Homeनागपूर न्यूजमुंढेंच्या दालनात भाजपचे मूक आंदोलन: पाणी दरवाढ मागे घेण्याची मागणी

मुंढेंच्या दालनात भाजपचे मूक आंदोलन: पाणी दरवाढ मागे घेण्याची मागणी

नागपूर,ता. १३ ऑगस्ट: २०१२ साली सभागृहात भाजपच्याच सत्ताकाळात दर वर्षी ५ टक्के पाणी दरवाढ करण्याचा निर्णय बहूमताने संमत झाला होता. मात्र या वर्षी परिस्थिती खूप बिकट आहे. करोनाच्या महामारीमुळे तसेच सतत तीन महिन्यांच्या लॉक डाऊनमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यात महावितरणाने भरमसाठी वीज बिलांचा भरणा जनतेवर लादला असून मनपाने केलेली ही ५ टक्के दरवाढ अन्यायकारक ठरेल,परिणामी या वर्षी ही दर वाढ करु नये,या मागणीसाठी भाजपचे आमदार व माजी महापौर प्रवीण दटके यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या नगरसेवकांनी आज सायंकाळी ४ वा. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या दालनात मूक आंदोलन केले.

मालमत्ता कर व पाणी बिल माफ करण्यासंबंधी बुधवारी महापौरांच्या अध्यक्ष् तेत शहरातील सर्व जनप्रतिनिधींची बैठक पार पडली होती.त्यांनी या संदर्भात आयुक्तांनी संवेदनशीलता दाखवून मालमत्ता कर व पाणी बिलावरील शास्ती या वर्षी माफ करावी असे निर्देश दिले होते.

यापूर्वी स्थायी समितीने आयुक्तांनी त्यांच्याकडे पाठवलेला पाणी दर वाढीचा प्रस्ताव परत पाठवला होता. मात्र यावर आयुक्तांनी प्रस्ताव फक्त समितीकडे माहितीसाठी पाठविला असल्याचे सांगून नागरिकांना आधीच वाढीव बिल पाठविण्यात आल्याचे समितीला कळवले व ही दरवाढ मागे घेता येणार नसल्याचे सांगितले.यावर भाजपच्या सर्व नगरसेकांनी आयुक्तांच्या दालनात मूक आंदोलन करण्याचा आधीच इशारा दिला होता.

गुरुवारी दुपारी ४ वाजता मनपा मुख्यालयातील आयुक्तांच्या दालनात १ तास हे मूक आंदोलन चालले. याप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते दयाशंकर तिवारी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना आम्ही मुंढेंच्या विरोधात आंदोलन करीत नसून त्यांच्या निर्णयाविरोधात असल्याचे ते म्हणाले. लोकशाहीत नियमात बदल करण्याचा अधिकार हा सभागृहाला आहे,स्थायी समितीला बहाल करण्यात आला आहे. प्रशासकीय अधिका-यांना नाही.मुंढेंनी नागरिकांना दिलासा दिला पाहीजे,एवढीच आमची मागणी असल्याचे ते म्हणाले.

मूक आंदोलनात नारे लावण्याची खूमखूमी!
एका समितीच्या सभापतीला या मूक आंदोलनात नारे लावण्याची खूमखूमी आवरता आवरत नव्हती. मुंढे यांना दीड लाख पगार आहे,त्या लखपती माणसाला सर्व सामान्याचे दू:खं काय कळणार?असा त्यांचा त्रागा चाललेला होता. सतत ते बोलतच होते,त्यामुळे हे मूक आंदोलन आहे की ’भडास’आंदोलन असा संशय उपस्थितांमध्ये निर्माण झाला.याशिवाय मागून अनेक नगरसेवक यांनी नारे देण्याचा प्रयत्न केलाच.मात्र सत्ता पक्ष् नेते संदीप जाधव यांनी हे मूक आंदोलन आहे,कोणीही नारेबाजी करणार नाही,असा सज्जड दम दिल्याने,नारेबाजीसाठी उतावीळ झालेले ’ते’काही नगरसेवक गपगुमान हातात फलक घेऊन उभे राहीले. एका समितीच्या माजी अध्यक्षाने तर चक्क हातात फलक उलटा पकडला होता,शब्द त्यांच्या स्वत:च्याच चेह-याकडे तर मागील रिकामा भाग आयुक्तांच्या कक्षाकडे होता!

दूपारी २ वा.पासूनच पोलीस कूमूक तैनात!
भाजपच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज मनपा मुख्यालयातील आयुक्तांच्या दालनात पोलीसांची तगडी कूमूक दूपारी २ वा.पासूनच तैनात करण्यात आली होती!दुपारी ४ वा.हे आंदोलन होणार असल्याचे आधीच कळवले असता,पोलीसांवरील हा अतिरिक्त ताण,याची चर्चा पोलीसकर्मींमध्येच खासगीत रंगली होती. अनेक महिला पोलीसांचे पाय सतत तीन तास जागेवरच उभे राहील्याने दूखत होते. यापूर्वीच्या आयुक्तांच्या वेळी आयुक्तांच्या सुरक्ष्े साठी कधी पोलीसकर्मींची गरजच पडली नसल्याची कुजबुज ही ऐकू आली. मुंढे रुजू झाले आणि हा नवा पायंडा मनपात पडला.मनपाच्या इतिहासात पहील्यांदाज आयुक्तांच्या कक्ष्ासमोर किमान ७ पोलीसकर्मी हे त्यांच्या सुरक्ष्ेसाठी सतत तैनात असतात!महापालिका ही शहरातील जनतेचे प्रतिनिधित्व करणारी व पालकत्व करणारी एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे.
या ठिकाणी दररोज आपापली कामे घेऊन अगदी सर्वसामान्य माणूस चकरा मारत असतो. या सामान्य माणसांमध्ये खाकी पोलीस वर्दींची उपस्थिती ही लक्ष् वेधी आणि असंयुक्तिक ठरते.मुंढेंच्या काळात नागरिक आणि प्रशासन यांच्याच बरेच अंतर निर्माण झाले आहे,हे ठलकपणे तेथे गेल्यास जाणवत असतं,हे विशेष!

Latest बातम्या