Homeनागपूर न्यूजउपराजधानीत आणखी दोन करोना बाधीतांची भर: रुग्णसंख्या ५८ वर

उपराजधानीत आणखी दोन करोना बाधीतांची भर: रुग्णसंख्या ५८ वर

नागपूर: उपराजधानीतील दोन वेगवेगळ्या भागातील दोन नवीन व्यक्तींना करोना विषाणूची बाधा झाल्याचे गुरूवारी पुढे आले. दोघेही रवी भवन येथे सक्तीच्या विलगिकरणात होते. त्यामुळे या रुग्णांतून सामाजिक संक्रमनाचा धोका नसल्याचा प्रशासनाचा दावा आहे. दोघांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले.
इंदिरा गांधी शासकीय वैद्याकीय महाविद्याालय व रुग्णालयील (मेयो) प्रयोगशाळेत करोना बाधीत आलेल्यांमध्ये २५ वर्षीय गिट्टीखदान येथील एक तर ६१ वर्षीय कन्हन येथील एक अशा दोन रुग्णांचा समावेश आहे. पैकी एकाने दिल्ली तर दुसऱ्याने अजमेर प्रवास केला होता.
दोघांना प्रशासनाने खबरदारी म्हणून सक्तीच्या विलगिकरणासाठी रवी भवनमध्ये ठेवले होते. पैकी ६१ वर्षीय कन्हान येथील व्यक्तीचे आज विलगिकरणातील १४ दिवस पूर्ण झाले. आज प्रयोगशाळेचा अहवाल नकारात्मक आल्यास त्याला घरी पाठवले जाण्याची शक्यता होती. परंतु त्याचा अहवाल सकारात्मक आल्याने त्याच्यासह दुसऱ्यालाही तातडीने रुग्णालयात हलवले गेले.
दरम्यान बुधवारी दिवसभरात शहरात एकही करोनाबाधीत आढळला नसल्याने प्रशासनासह शहरातील नागरिकांना आंशिक दिलासा मिळाला होता. परंतु दुसºयाच दिवशी दोन नवीन भागांत प्रत्येकी एक असे आणखी दोन करोनाबाधीत आढळल्याने पून्हा चिंता वाढली आहे.  तातडीने प्रशासनाकडून या दोघांच्या विलगिकरणापूर्वी संपर्कात आलेल्यांची माहिती घेतली जात आहे. त्यानंतर तातडीने त्यांनाही खबरदारी म्हणून विलगिकरणात आणून त्यांची करोना चाचणी केली जाणार आहे.
डॉक्टर आणि परिचारिकेत लक्षणे-
शासकीय वैद्याकीय महाविद्याालय व रुग्णालय (मेडिकल) येथील संशयीत रुग्णांचे नमुने घेणाऱ्या कान- नाक- घसा रोग विभागातील एका निवासी डॉक्टर आणि परिचारिका या दोघांमध्ये करोना सदृष्य सर्दी, खोकल्यासह इतर काही लक्षणे असल्याचे गुरूवारी पुढे आले. तातडीने प्रशासनने खबरदारी म्हणून दोघांना दाखल करत त्यांचे नमुने तपासणीसाठी घेतले. दोघांचा अहवाल नकारात्मक आल्यावरही त्यांना काही दिवस सक्तीच्या विलगिकरणात रहावे लागणार आहे.

Latest बातम्या