Advertisements

Advertisements

पुलाच्या खांबांचे सौंदर्यीकरण व स्वागत फलकाचे लोकार्पण उत्साहात
नागपूर,७ जुलै २०२६: ताजबाग प्रवेशद्वार परिसरातील पुलाच्या खांबांचे आकर्षक व कलात्मक सौंदर्यीकरण तसेच “ताज नगरी में आपका स्वागत है” या भव्य स्वागत फलकाचे लोकपर्ण उत्साहपूर्ण वातावरणात आणि नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीत संपन्न झाले.
ताजबाग परिसराच्या सुशोभीकरणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष (अल्पसंख्याक विभाग) निसार अली यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नागरिक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सातत्याने पाठपुरावा, निवेदने आणि आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेत परिसराचे सौंदर्यीकरण पूर्ण केले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत या उपक्रमाचे स्वागत केले.
कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर यांनी सांगितले की, हे यश केवळ एका व्यक्तीचे नसून स्थानिक नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील सर्व समाजघटकांनी केलेल्या सातत्यपूर्ण संघर्षाचे फळ आहे. नागरिकांच्या प्रश्नांसाठी आम्ही भविष्यातही याच ताकदीने लढत राहू आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करू.

या लोकार्पण सोहळ्याला नागपूर शहराच्या महापौर नीता ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर, दक्षिण नागपूर विधानसभा अध्यक्ष मुकेश रेवतकर, मुमताज बाजी, राजेश समर्थ, सुखदेव वंजारी, भूषण हरडे, रूपाली पिचकाटे, भोला पटेल, नितीन ढेंगे, जाकीर अली यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील शेकडो स्थानिक नागरिक उपस्थित होते.
………………………………………