Homeनागपूर मनपामनपात सध्या हिटलरशाहीच सुरु: महापौरांचा संताप

मनपात सध्या हिटलरशाहीच सुरु: महापौरांचा संताप


मनपात सध्या हिटलरशाहीच सुरु: महापौरांचा संताप
शिक्ष् कांच्या बैठकीत व्यक्त केली खंत

नागपूर: लक्ष्मीनगर झोनमध्ये सकाळी आठ वाजता मनपाच्या सर्व शिक्ष् कांनी एकत्रित होण्याचे आदेश उशिरा रात्री शिक्ष् कांच्या व्हाटॅस ॲपवर धडकले आणि शिक्ष् कांच्या मनात एकच धडकी भरली. सकाळी आठ वाजता ३०० ते ४०० शिक्ष् क हे लक्ष्मीनगर झोनमध्ये पोहोचले मात्र संदेश पाठवणारे आरोग्य समितीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रवीण गंटावार व डॉ.कामडी हेच उपस्थित नव्हते. सकाळी १० वा. हे दोेन्ही वैद्यकीय अधिकारी झोनमध्ये प्रवेशकर्ते झाले तेव्हा अनेक शिक्ष् क हे सकाळी न्यारी करुन देखील आले नसल्याची जाणीव त्यांना करुन देण्यात आली मात्र याचे कोणतेही सोयरसूतच न बाळगता, एक तास या दोन्ही वैद्यकीय अधिका-यांमध्ये चांगलेच ‘वाक्‌ युद्ध’रंगले. याची माहिती मिळताच महापौर संदीप जोशी हे तातडीने झोन कार्यालयात पोहोचले असता शिक्ष् कांचा चांगलाच उद्रेग त्यांच्यासमोर झाला.यावेळी सध्या महापालिकेत फक्त ‘हिटलरशाहीच’सुरुच असल्याची खंत शिक्ष् कांच्या या बैठकीत व्यक्त करुन आयुक्तांच्या एकाधिकारशाही कारभारवरच महापौरांनी टिका केल्याची चांगलीच चर्चा यावेळी रंगली होती.

शिक्ष् क संघटनेचे अध्यक्ष् राजेश गवरे यांनी महापौरांच्या निर्दशनास आणून दिले की मनपातील ९० टक्के शिक्ष् क हे ५०-५५ वर्षाच्या वर वयाचे आहेत. १९९८ पासून मनपात शिक्ष् कांची भरतीच झाली नसून आजपर्यंत त्यांच्यावर सोपविण्यात आलेली प्रत्येक जवाबदारी शिक्ष् कांनी योग्यरित्या पार पाडली.मात्र ९० टक्के महिला व १० टक्केच असलेल्या पुरुष शिक्ष् कांमध्ये अनेकांना उच्च रक्तदाव व मधुमेह आहे. मुंढे यांनी आरोग्य विभगाच्या बैठकीत वैद्यकीय अधिका-यांना सूचना केली खामला येथील नागरिकांच्या सर्व्हेमध्ये मनपाच्या शिक्ष् कांना कामी लावा,आम्ही ही देखील जवाबदारी स्वीकारण्यास तयार आहोत मात्र खामला येथे करोना पॉझिटिव्ह रुग्णांची पार्श्वभूमी असल्यामुळे हा सर्व्हे करताना वयोवृद्ध असणारे,उच्च रक्तदाब व मधुमेह असणा-या मनपाच्या शिक्ष् कांना केंद्राद्वारे निर्देशित सर्व सुविधा आधी पुरविण्यात याव्या,एवढीच मागणी आम्ही डॉ.गंटावार यांच्याकडे केली मात्र त्यांनी चक्क ‘एवढा गलेलठ्ठ पगार घेता ना मग कराना काम,घ्या स्वत:च्याच पैशांतून मास्क,सॅनिटायझर’अश्‍या शब्दात महिला शिक्ष्ि कांसोबत असभ्य भाषेत संभाषण केले.

महापौरांनी याप्रसंगी शिक्ष् कांची समजूत काढीत,आलेल्या प्रसंगाला धैर्याने तोंड देऊन सामोरे जाण्याचा सल्ला शिक्ष् कांना दिला. मात्र त्यासोबतच आणिबाणिमुळे स्वत:च्या अधिकार क्ष्ेत्रात आलेली हतबलता देखील मार्मिक शब्दात व्यक्त केली. एका शिक्ष्किेने सांगितले त्यांच्या डाेळ्यांचे नुकतेच मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले असल्याने त्यांना या सर्व्हेमधून सूट मिळावी,मात्र महापौरांकडे त्यांच्याही समस्येवर कोणताही उपाय नव्हता.

अर्धवट व्हिीडीयो बघून मुंढेंनी केले निलंबित:राजेश गवरे यांचा आरोप-

माझे निलंबन ‘पूर्वनियोजित आकसातूनच’ करण्यात आल्याचा आरोप राजेश गवरे यांनी केले. तत्पूर्वी दोन्ही डॉक्टर्स तासभर भांडले त्यांच्यावर मुंढेंची कारवाई का नाही? ज्या डॉक्टरांना शिक्ष् कांना सर्व्हेचे प्रशिक्ष् ण द्यायचे होते तेच दोन्ही डॉक्टर दोन तास उशिरा आले यानंतर एक तास भांडत बसले तोपर्यंत आम्ही सर्व शिक्ष् क हे उपाशीच बसलो हातो.

मी डॉ.गंटावार यांना केंद्राचे निर्देश सांगत होतो याचाच फक्त अर्धवट व्हिीडीयो मुंढे यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आला. महापालिका शिक्ष् क संघांचे अध्यक्ष् राजेश गवरे यांना रविवार दि. १३ एप्रिल रोजी मनपा आयुक्त तुकराम मुंढे यांनी निलंबित केले. रविवारी मनपा कर्मचारी याच्या हस्ते गवरे तसेस मुख्याध्यपकांच्या नावे असे दोन पत्र मनपा कर्मचारी यांनी रविवारी, नरेंद्र नगर निवासी राजेश गवरे यांना छत्रपती चौकात बाेलावून सुपुर्द केले. मात्र ही निलंबनाची कारवाई मुंढे यांनी पूर्वनियोजित आकसाने केली असून फक्त अर्धवट व्हिडीयो बघून ही आकसपूर्ण कारवाई करण्यात आल्याची खंत राजेश गवरे यांनी खास ‘सत्ताधीश‘ जवळ व्यक्त केली. ४ एप्रिल रोजी आरोग्य विभागाच्या बैठकीचा मुंढे यांचा जो व्हिडीयो व्हायरल झाला,किंबहूना व्हायरल करण्यात आला त्यात योग्य वेळी माझ्यावरही कारवाई करणारच असाच सूर त्यांनी लावल्याचा पुरावा असल्याचे गवरे यांनी सांगितले.

माझ्या निवृत्तीला अद्याप ११ वर्षे बाकी आहे. १९९३ साली मनपा शाळेत शिक्ष् क पदी रुजू झालो.गेल्या २७ वर्षांपासून मी माझी नोकरी इमाने-इतबारे करीत आहो.सध्या मी फूटाळा येथील प्रियदर्शनी उच्च प्राथमिक शाळेत शिक्ष् क असून २००६ साली मी शिक्ष् क संघटनेचा प्रमुख सचिव झालो, त्यापूर्वी २००३ मध्ये मी संघटनेत कार्यकारी सभासद होतो,२०१२ पासून मी संघटनेचा अध्यक्ष् म्हणून जवाबदारी पार पाडत आहोत.नुकतेच मनपातील अतिरिक्त शिक्ष् कांच्या प्रश्‍नावर मुंढे यांची सर्वसाधारण सभेत चांगलीच कोंडी झाली होती त्याच्याही माझ्यावर विशेष राग हा होताच.

सभागृहाचे आदेश मान्य करुन त्यांना अतिरिक्त शिक्ष् कांच्या प्रश्‍नावर समायोजनाची योग्य भूमिका घ्यावीच लागली.याही वेळी मी शिक्ष् कांच्यावतीने योग्य आणि अगदी रास्त पाच मागण्या डॉ.गंटावार यांच्यासमोर ठेवल्या होत्या.करोनाबाधित भागात सर्व्हेचा लेखी आदेश शिक्ष् कांना देण्यात यावे.केंद्र शासनाने आरोग्य सेवेतील तसेच आवश्‍यक सेवेतील कर्मचा-यांना करोनासंबधी काम करताना मृत्यू झाल्यास ५० लक्ष् चे सुरक्ष्ा कवच देण्याची घोषणा केली ते सुरक्ष्ा कवच मनपाच्या शिक्ष् कांना देखील लागू झाले पाहिजे.मनपा शिक्ष् कांना सर्व्हे करताना मास्क,सॅनिटायझर,हॅण्डग्लोज पुरविण्यात यावे.गेल्या १५-२० दिवसांपासून अनेक शिक्ष् क हे कामावर रुजू आहेत,त्यांना आता थोडी विश्रांती मिळण्यासाठी रोटेशन पद्धतीने काम देण्याची योजना आखावी,शहरातील खाजगी शाळेतील शिक्ष् कांना देखील यात सहभागी करावे जेणेकरुन कुण्या एकावरच दडपण येणार नाही तसेच मनपाचे जे ५ टक्के कर्मचारी करोनाच्या नावाखाली घरी बसले आहेत त्यांना देखील सर्व्हेच्या कामात सहभागी करुन शिक्ष् कांचा भार हलका करावा.

शिक्ष् कांच्या हिताच्या रास्त मागण्या करताच आयुक्तांनी चक्क माझ्या निलंबनाचाच आदेश काढला व रविवारी माझ्यापर्यंत पोहोचवला.सध्या राज्यात १९७९ चा साथी रोगाचा कायद्या अस्तित्वात असून या प्रतिबंधक कायद्यातील कलम(८)प्रमाणे सर्वाधिकार मुंढे यांना शासनाच्यावतीने मिळाले आहेत. या कायद्यात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे जे कर्मचारी शासनाच्या कामात बाधा निर्माण करतात वा अडथळे आणतात,प्राधिकरणाचे मत असेल तर त्यांच्यावर कारवाईचा अधिकार आयुक्तांना मिळतो आणि आयुक्तांनी त्याच अधिकाराचा ‘गैरफायद्या’मला बडतर्फ करुन घेतला असल्याचा आरोप गवरे यांनी केला. आयुक्तांच्या या निर्णयाला न्यायालयातही आव्हान देता येत नाही.

करोनाचा जगभर, देशभर व शहरातही होणारा उद्रेग बघता मनपाची सर्वसाधारण सभा पुढील तीन-चार महिनेतरी होणे शक्य नसल्याचे दिसत आहे. माझे निलंबन रद्द करण्याचा अधिकार हा स्थायी समितीच्या अध्यक्ष्ांना असून आता या अन्यायाविरोधात मला सभागृहातच न्याय मिळण्याची आशा आहे.

Latest बातम्या