Homeनागपूर मनपानिजामुद्दीन मरकजमध्ये सहभागी झालेले नागपूरातील १९ लोकं अद्याप ही बेपत्ता!

निजामुद्दीन मरकजमध्ये सहभागी झालेले नागपूरातील १९ लोकं अद्याप ही बेपत्ता!

प्रशासनावरचा ताण वाढला

नागपूर: दिल्ली येथील मरकज येथे सहभागी झालेले १९ लोकं अद्यापही नागपूर प्रशासनाला गवसले नाहीत.यामुळे प्रशासनावरचा ताण बराच वाढला असून याबाबत पोलिसांना सूचित करण्यात आले आहे.नागपूर पोलिसतर्फे बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा गाठली जात आहे.विशेष म्हणजे या सर्व लोकांचे मोबाईल हे संपर्क क्ष्ेत्राच्या बाहेर दाखवत आहेत.

मरकज येथून नागपूरात परत आलेल्या १८९ लोकांचा शोध घेऊन त्यांना आधीच एका संस्थेत विलीगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांना घरात विलीगीकरणात राहण्याची परवानगी प्रशासनाने नाकारली असून या सर्वांना प्रशासनाने स्वत:च्या देखरेखीखाली ठेवल्याचे सांगण्यात येत आहे.

मरकजमध्ये सहभागी झालेल्या सर्व लोकांची करोना चाचणी घेण्यात आली असून त्याचा अहवाल अद्याप प्राप्त व्हायचा आहे. प्रशासनातर्फे मिळालेल्या माहितीनुसार मरकजमध्ये सहभागी झालेल्यांपैकी ३३ लोकं हे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील रहीवाशी आहेत. १० माणसे नागपूर जिल्ह्यातील रहीवाशी आहेत तर नागपूर शहरातून एकूण १८९ लोकं हे मरकजमध्ये सहभागी झाले होते.
मरकज प्रकरणी प्रशासन कठोर निर्णय राबवित असून शहरातील २७ लाख शहरवासियांच्या सुरक्ष्ेचा प्रश्‍न यात आता अंर्तभूत झाला आहे. मरकजमध्ये सहभागी झालेल्या नागपूर शहरातील १८९ लोकांना आमदार निवासात विलगीकरणात ठेवण्यात आले असल्याची माहिती आहे. मात्र १९ लोकं अद्याप बेपत्ता आहेत. या सर्वांचे मोबाईल हे बंद आहेत.

प्रशासनाने पोलिस विभागाला या सर्व १९ लोकांची यादी सोपवली आहे.पोलीस प्रशासनातर्फे या १९ लोकांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे.

रकज तब्लीगी जमातमध्ये सहभागी झालेल्यांची जी यादी केंद्र सरकारतर्फे नागपूर प्रशासनाला देण्यात आली त्यात ३२७ लोकांची नावे आहेत. त्यातील २२८ लोकांना महानगरपालिकेने चिन्हित केले आहे. इतर लोकं हे नागपूर ग्रामीण व नागपूर शहराच्या सीमावर्ती भागातील रहीवाशी आहेत. आतापर्यंत महानगरपालिकेने १८९ लोकांना विलगीकरण कक्ष्ात ठेवले आहे.मात्र १९ लोकांचा पत्ता अद्याप प्रशासनाला लागला नाही. यामुळे या लोकांची नावे पोलीस प्रशासनाला सोपविण्यात आली असल्याचे सांगितले जाते.

ही माहिती मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी माध्यमांना दिली. दिल्लीच्या निजामुद्दीन येथील मरकजमधील तब्लीकी जमातमध्ये नागपूरातील अनेक लोकं हे सहभागी झाले होते. नागपूर पोलीसांच्या मदतीने या लोकांची ओळख पटवून १८९ लोकांना सख्तीच्या विलगीकरणात ठेवण्यात आले असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात दिली.

मुंढे यांनी सांगितले की आणखी लोकांची ओळख पटली आहे लवकरच त्यांना देखील विलगीकरण केंद्रात पाठविण्यात येईल.

Latest बातम्या