Homeblogजनरल कायर....थँक्यू

जनरल कायर….थँक्यू

Advertisements
Advertisements
मोदीं विरोधात जनआक्रोश समाज माध्यमांवर उमडला

 

२० जुलै मोदी काळातील सर्वाधिक काळा दिवस
तरुणाईने आक्रमक न होता खालल्या पोलिसांच्या लाठ्याकाठ्या 
लाठीहल्ल्यानंतरही  पुन्हा जेन-झी जंतरमंतरवर:आंदोलनाची राहूटी पुन्हा जोमाने उभी
देशभरातील पालकांचेही जंतरमंतरकडे प्रस्थान
नागपूर,ता.२१ जुलै २०२६: आज समाज माध्यमांवर लाखो रिल्स व्हायरल झाल्या.रिल्स मधील निशस्त्र आंदोलनकर्ते, दिल्ली पोलिसांकडून बर्बरतापूर्ण मार खातानाचे दृष्य संपूर्ण जगाला थक्क करुन जाणारे होते.पोलिसांच्या लाठ्यांना खिळे लागले होते,निष्पाप विद्यार्थ्यांच्या रक्ताच्या चिरकांड्या उडून पोलिसांच्याच अंगावर पडतानाचे दृष्य मोदी सरकारची संवेदनशीलता किती मेली आहे,याचे दर्शन घडवत होते.त्याहून भयंकर दृष्य हे, तरुणी व महिलांवर ज्या प्रमाणे पोलिसांनी लाठ्या काठ्या चालवल्या,त्यांच्या अंगावरील कपड्यांची पर्वा न करता त्यांना फरफडत ओढत नेले अशी दृष्ये नाझी हिटलरच्या क्राेर्यालाही लाजवणारे होते.
हे सगळं कशासाठी?तर विद्यार्थ्यांना जंतरमंतरवरुन पांगवण्यासाठी?मात्र,हा डाव मोदी सरकारच्याच अंगावर उलटला आणि आज सकाळपासून दुप्पट संख्येने देशभरातील विद्यार्थी निधड्या छातीने पुन्हा एकदा आंदोलनस्थळी जमत गेले,या वेळी दिल्लीसह आजू बाजूच्या भागातून पालक वर्गाने देखील मोठ्या संख्येने जंतरमंतर गाठले व माध्यमांसमोर मोदी सरकारच्या या बर्बरतापूर्ण  कृत्याचा निषेध केला.आंदोलनस्थळी नारा गुंजला,‘जनरल कायर…थँक्यू!’
काल २० जुलै रोजी जंतरमंतरवर आपल्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी ‘कॉक्रोच जनता पार्टी’ चे समर्थक तसेच देशभरातील विद्यार्थी यांनी संसेदवर निषेध मोर्चा काढला. मात्र,हे आंदोलन दिल्ली पोलिस व सीएफआर जवानांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशातून ज्या पद्धतीने आणि ज्या क्रोर्याने चिरडले ,तो दिवस मोदी सरकारच्या भारताच्या राजकारणातील इतिहासात सर्वात काळा दिवस गणल्या गेला आहे.
नि:शस्त्र विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी मागील २२ दिवसांपासून जंतर मंतरवर आंदोलन सुरु केले आहे.काल संसेदेचे पावसाळी अधिवशेन सुरु झाले व ऐन दिल्लीत मागील २१ दिवसांपासून झोपी गेलेल्या केंद्र सरकारला जागे करण्यासाठी याच दिवशी संसेदवर निषेध मोर्चा काढण्यासाठी देशभरातील हजारो विद्यार्थी जंतरमंतरवर जमले होते मात्र,पोलिसांनी चहूबाजूंनी बॅरिकेट्स लाऊन विद्यार्थ्यांची कोंडी केली व चार ही बाजूने विद्यार्थ्यांवर खिळे लागलेल्या लाठ्यांनी  पूर्ण ताकदीने प्रहार करण्यास सुरवात केली,विद्यार्थ्यांना कुठे ही पळण्यास जागा नव्हती.परिणामी,या बर्बरतापूर्ण लाठीहल्ल्यात शेकडो विद्यार्थी जखमी झाले,बेशुद्ध होऊन धरातार्थी पडले मात्र,पोलिसांनी त्यांना तातडीने वैद्यकीय सेवा पुरविण्या ऐवजी जणू काही ते शत्रू देशातील नागरिक आहेत,अश्‍या रितीने आपल्या बुटांनी जागा करीत इतरांना मारण्यास धावत राहण्याचे दृष्य हे देशातील लोकशाहीला सत्तारुपी बुटाखाली चिरडण्याचाच प्रकार ठरला,
मात्र,मोदी सरकारच्या या क्रोर्याला जेन-झी ने भीक न घालता,पुन्हा जंतरमंतरवर आपली राहूटी म्हणजे स्टेज उभारला व आंदोलनाला पुन्हा सुरवात केली.पोलिसांनी त्यांचे उखडून टाकलेले तंबू पुन्हा उभारले.प्रशासनाने त्यांची वीज आणि पाणी खंडित करुन ही त्यांचा ‘निर्धार ‘तोडू शकले नाहीत.

महत्वाचे म्हणजे,काल रात्रभर पाऊस कोळसत असतानाही आंदोलक मागे हटले नाहीत.राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी देखील कालची घटना वृत्त वाहीन्यांवर बघितल्यानंतर आंदोलन स्थळ गाठले मात्र,त्यांना ही पोलिसांनी रोखले.या आंदोलनावरुन महाराष्ट्रातील राजकीय वातावरण देखील तापले असून,विविध नेत्यांनी नि:शस्त्र विद्यार्थ्यांचे हे शांततापूर्ण आंदोलन चिरडण्यासाठी केलेल्या अमानूष मारहाणीवर तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे.
अनेक विद्यार्थ्यांची धरपकड करुन पोलिसांनी त्यांना तुरुंगात डांबले तर अनेक विद्यार्थी हे गंभीर जखमी असून रुग्णालयात दाखल आहेत.मोदी सरकारच्या प्रशासनाकडून जखमी व मृतकांचा अधिकृत आकडा अद्याप जारी करण्यात आला नाही.

काँग्रेसचे नकाश्रू–
राहूल गांधी,प्रियंका गांधींसह आज काँग्रेसच्या सर्व खासदारांनी पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानासमोर विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ धरणे आंदोलन केले मात्र,देश अद्यापही ४-५ जून २०११ ची रामलीला मैदानावरील ती मध्यरात्र विसरला नाही जेव्हा रामलीला मैदानात गाढ झोपलेले आंदोलनकर्ते यांच्यावर काँग्रेसच्या काळात गृहमंत्र्यांच्या आदेशानुसार अमानुष लाठीचार्ज झाला होता,यात राजबाला यांचा मृत्यू झाला,अनेक आंदोलनकर्ते गंभीर जखमी झाले व स्वत: रामदेव बाबांना महिलेचे वस्त्र धारण करुन रामलीला मैदानातून पळ काढावा लागला असल्याची चर्चा रंगली होती.
सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेसच्या या कारवाई विरोधात कठोर टिपण्णी केली होती की अखेर गाढ झोपलेल्या लोकांवर अमानुष लाठीचार्ज करण्याची गरज काय होती?रामलीला मैदानात गाढ झोपलेल्या आंदोलनकारी जनतेला मध्यरात्री जबरदस्ती हटविण्याची पोलिसांची ही कारवाई फक्त मनमानी व चुकीचीच नव्हे तर सत्तेच्या ताकदीच्या दुरुपयोगाचे प्रकरण आहे,मग हा निर्णय पोलिसांनी स्वत: घेतला असेल किंवा केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार अशी परखड कानउघाडणी सर्वोच्च न्यायालयाने केली होती.रात्रीची झोप ही प्रत्येक नागरिकाचा संवैधानिक अधिकार आहे,झोपेत असणारे,अर्धे मुर्च्छित अवस्थेत असतात,ते कोणालाही हानी पोहोचवू शकत नाहीत.त्यावेळी त्यांच्यावर अमानुष लाठीचार्ज करुन त्यांना रामलीला मैदानातून का खडेदण्यात आले?असा सवाल न्यायालयाने काँग्रेस सरकारला केला होता.
भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी देखील,या घटनेवरुन काँग्रेसवर कठोर टिका करीत,हे मानवाधिकाराचे हनन असल्याचा आरोप केला होता.स्वत: न्यायालयाने आपल्या आदेशात,या आंदोलनकर्त्यांची गर्दी ही बेकायदेशीर नव्हती,असे सांगितले आहे.ते शांतिपूर्वक झोपले होते.त्यामुळे या बर्बरतापूर्ण लाठीहल्ल्यासाठी दिल्ली पोलिस तसेच काँग्रेस पक्ष जबाबदार असल्याचा आरोप जावडेकरांनी केला होता.
बाबा रामदेव यांनी हे आंदोलन तत्कालीन काँग्रेसप्रणीत केंद्र सरकारमधील भ्रष्टाचाराविरोधात आणि परदेशात दडवून ठेवलेला काळा पैसा भारतात परत आणण्यासाठी सुरु केले होते.त्यांनी ४ जून २०११ रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर आमरण उपोषण सुरु केले.‘भारत स्वाभिमान’या त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी हे आंदोलन पुकारले होते.त्यांच्यासोबत हजारो समर्थक या आंदोलनात सहभागी झाले होते.त्यावेळी युपीए सरकारने रामलीला मैदानावर अचानक कारवाई केली.अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून आणि लाठीचार्ज करुन आंदोलन जबरदस्तीने मोडून काढण्यात आले.या कारवाईमुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती.या घटनेनंतर बाबा रामदेव यांनी हरिद्धारला जाऊन पुन्हा आपले उपोषण सुरु ठेवले होते.नंतर विविध धार्मिक नेत्यांच्या मध्यस्थीने ते उपोषण मागे घेण्यात आले.
या आंदोलनाने देशातील भ्रष्टाचाराच्या मुद्दावर जनमत तयार केले आणि पुढे अण्णा हजारेंच्या ‘लोकपाल’आंदोलनासाठी पूरक वातावरण तयार झाले.दिल्ली पोलिसांच्या या हिंसक कारवाईत राजबाला या ५१ वर्षीय महिला आंदोलकाचा मृत्यू झाला तर ५० हून अधिक जखमी झाले होते.या कारवाईची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेत पोलिसांच्या भूमिकेवर कडक ताशेरे ओढले होते व मृत व जखमी आंदोलनकांना भरपाई देण्याचे निर्देश दिले होते.
त्याच काँग्रेसचे सर्वेसर्वा राहूल गांधी,प्रियंका गांधींनी आज विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ मोदींच्या निवासस्थाना समोर धरणे आंदोलन केले तेव्हा समाज माध्यमांवर त्यांच्या सरकारच्या काळातील बाबा रामदेव आंदोलन व झालेला लाठीचार्ज सर्वाधिक सर्च झाला आहे.
समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी देखील राहूल गांधीच्या आंदोलनात सहभाग नोंदवला मात्र,त्यांच्याच पक्षाचे मुख्यमंत्री असलेले त्यांचे पिताश्री मुलायम सिंह यादव यांच्या आदेशानुसार नि:शस्त्र कारसेवकांवर गोळ्या झाडून त्यांची प्रेते शरयू नदीत फेकून देणारी घटना अद्याप हा देश विसरला नाही.त्यामुळे विद्यार्थ्यांवर झालेला अमानुष लाठीहल्ला यामुळे जरी देश आज संतप्त झाला असला तरी काँग्रेस व समाजवादी पक्षाच्या सत्ताकाळात याहून दूसरे काही घडत नव्हते,तेव्हा ही भारतीय आंदोलनकर्त्यांचे ‘मानवाधिकार’असेच चिरडलेच जात होते,हे देश विसरला नाही.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली पोलिसांच्या कारवाईचे समर्थन करीत,कोणत्याही सरकारला आपल्या नागरिकांवर लाठीचार्ज करायला आवडत नाही,मात्र,जर पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली नसती तर आणखी गंभीर घटना घडल्या असत्या,अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली.या आंदोलनात काही लोक चांगल्या विचारांनी आले असले ,तरी काही जण विशिष्ट राजकीय अजेंडा आणि अराजकता पसरवण्याच्या हेतूने त्यात घूसले असल्याचा आरोप त्यांनी केला.ज्या राजकीय पक्षांना वेगवेगळ्या राज्यात जनतेने नाकारले आहे,ते पक्ष या आंदोलनात सामील होऊन स्वत:चे हित साधण्याचा प्रयत्न करीत आहेत,असा टोला देखील त्यांनी हाणला.
मात्र,बाबा रामदेव यांच्या आंदोलनाला याच भाजपने सक्रिय पाठिंबा दिला होता.काळा पैसा देशात परत आणण्याच्या रामदेवबाबांच्या मागणीशी भाजप पुर्णपणे सहमत होती.त्यावेळी काँग्रेसने मात्र,देशातील जनतेने नाकारलेला पक्ष म्हणजे भाजप रामदेव बाबांच्या आंदोलनात सामील होऊन आपले राजकीय हित साधण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला नव्हता,हे विशेष.
माजी अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील दिल्लीतील लाठीचार्जवर आपली प्रतिक्रिया देत, हे आंदोलन म्हणजे केवळ पंतप्रधानांवर टिका करण्याचा राजकीय प्रयत्न असल्याचा आरोप केला.आंदोलनाचा उद्देश्‍य हा केवळ न्याय मागण्यापूरती मर्यादित असावा असे देखील ते म्हणाले.पेपर फूटी प्रकरणात सोनम वांगचूक यांनी मोदींना भेटण्याची वेळ मागितली होती का?असा प्रश्‍न ही त्यांनी केला.मात्र,नेटक-यांनी त्यांच्या या व्हायरल व्हिडीयोजवर अतिशय शेलक्या शब्दात प्रतिक्रिया देऊन चांगलाच समाचार घेतला आहे.
थोडक्यात,सत्ताधारी करतात त्याप्रमाणे या आंदोलनात काही प्रमाणात समाजकंटकाचा शिरकाव झाला असेलही मात्र,त्यामुळे विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय व त्यांची न्याय मागणी गौण ठरत नाही.तसेच पोलिसांचा बर्बरतापूर्ण लाठीचार्जही योग्य ठरत नाही.
देशाचे उच्च शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान ३ मे २०२६ रोजी पार पडलेली अचानक ‘नीट’ची परिक्षा रद्द करुन देशातील २० निष्पाप विद्यार्थ्यांच्या आत्महत्येसाठी कारणीभूत झालेत,तेच आज कालच्या लाठीचार्जनंतरही संसदेतून हसतमुखाने बाहेर पडत आपल्या वाहनात बसत असलेले दृष्य, भारतीयांच्या संतापात भर टाकणारेच होते.एकीकडे त्या आत्महत्याग्रस्त विद्यार्थ्यांची छायाचित्रे घेऊन त्यांचे पालक जंतरमंतरवर बसली होती,दुसरीकडे धर्मेद्र प्रधान यांच्या चेह-यावरचे हास्य मात्र तसूभरही ढलले नव्हते.मोदी सरकारच्या या मंत्र्यांची ही संवेदनशून्यता मोदी व अमित शहा यांच्याप्रतीच्या रोषात आणखी भर घालणारीच ठरली.
आज देशातच नव्हे तर जगभर मोदी सरकारचा नि:शस्त्र विद्यार्थ्यांवर करण्यात आलेला अमानुषपणा गाजला.संपूर्ण समाज माध्यमांची भिंत थरकाप उडविणा-या दृष्यांनी भरली असून २०११ नंतर ज्याप्रमाणे काँग्रसेचे राजकीय पतन सुरु झाले होते,अगदी तसेच मोदी सरकारच्या अद्य:पतनाची, कालचा लाठीचार्ज ‘नांदी’ ठरली असल्याचे मत देशातील बुद्धीजीवी वर्ग व्यक्त करीत आहे.
नागपूरचा भारत बानाईत जखमी-
कालच्या अमानुष मारहाणीत नागपूरचा भारत बानाईत हा विद्यार्थी देखील जखमी झाला आहे.भारत या विद्यार्थ्याच्या नावातच ’भारत’आहे मात्र,हिरवी जर्सी घातलेल्या भारतला देखील शेकडो पोलिसांनी घेरुन त्याच्यावर लाठ्यांनी अनेक प्रहार केले मात्र,त्या शूराने पोलिसांपासून पळ न काढता पोलिसांना आणखी प्रहार करण्याचे आव्हान केले.भारतच्या डोक्यावर एकूण सहा लाठ्या मारल्या व संपूर्ण शरिरावर अनेक प्रहार करण्यात आल्याचे भारतच्या आईने माध्यमकर्मींना सांगितले.माझ्या मुलाला काहीच वेदना झाल्या नसतील का?असे सांगताना त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा कोसळल्या तर भारतच्या वडीलांनी,मोदी सरकारला मूळात विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्याची गरजच काय होती? खुद्द भारत सरकारकडेही ज्याचे उत्तर नाही,असा सवाल त्यांनी जखमी अंतकरणाने केला.
…………………………………………

Latest बातम्या