संघर्षातून… यशाला गवसणी
संजय चिंचोले यांची यशोगाथा
सामाजिक,धार्मिक कार्यांनी तारले
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता.१ फेब्रुवरी २०२६: सहजीवन…प्रत्येकाच्या जीवनातला एक अत्यंत सुंदर,खास आणि भावनिक टप्पा असतो जो प्रेम,विश्वास,तडजोड,त्याग आणि एकमेकांबद्दलच्या आदरावर टिकून असतो.सुरेखा आणि संजय चिंचोले यांचाही २८ वर्षांचा आजपर्यंतचा सहजीवानचा प्रवास, जीवनातील अनेक सुख-दु:खं,चढ-उतारामंध्ये खंबीरपणे सोबत राहिल्याचा आहे आणि आयुष्यातील प्रत्येक आनंद ही एकत्र साजरा केल्याचा पुरावा आहे.गुलजारच्या मलमली लेखणीतून नकळत काही शब्द मोत्यांसारखे उमटले होते‘एक अकेली छत्री मे आधे-आधे भीग रहें थे,आधे सुखे आधे गीले,सुखा तो मैं ले आई थी…’असाच सुख-दु:खं,अडचणी आणि संघर्षाचा संसार सुरेखा आणि संजय यांचा असून १ फेब्रुवरी आज त्यांच्या लग्नाचा २९ सा वा वाढदिवस आहे.
संजय चिंचोले हे नाव नागपूरकरांना खूप चांगल्याने परिचित आहे.अतिशय साधे व्यक्तिमत्व,निगर्वी,सतत धावपळीत दिसणारे संजय यांची ‘दृष्टि कम्यूनिकेशन’ ही पीआर एजंसी देशभरात कार्यरत आहे.मात्र,हे यश इतक्या सहजासहजी त्यांना मिळाले नाही.या मागे खूप मोठ्या संघर्षाची मालिका आहे.संजय चिंचोले यांचे वडील एका वृत्तपत्रात कार्यरत होते.स्वाभाविक आहे अर्थाजणासाठी संजय यांना खूप लहान वयातच प्रयत्नरत व्हावे लागले.
दहावी-बारावींत असताना संजय यांनी ३०० रुपयांपासून नोकरीला सुरवात केली.मग त्यांचा पगार हजार रुपये महिना झाला,मग दोन हजार रुपये महिना झाला,या प्रगतीतच संजय समाधानी राहत होते.सुरवातीला त्यांनी अशोक मानकर यांच्या प्रकाशन संस्थेत काम केले.या एसिडच्या कंपनीत ही नोकरी करावी लागली.यानंतर त्यांना एका इंग्रजी दैनिकात काम करण्याची संधी मिळाली.१९९७ ते २०१० पर्यंत ते ‘दैनिक हितवाद ’या दैनिकात कार्यरत होते.
यानंतर २०१० मध्ये संजय यांनी आपली पीआर एजन्सी ‘दृष्टि कम्यूनिकेशन’सुरु केली.यासाठी त्यांना सगळ्यांनी मदत केली.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्यासह सर्व भाजपचे आजी-माजी आमदार,नेते,पदाधिकारी यांचे पाठबळ संजय यांच्या पीआर एजन्सीला लाभत गेले.हा काळ होता २०१० .त्यावेळी शहरात,राज्यात,केंद्रात कुठेही भाजपची सत्ता नव्हती मात्र,भाजप नेत्यांचे पाठबळ व संजय यांच्यावरचा अढळ विश्वास संजय यांना मोलाची संधी देऊन गेला..मूळात संजय यांचा स्वभाव हा सदैव गोरगरीब,गरजू यांच्या मदतीसाठी धावण्याचा राहीला आहे.कोणाला रुग्णालयात भर्ती करणे,कोणाच्या शाळेची फी भरुन देणे हे सामाजिक ऋण संजय काेणत्याही प्रसिद्धीशिवाय फेडत होते.
आपले सामाजिक उपक्रम संजय कोणत्याही राजकीय मदतीशिवाय करीत होते.करोनाच्या भीषण संकटकाळात पुन्हा एकदा त्यांच्यातील ‘माणूसकीची’प्रचिती अनेकांना आली.करोनाग्रस्तांना दोन हजार किट त्यांनी वाटले. प्राणवायूचे सिलेंडर गरजूंना वेळेवर उपलब्ध करुन दिले.गडकरी यांच्या पुढाकारातून ५ ऑक्सीजन मशीन्स देखील वेळेवर त्यांनी गरजू रुग्णांपर्यंत पोहोचविल्या.विलगीकरणातील रुग्णांना औषधांचा पुरवठा स्वखर्चातून करीत राहीले.अनेकांसाठी शहरातील विविध रुग्णालयात कुठे बेड मिळतो का,यासाठी करोनाकाळात भटकंतीही केली.दोन वर्ष लॉकडाऊनमुळे काम बंद होते,इव्हेेंट,कार्यक्रम,जाहीराती,पीआरचे काम सगळं काही बंद होतं,तरीही आपल्या सुस्वभावी, स्वभावातून ,लोकवगर्णी सहज ते गोळा करीत असल्याने सामाजिक कार्याचे हे शिवधनुष्य त्यांनी लीलया पेलले.
मूळात संजय यांचा स्वभात धार्मिक असल्यानेच समाजाचे ऋण फेडण्याचे काम ते सहज करु शकतात.‘सर्व भवन्तु सुखिन:सर्वे सन्तू निरामया । सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दु:खभाग् भवेत् ।। सगळे सुखी झाले पाहिजे,राेगमुक्त राहीले पाहिजे,सर्वांचे मंगलमय जीवन होवो,या मंगलमय जीवनाचे साक्षीदार होण्याचे भाग्य मिळो,कोणालाही दु:खाचा भागीदार बनण्याची वेळ न येवो,जणू हा श्लोक त्यांनी जीवनात खोलवर आत्मसात करुन ठेवला आहे.याच धार्मिक व पापभिरु वृत्तीमुळे महाल येथील सुप्रसिद्ध ‘संती गणेशोत्सव मंडळाची’धुरा त्यांनी गेल्या ३५ वर्षांपासून यशस्वीपणे सांभाळली.संती गणेश मंडळाची स्थापना १९५८ मध्ये झाली होती. संती गणेशोत्सव हे दर वर्षी गणेशोत्सवात नागपूरातील भव्य-दिव्य व नेत्रदिपक आरास करण्यास अग्रगण्य असल्याचा मान पटकवतो,हे विशेष.
या ही महोत्सवात कुठे ही बॅनरवर स्वत:चे नाव नाही,जाहीरात नाही,एकमेव उद्देश्य,प्रत्येक येणा-या भाविकाला भक्तिमय वातावरणाचा लाभ मिळो.यातून त्यांचे सांस्कृतिक कार्य देखील उठून दिसून पडताे.त्यांच्या सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक कार्यात प्रामुख्याने खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचे माध्यम प्रमुख,स्व.प्रभाकरराव दटके स्मृती सेवा संस्थेचे सदस्य पद,नागपूरच्या निश्चय फाऊंडेशनचे कार्य,पं.बच्छराज व्यास स्मृती प्रतिष्ठानचे सदस्य म्हणून कार्य,नागपूरच्या मैत्री परिवारचे सदस्य पद,नागपूरस्थित ऐतिहासिक राष्ट्रीय वाचनालयाचे सदस्य म्हणून कार्य,युवा चेतना मंच या सामाजिक संस्थेचे कार्य,शिवराज्याभिषेक साेहळा समितीचे सदस्य पद,नागपूर स्थित दूर्ग प्रतिष्ठानचे सदस्य पद,कला संगम संस्थेचे सदस्य पद तसेच नागपूरच्या लोक जागृती मोर्चाचे सदस्य म्हणून भूमिका महत्वाची ठरते.
भाजप या राजकीय पक्षाशी ते फार-फार सुरवातीपासून जुळले आहेत.१९९६ मध्ये ते भाजपमध्ये सहभागी झाले व त्यांच्यातील कार्यकतृत्वं व समर्पण भाव ओळखून भाजप श्रेष्ठींनी त्यांच्यावर दुस-याच वर्षी १९९७ मध्ये वॉर्ड क्र.११५ च्या अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली.त्यांच्या अध्यक्षतेखाली त्याकाळी या वॉर्डातून कल्पना ताई पत्राळे यांनी ११४ मतांनी विजय मिळवला होता.त्याकाळी प्रसिद्धीचे साधन अतिशय अल्प होते.घरोघरी चिठ्ठया पाहोचवणे,पत्रके वाटणे,भिंतींवर पोस्टर चिपकवणे इत्यादी कामे झपाटल्यासारखे व तितक्याच इमानेइतबारे केले.त्यांच्या याच प्रामाणिक स्वभावाचे फळ ही त्यांना पक्षातील नेत्यांनी वेळोवेळी दिले.त्यांच्या व्यवसायाच्या मागे याच नेत्यांचे आर्शिवाद सदैव पाठीशी राहील्याचे संजय खास ‘सत्ताधीश’ला सांगतात.
केवळ नागपूरच नव्हे तर महाराष्ट्र आणि देशात अनेक सोसायटी,मेट्रो,बँक,शिक्षण संस्थां,प्रकाशने इत्यादी कामे त्यांची पीआर एजन्सी ‘दृष्टि कम्यूनिकेशन्स‘यशस्वीपणे सांभाळताना दिसून पडते.
वर्षातील प्रत्येक धार्मिक,सांस्कृतिक किंवा राष्ट्रीय सण असो,हरहुन्नरी संजय नेहमीच तो उत्साहात साजरा करण्यास तत्पर दिसून पडतात.स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती असो,रामनवमी असो,हनुमान जयंती असो किंवा गणेशोत्सव,संजय यांचा उत्साह वाखाण्याजोगा असतो.जी समाजाकडून,कुटूंबियांकडून संस्काराची व धार्मिक शिदोरी मिळाली तीच,समाजात वाटण्याचा आनंद खूप न्यारा असतो,असे ते सांगतात.
अश्या या प्रसिद्धी परा:मुख व साधे व्यक्तिमत्व असलेल्या अवलियाचे लग्न १ फेब्रुवरी १९९८ साली अमरावतीच्या सुरेखा सराफ यांच्यासोबत झाले.सुरेखा या अतिशय साध्या,सालस व तितक्याच धार्मिक आहेत.‘माझं घर व माझे कुटूंब’या पलीकडे कोणत्याही प्रकारच्या राजकारणात त्यांना रस नाही.भागवत कथा,भजन,पूजा हेच त्यांच्या आनंदी जीवनाचे मर्म.ज्यावेळी व्यवसायात उडी घेण्यासाठी इंग्रजी दैनिकाची नोकरी संजय यांनी सोडली त्यावेळी घर-संसाराच्या काळजीने त्यांनी संजय यांना डगमगू दिले नाही.सुरेखा यांच्या खंबीर पाठबळामुळेच आपल्या यशस्वी ध्येयाकडे संजय हे वाटचाल करु शकले.

कोणतंही काम नव्याने सुरु केल्याबरोबर यश मिळत नसतं.हे त्या माऊलीलाही चांगल्याने माहिती होतं.संजय यांनी आपल्या व्यवसायाच्या प्रगतीसाठी प्रचंड मेहनत घेतली.एक काळ असा होता,संजय यांना महाल येथील अगदी लहानश्या घरात राहत असताना दिव्या खाली अभ्यास करावा लागत असे.शाळेची फी भरायला ही पैसे नसायचे.परिणामी,दहावी,बारावी पासूनच त्यांनी जमेल ते काम स्वीकारुन आपल्या कुटूंबाला अर्थाजणाची मदत करण्यास सुरवात केली.सायकलवर फिरुन अगदी कोराडीपर्यंत जाऊन जाहीराती गोळा करायचे.कधी दोन हजार,कधी तीन हजारांच्या जाहीराती मिळाल्या तरी त्यांची दिवाळी आनंदाने साजरी होत असे.दिवाळीत उटणे,देवीचे फोटो,पणत्या विकल्या, मात्र,गरीबी समोर कधीच हरले नाहीत.’हे ही दिवस जातील’संतांच्या या वचनावर अतुट विश्वास होता.संताचे वचन हे कधीही खोटे ठरत नाही याची प्रचिती पुन्हा एकदा संजय यांच्या जीवनाकडे बघून येते.
आज महाल येथे त्यांचे प्रशस्त घर व ‘दृष्टि कम्यूनिकेशन्सचे ’कार्यालय आहे.त्यांचा व्यवसायही खूप वाढला मात्र,अंर्तमन आज ही भूतकाळातील त्या संघर्षात रमत असतं. ‘आपला भूतकाळ विसरणारा भविष्य घडवत नसतो’जणू ही उक्ती पाठीशी त्यांनी घट्ट बांधून ठेवली असल्यानेच,आजचे यश,आर्थिक सुबत्तता,जिवनातील स्थेर्य संजय चिंचोले यांना बदलू शकली नाही.नुकत्याच पार पडलेल्या नागपूर महानगरपालिकेच्या निवडणूकीत संजय यांनी प्रभाग क्र. २२ मध्ये मनपा निवडणूक प्रमुख म्हणून यशस्वी जबाबदारी पार पडली.या प्रभागातून भाजपचे चारही उमेदवार भरघोष मताधिक्याने विजयी झाले आहेत.
अर्थात त्यांच्या या यशात सुरेखा यांचा बरोबरीचा वाटा आहे तसेच एकुलती एक लेक ‘दृष्टि’हिचे पायगुण असल्याचे ते सांगतात.२३ एप्रिल १९९९ रोजी त्यांच्या जिवनात आलेली दृष्टि आज एमबीए झाली आहे.मुंबई,पुणे,बंगलौर येथे नोकरी केल्यावर एका मोठ्या व प्रतिष्ठित संस्थेत एचआर एक्सीक्यूटीव्ह पदावर दृष्टि कार्यरत आहे.
संजय व सुरेखा यांचे सरळ,सहज व सुंदर सहजीवन बघून पुण्यातील कवियत्री सुनीती सु.र. यांची सहजीवनावरील कविता नकळत आठवून जाते…
सहजीवन म्हणजे अवघड वाट,
सहजीवन म्हणजे दुस्तर घाट
कधी अगदीच मयसभा आणि
कधी चाकोरीची वहीवाट.
सहजीवन म्हणजे अनेक होकार,
सहजीवन म्हणजे किती तरी नकार
सहजीवन म्हणजे एकमेकांच्या भावनांचा सन्मान
सहजीवन म्हणजे एकमेकांच्या माणसांचा स्वीकार.
सहजीवन म्हणजे एकमेकांचं मन समजून घेणं
सहजीवन म्हणजे एकमेकांच्या दु:खावर फूंकर घालणं
सहजीवनात नाही एकाचीच भरारी
सहजीवनात नाही एकाचीच मक्तेदारी.
सहजीवनात नसतं कुणी एकच पायाचा दगड
सहजीवनात नसतं कुणी एकच चुलीच्या जवळ
सहजीवन म्हणजे अर्थातच दळणाची पिशवी,रॉकलचा डबाही
सहजीवन म्हणजे नक्कीच पाळणाघर अन् बस,लोकलचा रेटाही.
सहजीवन म्हणजे त्यानेही बाळाची शी-शू काढणं,
बाळासाठी दोघांनीही भारावलेल्या डोळ्यांनी जागणं,
सहजीवन म्हणजे दोघांनीही मिळून आपलं घरटं सजवणं
सहजीवन म्हणजे झोपडीलाही ‘महाल’संबोधणं.
सहजीवन म्हणजे परस्परांच्या मर्यादा समजून घेणं
सहजीवन म्हणजे एकमेकांना मोठं करीत जाणं,
सहजीवनात नसतं बंदिस्त दोघांचंच,दोघांपुरतं,
सहजीवनात असंत कुटुंब,गणगोत,आप्त,मित्र सामावून घेणं.
सहजीवन म्हणजे पंख फूटून भरारी घेणा-या पिलांना आनंदाने निराेप देणं,
चुकली, माकली, थकली तर उबदार मिठीची सेज तयार ठेवणं
सहजीवन म्हणजे दुखलेलं मन सहज ओळखणं
स्वप्न तुटतांना,विरतांनाही दोघांनीही मिळून सोसणं.
सहजीवन म्हणजे परस्परांसाठी हमेशा खुला चौथा कमरा,
‘जा त्या घरी’ न म्हणणारा विश्वासाचा कोपरा
सहजीवन म्हणजे चुकल्या-माकल्याचा सहज दिला जाणार हिशोब
सहजीवनात ‘चुकलो’म्हणायला कशासाठी असावा संकोच?
सहजीवन म्हणजे पिकतांना मिळून आठवायची सारी कथा…
माझ्याआधी तू जायचं नाहीस…एकमेकांना घालायच्या शपथा!
………………………….
तळटीप:-
पुण्या मधल्या अक्षर स्पर्श ग्रंथालयात ही कविता ग्रिटिंगमध्ये वाचायला मिळते.
………………………………………
‘
Advertisements

Advertisements

Advertisements
