Homeनागपूर न्यूजअपूर्व विज्ञान मेळाव्याचे महापौरांच्या हस्ते उद्‌घाटन : विविध प्रयोगांची मेजवानी

अपूर्व विज्ञान मेळाव्याचे महापौरांच्या हस्ते उद्‌घाटन : विविध प्रयोगांची मेजवानी

Advertisements
Advertisements

विद्यार्थ्यांनी अनुभवले विज्ञान विश्व

नागपूर, ता. २७  : नागपूर महानगरपालिका आणि असोशिएशन फॉर रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग इन बेसिक सायन्स एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान राष्ट्रभाषा परिसरात आयोजित अपूर्व विज्ञान मेळाव्याचे उद्‌घाटन बुधवारी (ता. २७) महापौर संदीप जोशी यांच्या हस्ते पार पडले. या मेळाव्याचे निमित्ताने विद्यार्थ्यांनी विज्ञान विश्व अनुभवले.

महापौर संदीप जोशी यांनी फीत कापून अपूर्व विज्ञान मेळाव्याचे उद्‌घाटन केले. यावेळी उपमहापौर मनिषा कोठे, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, धरमपेठ झोन सभापती अमर बागडे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, संजय बंगाले, सुनील हिरणवार, नगरसेविका रूपा रॉय, उज्ज्वला शर्मा, एआरटीबीएसईचे सचिव सुरेश अग्रवाल, राज्य विज्ञान संस्थेचे नागपूरचे संचालक रवींद्र रमतकर,  यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी महापौर संदीप जोशी यांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी मनपा व असोशिएशन फॉर रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग इन बेसिक सायन्स एज्युकेशन यांच्या वतीने सुरू असलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली. नागपूर शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांना विज्ञानासंबंधी मार्गदर्शन मिळण्यासाठी अशा मेळाव्याचे आयोजन अधिक व्यापक प्रमाणात करण्याच्या दृष्टीने अहवाल सादर करण्यासही अधिकाऱ्यांना सांगितले.

उपस्थित पाहुण्यांनी मनपा शाळांतील विद्यार्थ्यांद्वारे साकारण्यात आलेल्या प्रयोगांचे निरीक्षण केले. विज्ञानाला समजण्यासाठी असे आयोजन म्हणजे क्रांतिकारी पाऊल असल्याचे अतिथींनी म्हटले. प्रयोगाच्या माध्यमातून विज्ञानाचे नियम शिकणे उपयुक्त आहे. मेळावा प्रत्येक व्यक्तीसाठी ज्ञानवर्धक असल्याचेही काहींनी म्हटले.

एकीकडे विद्यार्थी प्रयोगाच्या माध्यमातून विज्ञान समजावून सांगत होते तर दुसरीकडे देशातून आलेले प्रतिनिधी त्यांनी सादर केलेल्या विशेष प्रयोगांनी लक्ष वेधून घेत होते. आलम्स हाइड्रोपोनिक्सफन फिजिक्सओरिगामी एंड क्रीगामी मेथमेटिकल टायसअंधश्रद्धा निर्मूलन समिती, एकलव्य प्रकाशन च्या पुस्तकांच्या स्टॉलवरही उपस्थितांनी गर्दी केली होती. विज्ञान प्रश्नमंजुषा स्टॉलवर विद्यार्थ्यांना विज्ञानविषयक प्रश्न विचारण्यात आले.

यावेळी सहायक शिक्षणाधिकारी राजेंद्र सुके, कुसुम चाफलेकर, शाळा निरीक्षक संजय दिघोरे, मुख्याध्यापिका संध्या मेडपल्लीवार, सिनीयर सायन्स कम्युनिकेटर (कोलकाता) कृष्णेंदु चक्रवर्ती, राजाराम शुक्लाम, ओमप्रकाश मिशा, मेळाव्याचे समन्वयक मुख्याध्यापक राजेंद्र पुसेकर प्रामुख्याने उपस्थित होते.

Latest बातम्या