला या लग्नापासून दोन मुले झाली एक मुलगी काशवी रेखी आणि मुलगा सोहेल रेखी.

शशी रेखीसोबतच्या लग्नाला तिच्या घरच्यांचा विरोध होता पण तिला सलीम खान यांची साथ मिळाली.कमलजितने वहिदाला आधी प्रपोज केलं होतं.ते एकमेकांचे शेजारी होते.दोघेही चांगले मित्र ही होते.पण धर्म वेगळा असल्याने त्यांच्या लग्नाला खूप विरोध होता.त्या काळी लग्नाच्या बाबतीत विचार हे खूप रुढीवादी होते.कवलजितने लग्नानंतर फार कमी चित्रपट केले.२००० साली कमलजित यांचा मृत्यू वहीदाला एकाकी करुन गेला पण अभिनयाच्या या साम्राज्ञीने स्वत:ला तरी देखील चित्रपटात व्यस्त ठेवले.वहीदा यांचा जन्म ३ फेब्रुवरी १९३८ साली झाला होता.याच फेब्रुवरी महिन्यातील ३ तारखेला त्या ८८ वर्षांचा झाल्या आहेत.
अनेक जण वहिदा रहमानला गुरुदत्तच्या मृत्यूसाठी दोष देतात मात्र,गुरुदत्तची एकूण जीवनी आणि विचार बघता,वहिदा यांनी गुरुदत्तची साथ दिली असती तरी…त्यांची दूसरी ‘गीता दत्तच’ झाली असती असे अनेक जाणकार सांगतात,ज्याप्रमाणे पार्श्वगायनात सर्वोच्च स्थानावर असलेल्या आणि घरंदाज गीता दत्तचे आयुष्यं, लग्नानंतर गुरुदत्तने आपल्या संकुचित आणि स्वार्थी स्वभावातून  उधवस्त केले,वहिदा रहमानसारख्या प्रतिभावान अभिनेत्रीचेही जगणे त्याच बंधनात बंदिस्त झाले असते आणि हिंदी सिनेसृष्टि एका प्रतिभावंत व गुणी नायिकेला कायमची मुकली असती….!
‘रंगीला रे तेरे रंग में यू रंगा है मेरा मन’,‘जानेवाले आजा तेरी याद सताये‘आज फिर जीने की तमन्ना है’,‘पिया तोसे नैना लागे रे’,जादूगर मेरे सैया’,‘मेहबूब मेरे मेहबूब मेरे..’अश्‍या सदाबहार आणि ह्दयाचा ठाव घेणा-या गीतांमुळे आज देखील सिने रसिकांच्या ह्दयावर अधिराज्य गाजवणा-या वहिदा रहमानच्या कसलेल्या अभिनयाला रसिक सिनेप्रेमी त्यामुळे मुकले असते…!
………………………………
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या