Homeनागपूर न्यूजमुंढेवरील फेसबूक पोस्टमुळे मिळाली जीवे मारण्याची धमकी! धर्मपाल मेश्राम

मुंढेवरील फेसबूक पोस्टमुळे मिळाली जीवे मारण्याची धमकी! धर्मपाल मेश्राम

नागपूर मनपा विधी समिती सभापतींनी केला पत्र परिषदेत आरोप

नागपूर,२ जून: मागील आठवड्यात २६ मे रोजी मी पत्र परिषद घेतली होती त्यात नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना मी मास्क संदर्भात एक प्रश्‍न विचारला होता. मास्क वापरणे गरजेचे नाही याबाबत खुलासा मागितला होता.ही बातमी प्रसार व प्रचार माध्यमातून प्रसिद्ध ही झाली. प्रसिद्ध झालेल्या या बातम्या तसेच व्हीडियो मी माझ्या वैयक्तिक फेसबूक अकाऊंटवर पोस्ट केल्या,यावर मला काही जणांनी घरात घूसून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा खळबळजनक आरोप मनपाच्या विधी समिती सभापती धर्मपाल मेश्राम यांनी आज मंगळवार दि. २ जून रोजी घेतलेल्या पत्र परिषदेत केला.

याच पत्र परिषदेत मी आयुक्त साहेबांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका राज्यपाल नामनिर्देशित आमदारांच्या सांगण्यावरुन सुदाम नगरी,प्रभाग क्र.१३ येथील प्रतिबंधित क्ष्ेत्राची व्याप्ती, ही का कमी करण्यात आली?नागपूरातील इतर क्ष्ेत्र प्रतिबंधित करताना तुम्ही भेदभाव व पक्ष् पात करता असा आरोप केला होता,या पोस्टवर देखील अत्यंत अवमानकारक कमेंट्स माझ्या पोस्टवर आल्या. ‘बोट कुचकण्याची सवय आहे’’मेश्रामला घरात घूसून मारले पाहिजे’अश्‍या प्रकारच्या कमेंट्स एका, यू ट्यूबवरील एका चॅनलच्या ‘माझ्या’ पोस्टवर आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

या विरोधात मी नंदनवन पोलीस ठाण्यात मला धमकी देणा-या,माझा आत्मसन्मान दूखावणा-या तसेच मला व माझ्या कुटुंबियांना दहशतीत ठेवणा-या आरोपींविरुद्ध तक्रार केली असून नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्याय यांच्याकडे देखील तक्राराची नोंद केली असल्याचे ते म्हणाले. अाराेपींवर कठोर कारवाई करण्याची मी मागणी केली आहे. भारताचा एक सामान्य नागरिक म्हणून,एक नगरसेवक म्हणून मला पत्र परिषदा घेणे,त्यात आपले मत मांडणे याचा अधिकार भारताचा संविधान देतो.

त्या पत्र परिषदेतील मुद्दांवर मुंढे यांच्या समर्थकांना काही आक्ष्ेप होता तर त्यांनी मुद्दांवर चर्चा करायला हवी होती. माझ्याविषयी अपमानजनक भाषेचा वापर करुन आणि मला घरात घूसून मारायला हवे,अश्‍या स्वरुपाच्या धमक्या देणे हे कोणत्याही माणूसकीत किंवा संहितेत बसत नाही.या मागे कोण आहे?कोणाच्या सांगण्यावरुन हे घडले?यामागील कर्ता-करविता धनी नेमका कोण आहे? हिंमत असेल तर त्यांनी सामोरे यावं आणि लढावं मात्र अश्‍या प्रकारच्या धमक्या देण्यास इतरांना प्रवृत्त करुन माझे तोंड दाबणार असाल तर नागपूरचा हा सूजाण आणि सामान्य असणारा नागरिक, धर्मपाल मेश्राम हे सहन करणार नाही,असे ते म्हणाले.

फेसबूकवरील मुंढे यांच्या समर्थकांविरुद्ध एफआयआर दाखल झाली आहे.लवकरच त्यांची नावे पोलीसांच्या कारवाईत उघड होईल,असे त्यांनी सांगितले.

Latest बातम्या