Homeनागपूर न्यूजनिगेटीव्ह नागरिकाला मनपा कर्मचा-याने दिली केस करण्याची धमकी!

निगेटीव्ह नागरिकाला मनपा कर्मचा-याने दिली केस करण्याची धमकी!

Advertisements
Advertisements

क्वारंटाईनमधील नागरिकाला अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर ही मनपाने ठेवले डांबून!

नागपूर,ता. २४ जुलै: मेयो रुग्णालयातून डेविड नावाचा २२ वर्षीय करोना बाधित तरुण पळून गेल्यानंतर प्रशासनात एकच खळबळ उडाली.मात्र यानंतर मनपा प्रशासनाने पोलीस प्रशासनासोबत मिळून जे केले ते नागपूर शहरातील ’कोविड-१९’च्या इतिहासात ‘सुवर्ण अक्ष् राने’नोंदवण्यासारखे आहे. प्रशासनाने डेविड नावाच्या ४२ वर्षीय सेमिनरी हिल्स येथील वाहन चालकाला मेयोमध्ये नेले त्याची चाचणी केली आणि त्याला लॉ कॉलेजच्या विलगीकरण केंद्रात २१ जुलै पासून चक्क डांबून ठेवले.

आपल्या चार वर्षीय चिमुकली व पत्नीपासून विलग झालेल्या या नागरिकाने मनपा प्रशासनाच्या या मोगलाईविरुद्ध जमीन-आसमां एक केले मात्र साथ रोग प्रतिबंध कायद्याने दिलेल्या अमर्याद अधिकाराखाली मनपाचे आयुक्तच नव्हे तर त्यांच्या अधीनस्थ कर्मचा-यांचीही हवा कशी सध्या अासमंतात आहे.’सत्ताधीश’ने या बातमीचा खुलासा दोन दिवसांपूर्वीच केला होता.

या नागरिकाने त्याला पाच दिवसात सोडण्यात आले नाही तर विलगीकरण केंद्रातच फाशी लावण्याचा इशारा दिला होता. मेयोमधील त्याच्या चाचणीचा अहवालाची तो वारंवार विलगीकरणातील मनपाच्या कर्मचा-यांना विचारणा करीत होता.शेवटी आज शनिवारी सकाळी १० वा. मनपाच्या महिला नोडल अधिकारी यांनी रजिस्टरवर त्याला ते पान दाखवले ज्यात त्याचा करोनाचा चाचणी अहवाल हा निगेटीव्ह आल्याचे नमूद अाहे!
मग मला घरी का जाऊ देत नाही?असा आकांत या नागरिकाने केला. दोन दिवसांपासून हा नागरिक जेवला नाही,किवा सकाळपासून त्याने नाश्‍ता देखील केला नव्हता. त्याला त्याच्या कुटुंबियांकडे जाण्याचा एकच ध्यास लागला आहे. काल रात्री त्याची जन्मदात्री आई व मोठी बहीण त्याला भेटायला विलगीकरण केंद्रात आले असता,या तिघांचीही भेट फक्त ’अश्रूंच्या अबोल धारांनीच’झाली. रडतच त्या दोघी बाहेर पडल्या. या नागरिकाच्या पत्नीनेही अन्न पाणी सोडले आहे.

गेल्या चार दिवसांपासून या नागरिकाला मनपा प्रशासन फक्त हूल देत आहे.छत्तीसगढ मध्ये मालकाच्या सूचनेवरुन एका प्रवाश्‍याला सोडून परत आल्यानंतर तो घरीच होता. १४ दिवस त्याने स्वत:ला घरीच क्वारंटाईन करण्याचे ठरविले होते मात्र ५ दिवसातच वस्तीतील नागरिकांनी करोनाच्या भीतीतून पोलीसांना कळवले!पोलीसाची गाडी आणि एंबूलेस त्याला घ्यायला आली तेव्हा हा नागरिक मेयोमध्ये चाचणीसाठी गेला होता. एलआयसी चौकातच त्याला भावाचा फोन आला,पोलीस त्याला घ्यायला आले आहेत!

शेवटी त्याला २१ जुलै रोजी आमदार निवासात डांबण्यात आले व लगेच दुस-या दिवशी २२ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वा. लॉ कॉलेजच्या विलगीकरण केंद्रात त्याला नेण्यात आले. ‘येथून तिथे ’ या निरपराध नागरकाची मनपाच्या प्रशासनाने पोलीस प्रशासनासोबत मिळून जी आयुष्याची फरफट चालवली आहे,ती अक्ष् म्य अशीच आहे. तो एकटाच यात होरपळत नसून त्याचे अख्खे कुटुंब या दू:खात जिवंतपणी भरडले जात आहे,ते ही दररोज…. प्रत्येक क्ष् णी !

आज सकळी त्याचा अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर पुन्हा या नागरिकाने घरी जाण्यासाठी आकांत तांडव केला.मी तो डेविड नाही म्हणून वारंवार प्रशासनाला सांगितले. त्याला मग विलगीकरण केंद्रातील कर्मचा-याने मनपाच्या धरमपेठ झोन अधिका-याला फोन लावून दिला मात्र या झोन अधिका-याने त्याच्यावरच ’केस’करण्याची अजब धमकी दिली…!

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरात करोना संशयितांसाठी जी विलगीकरण केंद्रे बनवली आहेत,ती आता केंद्रे राहीली नसून बूचडखाना झालेली आहेत.लॉ कॉलेजचे विलगीकरणातील सोय तर अत्यंत भयंकर संताप आणणारी आहे.या सर्व बाबींमुळेच शहरातील नागरिक आज करोनामुळे नव्हे तर मनपाच्या विलगीकरणाला घाबरतो आहे आणि आपला आजार लपवण्यास बाध्य होतो आहे.

हे अपयश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे आणि त्यांच्या या मूजोर प्रशासकीय योद्धांचेच असल्याचे म्हणावे लागेल. एका निगेटीव्ह आलेल्या सामान्य नागरिकाला जबरीने अतिशय घाणेरड्या विलगीकरण केंद्रात डांबून ठेवण्याचा हाच का साथ रोग प्रतिबंध कायद्याचा अधिकार?असा प्रश्‍न आता नागरिक उपस्थित करीत आहेत.आयुक्तांनी डेविड नावाच्या या नागरिकाची त्वरीत सुटका करण्याची मागणी केली जात आहे. आयुक्तांनाही कुटुंब आहे,लहान मुले आहेत,त्यांनी संवेदनशील मनाने नागपूर शहरातील नागरिकांच्या भावना समजून घेऊन कार्यभार करण्याची अपेक्ष्ा नागपूरकर व्यक्त करीत आहेत.

Latest बातम्या