Homeनागपूर न्यूजशहरात आणखी एक पार्टी????

शहरात आणखी एक पार्टी????

पार्टी देणारी हॉटेल मालकाचीच मुलगी निघाली पॉझिटीव्ह

नागपूर,ता. ११ जून: शहरातील नाईक तलाव येथील एका तरुणाने दिलेल्या बिर्याणी पार्टीची नागपूरात ‘चीड’ आणणारी चर्चा सुरु असतानाच शहरात अश्‍याच प्रकारची ‘दुसरी’पार्टी देखील थाटात साजरी झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. फरक एवढाच आहे,ही दूसरी पार्टी शहरातील एका प्रतिष्ठित हॉटेल मालकाच्या मुलीने आयोजित केली होती व यात शे-दोनशे लोकं सहभागी असल्याचे सांगितल्या जात आहे.

नागपूरात कोरोना प्रार्दुभाव हा थांबण्याचे नाव घेत नसताना नाईक तलाव भागातील एक तरुणाने दिलेल्या पार्टीमुळे जिथे १५० च्या वर लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला तर ७०० लोकांना कोरोंटाईन व्हावे लागले,या घटनेची स्याही वाळत नाही तेच दूसरीकडे शहरातील सर्वाधिक पॉश भाग असणा-या सिव्हिल लाईन्स येथील एका रेस्टॉरेंटमध्ये नुकतेच एक ‘हाय प्रोफाईल’पार्टी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

चिंताजनक बाब म्हणजे या पार्टीमध्ये कोरोना संक्रमित तरुणी सहभागी झाली होती. ही तरुणी शहरातील एका प्रतिष्ठित हॉटेल मालकाची मुलगी असून सध्या काेरोनाच्या संक्रमणामुळे मेडीकलमध्ये उपचारासाठी दाखल असल्याचे सांगितले जात आहे.३४ वर्षीय या तरुणीला परवा रात्री उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या तरुणीचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह येतात तिच्या कुटुंबियांना विमानतळाजवळील एका नामांकित हॉटेलमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

सूत्राने दिलेल्या माहितीप्रमाणे सिव्हिल लाईन्य येथील एका रेस्टारेंटमध्ये या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीमध्ये या तरुणीसोबत तिच्या भावाने देखील सहभाग नोंदवला. या पार्टीमध्ये शहरातील अनेक प्रतिष्ठितांनी हजेरी लावल्याची माहिती आहे,यात एका राजकीय पक्ष्ाच्या माजी राज्यसभा खासदाराचे संपूर्ण कुटुंबिय हे देखील सहभागी असल्याचे सांगितले जात आहे.

धक्कादायक बाब म्हणजे या सिव्हिल लाईन्स भागातील एका खासगी बंगल्यात त्याच दिवशी दुस-या एका पार्टीचे देखील आयोजन करण्यात आले होते. ज्या व्यक्तिने या पार्टीचे आयोजन केले त्याने या तरुणीला व तिच्या भावाला, त्याच्या पार्टीत देखील निमंत्रित केले होते. रेस्टोरेंटमधील पार्टी आटोपताच हे दोघेही बहीण-भाऊ त्या दुस-या पार्टीत देखील सहभागी झाले,एवढेच नव्हे तर पहील्या पार्टीतील सर्व हाय-प्रोफाईल हस्ती या देखील या दुस-या पार्टीत पोहोचलेत!

तरुणीला ही काेरोना पॉझिटीव्ह असल्याचे समजताच या हाय-प्रोफाईल मंडळींना चांगलाच मानसिक धक्का बसला असून,पार्टीमध्ये सहभागी १०० पेक्ष्ा जास्त‘ पार्टी-रसिकांना’ त्यांच्या ‘प्रशस्त बंगल्यातच’विलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आल्याचे कळतंय!
विशेष म्हणजे प्रशासनाने या घटनेबाबत कोणतीही टिपण्णी करण्यास नकार दिला असून या घटनेला अधिकृत दुजोरा देण्याचे टाळले.परिणामी शहरात आता अधिक लोकांचे जीव धोक्यात आले असून या धनदांड्यांच्या अश्‍या ‘बेजवाबदार’कृती विरोधात अद्याप पोलीस प्रशासनाकडून देखील कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही.

युवती ही कनाडावरुन नागपूरात दाखल-
सूत्राने दिलेल्या माहितीप्रमाणे झांशी राणी चौकात तसेच सिव्हिील लाईन्य येथे ३ प्रतिष्ठित रेस्टारेंट चालविणा-या एका प्रतिष्ठित हॉटेल मालकाची ही मुलगी आहे. काही दिवसांपूर्वीच ही तरुणी कनाडा येथून दिल्लीला पोहोचली.गेल्या आठवड्यातच ती नागपूरात दाखल झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर विमानतळावर उतरतानाच या तरुणीला हल्कासा ताप होता.यानंतर ती आपल्या घरीच क्वारंटाईनमध्ये राहत होती. या दरम्यान या तरुणीने आपल्या काही धनदांडग्या मित्रांना तिच्या रेस्टोरेंटमध्ये पार्टीसाठी बालोवले. हे रेस्टोरेंट लॉक डाऊनमुळे बंदच होते मात्र होम-डिलीव्हरीच्या नावाखाली ते सुरु करण्यात आले होते.

या पार्टीत आमंत्रित लोकांनी एकच धमाल केली.याच दरम्यान शहरातील शासन मान्यताप्राप्त एका खासगी प्रयोगशाळेत या तरुणीचा अहवाल हा पॉझिटीव्ह आला.या माहितीमुळे पार्टीत सहभागी सगळीच मंडळी ही चांगलीच धस्तावली आहे.. या सर्वांनी स्वत:ला घरीच विलगीकरणात ठेवले असून,या सर्वांच्या कोरोना चाचणींचा अहवाल अद्याप यायचा आहे. या पार्टीमुळे आता सिव्हिल लाईन्स हा नागपूरातील आणखी एक ‘हॉट स्पॉट’ ठरु शकतो,असे खाजगीत बोलले जात आहे.

ही माहिती माध्यमांमध्ये येताच या तरुणीच्या वडीलांनी काही माध्यमकर्मींकडे मान्य केले की त्यांची कन्या ही कोरोना पॉझिटीव्ह असून मेडीकलमध्ये भरती आहे मात्र त्यांनी हा देखील दावा केला की त्यांचे रेस्टोरेंट हे पूर्णपणे सुरक्ष्ति आहे,जेथून होम-डिलीवरी केले जाते!

नागपूरकरांमध्ये उसळली संतापाची लाट!

लॉक डाऊनच्या काळात तरुणीने दिलेल्या या हाय-प्रोफाईल पार्टीची माहिती होताच नागपूरकरांमध्ये संतापाची लाट उसळली असून,तरुणीवर उपचार होताच कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आता होत आहे. एकीकडे मय्यतीमध्ये फक्त २० माणसे,लग्न सोहळ्यात फक्त ५० माणसे एकत्रित होण्याचे प्रशासनाचे आदेश असताना स्वत: महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे हे रजवाडा पॅलेसमध्ये २०० लोकांच्या उपस्थितीत कौतूक सोहळा साजरा करतात व २०० लोकांचा जीव धोक्यात आणतात,दुसरीकडे सामान्य नागरिक असो किवा धनदांडगे, हे देखील कोरोना संसर्गाचा प्रार्दुभाव शहरात अतिशय झपाट्याने होत असताना सर्रास ‘पार्ट्याचे‘आयोजन करतात, परिणामी मुंढे असोत किवा शहरातील धनदांडगे किवा सामान्य वस्तीतला तरुण,प्रत्येकावर साथरोग प्रतिबंधक कायदा तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा मोडल्याने ,समान न्यायाने कायदेशीर कारवाई ही झालीच पाहिजे,अशी मागणी आता शहरातील बुद्धिजीवी करीत आहेत. एवढेच नव्हे तर नागपूरातून राज्यसभेचे प्रतिनिधित्व करणारे माजी राज्यसभा सदस्यांवर देखील आरोप निश्‍चित करण्याची मागणी होत आहे.

एवढ्े जवाबदार पद भूषवून देखील माजी राज्यसभा खासदार यांनाच जर लॉक डाऊनचा किवा अंशत: शिथिलता याचा अर्थ कळत नसेल तर अश्‍या राजकीय नेत्यांनी नागपूरसारख्या शहराचे राज्यसभेत प्रतिनिधित्व केलेच कसे?असा प्रश्‍न देखील आता उपस्थित केला जात आहे.

Latest बातम्या