Homeनागपूर न्यूजनागपूरात लॉक डाऊन नाही म्हणजे नाहीच!महापौरांनी ठणकावले

नागपूरात लॉक डाऊन नाही म्हणजे नाहीच!महापौरांनी ठणकावले


आयुक्तांनी व्हिडीयोच्या माध्यमातून जनतेला धमकावणे बंद करावे

नागपूर,ता.३१ जुलै: गेल्या शुक्रवारी दि.२४ जुलै रोजी मनपा मुख्यालयात पार पडलेल्या बैठकीत नागपूर शहरात सातत्याने वाढणा-या करोना संसर्गाच्या पाश्‍वार्श्वभूमिवर शनिवार व रविवार असे दोन दिवस ‘जनता कर्फ्यू‘ पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पुढील आढावा घेण्यासाठी आज शुक्रवार दि. ३१ जुलै रोजी पुन्हा दूपारी १२ वाजता मनपा मुख्यालयात सर्व आमदार, जनप्रतिनिधी, मनपा आयुक्त,पोलीस आयुक्त आदी प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत बैठक ठरली असताना अचानक पालकमंत्री नितीन राऊत यांनी आजच ऐन त्याच वेळी म्हणजे १२ वा.ची बैठक विभागीय आयुक्तांच्या कक्ष्ात आयोजित केल्याने महापौर संदीप जोशी यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करीत,आमदार व जनप्रतिनिधी यांच्यासोबत पार पडलेल्या आजच्या बैठकीत झालेल्या निर्णयाप्रमाणे ‘शहरात लॉक डाऊन नाही म्हणजे नाहीच,’असे सूचित करुन पालकमंत्री व मनपा आयुक्तांना अपरोक्ष् रित्या ठणकावले.

बैठकीनंतर ते पत्र-परिषदेला संबाधित करीत होते. महापौर म्हणाले की दोन दिवसांच्या जनता कर्फ्यूला नागपूरकरांनी भरभरुन प्रतिसाद दिला. जनप्रतिनिधी व प्रशासनाने चांगल्या वातावरणात शहरातसाठी घेतलेला तो योग्य निर्णय होता.२९ ता. ला आजच्या ३१ ता.च्या बैठकीचे पत्र आम्ही काढले. आजच्या या दुस-या बैठकीत आम्ही शहरातील लॉक डाऊनविषयीचाच आढावा घेणार होतो मात्र दुर्देवाने ३० ता. काल सन्माननीय पालक मंत्री नितीन राऊत यांनी आजच अगदी त्याच वेळी बरोबर १२ वा. विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार यांच्या कक्ष्ात बैठक ठरविल्याने सर्व जनप्रतिनधिंनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

मी नागपूर शहराचा महापौर म्हणून पालकमंत्र्यांना हात जोडून विनंती करतो की या पद्धतीचं अत्यंत घाणेरडं राजकारण शहरात करु नये. आपण जर मला कळवले असते की १२ वा.माझी बैठक आहे तू २ वा.ची ठेव तर मी २ वा. बैठक ठेवली असती. पण शहरात या पद्धतीचं वातातवरण निर्माण करायचं की एकाच वेळी एकाच विषयाला, कोविडला घेऊन दोन-दोन बैठका सुरु आहे,हा अत्यंत चुकीचा संदेश जनतेमध्ये गेला. करोनासारख्या या महामारीच्या काळामध्ये अश्‍या पद्धतीचं घाणेरडं राजकारण करुन जनतेला आपण काय दाखवता आहात?असा प्रश्‍न महापौरांनी उपस्थित केला.

या बैठकीत सर्व जनप्रतिनीधींचं आज एका बाबतीत एक मत झालं आहे की या ‘शहरात लॉक डाऊन नको म्हणजे नकोच’स्मार्ट ही नको आणि इतर कुठलाच लॉक डाऊन नको,लॉक डाऊनला या शहरातील सर्व जनप्रतिनिधींनी यात रामटेकचे शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांच्यासह शहरातील सर्व आमदारांनी तीव्र विरोध केल्याचे महापौरांनी सांगितले.

जनतेसोबत रस्त्यावर उतरु:महापौरांचा इशारा
लॉक डाऊनच्या संदर्भात अायुक्त किवा पालकमंत्र्यांनी भूमिका घेऊन शहरावर लॉक डाऊन जबरदस्ती लादल्यास आम्ही देखील जनतेसोबत आता रस्त्यावरती उतरु असा इशारा महापौरांनी मुंढे व पालकमंत्र्यांना दिला. याशिवाय बैठकील ‘ऑड ॲण्ड इवन‘ च्या धोरणाविषयी देखील चर्चा झाली असल्याचे सांगितले. सेंट्रल एवेन्यूसारखा रोड एवढा मोठा असताना व मधोमध एवढा मोठा डिवायडर असताना एका बाजूची दूकाने बंद करण्याचे औचित्यच काय?व्यापारांना,बेरोजगारांना महानगरपालिकेचे प्रशासन हे ज्याप्रमाणे प्रताडीत करतंय हे अत्यंत अयोग्य आहे त्यामुळे शहरातील १२ मीटर अणि त्याच्या वरचे सर्व रस्त्याच्या बाजूचे दोन्ही बाजूचे दूकाने ही उघडी राहतील, १२ मीटर व त्यापेक्ष्ा मोठ्या रस्त्यांवर असणारी दूकाने यांना हा ऑड-इवनचा फॉर्मूला लागू होणार नाही असे निर्देश मी आज मनपा प्रशासनाला दिले असल्याचे महापौर यांनी सांगितले.

त्याच प्रमााणे १२ मीटर खालचे असतील उदा.इतवारी,मस्कानाथ,जागनाथ बुधवारी इ. क्ष्ेत्र या ठिकाणी हा ऑड ॲण्ड इवनचा फॉर्मूला कुठल्याही स्थितीत राबविण्यात येईल,अशी माहिती महापौरांनी दिली.
बैठकीच्या ५ मिनिटांआधी मुंढे हे मुख्यालयातून बाहेर पडले!

दूर्देवाने महानगरपालिकेची ही बैठक असताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे हे १२ ला ५ मिनिटे कमी असताना मुख्यालयातून बाहेर पडले. पालकमंत्र्यांच्या बैठकीत जाण्यापूर्वी त्यांनी माझ्याशी भेटून जाण्याचे देखील सौजन्य दाखवले नाही. ते मला सांगून जाऊ शकले असते की पालकमंत्र्यांची अशी-अशी बैठक आहे, मला काही कारणामुळे तिथे जावे लागेल, किवा आपली मनपाची बैठक एक तास उशिरा घ्या,पण तेवढे देखील ‘सौजन्य’आयुक्तांनी दाखवले नाही. फक्त त्यांनी उपायुक्तांना काल निरोप सांगितला की आपण बोलून घ्या.मात्र मी पालकमंत्र्यांच्या बैठकीत जाणार हे कळवले नाही.शहराची जवाबदारी आयुक्तांकडे आहे मात्र आयुक्त हे ज्या बैठकीत शहरातील सर्व जनप्रतिनिधी उपस्थित आहेत,महापाैरांनी बोलावलेली बैठक आहे,त्या बैठकीला आयुक्तच हजर नाही,हे अत्यंत घाणेरडं चित्र या ठिकाणी उभं झालं,आयुक्तांच्या या वर्तना बद्दल देखील सर्व जनप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली.

मूर्तीकारांवर दंड ठोठावण्याचा आधिकार आयुक्तांना नाहीच!
आजच्या बैठकीत पोलीस प्रशासनातर्फे डीसीपी श्‍वेता खेडकर उपस्थित होत्या. पोलीस प्रशासनाने न्यायालयाचे आदेश मनपा प्रशासनाला दिले आहेत की न्यायालयाचा आदेश असेल तरच शहरातील अतिक्रमण काढण्यात यावे.असे असताना आयुक्तांचे प्रशासन हे शहरातील बेरोजगारांचे रोजगार हिरावून घेण्याचे काम करीत असल्याचे ते म्हणाले. लॉक डाऊनमुळे आधीच शहरातील परिस्थिती ही आर्थिकदृष्टया अत्यंत गंभीर झाली आहे. ज्यांची मंगल कार्यालये आहेत त्यांनी देखील त्या ठिकाणी आता भाजीची दूकाने उघडली आहेत.अशी परिस्थिती असताना अतिक्रमणाच्या नावावर कारवाई करुन राेजगार हिरावण्याची कारवाई तात्काळा बंद करावी अशी देखील जनप्रतिनिधींचे मत आहे.

शहरातील मूर्तीकारांची स्थिती अत्यंत वाईट असताना आयुक्तांनी अतिक्रमणाच्या नावावर मूर्तीकारांकडून पाच-पाच हजारांचा दंड वसूल केला!ते ही स्थायी समितीची परवानगी न घेता. मनपा आयुक्तांना कोणताही आर्थिक व्यवहार हा स्थायी समितीच्या परवानगीशिवाय करता येत नाही तरी देखील मुंढे यांनी मूर्तीकार व दूकानदारांकडून पाच-पाच,दहा-दहा हजारांचा दंड वसूल केला! आयुक्तांनी स्वत:च नियम पाळला नाही. हे देखील प्रकार तात्काळ बंद करण्याचा निर्देश दिला असल्याचे ते म्हणाले.

हॉटेल-प्रशासनामध्ये काही साटेलोटे आहे का?
एकीकडे लक्ष् ण नसलेले बाधित हे घरीच विलगीकरणात ठेवायचे.दूसरीकडे जे विलगीकरणातील संशयित आहे त्यांना मात्र हॉटेलमध्ये राहायला सांगण्यात येत आहे. त्यांना १४-१४ दिवस हे हॉटेलमध्येच राहण्यास सांगण्यात येत आहे, यावरुन हॉटेल संचालक व प्रशासनाच्या अधिका-यांमध्ये काही साटेलोटे आहे का?जर बाकीच्यांना घरी ठेवतोय,तर हॉटेलमध्ील संशयितांना घरी का पाठवत नाही? याविषयीची देखील बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली असल्याचे महापौर यांनी सांगितले.

व्हिडीयोच्या माध्यमातून धमकावणे बंद करा-
आयुक्त तुकाराम मुंढे हे सातत्याने व्हिडीयोच्या तसेच प्रेसच्या माध्यमातून धमक्या देण्याचे काम करीत असल्याचा सणसणीत आरोप महापौरांनी आजच्या पत्र परिषदेत केला.या शहराची जनता ही संयमी आहे. समजूतदार आहे. त्यांना वारंवार-वारंवार व्हिडीयोच्या माध्यमातून धमकावणे आयुक्तांनी बंद करावे,आयुक्तांच्या या कार्यशैलीबाबत देखील आजच्या बैठकीत जनप्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे महापौरांनी सांगितले.

आणि महापौरांनी पोलीसांना पाठवले कक्ष्ा बाहेर-
मनपा मुख्यालयातील बैठकीनंतर पत्र परिषदेनिमित्त प्रसार व प्रचार माध्यमकर्मींनी कराेना कंट्रोल रुम कक्ष्ात गर्दी करताच त्यांच्या पाठीमागे पोलीसकर्मी हे देखील आत आले. महापौरांनी हे खाकी वर्दीतील येथे काय करीत आहेत?असा प्रश्‍न विचारत त्यांना कक्ष्ा बाहेर जाण्याचे निर्देश दिले. तुमची गरज ही बाजूच्या ’आयुक्तांच्या’कक्ष्ात असल्याचा टोला ही त्यांनी हाणला. हे नागपूरकर आहेत आणि मला माझ्या नागपूरकरांवर पूर्ण विश्‍वास असल्याचे ते म्हणाले.मला सुरक्ष्ेची गरज नसल्याचा टोला ही त्यांनी हाणला.

पुढील बैठक पुढच्या शुक्रवारी ७ ता.-
पुढील शुक्रवारी ७ ऑगस्ट रोजी पुन्हा दूपारी १२ वा.जनप्रतिनिधी व प्रशासकीय अधिका-यांची बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती महापौरांनी दिली. कुठे तरी ‘स्पिरिट ऑफ नागपूर’दिसायला हवे. कुठे तरी ’विल ऑफ नागपूर’हे निर्माण व्हायला पाहिजे. कुठेतरी तुम्ही आणि आम्ही सारे एकत्रित आहोत असा मॅसेज जायला हवा होता अश्‍यावेळी पालकमंत्र्यांनी वेगळी बैठक बोलावून आपलं वेगळं राजकारण करण्याची काहीही आवश्‍यकता नाही. पालकमंत्री हे वयाने मोठे आहेत,पदाने मोठे आहेत,त्यांनीच मोठेपणा घ्यावा.मी त्यांना आजच्याही बैठकीचे अध्यक्ष् पद स्वीकारण्याचे पत्र दिले होते.शेवटी सर्वांना मिळूनच नागपूरच्या जनतेच्या हिताचे निर्णय घ्यायचे आहेत. असे असतना एक अट्टहास,एक दुराग्रह घेऊन राजकारण करणे त्यात मनपा आयुक्तांनी मनपाच्या बैठकीला हजर न राहता पालकमंत्र्यांच्या बैठकीला जाणे हे दूर्देवीच होते,असे ते म्हणाले.
पालकमंत्र्यांच्या बैठकीतून परतलेले आयुक्त तुकाराम मुंढे यांची अशी होती देहबोली!

Latest बातम्या