Homeब्रेकिंग न्यूजनागपूरात संपादक समूहाच्या कथनी व करनीमध्ये अंतर!

नागपूरात संपादक समूहाच्या कथनी व करनीमध्ये अंतर!

एआयमुळे हजारो पत्रकारांची नोकरी धोक्यात:संपादक समुहाने मात्र जमवली ५० लाखांची आर्थिक माया!

नागपूर,ता.२८ ऑगस्ट २०२६: नागपूरातील पत्रकार जगतात एका माहितीने अनेकांच्या पोटात अक्षरश: गोळा आणला असून, एका लोकप्रिय दैनिकांने नागपूरसह राज्यभरातील कार्यालयीन शाखांमधील संपादकीय व पेजिनेशन विभागातील हजारो पत्रकार व कर्मचा-यांना कामावरुन काढण्यासाठी नोटीस दिली असल्याची धक्कायदायक बाब समोर आली आहे.हाच कित्ता इतरही काही मराठी,हिंदी व इंग्रजी वृत्तपत्रांनी गिरवला असल्याची खासगीत चर्चा झडत आहे मात्र,यासोबतच नागपूरातील काही आजी व माजी संपादकांनी मिळून जे संघटन बनवले आहे त्यावरच आता टिकेची तीव्र झोड उठली आहे.
नागपूर आणि विदर्भ परिसरातील पत्रकारितेचा दर्जा सुधारण्यासाठी आणि नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी कार्यशाळा घेणे,वार्तांकन करताना किंवा संपादकीय भूमिका घेताना पत्रकारांवर होणारे हल्ले िकंवा दबाव याविरोधात एकत्र येऊन आवाज उठवणे,विविध सामाजिक समस्यांवर चर्चा घडवून आणणे आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी माध्यम समूहांच्या माध्यमातून पुढाकार घेणे इत्यादी ‘मूल्धाधििष्ठत ’संकल्पना, ही संघटना निर्माण करताना मांडण्यात आली मात्र,प्रत्यक्षात हजारो पत्रकार व कर्मचा-यांच्या नोकरीवर वृत्तपत्रांच्या मालकांनी गदा आणली असताना, या समूह किंवा संघटनेने कोणताही पुढाकार घेतला नसल्याने, महाराष्ट्राच्या उपराजधानीतील पत्रकार जगतामध्ये, संपादकांच्या या समुहाविषयी किंबहूना आपलेच इस्पित साधण्यासाठी पत्रकारितेच्या नावावर गठीत करण्यात आलेला हा दबावगट असल्याचा आरोप करीत, चांगलाच रोष व्यक्त होत आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार या समुहाने ५० लाखांचा निधी देखील जमा केला आहे.यावर देखील तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून मूळात ही बाब सत्य असल्यास या निधीबाबत आता ‘ईडी‘नेच पारदर्शक चौकशी करावी ,अशी उपहासात्मक मागणीही  केली जात आहे.रामेश्‍वरी येथील ॲड.सतीश उके यांच्या एका लहानशा घरात इडीने ज्या तातडीने छापा टाकला होता,इडीच्या त्या कारवाईकडे ही अनेकांनी लक्ष वेधले!
या संघटनांमध्ये नागपूरातील नामवंत मराठी,हिंदी आणि इंग्रजी वृत्तपत्रांचे आजी-माजी मुख्य संपादक,कार्यकारी संपादक आणि ज्येष्ठ पत्रकारांचा दुस-या शब्दात सांगावयचे झाल्यास पत्रकारितेतील‘अनुभवसंपन्न‘संपादकांचा समावेश अाहे!वेळोवेळी बैठका घेऊन माध्यम क्षेत्रातील आव्हाने,जसे की डिजिटल मीडियाचे वाढते महत्व,फेक न्यूज वर नियंत्रण आणि पत्रकारांचे वेतनमान यांवर धोरणात्मक चर्चा करण्यासाठी अश्‍या संघटनेची निर्मिती झाली असल्याची वल्गना करणा-या समूहाच्या महानुभवी संपादकांनी, पत्रकारांचे वेतनमान तर सोडा त्यांच्या नोकरीविषयी देखील मालकांकडे ‘ब्र‘काढला नसल्याने, संपूर्ण रोष त्यांच्या समूहावर असल्याचे दिसून पडत आहे.महाराष्ट्राच्या नंबर-वन रेसमधील एका दैनिकाने तर नागपूरात ज्या ९ जागा रिकाम्या झाल्या त्या चक्क सरेंडर केल्या असल्याची बाब ही पुढे आली आहे.त्याच वृत्तपत्रातील एक संपादक या संपादकांच्या संघटनेतील एक सन्मानीय विभूती आहे,हे विशेष!
पेजिनेशन विभागात आठ पाने लावण्यासाठी चार कर्मचारी कार्यरत होते तिथे आर्टिफिशल इंजलिजेंट्स(एआय)तंत्रज्ञानामुळे एकच कर्मचारी आठ पाने आता सहज लावू शकतो.याशिवाय वृत्तपत्र मालकांनी एका बिटसाठी एकाच कोणत्या तरी भाषेतील पत्रकार कायम ठेवून इतर दोन भाषेतील उदा.इंग्रजी किंवा हिंदी किंवा मराठी पत्रकाराला,एआय आता अचूक व चपखल भाषांतर करीत असल्याने  घरचा रस्ता दाखवला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यात मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ व अनुभवी पत्रकारांचा मोठ्या प्रमाणात बळी घेतला जात असल्याची चर्चा आहे.इतकी मोठी, अनेकांचे आयुष्य उधवस्त करणारी घडामोड नागपूरातील पत्रकार जगतात घडत आहे मात्र,संपादक संघटनेतील अनेक संपादक,वृत्तपत्र मालकाच्या या धोरणाला कोणताही विरोध करताना दिसून पडत नाही उलट संघटना व वृत्तपत्रातील नोकरी दोन्ही जागेवर ‘फेविकॉल का मजबूत जोड‘सारखी टिकून असल्याचे दिसत आहे.
मूळात, अगदी पहिल्या दिवसापासून संपादकांचा हा समूह किंवा संघटना वादाच्या भोव-यात अडकली आहे.या समूहातील काही चेहरे हे वादग्रस्त असून त्यांच्यावर मोठमोठे राजकारणी,नेते,मंत्री यांच्याकडून चक्क ‘वसूलीचे ’देखील आरोप झाले आहेत.अश्‍या संघटनेने ५० लाखांचा निधी जमवणे याकडे देखील त्यामुळेच संशयाने बघितले जात असून ५० लाखांचा निधी हा पत्रकारितेच्या जगात वादाचा विषय ठरत आहे.इतका मोठा निधी स्वत:च्या खिशातून जमा केला किंवा नेमका कुठून मिळवला?यावर पत्रकार परिषद घेऊन नागपूरकर जनतेसमोर त्याचा खुलासा करण्याची मागणी केली जात आहे.
संपादक हे ध्येयवादी,चारित्र्यसंपन्न,मूल्याधिष्ठित,तत्ववादी.समालाजा दिशा दाखवणारे आणि पत्रकारितेशी प्रामाणिक असतात असा एक (गैर)समज समाजात रुढ आहे. मात्र,संपादकांच्या संघटनेत प्रामाणिक संपादकांचाच अभाव आढळतो,त्यांच्या विशिष्ट बैठकीत असे प्रामाणिक आजी-माजी संपादक सहभागी झाल्यास त्यांचा (कू)हेतू साध्य कसा होणार ?असा देखील टोला हाणला जात आहे.
राजकारणात नंबर दोनचे धंदे करणारे अनेक महाभाग असून त्यांच्याकडून वसूलीसाठी देखील काही दबावगट पत्रकारितेच्या नावाखाली निर्मित होत असल्याची जहाल टिका उमटली आहे.पत्रकारांच्या हितासाठी आधीच एक संघटना होती,तीला बळ देऊन मजबूत करण्या ऐवजी नागपूरात काही संपादकांनी स्वत:पुरती एक नवीन संघटना निर्माण करणे,यावर आता टिकेची झोड उठली आहे.
हजारो अनुभवी पत्रकार व कर्मचा-यांच्या घरातील चुली एआय तंत्रज्ञान व वृत्तपत्र मालकांच्या व्यवसायिक वृत्तीमुळे विझणार आहेत आणि हे दाहक वास्तव आहे.यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने जुन्या २९ केंद्रीय कामगार कायद्यांचे एकत्रिकरण करुन चार नवीन कामगार संहिता (4 Labour Codes) देशभरात लागू केला आहे तो अश्‍या असंघटित कामगार व पत्रकारांच्या जीवावर चांगलाच उठला असल्याची देखील टिका होत आहे.
थोडक्यात,हयातीत नसलेले ल.त्र्य.जोशी,मनोहर अंधारे,पत्रकारितेच्या मूल्याशी आजतागत प्रामाणिक असलेले सुधीर पाठक,प्रकाश दुबे,भूपेंद्र गणवीर आदी माजी संपादकांच्या ध्येयनिष्ठ कारकीर्दीची आठवण अवार्जून या पार्श्वभूमीवर काढली जात आहे.प्रिया चतुर्वेदीची कविताही मग नकळत आठवून जाते….
हाँ मैं एक पत्रकार हूँ…
अत्याचार अन्याय के विरुद्ध,
भरता नित नई हूंकार हूँ।
“हाँ मैं एक पत्रकार हूँ।”
लोकतंत्र का चतुर्थ स्तंभ हूँ,
अन्याय के विरुद्ध, सच के संग हूँ।
मजदूर और मजबूर की आवाज,
समाज का एक अभिन्न अंग हूँ।
सच के लिए हरदम लड़ूँ,
निर्भीक हूँ, नहीं लाचार हूँ।
“हाँ मैं एक पत्रकार हूँ।”
मेरी आवाज को रुकना कभी आया नहीं,
मेरी कलम को झुकना कभी आया नहीं।
रोज मिलते हैं सियासत के नए पहरेदार,
पर मेरे अस्तित्व को कोई गिरा पाया नहीं।
आईना दिखाने का साहस है मुझमें,
झूठ के लिए मैं उसकी हार हूँ।
“हाँ मैं एक पत्रकार हूँ।”
……………………………………………………..

Latest बातम्या