Homeनागपूर मनपामुंढे यांच्या नावावर फेक न्यूज व्हायरल!

मुंढे यांच्या नावावर फेक न्यूज व्हायरल!

Advertisements
Advertisements

नागपूर: आज रात्री १० ते उद्या पहाटे ५ पर्यंत घराबाहेर पडू नये. कोव्हिडं १९ च्या मृत्यूसाठी हवेत औषधांची फवारणी होईल’ असा संदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नावाने सोशल मीडियावर फिरत आहे. मात्र असा कुठलाही संदेश आपण दिला नसून अशी कुठलीही फवारणी शहरात होणार नाही. जनतेने असा चुकीचा संदेश पसरविणाऱ्या समाजविघातक प्रवृत्तींपासून सावध राहावे. अफवा पसरवू नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन मुंढे यांनी नागपूरच्या जनतेला केले आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नका

‘ असा कुठलाही संदेश आपण दिला नसून अशी कुठलीही फवारणी शहरात होणार नाही. जनतेने असा चुकीचा संदेश पसरविणाऱ्या समाजविघातक प्रवृत्तींपासून सावध राहावे. अफवा पसरवू नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये. मात्र रविवार २२ मार्च रोजी ‘जनता कर्फ्यु‘ पाळावा आणि ३१ मार्च पर्यंत आपल्या घरातच राहावे. कुठेही बाहेर फिरू नये अथवा गर्दी करू नये.

– तुकाराम मुंढे, आयुक्त, मनपा, नागपूर

Latest बातम्या