२९३ पैकी भाजपने जिंकल्या २१० जागा
मोदी वर्सेस दिदीच्या सामन्यात दिदीचा झाला ‘खेला’
बंगालची झालमुरी बनली विजयाचं प्रतीक
देशभर भाजप कार्यालयात जल्लोष
नागपूर,ता.४ मे २०२६: आज भारतीय जनता पक्षासाठी एक ऐतिहासिक दिवस ठरला.गेल्या पंधरा वर्षांनंतर पश्चिम बंगालमध्ये भाजपने सत्ता स्थापनेपर्यंतचे यश गाठले असून, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सत्तेतून खाली खेचण्यात यश मिळवले.प.बंगालमधील एकूण २९३ पैकी भाजपने मतमोजणीच्या विविध फे-यात २१० जागांपर्यंत मजल गाठली व बंगालच्या राजकारणाचा सर्व नूरच पालटला.
तीन वेळा एक हाती सत्ता मिळवणा-या सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला ७७ जागांवर समाधान मानावे लागले,अर्थात हा पराभव अद्याप मुख्यमंत्री ममता बॅनजींनी मान्य केला नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाने केंद्र सरकारच्या केंद्रीय सुरक्षा बळाच्या देखरेखी खाली पार पाडलेल्या या निवडणूकीत यावेळी ममता बॅनर्जी,तिचे पुतणे अभिषेक बॅनर्जी व त्यांच्या एका विशिष्ट धर्माच्या समर्थकांना यंदा या निवडणूकीत, कोणतेही घटनाबाह्य घडामोडी घडवता आल्या नाही,परिणामी,बंगालमधील मतदार निर्भयपणे मतदानासाठी बाहेर पडला,व बंगालमधील मतदानाने दोन्ही टप्ट्यात नव्वदीच्या पार टक्केवारी गाठली,जी देशाच्या इतिहासात ऐतिहासिक ठरली.
या विक्रमी मतदानात वाढलेला टक्का हा भाजपच्या झोळीत गेला,हे सिद्ध झालं.बंगालमध्ये २९३ जागांसाठी सकाळी मतमोजणीला सुरवात झाली.एका जागेवर(फालटा)मध्ये २१ मे रोजी पुर्नमतदान होणार असून,विधान सभेच्या या मतदारसंघात मतदारांना धाकदपटशाहीतून मतदान करण्यास बाध्य करण्यात आल्याची तक्रार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे भाजपच्या उमेदवारांनी केली.तृणमूलच्या गुंड प्रवृत्तीच्या एजेंटने निवडणूक कर्तव्यावर असलेल्या अधिकारी व कर्मचा-यांच्या नाकावर टिच्चून, ईव्हीएम मशीन वरील तृणमूलच्या निवडणूक चिन्हाच्या बटणावर सुगंधीत अत्तर शिंपडले.परिणामी,तेच बटन दाबल्याची शहनिशा करण्यासाठी,मतदान करुन बाहेर पडणा-या मतदारांच्या बोटावरील सुगंध तपासल्या जात होता.निर्भयपणे या मतदारसंघात निवडणूक पार पडली नसल्याचे लक्षात आल्यावर निवडणूक आयोगाने या मतदार संघाची ि नवडणूक रद्द करीत,पुन्हा २१ मे रोजी मतदान होणार असल्याचे घोषित केले.
याशिवाय अनेक मतदार संघातील इव्हीएम मशीनवरील भाजपच्या बटनावर टेप चिपकवण्यात आले होते,भाजप उमेदवारांनी याचे व्हिडीयो काढत ते समाज माध्यमांवर व्हायरल केले.मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची संपूर्ण स्थानिक यंत्रणा त्यांच्या दिमतीला असतानाही यंदा सर्वोच्च न्यालयाच्या आदेशानंतर केंद्रीय सुरक्षा बलाच्या जवानांसमोर, पार पडलेल्या या निवडणूकीत तृणमूलच्या स्थानिक गुंडांना नेहमीसारखे घटनाबाह्य कृत्य करण्याची संधी मिळाली नाही,व भाजपचा विजय सुनिश्चित झाला.
नागपूरातील एका बंगाली कुटूंबियाने दिलेल्या माहितीनुसार बंगालमधील जवळपास अनेक भागात हिंदू मतदारांना मतदानासाठी घराबाहेर पडू दिले जात नव्हते.हिंदू मतदारांचा प्रभाग एका विशिष्ट धर्माचे हजारो लोक मतदान संपेपर्यंत घेरुन राहत असल्याने,फक्त ममता बॅनर्जींचेच समर्थक मोठ्या प्रमाणात मतदान करीत होते.याला ‘मत-चोरी‘देखील म्हणता येणार नाही तर ‘धर्मांधता व हिंसे’च्या आधारावर ममता बॅनर्जी निवडणूक जिंकत आल्या आहेत,असा थेट आरोप करीत ,प.बंगालचा कोणताही विकास ममता बॅनर्जीच्या सत्ताकाळात झाला नाही.प.बंगाल हे एक बकाल राज्य असून अतिशय अस्वच्छता,धर्माधता व अतिरेकी हिंसा हेच या राज्याचे वैशिष्ठ झाले आहे.
आर.जी.कर रुग्णालयात एका महिला डॉक्टरवरील बलात्कार व निघृण हत्या,या प्रकरणाला एक महिला असून देखील ममता बॅनर्जींनी ज्या असंवेदनशीलपणे हाताळले,त्याबाबत देखील बंगाली जनतेच्या मनात संताप होता.दूर्गा पूजा आणि हिंदू धर्माविषयीची हीन भावनांची उघड अभिव्यक्ति हे ममता बॅनर्जीचे बंगालमधील यशाचे गमक राहीले आहे.मोठ्या प्रमाणात बांग्लादेशमधील घूसखोर यांना प.बंगालमध्ये मिळणारा सहज आश्रय ,शासकीय कागदपत्रांची पूर्तता व त्या आधारावर संपूर्ण देशात कोणत्याही राज्यात त्यांचा सहज वावर,हे संपूर्ण देशाच्या एकात्मतेसाठी धोका बनले असून,फक्त स्वत:ची सत्ता प.बंगालमध्ये अबाधित ठेवण्यासाठी एका विशिष्ट धर्मियांचे लांगून चालन ममता बॅनर्जीच्या राजकारणाचे व यशाचे धोरण बनले होते.
मात्र,यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी व चाणक्य अमित शहा यांनी सुरवातीपासून प.बंगालवर संपूर्ण लक्ष केंद्रीत करुन रणनीती आखली होती.गेल्या विधान सभा निवडणूकीत भाजपने प.बंगालमध्ये ७७ जागांपर्यंत मजल मारली तेव्हाच २०२६ च्या निवडणूकीत सत्तेचे साेपाण त्यांच्यासाठी सहज झाले होते.अतिशय योजनाबद्धरितीने मोदी-शहा या जोडीने रणनिती आखून ममताला त्यांच्याच राज्यात खिंडीत पकडले.देशाची सर्वोच्च सत्ता मोदी-शहा यांच्याच हातात असल्याने, निवडणूक आयोगाला हाताशी धरुन यंदा मतदानामध्ये कोणतीही धांंधली होणार नाही,याची पूर्ण खबरदारी त्यांनी घेतली होती.
केंद्रीय सुरक्षा दलाच्या निगराणीखाली मतदान पार पडल्यानंतर मतमोजणी कर्मचारी नियुक्तीला आव्हान देत, मतमोजणीच्या एक दिवस आधी ममता बॅनर्जी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले.मात्र,मतमोजणी कर्मचारी नियुक्त करण्याचा अधिकार निवडणूक अायोगाला असल्याचे स्पष्ट करत सर्वोच्च न्यालयाने सत्ताधारी तृणमूल काँग्रेसची विनंती फेटाळून लावली.या पूर्वी कोलकत्ता उच्च न्यायालयाने देखील हेच आदेश दिले होते.प.बंगालमध्ये मतमोजणी केंद्रांवर केंद्र सरकारी कर्मचारी नेमण्या संदर्भातील निवडणूक आयोगाच्या परिपत्रकाविरोधात ममता बॅनर्जी यांचा हा थयथयाट होता.
चौथ्यांदा सत्तेचा हव्यास इतका की,उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील भाटपारा येथील भाजपचे उमेदवार पवनसिंह यांच्या घराबाहेर रविवारी रात्री गोळीबार झाला यात सीआयएसएफचा जवान जखमी झाला.२९ एप्रिलच्या दुस-या टप्प्यातील मतदाना पूर्वी हा प्रकार घडला.केवळ याच मतदारसंघात नाही तर पं.बंगालच्या अनेक जिल्ह्यात तृणमूल-भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने भिडले होते.
दक्ष्ण २४ परगणा जिल्ह्यात विशेष पोलिस निरीक्षक अजयपाल शर्मा यांनी कडक पाळत ठेवली होती.‘सिंघम’म्हणून ओळखले जाणारे शर्मा यांनी मतदाना पूर्वी या संपूर्ण संवदेशनशील भागाची पाहणी केली.यामुळे देखील यंदा मतदारांना मोठा धीर मिळाला.कलकत्ता येथील ’डायमंड हार्बर’परिसरात हिंसाचार रोखण्यासाठी त्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे राजकीय वाद निर्माण झाला होता,हा परिसर तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी याचा बालेकिल्ला मानला जातो.गुन्हेगारांविरुद्ध कडक कारवाईमुळे शर्मा यांना ‘सिंघम’हे विशेषण मिळाले आहे.
याच जिल्ह्यातील भांगर आणि आसपासच्या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले ,जेव्हा तृणमूल काँग्रेस मतदान प्रतिनिधींना धमकावत असून मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करीत होती.२६ एप्रिल रोजी केंद्रीय सुरक्षा बलाने एका कथित तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या घरातून गावठी बॉम्ब जप्त केले होते!केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निर्देशानुसार एसआयटीने राज्यात सापडलेल्या ४९ गावठी बॉम्बच्या प्रकरणाची चौकशी सुरु केली.त्यामुळे मतदानापूर्वी भांगर या भागात वादविवादाच्या अनेक घटना घडल्या.
उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील पाणिहाटी मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार रत्ना देबनाथ यांना मतदानानंतर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी वाद उकरुन काढत केंद्रातच अडवून ठेवले.त्या आर.जी.कर रुग्णालय प्रकरणातील पिडीतेच्या आई आहेत.केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यांना बाहेर पडण्यास मदत केली.निवडणूक आयोगाने या कथित घटनेचाही अहवाल मागवला आहे.
लोकशाहीच्या पडद्याआड,हिंसा व धाकदपटशाहीने निवडणूक जिंकण्याची सवय असलेल्या ममता बॅनर्जीच्या पं.बंगालमध्ये रोख रक्कम,मद्यसाठा,अमलीपदार्थ,दागदगिन्यांची देखील मोठ्या प्रमाणात जप्ती करण्यात आली.दुस-या टप्प्यातील मतदानापूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगाने आदर्श आचार संहितेची अंमलबजावणी करताना ५१० कोटी रुपयांचा वरील ऐवज जप्त केला!यात ३० कोटी रोख रक्कम,४८.४६ लाख लिटर मद्य(किंमत १२६.८५ रुपये),११०.१२ कोटींचे अमली पदार्थ,५८.२८ कोटी रुपयांचे मौल्यवान धातू,१८४.८५ कोटी रुपयांच्या इतर मोफत वस्तू,५१०.१० कोटी रुपयांचा इतर मुद्दे मालचा समावेश आहे.
कदाचित याच भरवशावर ममता बॅनर्जींनी यंदा देखील मतदानोत्तर कल चाचण्यांचे अंदाज झुगारुन तृणमूल राज्यात २२६ जागा जिंकत असल्याची वल्गना केली.२०२१ च्या निवडणूकीत ममता बॅनर्जीच्या तृणमूलने बहूतांश जागा जिंकल्या होत्या मात्र,भाजपने देखील ७७ जागा जिंकून मुख्य विरोधी पक्षाची भूमिका बजावली होती.
यंदा देखील ममता बॅनर्जीने,व्हिडीयोच्या माध्यमातून,‘ केंद्रीय सुरक्षा दल तृणमूल काँग्रेसवर अत्याचार करत असल्याचा आरोप केला.लोक आमच्या कार्यालयात घुसले आणि त्यांनी कार्यालयाचा ताबा घेतला आहे.एसआयआरच्या माध्यमातून लूटमार करुन जागा कशा जिंकल्या जात आहे,हे तुम्ही पाहिले आहे.आम्हीच ७० ते १०० जागांवर आघाडीवर आहोत,पण त्या विषयी सांगितले जात नाही.सर्व काही खोटे सांगितले जात आहे.
निवडणूक आयोग केंद्रीय दलाशी संगनमत करुन स्वत:चा खेळ खेळत आहे.आमचे पोलिसही केंद्र सरकारशी संगनमत करुन काम करत आहे(याचा अर्थ आधीच्या निवडणूकांमध्ये प.बंगलाची पोलिस लोकशाहीला धाब्यावर बसवून राज्य सरकारचे काम करीत होती!)मला पक्षाच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना सांगायचे आहे,दुखी होण्याची गरज नाही.मतमोजणीच्या केवळ काही फे-या झाल्या आहेत.आपणच जिंकू.वाट पहा.आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत.आम्ही वाघासारखे लढत राहू.’असे सांगत यावेळी त्यांनी तृणमूल कार्यकर्त्यांना मतमोजणी केंद्रातच थांबवण्याचे आव्हान केले.
निकालचे रुझाण तृणमूलच्या पराभवात तसेच सत्ता हातातून निसटल्याचे दिसल्यानंतर ममता बॅनर्जीनी त्यांना मतदान केंद्रात कशाप्रकारे मारहाण झाली वगैरे भावनिक आव्हान जनतेला केले.मात्र,उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे हे जग आज ममता बॅनर्जी नावाच्या डूबत्या सूर्याला अर्ध्य देण्यास धजावली नाही.तसंही वाघ म्हातारा झाल्यानंतर त्याच्या डरकाळीची भिती जनावरे बाळगत नाही,हीच जगाची रित आहे.
त्यात भवानीपूरमधून ममता बॅनर्जीचा भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांनी १५ हजार १०५ मतांनी पराभव करीत जुने उट्टे फेडून घेतले.सुवेंदू अधिकारी यांना ७१,९१७ मते मिळाली तर ममता बॅनर्जींना ५८,८१२ मते मिळाली.
दरम्यान,प.बंगालमध्ये भाजपने विजयी आघाडी घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ममता यांनी,भाजपने १०० हून अधिक जागा चोरल्या आहेत,भाजपने या निवडणूकीत घोटाळा केला आहे.निवडणूक आयोग भाजपचा आयोग बनला आहे,असा आरेाप त्यांनी केला.भाजपचा विजय हा अनैतिक आहे.निवडणूक आयोगाने पंतप्रधान व गृहमंत्री यांच्या संगनमताने जे काही केले ते अनैतिक आहे.त्यांनी जबरदस्ती एसआयआर राबवला.त्यांनी अत्याचार केले.त्यांनी मतमोजणी प्रतिनिधींना अटक केली,आम्ही प्रत्युत्तर देऊ,अशी वल्गना केली.मूळात तीन वेळा ‘लोकशाही!’मार्गाने सत्ता काबिज केल्यानंतर सत्ता परिवर्तानासाठी यंदा मतदारांनी दिलेला कौल हा उदार मनाने स्वीकारायचा असतो,हेच लोकशाहीला अभिप्रेत आहे आणि हीच पराभूतांची परिपक्वता आहे.,मात्र,असे घडले नाही.बंगालधमील एसआयआर नंतर ९१ लाख मतदार हे मतदारयादीतून बाहेर झाले,हे विशेष.
याच दरम्यान ममता बॅनर्जी यांच्या कोलकत्यातील कालीघाट परिसरातील निवासस्थाजवळ सुरक्षा कडक करण्यात आली.निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर त्यांना कडक सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली.महत्वाचे म्हणजे ममता बॅनर्जी यांच्या घराजवळील परिसर ‘जय श्री राम’च्या घोषणांनी दूमदूमला.हे येत्या काळात प.बंगालचे राजकारण कोणत्या दिशेने जाणार आहे,हे सूचित करतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या विजयाचे वर्णन विकासाचा विजय आणि बंगालमधील ‘परिवर्तन’म्हटले आहे.मोदी यांनी बंगालमधील निवडणूक निकालांचे स्वागत करताना,हा निकाल भय,तृष्टीकरण आणि हिंसेच्या राजकारणाला नाकारुन विकासाच्या दिशेने टाकलेले पाऊल असल्याचे सांगितले..पंतप्रधान मोदींनी ’बंगाल भयमुक्त झाला,आता बंगालमध्ये परिवर्तन होणार’,असा विश्वास व्यक्त केला.भाजपने हा विजय विकास,सुशासन आणि महिलांच्या सुरक्षेच्या मुद्दयावर मिळवला आहे,असे सांगितले.मतदानाच्या विक्रमी टक्केवारीबद्दल आनंद व्यक्त करत,त्यांनी बंगालच्या जनतेने लोकशाहीवर विश्वास दाखवल्याचे म्हटले.
हा निकाल,बंगालच्या राजकारणात एक नवीन अध्याय सुरु करणारा आणि ‘सुनहरा’भविष्य घडवणारा विजय मानले.निवडणूकीच्या रॅलीमध्ये,मोदींनी तृमणूल सरकारवर भ्रष्टाचार आणि सिंडिकेट राजचा आरोप करीत,भाजप सत्तत आल्यास बंगालच्या विकासाची ग्वाही दिली होती.
मात्र,असे असले तरी,बंगालचा विकास करताना, मोदी यांनी नेहमीसारखाच एका खास उद्योगपतीधर्जिणे विकास बंगालमध्ये साधता कामा नये,असे देखील मत समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात उमटले.कोणत्याही राज्याची निवडणूक जिंकताच देशातील उद्योगपती अदानी यांनाच ज्याप्रमाणे उर्जा पासून तर बांधकाम क्षेत्रातील सर्व कंत्राटे मिळतात,यावर देखील प्रखर टिकेची झोड उठली.भाजपने बंगालच्या मतदारांच्या अपेक्षेवर खरे उतरावे,त्यांचे जीवनमान सुधारावे,कायदा व सुव्यवस्था राखण्याची हमी घ्यावी,महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे,मोठ्या प्रमाणात रोजगारच्या संधी उपलब्ध करुन द्यावा,देशाच्या सुरक्षेसोबतच बंगालच्या लोकांच्या मूलभूत गरजा या देखील महत्वाच्या असून,एका पराकोटीच्या आणि संवदेनाशून्य दडपशाहीत गेली पंधरा वर्षे व त्याही पूर्वी कम्यूनिस्टांच्या राज्यात बंगालची जनता पूर्णपणे पिचली असताना,भाजपने एक नवीन पहाट प.बंगालच्या नागरिकांच्या जीवनात उजाडावी,प.बंगालची जमीन व नैसर्गिक संसाधनांचे दाेहन, हे फक्त एखाद्या उद्योगपतीच्या विकासासाठी न राबविता ते प.बंगालच्या जनतेच्या सर्वांगिण विकासासाठी राबवावे,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
एप्रिलमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान कलकत्त्याच्या ज्या झाडग्राममध्ये पंतप्रधान मोदींनी आपला सुरक्षा ताफा थांबवून एका सामान्य दूकानदाराकडून ‘झालमुरी‘घेऊन खालली,त्याची खिल्ली ममताने उडवली होती.त्याच विधानसभा मतदारसंघात भाजपचे चारही उमेदवार विजयी झाले असून,संपूर्ण देशात आज भाजपच्या विजयानंतर बंगालचा ‘रोसगुल्ला’हा जरी प्रसिद्ध असला तरी भाजपच्या कार्यकर्त्यांनी ’झालमुरी’वाटून हा जल्लोष साजरा केला.
………………………………………….