
नागपुरात आज ७२ नवे रुग्ण! एकूण संख्या पोहोचली १०६३ वर
नागपूर, ता. १५ जून : शुक्रवार दि. १२ जून रोजी कोरोनाबाधिताच्या मृत्यूनंतर लगेच तीन दिवसानंतर सोमवारी आज आणखी एका पन्नास वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे सकाळी मृत्यू झाला. नागपुरातील मृत्यूसंख्या आता १७ वर पोहचली असून आज ७२ नवीन कोरोनाबाधित आढळले. बाधितांचा आकडा आता १०६३ वर पोहोचला आहे. मध्य प्रदेशातील कोरोनाबाधितांचा नागपुरात झालेला हा दुसरा मृत्यू आहे. तर आतापर्यंत मेडिकलमध्ये ९ तर मेयोत ८ मृत्यू झाले आहेत.
उपराजधानीत ८ जून रोजी बाधितांचा आकडा ७१८ वर होता. मात्र आठ दिवसनंतर १५ जूनपर्यंत ३२५ नव्या रुग्णांची वाढ झाली. सोमवारी सकाळी मेडिकलमधील कोविड रुग्णालयात, मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथील ५० वर्षीय व्यक्तीचा कोरोनाच्या बाधेने मृत्यू झाला. ८ जून रोजी या व्यक्तीला मेडिकलमध्ये श्वसनाच्या आजारासाठी दाखल करण्यात आले होते. पंधरा दिवसांपासून त्याला खोकला असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. निदानातून न्यूमोनियाचे निदान झाले. सोबतच फुफ्फुसामध्येही संसर्ग असून ह्दयाचाही त्रास होता. प्रकृती गंभीर होताच त्याला व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले. मात्र उपचाराला प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर १५ जून रोजी सकाळी ८ वाजून ५५ मिनिटांनी त्याचा मृत्यू झाला. मध्य प्रदेशातील कोरोनाबाधिताचा नागपूरच्या मेडिकलमध्ये झालेला हा दुसरा मृत्यू आहे. यापुर्वी ४ जून रोजी ६२ वर्षीय महिलेचा कोरोनाच्या बाधेने नागपूरात मृत्यू झाला होता.
नागपूर शहरात कोरोनाच्या मृत्यूवर नियंत्रण मिळवले आहे. मात्र, कोरोनाबाधितांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाच्या प्रयत्नांना अपयश येत आहे. दररोज दोन आकड्यातील रुग्णसंख्या आढळून येत असल्याने प्रशासनाने खबरदारी घेण्याचा इशारा दिला आहे. आज सोमवारी एकूण नवे ७२ रुग्ण आढळून आले असून सर्व कोरोनाबाधित पाचपावली व रविभवन विलगीकरणातील आहेत. महाल किल्ला येथील एका गर्भवती महिला देखील कोरोना बाधित असल्याचे सांगितले जात आहे. आज नीच्या प्रयोगशाळेत २० नमुने हे पॉझिटीव्ह आले,हे पाचपावली विलगीकरणात होते, २ खासगी प्रयोगशाळेतील अहवाल हे पॉझिटीव्ह आले,एम्सच्या प्रयोगशाळेत ४ नमुने हे पॉझिटीव्ह आले असून हे वनामती येथील विलगीकरणात होते. याशिवाय मेडीकलच्या प्रयोगशाळेत १ बाधिताचा अहवाल हा पॉझिटीव्ह आला असून,हा शांतीनगर येथील मनपाचा कर्मचारी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आज आढळून आलेले ५० कोराना पॉझिटीव्ह यांची संख्या व क्ष्ेत्र-
२ तीन नल चौक
१ आठवा मैल
१७ नाईक तलाब
१ नरसाळा
४ चंद्रमणि नगर
१ आर्य नगर
१ झाड़ीवाला ले-आउट
१ हुडकेश्वर
२ आरटीपीएस
१ निर्मल कालोनी
१ मंगलवारी चिचघरे मोहल्ला
२ निकालस मंदिर
१ बजरिया भोईपुरा
३ भीम नगर
५ मोमिनपुरा
२ हंसापुरी
१ शांति नगर
१ ईतवारी अनाज बाजार
२ महल
१ प्रायवेट लैब
एकूण पाज़िटिव-१०४१
[उर्वरित संख्या रात्री उशीरा हाती आल्याने, या बधितांचे क्षेत्र अद्याप कळले नाहीत]
धाडीवाल ले-आउट, आर्यनगर आणि नरसाळा या नवीन वस्त्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव –
शहरातील सर्वच वस्त्यांमध्ये हळूहळू कोरोना चांगलेच हात- पाय पसरत आहे. नाईक तलाव, चंद्रमणीनगर, हुडकेश्वर रोड सावरबांधे हाॅलजवळचे रुग्ण आहेत. विशेष असे की, रामेश्वरी परिसरातील धाडीवाल ले-आउट, आर्यनगर आणि नरसाळा कोरोनाच्या नकाशावर आले आहे. यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सद्या मेडिकल, मेयो आणि एम्समध्ये ३६१ बाधितांवर उपचार सुरू आहेत.
शहरातील हॉटस्पॉट-
मोमीनपुरा -२४७
नाईकतलाव-बांगलादेश-२२९
सतरंजीपुरा -१२०
टिमकी-भानखेडा-५३
शांतीनगर -२२
हंसापुरी -१८
नोव्हेंबरमध्ये परमोच्च धोका?
कालच रविवारी शहरातील बाधितांच्या संख्येने हजारची संख्या पार केली यात आज एकाच दिवसात आणखी ५० ची भर पडली.नुकतेच १० जून रोजी एकाच दिवसात ८६ रुग्णांची भर पडली होते आणि शहर हादरले होते.भारतात कोरोना संकट नोव्हेंबरच्या दुस-या आठवड्यात परमोच्च बिंदूवर पाेहोचल व त्यावेळी विलगीकरण तसेच आयसीयू खाटांची आणि व्हेंटिलेटर्सची कमतरता भासेल,असा निष्कर्ष भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद(आयसीएमआर)च्या पुढाकाराने करण्यात आलेल्या एका अभ्यासात काढण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य सुविधा ८० टक्क्यांपर्यंत वाढविल्यास काेरोनाचा प्रभाव कमी करणे शक्य शक्य होईल,असेही या अभ्यासात म्हटले आहे.
दोन महिन्यांच्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे देशावर घोंघावत असलेले कोरोनाचे संकट हे नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत पुढे ढकलले गेले असल्याचे या निष्कर्षातून सांगण्यात आले आहे. याशिवाय महाराष्ट्रात कोव्हिडग्रस्तांची दररोजची संख्या ही ३१ जुलैपर्यंत १०,००० पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून केंद्र सरकारच्या आरोग्य खात्याने हा आकडा आणखी वर म्हणजे २५,००० दररोजची लागण,असे सांगितले आहे.
नागपूरात देखील वाढत्या बाधितांच्या संख्येने या शक्यतांवर शिक्कामोर्तब करीत अवघ्या काही दिवसातच हजारचा टप्पा गाठला तर एकाच दिवसात ८६ ते ७२ अशी रुग्णसंख्या वाढत आहे. परिणामी येता काळ हा अधिक धोकादायक राहणार असल्याने अधिकाधिक अनोळखी संपर्क टाळणे हाच प्रभावी उपाय आता नागपूरकरांच्या हातात आहे.
आज ३३ बाधितांची केली कोरोनावर मात-
कोरोनाबाधितांची संख्या जरी दररोज वाढत असली तसेच मृत्यूचा आलेख जरी वाढत आहे तरी त्या तुलनेत बरे होणाऱ्यांचा टक्का गतीने वाढत आहे. एम्समधून नाईक तलाव परिसरातील १६, गुमंगाव आणि लोकमान्य नगरातील प्रत्येकी एक अशा १८ व्यक्तींसहित मेयोतून ५ आणि मेडिकलमधून १० असे एकूण ३३ रुग्ण हे कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत ६४० बाधितांनी कोरोना विषाणूच्या विरोधातील युद्ध जिंकले आहे. यांना कोरोनामुक्त घोषित करण्यात आले.

आमचे चॅनल subscribe करा