
दहा टक्के बेजवाबदार नागरिकांमुळे नव्वद टक्केंच्या रोजगारांवर कु-हाड
नागपूर,ता.२३ जुलै: ’मिशन बिगीन अगेन’ ३ जून पासून सुरु झाले आणि गेल्या तीन महिन्यांपासून आटोक्यात असलेल्या कोरोना बाधितांच्या संख्येत धक्कादायक वाढ झाली. अनलॉकपूर्वी नागपूरात ८०० केसेस होत्या त्या गेल्या दीड महिन्यात तीन हजार पल्याड पाेहोचल्या. दहा-बारा मृत्यूवर थांबलेला आकडा अनलॉक नंतर ३८ पर्यंत पाेहोचला आणि हे सर्व घडले ते नागपूरकरांनी कोरोनाबाबतचे शासनाचे दिशानिर्देश न पाळल्यामुळेच.परिणामी येत्या चार दिवसात जर व्यापारी असो,व्यवसायिक असो,कामगार वर्ग,शासकीय नोकर अथवा गृहीणी,तरुणाई असो यांनी स्वत:च्या वर्तवणूकीत सुधारणा आणली नाही तर नागपूरात कर्फ्यूसह १५ दिवसांचा कडक लॉक डाऊन लावण्याचा इशारा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज गुरुवार दि. २३ जुलै रोजी दूपारी २ वा. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दिला.
नागरिक,तरुणाई,व्यापारी आणि दूकानदार हे कोणत्याही नियमांना जुमानत नाहीत.मास्क घालतात ते गळ्यात! व्यापारांवर दंडात्मक कारवाई करुनसुद्धा सुधारणा नाहीच. पूर्वी एक हजार दंड वसूलण्यात आला,आता दहा हजार वसूलण्यात येतो तरीही सुधारणा नाहीच! दूकानात केवळ पाच ग्राहकांना ते ही सुरक्ष्ति अंतर ठेऊनच आत येण्याची परवानगी देण्याची सूचना असताना शहरातील बहूतांश दूकानात ग्राहकांची तौबा झुंबड बघायला मिळतेय,जणू काही कोरोना संपलाच आहे.त्यांना संसर्ग होणारच नाही.अश्या बेजवाबदार कृतीतून नागपूरात गेल्या एका महिन्यात कोराना झपाट्याने स्वस्थ माणसांमध्ये संसर्गित झाला.
नागरिकांनीच आपले सामाजिक,सांस्कृतिक,धार्मिक आचरण तपासण्याची आता गरज असल्याचे ते म्हणाले. लॉक डाऊनशिवाय विषाणूचा संसर्ग रोखता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. लॉक डाऊन नाही तर व्हायरसला अंत ही नाही.जिवनावश्यक वस्तू आणायला घरातील एकच व्यक्तीने बाहेर पडणे गरजेचे असताना,याचे ही पालन होत नाही. नागरिक हे जिवनावश्यक वस्तू आणायला बाहेर पडतात आहेत की विषाणू घरात आणायला?असा सवाल त्यांनी केला.या बेजवाबदार वर्तवणूकीतून शहरात संसर्गितांची संख्या धक्कादायरित्या वाढली असून दररोज मृत्यूचे सत्र सुरु आहे.
गेल्या ४५ दिवसांपासून मात्र शहरात हेच घडतंय. नागरिक हे घराबाहेर पडतात,दूकानात,भाजी बाजारात गर्दी करतात आणि विषाणूची लागण घेऊन घरी येतात. यामुळे प्रशासनासमोर संसर्गाची साखळी शोधून काढणे अशक्यप्राय बाब होऊन बसली आहे.शहरात मोठ्या प्रमाणात झालेल्या मृत्यूंना शहरातील ‘खासगी दवाखाने’हे देखील तेवढेच कारणीभूत असल्याचे आयुक्त म्हणाले. त्यांच्याकडे ताप,सर्दी,खोकला,श्वास घेण्यास त्रास होणे,अशी कोविडची लक्ष् णे असलेले रुग्ण आल्यानंतर देखील त्यांनी व्हायरलची औषधे देऊन त्यांना घरी पाठवले. मनपाच्या कंट्रोल रुमला कळवले देखील नाही.परिणामी अश्या रुग्णांना घरी गेल्यावर पुन्हा ताप येण्याचा आणि गंभीर परिस्थितीत शेवटच्या क्ष् णी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आल्याने त्यांच्यावर मृत्यू ओढवला.
नागपूरात झालेल्या २१ पैकी १९ मृत्यू हे खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर शासकीय रुग्णालयात भरती झालेल्यांचे आहेत तर इतर केसेस हे बेरोजगार लोकांचे झालेले मृत्यू आहेत,याचा अर्थ बेरोजगारीमुळे तरुणाई उगीचच शहरात भटंकती करीत असल्याचे सिद्ध झाले.
-तर लॉकडाऊनची वेळच येणार नाही
नागपूर शहरात लॉकडाऊन किंवा कर्फ्यू लागू करणे हा प्रशासनाचा उद्देश नाही. केवळ नागरिकांना स्वत:ची काळजी स्वत:च घेण्याची सवय लावणे हा हेतू आहे. हे जर आपण केल्यास आपण व्हायरसलाच लॉकडाउन करू शकू. मात्र आपण नेहमी प्रशासनाकडेच बोट दाखवतो. प्रशासन हे आपल्याच मदतीसाठी आहे. मात्र आपल्या प्रत्येकाचीही स्वत:च्या सवयी बदलून घ्यायची तयारी असायला हवी. आज देशातील इतर शहरांमध्ये कोव्हिडची जी स्थिती आहे ती आपल्या शहरातही असू शकते. हे टाळण्यासाठी आपल्या जुन्या सवयी बदलून शासनाच्या दिशानिर्देशाचे पालन करण्याच्या सवयी अंगीकरण्याची गरज आहे. या सवयी बदलून त्या अंगिकारल्यास आपल्या शहरात कधी लॉकडाऊनची वेळच येणार नाही, असेही मनपा आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले.

१० टक्के बेजवाबदारांमुळे ९० टक्के प्रामाणिक नागरिकांना लॉक डाऊनचा फटका-
शहरातील संपूर्ण ३० लाखांच्या जवळपास असणारे नागरिक हे सर्वच बेजवाबदार वर्तवणूक करतात असे नाही. ९० टक्के नागरिक हे कोरोनाच्या भीतीने का होईना,नियमांचे पालन करतात. सार्वजनिक स्थळी मास्क वापरतात,हात वारंवार सेनिटाईज करतात, सुरक्ष्ति अंतर राखतात,बाहेरुन घरी येताच अंगावरील वस्त्र धूवायला टाकतात,आंघोळ केल्याशिवाय चेह-याला हात लावत नाहीत,आपला व आपल्या कुटुंबियांच्या जीव धोक्यात आणीत नाही मात्र १० टक्के ’लोभी’दूकानदार आणि आयुक्तांनी उल्लेख केल्याप्रमाणे बेरोजगार,उनाड,स्वार्थी तरुणाई यांच्यामुळे शहरात लॉक डाऊन लावण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. याचे बोलके उदाहरण ‘सत्ताधीश’ला आज सिव्हिल लाईन्स येथील काही चहा टप-यांवर बघायला मिळाले. या भागात तरुणाई सर्रास ’हर फिक्र को धुएं में उडाता चला गया…मैं जिंदगी का साथ निभाता चला गया’या अंदाजमध्ये सिगारेट ओढताना ‘सत्ताधीशने ’ टिपले.चहा टप-यांवर होणारी गर्दी लक्षात घेता आयुक्तांनी अद्याप चहा टपरीवाल्यांना व्यवसाय सुरु करण्याची परवानगी दिली नाही मात्र तरी देखील अश्या चहा टप-या शहरात सर्रास सुरु आहेत.

चहा व्यवसाय करणे हा गुन्हा नाही मात्र आपल्या दूकानात कोरोनासारख्या संसर्गजन्य महामारीचा धोका लक्षात घेता, या चहा व्यवसायिकांनीच नागरिक म्हणून स्वत:ची जवाबदारी ओळखून या तरुणाईला तिथेच सिगारेट ओढण्यावाचून रोखण्याचे कर्तव्य बजावले नाही. परिणामी सिगारेटच्या धूरातूनही कोरोनाचा संसर्ग इतरांना होऊ शकतो,एवढी जनजागृती असल्यानंतरही ही तरुणाईचे आणि चहा टपरीवाल्यांचे असे बेजवाबदार कृत्य इतर नियम पाळणा-या प्रामाणिक नागरिकांवरही लॉक डाऊन ओढवण्याचे संकट निर्माण करीत असल्याने अनेकांनी याविषयी संताप व्यक्त केला आहे.
शहरात जागोजागी धूर सोडणा-या अश्या तरुणाईवर उपद्रव शोध पथकाद्वारे अद्याप कोणतीही कारवाई झालेली आढळून येत नाही.’सत्ताधीश’ने टिपलेल्या या छायाचित्रात दिसणा-या तरुणाईवर मनपा प्रशासन आतातरी कारवाई करेल का?असा प्रश्न उपस्थित झाला आहे.लॉक डाऊन हा कोरोनावर पर्याय असून शकत नाही, वाहतूक पोलीसांनी प्रत्येक सिग्नलवर मास्कचा वापर न करणा-यांवर जबर दंड आकारावा,मनपाच्या आरोग्य विभागाने आता पुन्हा एकदा घरोघरी सर्वेक्ष् ण करुन सर्दी,ताप,खोकल्याचे रुग्ण तपासून त्यांची नोंद घेण्याचा देखील पर्याय अनेक नागरिक सुचवतात.
(सर्व छायाचित्रे ‘सत्ताधीश’फोटो जर्नलिस्ट बोनी)

आमचे चॅनल subscribe करा