
आशिनगर झोनमधील प्रभाग क्र ३ देखील केला सील
नागपूर,१३ मार्च: शहरात करोना बाधितांची संख्या ही दररोज वाढत चालली असून काल रविवार दि. १२ एप्रिल रोजी एकाच दिवशी १४ करोना बाधित रुग्णांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला होता. याच दिवशी उशिरा रात्री आणखी ३ रुग्णांचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आल्याने एकाच दिवशी शहरात करोना बाधितांची संख्या ही १७ झाली होती. सोमवारी सकाळी यात आणखी ३ रुग्णांची भर पडली व आता शहरात करोना बाधितांची संख्या ही ४७ झाली असल्याचे प्रसिद्ध पत्रक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जनसंपर्क विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आले.
काल व आज दोन्ही दिवशी करोनाचा संसर्ग झालेल्या लोकांचा संबध हा दिल्लीतील ‘मरकज‘प्रकरणाशी असून यातील कालचे ३ संसर्गित हे सतरंजीपू-यातील करोनाबाधिताच्या संपर्कातील आहेत तर आज ज्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले ते ३ रुग्ण हे दिल्लीला मरकजमध्ये सहभागी झालेल्या लोकांच्या संपर्कातील असल्याचे सांगितले जाते. या सर्वांना मेयो येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या ‘मरकज’प्रकरणामुळे शहराच्या करोना बाधितांच्या संख्येत दररोज वाढत असल्यामुळे आता प्रशासनाची काळजी चांगलीच वाढली आहे.विशेष म्हणजे हे सर्व रुग्ण विलगीकरणातील आहेत. विलगीकरणात असताना त्यांच्या चाचणीचा अहवाल हा प्रलंबित होता. विलगीकरणातील इतर लोकांच्या संपर्कात आले असल्यास,हा आकडा आणखी वाढू शकतो,याची प्रशासनालाही जाणीव आहे.
मेडिकलमधील प्रयोगशाळेच्या अहवालातून कोरोनाबधित आढळलेल्यांमध्ये सतरंजीपुरा येथील २, काटोल मार्गावरील वेलकम कॉलनीतील ४ तर मोमिमपुरा आणि कामठी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. काल निर्दशनास आलेल्या मेडीकलमधील पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये मेडिकलमधील ४१ वर्षीय,४२ वर्षीय आणि ३३ वर्षीय तरुणांचा समावेश होता. एक १२ वर्षाचा मुलगाही होता तर ११ आणि १३ वर्षीय मुलींसह ४० आणि ४१ वर्षाच्या २ महिलांचा समावेश आहे.
मेयोच्या प्रयोगशाळेतून आलेल्या ६ बाधितांमध्ये कामठीतील २४ वर्षीय तरुणासह सतरंजीपु-यातील ३३ वर्षीय युवकाचा समावेश आहे तसेच जबलपूरवरुन दिल्लीमार्गे नागपूरात आलेल्या ४ जणांचा समावेश आहे. यात ५९ वर्षीय व्यक्तिसह ३४ वर्षीय २ युवक तसेच ३३ वर्षीय एका युवकाचा समावेश आहे.
आज सोमवारी मेयो रुग्णालयातून ज्या ३ करोनाबाधितांचा अहवाल पॉझिटिव्ह आला त्यात ३४,३३ व २६ वर्षीय व्यक्तिींचा समावेश आहे. यांचाही संबंध ‘मरकज’शी असल्याचे सांगितले जात आहे. काल रात्री सतरंजीपु-यातील ज्या ३ करोनाबाधितांचा अहवाल पॉझिटिव्ह आला त्यात ४२ वर्षीय महिला तसेच १४ व १५ वर्षीय मुलींचा समावेश आहे.थोडक््यात दिल्लीती ‘मरकज’प्रकरण हे नागपूर शहराच्या आरोग्यासाठी देखील किती ‘धोकादायक’ठरले याचे हे मूर्तीमंत उदाहरण असल्याचे बोलले जात आहे.
आशिनगर झोनमधील प्रभाग क्र ३ देखील केला सील-
नागपूर महानगरपालिका हद्दीतील आशीनगर झोनअंतर्गत येणारा प्रभाग क्र. ३ आणि सतरंजीपुरा झोनअंतर्गत येणारा प्रभाग क्र. ७ मधील बहुतांश परिसर कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात होऊ नये म्हणून नागरिकांची सुरक्षा लक्षात घेता सील करण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.
या आदेशानुसार आशीनगर झोन क्रमांक ९ आणि सतरंजीपुरा झोन क्रमांक ७ अंतर्गत असलेल्या प्रभाग क्र. ३ आणि ७ च्या उत्तर पश्चिमेस इटाभट्टी चौक रिंग रोड, उत्तरेस पिवळी नदी वनदेवी नगर, पूर्वेस कळमना गेट क्र. १ कोराडी लाईन, दक्षिण-पश्चिमेस कावरापेठ शांतीनगर रेल्वेगेट, पश्चिमेस कांजीहाऊस चौक बिनाकी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.
या भागात येणारे व जाणारे सर्व मार्ग तात्काळ बंद करून या भागाच्या सीमा आवागमनासाठी पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. शासकीय व निमशासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी, आवश्यक तातडीची वैद्यकीय कारणे तसेच अंत्यविधी, वैद्यकीय सेवेशी संबंधित खाजगी डॉक्टर, परिचारीका, मेडीकल स्टोअर्स दुकानदार, पॅथॉलॉजिस्ट, रुग्णवाहिका, पोलिस विभागामार्फत पासधारक असलेले जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे व्यक्ती यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.
दि. १३ एप्रिल सोमवारचा दैनिक तपशील असा-
दैनिक संशयित-३७
एकूण संशयित-११३०
सध्या भरती असलेले संशयित-७४(मेडीकल-४०,मेयो-३४)
एकूण भरती असलेले संशयित-१०३५(मेडीकल-४८२,मेयो-५५३)
एकूण भरती पॉझिटिव्ह-३८(मेडीकल-२४,मेयो-१४)
दैनिक तपासणी नमुने-२३
एकूण तपासणी नमुने- १३२९
कोव्हीड-१९ पॉझिटिव्ह नमुने-४७(मेडीकल-२७,मेयो-२०)
डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह-८(मेडीकल-३,मेयो- ५)
एकूण डिस्चार्ज केलेले संशयित-९६०(मेडीकल-४४२,मेयो-५१८)
आज अलगीकरण केलेले संशयित- १३
आज अलगीकरण कक्ष्ात भरती असलेले संशयित-५७८
अलगीकरण कक्ष्ेतून घरी पाठवलेले संशयित- २१
अलगीकरण कक्ष्ातून मेडीकल-मेयो रुग्णालयात पाठवलेले संशयित-३
पाठपुरावा सुरु असलेले एकूण संशयित(होम क्वारंटाईन)-११९०

आमचे चॅनल subscribe करा