Homeनागपूर मनपामहाज्योती पीएच.डी. संशोधक शिष्यवृत्ती प्रक्रियेचे सुलभीकरण करा

महाज्योती पीएच.डी. संशोधक शिष्यवृत्ती प्रक्रियेचे सुलभीकरण करा

Advertisements
संशोधन करावे की दर सहा महिन्यांनी कागदपत्रांची पूर्तता करावी?
Advertisements

 नागपूर, दि. १३ जुलै २०२६ : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस (शरदचंद्र पवार), महाराष्ट्र प्रदेशचे विद्यापीठ समन्वयक कुलदीप सोनकुसरे यांनी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर यांच्या व्यवस्थापकीय संचालक आणि प्रादेशिक उपसंचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग नागपूर  यांना निवेदन देऊन पीएच.डी. संशोधकांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीच्या सहामाही प्रगती अहवालासाठी आवश्यक कागदपत्रांची प्रक्रिया सुलभ करण्याची मागणी केली..
निवेदनात नमूद करण्यात आले की, महाज्योतीमार्फत ओबीसी व एसबीसी प्रवर्गातील पीएच.डी. संशोधकांना आर्थिक सहाय्य दिले जाते. मात्र, प्रत्येक सहा महिन्यांनी शिष्यवृत्तीचा पुढील हप्ता मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात कागदपत्रे, विविध अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या व प्रमाणपत्रे सादर करावी लागतात. या प्रक्रियेमुळे संशोधकांचा संशोधनासाठीचा मौल्यवान वेळ प्रशासकीय कामकाजात खर्च होतो आणि शिष्यवृत्ती वितरणालाही विलंब होतो.
यावर उपाय म्हणून कुलदीप सोनकुसरे यांनी पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत:
* सहामाही प्रगती अहवालासाठी आवश्यक कागदपत्रांची संख्या कमी करावी.
* एकदाच सादर केलेल्या कायमस्वरूपी कागदपत्रांची वारंवार मागणी करू नये.
* कागदी प्रक्रियेऐवजी ऑनलाइन (डिजिटल) पडताळणी व दस्तऐवज सादर करण्याची व्यवस्था विकसित करावी.
* संबंधित विद्यापीठ व संशोधन केंद्रांकडून आवश्यक माहिती थेट ऑनलाइन पडताळण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी.
* कागदपत्रांची पडताळणी निश्चित कालमर्यादेत पूर्ण करून शिष्यवृत्तीचा हप्ता वेळेत वितरित करावा.
* संशोधकांना अनावश्यक प्रशासकीय त्रास होणार नाही, अशी पारदर्शक, सुलभ व वेळबद्ध कार्यपद्धती लागू करावी.
सोनकुसरे यांनी निवेदनात म्हटले आहे की, महाज्योती ही संशोधकांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी कार्य करणारी संस्था असल्याने, संशोधकांच्या हिताचा विचार करून या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतल्यास राज्यातील हजारो पीएच.डी. संशोधकांना दिलासा मिळेल.
……………………..

Latest बातम्या