Homeनागपूर न्यूजनागपूरात आज १८ बाधितांची भर: आणखी एकाचा मृत्यू

नागपूरात आज १८ बाधितांची भर: आणखी एकाचा मृत्यू

रुग्णसंख्या ७१८! ४९३ बाधितांची कोरोनावर मात

नागपूर,ता.८ जून: राज्य शासनाने जाहीर केलेला अनलॉकचा तिसरा टप्पा सोमवार दि. ८ जून पासून सुरु झाला.यामुळे एकीकडे सामान्य जनतेला,दूकानदार,उद्योग जगताला थोडा दिलासा मिळाला असला तरी याचे दुष्परिणामही वेगाने समारे येत आहेत. नागपूरात रुग्णांची संख्या ही वाढतच चालली असून यात कोरोनामुळे मृत्यू पावणा-यांच्या संख्येचा आलेखही हळूहळू वर चढतच आहे. आज सलग दुस-या दिवशी आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला असून आज आणखी १८ बाधितांची भर पडली आहे.

यातील ३ रुग्ण हे शहरातील तीन वेगवेगळ्या खासगी रुग्णालयातील आहेत हे विशेषे! आता शहरात बाधितांची संख्या ही ७२६ झाली असून मृतकांची संख्या ही १५ झाली आहे. हंसापुरी गोळीबार चौक येथील ४२ वर्षीय रुग्ण १ जून रोजी मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. २ जून रोजी या रुग्णाचा अहवाल हा कोरोना पॉझिटीव्ह आला. हा रुग्ण डायलिसिसवर होता. काही दिवसांपासून त्यांना श्‍वास घेण्याचा त्रास जाणवत होता. यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कालच अमरावती येथील महिलेचा नागपूरातील मेडीकल रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तर काल रविवार दि. ७ जून रोजी एकूण १६ बाधितांची भर पडली होती. या महिन्यात आतापर्यंत एकूण ४ कोरोना बातिधांची मृत्यूची नोंद झाली आहे.

विशेष म्हणजे बाधितांमध्ये इतर शहरातून येणा-या नागरिकांची संख्या ही अधिक आहे.याशिवाय शहरातील खासगी रुग्णालयातही रुग्ण हे वाढत आहेत. आज सोमवार दि. ८ जून रोजी खासगी प्रयोगशाळेतून ५ जणांचे अहवाल हे पॉझिटीव्ह आलेत.यात मोमिनपु-यातील गर्भवती महिला, टेकडीवाडी येथील १ रुग्ण,इंदोरा चौक जसवंत मॉल परिसरातील १ रुग्ण,टिमकी येथील १ जर छिंडवाडा येथील १ रुग्णाचा समावेश आहे.

सिंदी रेल्वे कार्यालयात कार्यरत असलेला एक कर्मचारी पॉझिटीव्ह आढळल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या रुग्णांची संख्या ही ६ झाली आहे. आज पुन्हा यात २ ची भर पडली. हे रुग्ण रेल्वे कर्मचारी असून अजनी क्वॉर्टर येथील रहीवासी आहेत. या दोन्ही रुग्णांना रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सावनेर शहरात पहिल्यांदाज कोरोनाचा शिरकाव झाला. येथील वॉर्ड क्र. ४ मधील हा रुग्ण नुकताच मुंबईहून आला आहे. तर सावनेर तालुक्यातील भानेगाव येथील १ रुग्णाचा अहवाल हा देखील आज पॉझिटीव्ह आला. हा रुग्ण ओरिसामधून आला आहे.सावनेर तालुक्यात आतापर्यंत ५ रुग्णांनी नोंद झज्ञली असून ४५ संशयितांना विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे. याशिवाय हिंगणा येथे देखील १ रुग्ण पॉझिटीव्ह आला. ‘सारी’च्या आजार असणा-या या ७२ वर्षीय रुग्णाला मेडीकलमध्ये भरती केले असता त्याचा अहवाल हा पॉझिटीव्ह आला आहे.

आणखी १६ बाधितांनी केली कोरोनावर मात-
आज सोमवारी मेयोतून ८,एम्समधून ५ तर मेडीकलमधून ३ रुग्णांना सुटी देण्यात आली आहे.यात लोकमान्य नगरातील ४,तांडापेठ येथील २,सदर येथील १,नाईक तलाव येथील १ रुग्णाचा समावेश आहे.एम्समधून सुटी झालेल्यांमध्ये हावरापेठ येथील २,वसंतनगर येथील २ तर भगवान नगर येथील १ रुग्णाचा समावेश आहे. मेडीकलमधून सुटी झालेल्यांमध्ये गिट्टीखदान येथील २ तर ताजनगर येथील १ रुग्णाचा समावेश आहे. आता बरे झालेल्यांची संख्या ही ४९३ वर पोहोचली आहे.

उपराजधानीत कोरोनाची आजची स्थिती-
दैनिक संशयित- ४७७
दैनिक तपासणी नमुने- ६३९
दैनिक निगेटीव्ह नमुने- ३६४
नागपूरातील पॉझिटीव्ह नमुने- ७२६
नागपूरातील मृत्यू- १५
डिस्जार्च केलेले संशयित रुग्ण- ३,१४९
डिस्चार्ज केलेले पॉझिटीव्ही रुग्ण-४९३
विलगीकरण कक्ष्ात एकूण संशयित-१,८४०
बाधित- ७२६
बरे होणा-या रुग्णांची संख्या- ४९३
मृत्यू-१५

Latest बातम्या