उद्धव ठाकरे यांनी केली मुंढेंशी प्रशंसा
नागपूर,ता. २६ जुलै: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविषयी बोलताना ’मी मुंढेंसोबत’ असल्याचे म्हटले,मुख्यमंत्र्यांच्या मुंढेंप्रतिच्या या भावनेविषयी आम्हालाही आनंद आहे. मुंढेंसोबत आम्ही देखील आहोत. ते शिस्तप्रिय आहेत,कर्तव्यदक्ष् आहेत,आमचा या गोष्टीला विरोध नाही परंतू मुख्यमंत्री यांनी हे विसरता कामा नये ते फक्त मुंढे यांचे मुख्यमंत्री नसून ते आमचे देखील मुख्यमंत्री आहेत,अख्ख्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत,असा टोला महापौर संदीप जोशी यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
स्मार्ट सिटी प्रकल्पातील मुख्य कार्यकारी पदावरुन नागपूरात मुंढे-महापौर यांच्यात जो गदारोळ उठला होता,त्याची दखल घेत केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी थेट मुंढेंविरामधात केंद्राला पत्र लिहले होते. या सर्व घडामोडींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत भाष्य केले.याच मुलाखतीत नागपूरचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याही विषयावर ठाकरे यांनी भाष्य केले.यावर आज महापौरांनी वरील प्रत्युुत्तर दिले.
महापौर म्हणाले की मुख्यमंत्री हे जनप्रतिनिधींचे देखील मुख्यमंत्री आहेत,जनप्रतिनिधींनी त्यांची मुख्यमंत्री म्हणून निवड केली आहे. त्यामुळे जर वारंवार जनप्रतिनिधींचा अपमान होत असेल,जनप्रतिनधींना जर विचारल्या जात नसेल,जनप्रतिनिधींना सोबत घेऊन जर ते काम करत नसतील तर त्याच तुकाराम मुंढे यांना समज देण्याचे देखील माननीय मुख्यमंत्र्यांचेच काम आहे.
आमची मुळीच ईच्छा नाही की तुकाराम मुंढे यांनी नागपूरातून जावं,आम्ही या गोष्टीमागे लागलेलो नाही. आमचा विरोध फक्त याकरीताच आहे की एकीकडे कर्तव्यकठोर म्हणून दाखवायचं आणि दूसरीकडे नियमांची पायमल्ली वारंवार करायची,एकीकडे मी शिस्तप्रिय असल्याचे सांगायचं आणि दूसरीकडे एखाद्या अधिका-याच्या मार्फत पाठीमागे उभे राहून बाकी ‘कारनामे’करायचे,हे जर चालणार असेल तर याला आम्ही शंभर टक्के विरोध करणार आहोत.
एकीकडे आम्ही पाच-पाच मनपाचे दवाखाने चांगले केले म्हणून त्याचे व्हिडीयो टाकायचे आणि आजच्या काळात नागपूरात करोना पॉझिटीव्हला बेड देखील उपलब्ध होणार नसतील तर त्यांच्या पाठीमागे उभे राहणं,हे मुख्यमंत्र्यांना अपेक्ष्ति आहे का?असा सवाल महापौरांनी केला.आमची मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आम्ही देखील तुमचेच आहोत त्यामुळे ते मुंढेंच्या पाठीमागे उभे राहत असताना ते ‘खरोखर’काय करुन राहीलेत,हे देखील लक्ष्ात घेणे गरजेचे आहे,केवळ रिट्वीट करणे किवा केवळ व्हिीडीयो टाकणे म्हणजे ’काम करणे’नव्हे,तर ’सत्य’काम काय आहे?याचा देखील मुख्यमंत्र्यांनी विचार करावा,अशी विनंतीवजा सूचना महापौरांनी आज व्हिीडीयोच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली.
शहरातील जनप्रतिनिधींसोबत मुंढे यांचा पराकोटीला पोहोचलेला वाद आणि गडकरी यांच्यासोबत मुंढे यांनी घेतलेला पंगा याबाबत संजय राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की ’तुम्ही ही सचिवांची यंत्रणा केराच्या टोपलीत फेकून द्या, मंत्रालय की सचिवालय हा वाद कशाला हवा? सचिव पद्धतच बंद करुन टाका,‘पिन टू पियानो’ म्हणजे ’ए टू झेड’ ऑर्डर पण तुम्हीच काढायची,कामे पण तुम्हीच करायची,मदतीचं वाटप ही सगळं तुम्हीच करायचं,असा टोला त्यांनी भाजपच्या नेत्यांना लगावला. मुंढे नागपूरात आयुक्त म्हणून आल्यापासून तिथे शिस्त लागली, मग मी कोणाच्या मागे उभं राहीलं पाहिजे? म्हणून मी शिस्तीच्या मागे उभा आहे.एखाद्या अधिका-याच्या कठोरपणाचा तुम्ही लोकांच्या हितासाठी उपयोग करुन घेत असाल तर वाईट काय? काही नियम,कायदे कडकपणाने अमलात आणले,हे काही जणांना परवडत नसेल.पण तुकाराम मुंढेंनी एखादी गोष्ट कडकपणाने अमलात आणली तर अश्या अधिका-याच्या पाठी सर्वांनी उभं राहीलं पाहिजे.
आततायीपणा कोणीच करु नये,शिस्त लावली जात असेल आणि जनतेचं हित जोपासलं जात असेल तर चांगलेच आहे. शेवटी जनतासुद्धा उघड्या डोळ्यांनी हे बघत असेल,तोंडावर मास्क असला तरी जनतेचे डोळे हे उघडे आहेत हे विसरुन चालणार नाही,असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तुकाराम मुंढे यांची पाठराखण केली.

आमचे चॅनल subscribe करा