
१३० दिवस लॉक डाऊनमध्ये राहूनही नागपूरकरांच्या नशीबी राजकारणच
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता. ३१ जुलै: नागपूरकरांच्या नशीबी आज महापालिकेच्या इतिहासात ऐतिहासिक असे कुरघोडीचे डावपेच बघण्याची वेळ आली. महापालिका आयुक्त हे महापौरांनी आयोजित केलेली ‘पूर्वनियोजित’बैठक चक्क धुडकावून बैठकीच्या ५ मिनिटाआधी मुख्यालयातूनच निघून गेलेत!कारण होतं पालकमंत्री नितीन राऊत यांनी काल वेळेवर विभागीय आयुक्तांच्या कक्षात आयोजित केलेली बैठक तर एकच विषय या दोन्ही बैठकीचा होता तो म्हणजे मुख्यालयात ’लॉक डाऊन’तर विभागीय कार्यालयात ’कोविड संबंधी’.
आश्चर्य म्हणजे बैठका वेगवेगळ्या मात्र ’मत’मात्र एकच!शहरात ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तरी पालकमंत्र्यांनी लॉक डाऊन लावण्यास मनाई केली तर महापौरांनी ’लॉक डाऊन जनतेवर लादाल तर खबरदार’अशी भूमिका घेतली.आणखी एक वेगळे आश्चर्य म्हणजे महापौर व सत्ताधारी तर आयुक्त अाणि पालकमंत्री यांच्यातच हा संपूर्ण कलगीतुरा रंगला. शहरात तर जणू नागपूरकर जनता,त्यांचे उधवस्त व्योपार उद्दीम,खासगी नोकरदार,गृहीणी,तरुणाईची बेरोजगारी ,हॉकर्स,सिमनेमाघर,मंदिरवाल्यांचे प्रश्न,भाजी मार्केट इ. प्रश्नांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पार्टी, शिवसेना,बहूजन रिपब्लीकन पार्टी,रिपब्लीकन पार्टी, वंचित बहूजन आघाडी इ.पक्ष्ांचे तर काही अस्तित्वच जाणवत नाही!
साथरोग प्रतिबंधक कायद्याने जरी आयुक्तांना ’एकाधिकार’दिला असला तरी हे सर्व पक्ष् जनतेच्या हिताची किमान भूमिका तर मांडू शकतात!दूर्देवाने सगळेच मूकदर्शक होऊन फक्त राजकारणाच्या चष्म्यातून जनतेच्या जगण्या-मरणाच्या प्रश्नांकडे बघत आहेत.मूळात मुंढे यांना बळ देणारे मुख्यमंत्री यांना तरी नागपूरकर जनतेच्या प्रश्नांशी काही एक घेणे-देणे आहे का?ते मत मागायला नागपूरात येणार आहेत का?नागपूरकर जगले काय मेले काय?याच्याशी मुख्यमंत्री यांना काही घेणे-देणे असते तर नागपूकरांची बाजू ही त्यांनी त्या ‘गाजलेल्या मुलाखतीत’ थोडी फार तर घेतली असती!शिस्तीचा अतिरेक करणारे मुंढे यांच्या शिस्तीचे गोडवे गाणारे मुख्यमंत्री हे देखील शेवटी शहरात भाजपची सत्ता असल्याने राजकारणच करीत आहेत,हे जनतेला देखील ठाऊक आहे.
पालकमंत्री हे तर ’हाेयबा’गटातले असून त्यांना स्वत:चे कोणतेही मत नसल्याचे शहरातील बुद्धिजीवीच सांगतात.कालच हातावर पोट असणा-या संघटनेनी संविधान चौकात ’करोनाने मरण्यापेक्ष्ा भूकेने मरु’म्हणून अशी आर्त साद डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या साक्ष्ीने दिली तरी देखील निगरगट्ट प्रशासन आणि प्रशासनाचे प्रमुख यांना माणसांच्या ’भूकेपेक्ष्ा’ कुरघोडीचे ’राजकारणच’जास्त प्रिय असल्याचे दिसून पडतंय.असे नसते तर आयुक्त तुकाराम मुंढे ज्यांच्यावर नागपूर शहराची जवाबदारी आहे ते पालकमंत्र्यांच्या ऐवजी महापौरांच्या बैठकीला उपस्थित राहीले असते.मात्र रुजू झाल्यापासून अगदी पहील्या दिवसांपासून ते या शहराचे ’पदसिद्ध बादशाह’ आणि या शहराची जनता ही त्यांची ’गूलाम’असल्याच्या ‘अतार्कीक अर्हिभावातच’ कार्य करीत असताना दिसत आहेत.
आयुक्तांच्या अश्या वागण्यामागे सत्ताधारी भाजपाचे असे कोणते ’कारनामे’ त्यांच्या हातात लागले आहे?असा ही सवाल बुद्धिजीवींना पडला आहे.असे जर नसते तर आयुक्तांची ऐवढी मजलच गेली नसती,असे ते ठामपणे सांगत आहेत.वरुन साथरोग प्रतिबंधक कायद्याने तर त्यांना दिलेल्या ’अमर्याद’अधिकारांचा ते संपूर्णत: एडवाँटेज घेताना दिसतात. मनमानेल त्या पद्धतीने त्यांनी कोविडच्या चार महिन्याच्या काळात कारभार केला.पुढे ही करतीलच. त्यांची बदली झाली तरी बेहत्तर.त्यांना कोणताही फरक पडणार नाही मात्र कुरघोडीचे राजकारण ते देखील सोडत नाहीत. प्रतिबंधित क्ष्ेत्र, विलगीकरण केंद्रे, विलगीकरण केंद्रात जेवणाचे कंत्राट,दररोज नव-नवीन सूचना,आधी डबल सीटला नकार तर आता डबल सीट असलेल्या व्यक्तिनेही हेल्मेट घालण्याची चमत्कारीक अट!याने ते करोनाचा प्रसार रोखणार आहेत!एका कुटुंबात सहसा दोन दूचाकी असतात, दोन हेल्मटही असतात,मात्र आता अनावश्यकरित्या तिस-या हेलमेटचा खर्च सामान्य व अति सामान्य जनतेवर मुंढे यांनी लहरीपणाने लादला,त्याचे काय?
शहरात आणि देशात २२ मार्चपासून लॉकडाऊन लागला,या २२ जुलै रोजी लॉक डाऊनला ४ महिने झाले वर दहा दिवसही उलटले तरी देखील केंद्र व राज्याच्या सर्वोच्च पातळीवर लॉक डाऊन किवा अनलॉकला घेऊन ‘सुस्पष्ट,तर्कसंगत तसेच न्यायसंगत’ धोरणच नाही आहे! रेड झोनमध्ये माणसे नाही राहत का?रेड झोनच्या नावाखाली आणखी किती काळ त्यांचा मुक्त,नैसर्गिक जगण्याचा हक्क हिरावून घेत राहणार?पुढील एक वर्ष आणखी रेड झोनमधील नागरिकांना लॉक डाऊनमध्ये जरी ठेवले तरी करोनाचा संसर्ग पूर्णपणे नष्ट होणार याची खात्री मायबाप सरकार देणार आहे का?करोना किती काळ देशात थयथयाट माजवणार हे जर सरकारलाच माहिती नाही तर देशातील गरीब,मजूर आणि सामान्य नागरिकांना घरात डांबून सरकारने ही आणिबाणिच नाही लादली का?अधिका-यांचे आणि प्रशासकीय व्यवस्थांचे विकेंद्रीकरण का नाही सरकारने केले?संपूर्ण अधिकार स्थानिक प्रशासकीय अधिका-यांच्या हाती एकटवून सरकार हे जवाबदारीमुक्त कसे होऊ शकतात?
अतिक्रमणबाबतही तेच वारंवार घडतंय.तोंडावर आलेलेया गणेशउत्सवसाठी मूर्तीकारांनी मूर्ती उन्हात वाळवण्यासाठी अतिक्रमण केले ही असेल तरी ते स्वत:चे उत्पन्न वाढवण्यासाठी केले,इस्टेट जमवण्यासाठी नव्हे,एवढे देखील एका आयएएस अधिका-याला कळू नये?यावेळी नागपूरकरांनी मात्र अगदी मनापासून माजी आयुक्त श्रावण हर्डीकर व अभिजित बांगर यांची आठवण काढली. नागपूरकरांचे हे दूर्देव आहे महामारीच्या या अत्यंत कठीनाईच्या काळात त्यांच्यासारखे आयुक्त पदावर नाहीत,असे आता उघडपणे बोलल्या जात आहे.
मुंढे यांचा एकंदिरत स्वभाव पाहता ते लॉक डाऊनच्या संदर्भात महापौर व पालकमंत्र्यांच्या सूचनेला कितपत ग्राह्य घेतील याचा नेम नाही. कारण सध्या साथरोग प्रतिबंधक कायद्यामुळे त्यांनाच शहराबाबत निर्णय घेण्याचा कायदेशीर अधिकार आहे.मात्र त्यांनी आठमुठेपणाने आपलेच धोरण शहरात राबविले तर लवकरच शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा देखील गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे, कारण जगातील कोणताही माणूस आपल्या बायको-पोरांना उपाशी मरताना पाहू शकत नाही. तो बाहेर पडेल, चेन स्नेचिंग करेल,लहान मोठ्या चो-या करेल,दूकाने फोडेल यामुळे पोलीस विभागावरील ताण हा आणखी वाढणार आहे. आजच शंकर नगर चौकात एका चांगल्या घरातील वृद्ध हा भीक मागताना दिसला….!हे दृष्य खरंच दूर्देवी होते.
बेसा मधील एका सुप्रसिद्ध मंदिराच्या व्यवस्थापकाने प्रामाणिकपणे सांगितले की त्यांनी….मंदिरातील चार माणसे कामावरुन कमी केली! ती फक्त ४ माणसेच होती का?कि ४ कुटुंब होती?आता ती ४ माणसे आपला उदरनिर्वाह कसा करीत असेल?पडतो का प्रश्न पोट भरलेल्या अधिकारी किवा सत्ताधा-यांना?शहरातील अनेक हॉटेल मालकाने आपल्या मजुरांना भाड्याचे घर सोडण्यास सांगून हॉटेलमध्येच ठेऊन घेतले आहे. आम्ही फक्त दोन वेळचे जेवणच सध्या देऊ शकतो, ना पगार ना घरभाडे,असे स्पष्टपणे या मालकांनी मजूरांना सांगितले.
या शहरात शेकडो,हजारो लोकांना फक्त मार्च महिन्याचा पगार मिळाला आहे.गेल्या ३ महिन्यांपासून त्यांना पगारच मिळाला नाही,यात अनेक शाळांच्या शिक्ष्ि का यांचा देखील समावेश आहे.अनेकांचा पगार हा निम्मा झाला आहे,त्यात पत्रकार देखील आलेत!
वेगवेळ्या बैठकीत या प्रश्नांवर चर्चा झाली का?महापौरांचा अपमान निश्चितच झाला असे अनेक नागपूरकर देखील मानतात मात्र भाजपचे एवढे मोठे संघटन आहे,कार्यकर्त्याची फळी आहे,बूथ लेवलपर्यंची मजबूत संघटना आहे,तर का नाही महापौरांसह याचा निषेघ म्हणून उपोषणाला बसत?अशीही भूमिक़ा अनेकांनी घेतली.लोकांनी आजपर्यंत सर्वतोपरी प्रशासनाला व राजकारण्यांना सहकार्य केले.जमेल तशी यंत्रणेला मदत केली.गरजूंना शिधा शिजोरी वाटल्या.आता त्यांच्याच जवळ पैसे नाहीत. शासनाने तर लक्ष् काढून टाकले प्रशासन मात्र मनमानी कार्यभार करण्यास अद्यापही उत्सूकच आहे. ऑन लाईन बकरा मंडी याचे लेटेस्ट उदाहरण देता येईल!
बकरा ऑन लाईन कसा जाणार? कुर्बानीसाठी बक-याची निवड करताना ग्राहक अनेक निकष बघत असतो, ऑन लाईनमध्ये ते कसे शक्य आहे? का नाही मुंढेंनी शहरात ५० ठिकाणी बकरा मंडीला परवानगी दिली जेणे करुन एकाच मंडीत गर्दी होणार नाही, लोकांनाही सुरक्ष्ि त अंतर पाळता येईल,मनासारखी खरेदीही करता येईल.शेवटी ऑन लाईन बकराही कोणी ना कोणी तर घेऊनच येणार ना?मात्र मुंढेंचे धोरणच चमत्कारीक आहे. ३० लाख लोकसंख्येच्या मानाने कमीत कमी दूकाने,कमीत कमी वेळेसाठी सुरु ठेवावी व वरुन या दूकानांमध्ये गर्दी होऊ नये,अशी अपेक्ष्ा करावी!कालच खामला येथील भाजी मार्केट बुलडोजरने उधवस्त करण्यात आले.५० भाजीवाले होते.आता ६ भाजीवालेच रस्त्यावर बसले आणि आता त्या ६ भाजीच्याच दूकानात तेथील नागरिकांनी तूफान गर्दी केली,याला काय म्हणावे?नियोजन?कि फालतूपणा?आधीच नागवल्या गेलेल्या शेतक-याच्या डोळ्यात मनपा प्रशासनाने करोनाच्या नावाखाली रक्ताचे पाणी आणले,हे नागपूरकर जनता विसरली नाही. त्यांना आपली भाजी विकण्यासाठी काठीण्याचा अक्ष् रश: ‘ऐवरेस्ट’ सर करावा लागला,एवढे कष्ट पडलेत!
या शहरात आस्तिक जनता वसते. सणा-सुणीच्या काळात ते घराबाहेर पडतीलच. राखी पोर्णिमेला बहीणीच्या ओवाळणीत फूल नाही फूलाची पाखळी टाकल्याच जाईल. गौरी गणपतीचे प्रसन्न आगमन ही जनतेच्या आत्मिक सुखाची बाब आहे. घरातच साजरा करतील मात्र आपल्या लाडक्या गणरायासाठी मोदक,फूलांची आरास,फळे यासाठी बाहेर पडतीलच.१५ आगस्टला या शहरातील जनतेचा देशाभिमान करोनाच्या भीतीपेक्ष्ा जास्त उफाळून येणारच आहे. कदाचित पालकमंत्री व महापौर यांना जनतेचे हे मर्म उमजले म्हणूनच त्यांनी ऑगस्टमध्ये लॉक डाऊन लागू न करण्याचा निर्णय घेतला मात्र मुंढे यांना नागपूरकर नागरिकांचे हे अध्यात्मशास्त्र समजले का?
फडणवीसांवरही तोंडसुख-
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही नागपूरकर जनतेने संतापाचे चांगलेच ताशेरे ओढलेत. मुख्यमंत्री झाल्याबरोबर आपलं चंबूगबाळं उचलून ते कायमचे मुंबईकर झालेत.फक्त मते मागायला ते दक्ष्णि-पश्चिममध्ये फिरकले. मध्यंतरी एकदा येऊन पीपीई किट घालून करोना रुग्णांना भेटून आलेत,झाली इतिश्री. बारामतीचे शरद पवार हे तर केंद्रात मंत्री होते तरी देखील त्यांनी बारामतीचे घर सोडले नाही,केंद्रिय मंत्री नितीन गडकरी हे आज देखील नागपूरातच वसतात.दिल्लीचं घर फक्त ५ दिवसांचं ठेवले तर नागपूरात दर शनिवार,रविवारी ते येत असत. आपले संपूर्ण कुटुंब घेऊन नागपूराला कायमचा टाटा-बाय-बाय करीत ते आपलं शहर,आपलं मूळ,आपली माती सोडून गेले नाहीत म्हणूनच ते लोकनेते म्हणून ओळखले जातात.
मुंबईचं राजकारण नागपूरातून देखील केलं जाऊ शकतं.नागपूरात करोनाच्या भयंकर संकटकाळात मात्र अश्या या माजी मुख्यमंत्र्यांची कोणतीही मदत लाभली नसल्याची नोंद, इतिहासात नोंदवली जाणार असल्याचे उघडपणे बोलले जात आहे.महापौर यांनी देखील मुंढे यांच्यासोबत सुरवातीला जुळवून घेण्याची भूमिका घेतली आता विरोध करीत आहे. राजकारणी व प्रशासनाच्या लृटूपूटूच्या खेळात आता जनता पुरती कंटाळली असून त्यांना सुखी,समाधानी,आरोग्यदायी जगण्यासाठी एक ठोस धोरण हवे आहे,बस एवढंच.

आमचे चॅनल subscribe करा