Homeनागपूर मनपानळातून पाण्याच्या ऐवजी मिळणार दारु! मनपा आयुक्तांनी दाखल केली तक्रार

नळातून पाण्याच्या ऐवजी मिळणार दारु! मनपा आयुक्तांनी दाखल केली तक्रार

नागपूर मीम्स कॉरपोरेशच्या पोस्ट विराेधात सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

नागपूर,२९ एप्रिल: नागपूर महानगरपालिकेतर्फे सदर पोलीस ठाण्यात नागपूर मीम्स कॉरपोरेशनवरील एका पोस्टविरोधात आज बुधवार दि.२९ एप्रिल रोजी मनपाविरोधी चुकीचा अपप्रचार करण्याच्या आरोपाखाली तक्रार दाखल करण्यात आली आहे. या मीम्स कॉरपोरेशनवरील पोस्टमध्ये,सोशल मिडीयावर आता नागपूरातील ग्रीन झोनमधील नळांमधून मनपा, पाण्याऐवजी दारु पुरविणार असल्याचा मॅसेज टाकण्यात आला होता.विशेष म्हणजे हा मॅसेज १०० पेक्ष्ा जास्त नागपूरकरांनी आपल्या फेसबूक पेजवर शेअर केला आहे.

‘दारु’हा मूळातच संवेदनशील विषय.यावर अगदी मनसे नेते राज ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन सादर करुन महसूल प्राप्तीसाठी राज्यातील दारु दूकाने त्वरीत सुरु करण्यात यावी अशी मागणी केली होती. महसूल आणि राज्य यापेक्ष्ा उपराजधानी ही देखील कुठेच कमी नसल्याचे आज काही नागपूकरांनी दाखवून दिले. ‘कोरोना’मुळे शहरातील दारु दूकाने व सर्व बीअर बार हे २४ मार्च पासूनच बंद आहेत. यामुळे मद्यपी यांची चांगलीच गैरसोय झाली आहे.

गेल्या सव्वा महीन्यापासून,काेरोनापेक्ष्ाही जास्त वेदना ही फूफ्फूसांना दारु न मिळाल्यामुळे होत असल्याचे मॅसेजेच तसेच दारु या विषयाला घेऊन सध्या सोशल मिडीयावर अनेक मीम्स व्हायरल होत आहेत.

‘नागपूरयीन्स’ नावाच्या फेसबूक पेजवर आज एक पोस्ट चांगलीच व्हायरल झाली.यात महापालिकेविरोधात चूकीची माहिती टाकण्यात आली होती. उद्यापासून नागपूरातील ‘ग्रीन झोन’मध्ये पिण्याच्या पाण्याच्या नळातून पाण्या ऐवजी चक्क मनपातर्फे वाईन मिळणार असल्याची बतावणी यात करण्यात आली होती.

मनपाने हा मार्ग दारुच्या दूकानांमध्ये तसेच बारमध्ये मद्यपींची गर्दी होऊ नये व सामाजिक अंतर राखता यावे यासाठी स्वीकारला असल्याचे सांगण्यात आले होते.

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या विषयाला गंभीरतेने घेत याविरुद्ध सदर पोलीस ठाण्या, नागपूर मीम्स कॉरपोरेशनच्या या पोस्ट विरोधात तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले.आता सदर पोलीस या बाबत पुढील चौकशी करीत आहे.

Latest बातम्या