Homeनागपूर न्यूजनागपूरात आज १८ नवे रुग्ण: बधितांची संख्या ९३९ वर

नागपूरात आज १८ नवे रुग्ण: बधितांची संख्या ९३९ वर

बधितांमध्ये दोन व अडीच वर्षांच्या चिमुकल्यांचा समावेश

नागपूर,ता.१२ जून: शहरात आज १८ नव्या रुग्णांची नोंद झाली असून बधितांची संख्या ही ९३९ वर पोहोचली आहे. महत्वाचे म्हणजे यात दोन व अडीच वर्षांच्या चिमुकल्यांचा समावेश आहे.

सलग दोन दिवस शहरात बाधितांच्या अकड्याने उच्चांक गाठला होता,त्या मानाने शहराला आज थोडा दिलासा मिळाला. आज चंद्रमणी नगरात २ रुग्ण पोसिटीव्ह आढळले. तर सावित्रीबाई फुले नगर या वस्तीत आज कोरोनाचा शिरकाव झाला.

सावित्रीबाई फुले नगरात आज अडीच वर्षाचा चिमुकल्याला कोरोनाचा संसर्ग झाला! त्याची आई चार दिवसांपूर्वी सावित्रीबाई फुले नगरात आपल्या माहेरी आली होती. दोन दिवसांपूर्वी मुलाची तब्येत खराब झाल्याने त्याला एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्याचा नमुना तपासणीसाठी पाठवला असता,त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला.त्याच्या संसर्ग संपर्काचा शोध घेतल्या जात आहे.

चंद्रमणी नगरमधील २७ वर्षीय युवक हा पॉझिटिव्ह आला होता.हा रुग्ण स्वतः हून मेडिकलमध्ये भरती झाला होता.याला मोमिनपुरा येथून संसर्ग संपर्काची पार्श्वभूमी आहे. त्याच्या कुटुंबियांना विलगिकरणात ठेवण्यात आले होते. त्यातील २८ वर्षीय व २५ वर्षीय पुरुष हे आज पॉझिटिव्ह आढळले. परिणामी दाटीवाटीने वसलेली ही वसाहत नवा हॉट स्पॉट होण्याची भीती वर्तवली जात आहे.

याशिवाय आज मोमीनपुरा येथील आणखी २ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. गेल्या दोन दिवसांपासून समग्र नागपूरकरांचे लक्ष वेधून घेणाऱ्या नाईक तलाव येथून २,तसेच निकालस मंदिर,बजेरिया,टिमकी व हंसापुरी येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.

कोराडी सिद्धार्थ नगर येथे आज एका दोन वर्षीय चिमुकलीला कोरोनाची बाधा झाली. याशिवाय ग्रामीण भागात सावनेर येथील १ तर काटोल येथे १ बाधित आढळले.नागपुरातील एका खासगी प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या नमुन्यामध्ये अमरावतीतील १ रुग्ण पॉझिटिव्ह आढळला.

मृतांचा आकडा १६ वर!

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव उपराजधानीत वाढत असतानाच मृत्यू देखील वाढत आहेत, शुक्रवारी मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये ५६  वर्षीय व्यकतीचा मृत्यू झाला,

या व्यक्‍तीला कोरोना असल्याचा अहवाल आला, सायंकाळी रुग्ण बाथरूमध्ये गेला, परत येताना खाली पडला, कोरोनाची बाधा असल्याने कोनीही मदतीला धावले नाही, दरम्यान या मृत्यूमुळे कोरोनाबाधित  मृतांचा आकडा आता १६ वर गेला.

आज १८ रुग्णांची कोरोनावर मात-
आज शुक्रवार दि.12 जुन रोजी आणखी १८ रुग्णांनी कोरोनावर मात केली.यातील ५ रुग्ण मेयो रुग्णालयात भरती होते. यात अकोल्यातील ३,मोमिनपुरा व भानखेडा येथील प्रत्येकी १ रुग्णाचा समावेश आहे.७ रुग्ण बंगलादेश-नाईक तलाव येथील असून आतापर्यंत ५७३ रुग्ण यांनी कोरोनवर यशस्वीपणे मात केली.

 

Latest बातम्या