मध्य प्रदेश पर्यटन विभागाची कृती: समाज माध्यमांवर रोष
हवामान खात्याच्या इशा-याकडे दूर्लक्ष: क्रूझ पाण्यात उतरवले
नागपूर,ता.१ मे २०२६: मध्य प्रदेशच्या जबलपूरमधील नर्मदा नदीच्या बरगी डॅममध्ये(Bargi Dam) बरगी पर्यटन विभागाद्वारे संचालित क्रूझ नेहमीसारखाच त्या शांत लहरीत झोके घेत नौकावहन करीत होता.क्रूझ मधील सर्व प्रवासी नर्मदा नदीच्या उंच उसळणा-या लाटांचा आणि त्यावर हेलकावे घेत असलेल्या नौकेचा आनंद घेत होते.प्रत्येकाच्या हातातील मोबाईल त्या क्षणांना कॅमरेमध्ये कैद करण्यास व्यस्त होते.या नौकेवर महिला,त्यांची लहान चिमुकले,पुरुष आणि फक्त दोन नौका वाहक होते.
सगळं काही शांत होतं. मात्र ,अचानक वेगाने वारे वाहू लागले,सगळीकडे धूळीचे साम्राज्य पसरले.शांत पाण्यात अचानक भर्ती आली.मोठमोठ्या लाटांमध्ये क्रूझ तग धरु शकले नाही आणि ते हळूहळू उसळणा-या लाटांच्या आत शिरु लागले.लाटा इतक्या उंच उसळत होत्या की क्रूझ एखाद्या खेळण्याप्रमाणे वर-खाली होऊ लागला.प्रवाशांच्या जिवाच्या आकांताने किंचाळण्याच्या आवाजाने सगळे पाण्याकडे धावले.याच दरम्यान एक खूप मोठी लाट आली आणि क्रूझ पूर्णपणे त्यात कलंडले.
नाव पाण्यात उलटली होती आणि प्रवासी पाण्यात बुडत होेते.एका आईने आपल्या मुलाला डोक्यावर उचलून घेतले पण ती पाण्यात डूबत चालली होती.स्थानिक तरुणांनी पाण्यात उड्या घेतल्या आणि त्या आई व तिच्या चिमुकल्याला जिवंत पाण्याबाहेर काढले. प्रशासनाने क्रूझवर २९ प्रवासी असल्याचा दावा केला आहे मात्र,अनेक प्रत्यक्षदर्शींनी क्रूझवर विना तिकीट देखील आणखी प्रवासी असल्याचा दावा केला.
हवामान विभागाने एक दिवसा पूर्वीच म्हणजे बुधवार दिनांक २९ एप्रिल रोजी दूपारी साढे बारा वाजताच यलो अलर्ट जारी केले होते. पाऊस आणि जोरदार वारा वाहणार असल्याची सूचना पर्यटन विभागालाही मिळाली होती. त्यामुळे असा अलर्ट जारी झाल्यावर क्रूझ पाण्यात उतरवली जात नाही मात्र,भ्रष्ट कारभार व लोभातून जबलपूरमधील पर्यटन प्रशासनाने क्रूझ नौका विहारासाठी पाण्यात सोडली व प्रवासी व लहान-लहान मुलांचा जीव धोक्यात घातला.पाण्यात गेल्यानंतर थोड्याच वेळाने ६० ते ६५ किमी प्रति तास वेगाने वारे वाहू लागले अन् क्रूझ पाण्यात हेलकावे घेत अखेर बुडाली.
ज्यांना पोहता येत होते ते सुखरुप बाहेर पडले.या क्रुझवरील ज्यूलिअस नावाच्या प्रवाश्याने माध्यमकर्मींना सांगितले की,क्रूझ जेव्हा पाण्यात बुडू लागले त्यावेळी लाईफ जॅकेट्स देण्याची सुध नौका चालकांना आली.ज्यूलिअस हे त्यांची पत्नी,मुलगी,जावई व नातीसोबत क्रुझवर होते.या घटनेत ज्यूलिअसच्या पत्नीचा मृत्यू झाला तर जावई व नात सुखरुप आहेत,मुलीचा शोध सुरु आहे…!
ही घटना घडडी त्यावेळी जवळच निर्माणाधीन पुलाचे काम सुरु होते,तेथील लोकं देखील घटनास्थळी धावली.स्थानिकांनी प्रवाशांना वाचवण्यासाठी दोरी फेकली.यामुळे देखील अनेकांचा जीव वाचला.
अपघातानंतर रेस्क्यू ऑपरेशन(बचाव कार्य)सुरु करण्यात आले त ९ मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे.घटनास्थळी जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक आणि मदत व बचाव पथके(NDRF/SDRF)प्रवाश्यांचा शोध घेत आहेत.१९ प्रवाश्यांचे प्राण बचाव पथकाने वाचवले असल्याचे सांगण्यात आले आहे.तर काही प्रवाश्यांनी पोहून स्वत:चा जीव वाचवला,अशी माहिती आहे.
चिमुकलीचे विश्व पाण्यात समावले-
काल गुरुवार दिनांक ३० एप्रिल रोजी सायंकाळी झालेल्या या अपघातात एका चिमुकलीचं संपूर्ण विश्व क्षणार्धात पाण्या खाली सामावून गेलं. हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ असल्यामुळे पर्यटकांची चांगलीच गर्दी होती.क्रूझचा आनंद घेण्यासाठीही पर्यटकांमध्ये स्पर्धा सुरु होती.मात्र,नर्मदा नदीच्या खाडीत हे क्रुझ अचानक बुडालं.स्थानिक खलाशी आणि प्रशासनाने बचाव कार्य सुरु केले.यात वाचवण्यात आलेल्या एका चिमुकलीने पत्रकारांना सांगितले की,क्रुझ अचानक पलटली आणि संपूर्ण जहाजात पाणी भरले.सगळेजण सैरावैरा पळू लागले.त्यात मला माझे वडील कसे तरी सापडले,म्हणून मी त्यांचा हात धरला.माझी आई आणि भाऊ बेपत्ता आहे.माझे आजोबाही सापडले पण माझ्या आजीचा मृत्यू झाला.

याच अपघातात काही क्षणांपूर्वी आपल्या आई-वडीलांसोबत आणि भावासोबत खळखळून हसणा-या त्या चिमुकलीच्या डोळ्यातील भीती ही आयुष्यभरासाठी कोरली गेली.याच मुलीच्या आईचा मृतदेह आज सकाळी सापडला असून त्या आईने आपल्या मुलाला म्हणजे या चिमुकलीच्या भावाला आपल्या छातीशी कवटाळलं होतं.शेवटच्या क्षणापर्यंत ती आई आपल्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करीत होती.आईने आपल्या मुलाला लाइफ जॅकेटमध्ये कवटाळून ठेवले..अखेरच्या श्वासापर्यंत त्या आईने आपल्या मुलाला काळजापासून दूर केले नव्हते व त्याच अवस्थेत त्या माय-लेकाचा मृतदहे बचाव पथकाला सापडला….!हे दृष्य कोणत्याही संवेदनशील मनाचा थरकाप उडवणारा होता.
निमलष्करी दलाच्या डायव्हिंग चमूने क्रूझ शिपपर असेल्या एका महिलेचा मृतदेह बाहेर काढला.तिचा मृतदेह तिच्या मुलाला घट्ट मिठीत घेऊन आढळला…..!

छायाचित्र: आईने चार वर्षीय मुलाला असे आपल्या लाईफ जॅकेटमध्ये कवटाळले मात्र, समाज माध्यमांवर मीम्स,,शॉट्स..एआय जनरेटेड फोटोज…लाईक्स..व्यूजचा संवदेनाशून्य ममतेचा बाजारही दिसून पडला….!)
आग्रा येथील डायव्हिंग चमूने बुडालेल्या जहाजाच्या आतील आव्हानात्मक परिस्थितीचे वर्णन केले.जागा मर्यादित होती आणि तिथे धारदार लोखंडी सळ्या होत्या.त्यामुळे बचाव पथकाला अरुंद मार्ग तयार करण्यासाठी हातोड्यांचा वापर करावा लागला.बचाव पथकातील एक सदस्य तर जवळजवळ अडकलाच होता.सुरवातीला क्रूझच्या ढिगा-या खालून एका महिलेचा मृतदेह बाहेर काढताना खूप अडचण आली.मग आमच्या लक्षात आले की तिने आपल्या मुलाला घट्ट धरले होते आणि त्यांना वेगळे करणे कठीण जात होते.हे दृष्य पाहून आमची चमू खूप भावूक झाली….!
याशिवाय मर्यादित जागा,कोसळणा-या इमारती आणि कमी दृष्यमानता यामुळे बचाव कार्य हे अत्यंत आव्हानात्मक होते.पथकाला वारंवार तुटलेल्या इमारती आणि लोखंडी सळ्या आढळत होत्या ज्यात त्यांचे सामान अडकले होते.ही मोहिम धोकादायक होती करण क्रुझची रचना दोन्ही बाजूने पूर्णपणे खराब झाली होती आणि आतील जाळ्यांमुळे मार्ग अरुंद झाले होते.या अडचणी असूनही निमलष्करी दलाने खाेल भागातून ५ मृतदेह बाहेर काढले यात एका मुलाचा आणि चार प्रौढांचा समावेश आहे.
लाईफ जॅकेटचे गौडबंगाल:-
क्रुझमधील प्रवाश्यांना लाईफ सेविंग जॅकेट देण्यात आल्या नव्हत्या.एका प्रवाश्याने सांगितले की क्रूझ जेव्हा पाण्यात बुडू लागले तेव्हा प्रवाश्यांना लाईफ सेविंग जॅकेट देण्यात आले.तर एका प्रवाश्याने सांगितले की पॉलिथीनमध्ये एका ठिकाणी पडलेल्या लाईफ सेविंग जॅकेट्सकडे त्यांनीच धाव घेतली.क्रूझ पाण्यात उतरवण्या आधी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पर्यटन विभागाने कोणतेही सुरक्षा विषयय उपाययोजना केल्या नव्हत्या.ज्यांना लाईफ जॅकट्स वेळेवर मिळू शकले नाही ते पाण्यात बूडू लागले.
प्रशासकीय अधिका-याने यावर सांगितले की,क्रूझ पाण्यात उतरण्याआधी प्रत्येक प्रवाशाला लाईफ सेविंग जॅकेट घालण्याचा नियम आहे मात्र,आजच्या घटनेत जितके पण मृत देह बाहेर काढले जात आहेत त्या सगळ्यांनी लाईफ जॅकेट्स घातले आहेत.लाईफ जॅकेट्स नसल्यामुळे लोकांचा मृत्यू झाला नसून,खालच्या चेंबरमध्ये पाणी भरल्यामुळे,लाईफ जॅकेट्स घातले असतानाही प्रवाश्यांचा त्यात पडून मृत्यू झाला असावा,चौकशी नंतर खरे कारण समोर येईल,असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
ही प्रशासकीय हत्याच!
प्राथमिक तपासात असं समोर आलं की अपघाताच्या वेळी नर्मदा नदीच्या खाडीतील हवामान बिघडलं होतं.जोरदार वारे वाहू लागल्याने उंच लाटा निर्माण झाल्या.प्रत्यदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार,क्रूझ आधीच हेलकावे खात होतं.परंतु कर्मचा-यांनी त्याला तात्काळ किना-यावर आणलं नाही,ज्यामुळे हा अपघात घडला.या अपघाताबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.समाज माध्यमांवर या घटनेविषयी तीव्र संताप व्यक्त होत अाहे.
या दूर्घटनेत वाचलेले दिल्लीचे रहिवाशी प्रदीप कुमार यांनी घडलेला थरार मांडताना,बोटीवर फक्त दोन कर्मचारी होते.हवामान बिघडत असल्याचे पाहून प्रवाशांनी आणि किना-यावरील लोकांनी बोट किना-यावर घेण्याची विनंती केली,पण चालकाने त्याकडे दूर्लक्ष करत बोट पुढेच नेली….!क्रुझवर जवळपास ३० प्रवासी होते पण सर्वांसाठी लाईफ जॅकेट उपलब्ध नव्हते.प्रवाशांनी एकमेकांमध्ये जॅकेट वाटून घेतले त्यामुळे अनेकांना जॅकेट मिळाल्या नाहीत.या दूर्घटनेत प्रदीप यांनी पत्नी व ४ वर्षीय चिमुकल्या मुलाला गमावले….!
आनंदाचा क्षण क्षणार्धात दु:खात बदलला.७२ वर्षीय रियाज हूसैन हे तीन तास मानेपर्यंतच्या पाण्यात जग धरुन होते…!कुटूंबासोबत क्रूझमधून नौका विहार करणा-या हुसैन यांना समोर काय वाढून ठेवलं आहे याची जाणीव नव्हती…!त्यांना बचाव दलाकडून वाचवण्यात येईपर्यंत तीन तासात प्रत्येक क्षण मृत्यूची चाहूल देत होता.चारही बाजूला पाणीच पाणी.सर्वत्र अंधार..क्रूझवर आदळणा-या समुद्राच्या लाटा..भयानक आवाज…सगळे पाण्यात बुडाले आहेत आता…मी देखील पाण्यात जाणार….!पण….ते वाचले…!
पाणी मानेपर्यंत होतं..अंग थंडीने थरथर कापत होतं…श्वास घेण्यास त्रास होत होता..याच दरम्यान त्यांना बाहेरील लोकांचा आवाज ऐकू आला…प्रचंड ताकदीने क्रूझवर त्यांनी हात मारण्यास सुरवात केली..त्यांचा आवाज ऐकून बचाव पथक त्यांच्यापर्यंत येऊन पोहोचला.गॅस कटरचा वापर करुन क्रुझचे छत कापले आणि त्यांना सुखरुप बाहेर काढले…पण मृत्यूपेक्षाही भयाण दूखं ते भोगत आहे कारण त्यांची पत्नी व नातेवाईक यांचा शोध लागला नाही….!
आपात्कालीन स्थितीत प्रवाशांना मदत करण्यासाठी क्रूझवर पुरेसे कर्मचारी आणि सुरक्षा साधने नव्हती…!
राज्यपमंत्री राकेश सिंह यांनी घटनास्थळी पाहणी केल्यावर ही घटना अत्यंत दूर्देवी असल्याचे म्हटले…!मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली..!
या घटनेनंतर गुजरातमधील मोरबी शहरात मच्छू नदीवर ३० ऑक्टोबर २०२२ रोजी संध्याकाळी ‘झुलता पुल’ कोसळला या घटनेची आठवण झाली! या घटनेत १४० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता.याच काळात गुजरात विधान सभेची निवडणूक सुरु होती. निवडणूकीत राजकीय श्रेयासाठी ,प्रशासनाने घाईघाईने या पुलाचे उद् घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते केले होते.
हा पूल काही दिवस आधीच दुरुस्तीनंतर लोकांसाठी खुला करण्यात आला होता.पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट आणि सुरक्ष्तता प्रमाणपत्र पूर्ण झाले नव्हते,तरीही तो लोकांसाठी खुला करण्यात आला होता,जे या दुर्घटनेचे मुख्य कारण मानले गेले होते.
पर्यटकांनी भरलेला हा झुलता पूल अचानक तुटला आणि शेकडो लोक थेट मच्छू नदीच्या पात्रात पडले.पुलाची क्षमता कमी असतानाही,सुट्टीचा दिवस असल्याने पुलावर खूप गर्दी होती.ज्यामध्ये अनेक मुले,स्त्रिया आणि वृद्ध होते.या भीषण दुर्घटनेत १४० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला तर अनेक लोक जखमी झाले होते.ही दुर्घटना भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी पूल दुर्घटनेपैकी एक मानली जाते.
या प्रकरणी जबाबदार कंपनी आणि अधिका-यांवर गुन्हे दाखल करुन तपास सुरु करण्यात आला होता.न्यायालयीन सुनावणी सुरु असून पिडीतांना अद्याप न्यायाची प्रतिक्षा आहे.दुर्घटनेचे मुख्य आरोपी जयसुख पटेल(ओरेवा ग्रुप)यांच्या जामीन अर्जावर न्यायालयीन सुनावणी झाली .गुजरात उच्च न्यायालयाने पालिका प्रशासनाला आणि संबंधित अधिका-यांना त्यांच्या निष्काळजीपणाबद्दल तीव्र शब्दांत फटकारले होते.
सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातील आरोपींविरुद्ध कलम ३०२(हत्या)लावण्याची आणि सीबीआय(CBI)चौकशी करण्याची मागणी करणा-या पीडितांच्या याचिकेवर महत्वाचे निर्देश दिले आहेत.या दुर्घटनेची न्यायालयीन देखरेखीखाली एसआयटी(SIT)चौकशी करण्यात आली असून पिडितांना योग्य भरपाई मिळावी यासाठी न्यायालय आग्रही आहे.
मोरबीतील दूर्घटना असो किंवा जबलपूरमधील काल घडलेली घटना,निरपराधांचे जीव घेणा-या व कुटूंबाचे कुटूंब क्षणार्धात,कायमचे उधवस्त करणा-या ,अश्या दूर्घटना म्हणजे प्रशासकीय हत्याच असल्याचा संताप समाज माध्यमांवर व्यक्त होत आहे. तातडीची चौकशी…..नंतर थंड बस्त्यात गेलेले अहवाल….प्रदीर्घ काळ चालणारी न्यायालयीन प्रक्रिया..देशात अशाच अनेक दुर्घटनांची ‘नांदी ’असल्याचा रोष व्यक्त होत आहे…..!
……………………………………………………….