Homeनागपूर मनपादिल्लीवरून आलेल्या इतर प्रवाशांनी स्वत: पुढे येऊन सहकार्य करा: मुंढे यांचे आवाहन

दिल्लीवरून आलेल्या इतर प्रवाशांनी स्वत: पुढे येऊन सहकार्य करा: मुंढे यांचे आवाहन

Advertisements
Advertisements

नागपूर, ता. १ : १५ मार्च, २०२० नंतर दिल्लीवरुन रेल्वे व्दारा आलेल्या प्रवाशांनी तसेच अन्य धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांनी स्वत: पुढे येऊन आपली माहिती प्रशासनाला दयावी, असे आवाहन म.न.पा.आयुक्त श्री.तुकाराम मुंढे यांनी केले आहे. या नागरिकांची यादी मनपाकडे प्राप्त झाली असून यापैकी ५४ जणांचा शोध घेउन त्यांची चाचणी करण्यात आली आहे. याच्यात ५३ नागरिक नागपूरचे आहे आणि एक नागरिक गोंदियाचा आहे.

निजामुद्दीन येथे मुस्लिम संस्था तबलीगी जमातचे मुख्यालय आहे. याच ठिकाणी मार्च महिन्यात एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नागपुरातीलही अनेक जण सहभागी झाले होते. दिल्ली तथा अन्य ठिकाणांवरुन रेल्वे व्दारा परत आलेल्या सर्व धर्मिय प्रवाशांची यादी मागवून बुधवारी (ता.१) सकाळपर्यंत ५४ जणांचा शोध घेण्यात आला असून त्यांची चाचणी घेऊन त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.

दिवसेंदिवस कोरोनाचा धोका वाढतो आहे. संसर्गातून कोरोना पसरत असल्याने सर्वांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. रेल्वेने प्रवास करणारे सहप्रवासी यांनी स्वत: पुढे येण्याची गरज आहे. संबंधित व्यक्तींनी स्वत:बद्दल मनपा नियंत्रण कक्ष अथवा मनपाच्या आरोग्य विभागाला माहिती द्यावी. कोरोनाच्या विळख्यातून स्वत:सह आपले परिजन आणि इतर नागरिकांनाही वाचविण्यासाठी पुढे या. मनपा आपल्या सोबत आहे, असे आवाहनही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.

Latest बातम्या