Homeनागपूर न्यूजग्रामीण बाधितांची संख्या सर्वाधिक: मात्र लॉकडाऊन नागपूरात!

ग्रामीण बाधितांची संख्या सर्वाधिक: मात्र लॉकडाऊन नागपूरात!

अजब आयुक्तांचा गजब कारभार: शहरी-ग्रामीण बाधितांच्या संख्येत केली सरमिसळ

नागपूर,ता. २२ जुलै: शहरात दररोज बाधितांच्या संख्येत लक्ष् णीय वाढ होत आहे,आज बुधवार दि. २२ जुलै या एकाच दिवसात १२२ कोरोना बाधितांची संख्या वाढली. मात्र वास्तवतेत यात ग्रामीण भागातील बाधितांची संख्याच ही सर्वाधिक असल्याचे वास्तव सर्व विलगीकरण केंद्रातून मागवलेल्या माहितीतून उघड झाले. मनपा प्रशासन मात्र शहरी व ग्रामीण भागातील बाधितांच्या संख्येत सरळ-सरळ‘ सरमिसळ’ करुन शहरातील नागरिकांच्या मनाचा थरकाप उडवित असल्याचे दिसून पडत आहे.

विशेष म्हणजे शहरावर आता नागपूर जिल्ह्ययातील ग्रामीण भागातील कोरोना बाधितांचा अतिरिक्त बोजा पडत असून कामठी,कन्हान,सावनेर,कळमेश्‍वर,रामटेक इ.भागातील बाधितांचा बोजा मेयो-मेडीकल,एम्स इ. शासकीय रुग्णालयावर पडताना दिसत आहे. शहरातील सर्व विलगीकरण केंद्रात देखील ग्रामीण भागातून आणलेल्या संशयितांची संख्याच सर्वाधिक असल्याचे तथ्य समोर आले आहे.

ग्रामीण सोडून शहरात होणार लॉक डाऊन!
एकीकडे ग्रामीण भागातून शहरातील शासकीय रुग्णालये व विलगीकरण केंद्रात भरती होणा-यांची संख्या सर्वाधिक असताना मनपा आयुक्त यांनी शहरात ’लॉक डाऊन कि कर्फ्यू’या बाबतचे भाष्य करणयासाठी उद्या गुरुवार दि. २३ जुलै दूपारी २ वा.ची वेळ निवडली अाहे. त्यांच्या ‘लोकप्रिय ’माध्यम फेसबूक लाईव्ह ’द्वारे ते उद्या नागपूरकरांना धक्कादायक निर्णय ऐकवणार असल्याची शक्यता सोशल मिडीयावर वर्तवली जात आहे.

शहरात लॉक डाऊन करुन आधीच खिळखिळी झालेली अर्थव्यवस्था आणखी खिळखिळी करण्याऐवजी,अनेकांचे रोजगार बुडवण्याऐवजी,अनेकांना घरात उपाशी मरण्यासाठी सोडून देण्याऐवजी आयुक्तांनी ज्या ग्रामीण भागातून कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आज शहरात येत आहेत,त्या ग्रामीण भागात लॉक डाऊन करावे,अशी मागणी होत आहे. शहरात ते संपूर्ण व कडक टाळेबंदी करण्याचा मानस व्यक्त करीत असल्याने अनेकांनी ’अजब आयुक्तांच्या गजब काराभाराविषयी’आश्‍चर्य व्यक्त केले आहे! शहरात संसर्गाची साखळी या निर्णयामुळे कदाचित तुटेल ही मात्र ग्रामीण भागातील साखळीचे काय?असा प्रश्‍न आता उपस्थित झाला आहे.

नुकतेच पालकमंत्री नितीन राऊत यांच्या अध्यक्ष् तेखाली विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार यांच्या मुख्यालयात पार पडलेल्या बैठकीत रामटेकचे शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांनी ग्रामीण भागात पेरणीची कामे सुरु असल्याने ग्रामीण भागात लॉक डाऊन करण्याच्या निर्णयाला चक्क नकार दिला. मात्र आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरात मात्र संपूर्ण टाळेबंदी करण्याचा संपूर्ण मानस व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे.ग्रामीण भागातून बाधित शहरात येतच राहील्यास नागपूरकरांचे जगणे वेठीस धरुन आयुक्तांना काय साध्य होणार आहे? करायचेचे असेल तर शहर आणि ग्रामीण दोन्ही भागात टाळेबंदी करण्यात यावी,असा सूर लावला जात आहे.

मूळात मनपातर्फे आजच्या तारखेला शहरातील बाधित किती?व ग्रामीण भागातील बाधित व संशयित किती?याचा कोणताही सांख्यकिय तालेबंद हिशोब ठेवण्यात आला नसल्याने शहरातील बाधितांचीच संख्या वाढत असल्याचा नागपूरकरांचा समज झाला आहे.दररोज ही संख्या शंभरी पार करीत आहे.याचा दोष ही नागपूरकरांच्या चुकीच्या वर्तवणूकीला दिला जात असून दररोज पाच-पाच,दहा-दहा हजार रुपयांचा दंडही नागरिकांकडून वसूल केला जात आहे.साथ रोग प्रतिबंधित कायद्याच्या नावाखाली आयुक्तांना मिळालेल्या ‘अमर्याद’अधिकारांचा ‘सदूपयोग’नागपूरांनी काल कस्तुरचंद पार्क मुख्य रस्ता तसेच सेंट्रल एव्हेन्यू मुख्य रस्त्यावर होताना बघितलाच आहे.
आयुक्त स्वत: भर रस्त्यात उभे राहून नागरिकांवर दंड ठोठवित होते. राज्य शासनाने दूचाकीवर दोन माणसे बसण्यास कोणतीही बंदी घातली नसताना,आयुक्तांना मात्र नवरा-बायको एकाच घरात राहीलेले चालतात मात्र घराबाहेर पडताना एकाच दुचाकीवर बसलेले चालत नसल्याने त्यांनी चक्क अनेकांवर दंडच ठोठावला.एकाच कुटुंबातील सदस्यांना ओळख पत्र किवा आधार कार्ड दाखवून दूचाकीवर प्रवासाची मुभा देण्याची सद् बुद्धि आयएएस अधिकारी असणारे मुंढे यांना का सूचत नाही?असा सवाल आता शहरातील अनेक ‘नवरा-बायको’करीत आहे.आयुक्त हे नागपूरकरांवर आपला हट्टी आणि दुराग्रहीपणा लादत असल्याचा आरोप देखील अनेक दूकानदार करीत आहेत.आम्हाला गुन्हेगारांसारखी वागणूक आयुक्तांनी दिली असल्याचा संतापही अनेकांनी व्यक्त केला. ‘डॉ.बाबासाहेबांचे संविधान आणि नागरिकांना लाभलेली लोकशाही‘साथरोग प्रतिबंध कायद्यासमोर अक्ष् रश:पंगू झाली असून आयुक्त मुंढे हे या कायद्याचा आता ‘अति दुरुपयोग’ करीत असल्याचे ही उघडपणे म्हटले जात आहे.

आयुक्तांनी केली राधास्वामी सत्संग मंडळ केंद्राची आज पाहणी-
शहर व ग्रामीण भागातील करोना बाधितांची झपाट्याने वाढणारी संख्या बघता आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज कळमेश्‍वर मार्गावरील राधास्वामी सत्संग मंडळाच्या सहकार्याने उभारलेल्या कोविड केअर सेंटरची पाहणी केली. याप्रसंगी अति.आयुक्त राम जोशी,निर्भय जैन, आरोग्य अधिकारी डॉ.सवाई तसेच इतर अधिकारी वर्ग त्यांच्यासोबत होता.

आजच्या तारखेत शहरातील मेडीकल,मेयो व एम्ससारखे शासकीय रुग्णालये ही ‘हाऊस फूल’झाल्यामुळे पुढील विकट परिस्थितीचा अदमास घेऊन आयुक्त मुंढे यांनी ही पाहणी केली.या ठिकाणी एकसाथ ५ हजार रुग्णांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार असल्याचा दावा करण्यात आला होता.मात्र हे केंद्र वरुन जरी टिनांनी झाकले असले तरी आजूबाजूने संपूर्णत: उघडे आहेत. परिणामी पावसाळ्याचा दिवसात रुग्णांना होणारी गैरसोय याचा यातून अंदाज येऊ शकतो.

मनपा सभागृहात देखील राधास्वामी सत्संग मंडळाच्या केंद्रावर भापचे ज्येष्ठ नेते दयाशंकर तिवारी यांनी आक्ष्ेप नोंदवित या ठिकाणी शौचायल हे खूप दूर असल्याने रुग्णांची हेलसांड होणार असल्याचा अारोप केला होता मात्र आयुक्तांनी हा मुद्दा खोडून काढीत बॅरकमधून बाहेर पडताच शौचालये असल्याचे सांगितले होते.

ग्रामीण भागातील संशयित जाताना लाईट्स,तोट्या चोरुन नेतात!
शहरातील विविध विलगीकरणात सध्या भरती होणारे ग्रामीण भागातील संशयित हे जाताना लाईट्स,तोट्या,न्हाणीघरातील मगस् इ.साहीत्य चोरुन घेऊन जात असल्याचे वास्तव समोर आले आहे. एवढेच नव्हे तर अतिशय पाॅश फ्लॅट्समध्ये राहत असले तरी भिंतीवर खर्रा थूंकून,सगळ्या भिंती घाण करुन ठेवल्या असल्याची व्यथा एका विलगीकरणातील नोडल अधिकारी यांनी मांडली.परणिामी आयुक्त हे जसे संपूर्ण शहराला ज्याप्रमाणे शिस्त लावण्यासाठी भर रस्त्यावर उतरलेत तशीच शिस्त त्यांनी विलगीकरणातील संशयितांनाही लावावी,अशी मागणी खासगीत बोलली जात आहे.

महिलेच्या फ्लॅटमध्ये चक्क पुरुष कैदी ठेवला!
पाचपावली विलगीकरण केंद्रात नुकतेच एका महिलेला एका विंगमधील एक फ्लॅट तिच्या दोन लहान मुलांसोबत देण्यात आला मात्र रात्रीच्या कर्तव्यावर असणा-या अनुभव नसणा-या कर्मचा-याने चक्क नागपूर कारागृहातून विलगीकरण केंद्रात आणलेल्या कैद्यालाच त्या महिलेसोबत फ्लॅटमध्ये ठेवले.परिणामी ती महिला अतिशय भेदरली व तिने नोडल अधिकारी यांना फोन करुन तक्रार नोंदवली. त्या नोडल अधिकारी यांनी त्या कैद्याला दुस-या विंगमध्ये शिफ्ट केले.

सध्या राज्य शासनाच्या दिशानिर्देशानुसार शहरातील अभियंते,प्राध्यापक,शिक्ष् क,डॉक्टर्स यांची सक्तीची सेवा अधिग्रहीत करण्यात आली असून,यांना अश्‍या विलगीकरणातील भरतीच्या नोंदी ठेवण्याचे काम सोपविण्यात आले आहे.विलगीकरण केंद्रात किती फ्लॅट्स खाली आहे याची नोंद ठेवणे,विलगीकरण केंद्रात आलेल्या संशयितांचे मोबाईल क्रमांकाची नोंदी ठेवणे,संशयितांची शिफ्टींग करणे,त्यांना विंग क्र व रुम क्र देणे,त्याची सॉफ्ट कॉपीमध्ये नोंद करणे, वैद्यकीय अधिका-यांमार्फत स्वॅबची तपासणीच्या नोंदी ठेवणे इ. स्वरुपाचे कार्य ही मंडळी करतात. मात्र अनुभव नसल्यामुळे असा गोंधळ उडतो व एकट्या असलेल्या महिलेच्या फ्लॅटमध्ये चक्क कारागृहातील एक कैदीच ठेवणे यासारखे प्रकार सर्रास घडत आहेत.

म्हणूनच नागपूरकरांमध्येही कोरोनापेक्ष्ाही ’विलगीकरण केंद्राचीच ’धास्ती खोलवर बसलेली पहायला मिळतेय,मात्र ही भीती नागरिकांमध्ये का निर्माण झाली?याला प्रशासकीय व्यवस्थेचा एकंदरित भोंगळ कारभार जवाबदार नाही का?याचे उत्तर कदाचित साथरोग प्रतिबंध कायद्या राज्यातून समाप्त झाल्यावरच मिळू शकेल,असे उत्तर काही नगरसेवक यांनी दिले.

अनेकांनी अश्‍या विलगीकरण केंद्रात फक्त गंभीर आजारी असणा-या संशयितांनाच भरती करण्याची मागणी केली. इतरांना होम क्वारंटाईनची मुभा प्रदान करावी,अशी मागणी ते करीत आहेत.मूळात आज देखील अनेक विलगीकरण केंद्रातील मर्यादा ही फूल्ल झाल्याने अनेकांना परत होम क्वारंटाईन राहण्यासच सांगितले गेले असल्याचे सांगितले जात आहे.पाचपावली केंद्रातूनच आज नव्याने आलेल्या तीस ते चाळीस संशयितांना परत पाठविण्यात आले.या ठिकाणी आधीच ६३८ संशयित भरती आहेत.

आयुक्तांच्या घोषणेकडे नागपूरकरांचे लक्ष् –
उद्या गुरुवारी दि. २३ जुलै रोजी दूपारी २ वा.फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून मनपा आयुक्त तुकाराम मुंढे हे शहरात ‘लॉक डाऊन कि कफ्यू’याची घोषणा करणार असल्याचे मनपा जनसंपर्क विभागाद्वारे कळविण्यात आले आहे.परिणामी नागपूरकर जनता आता चांगलीच काळजीत पडली आहे.ऐन सणासुदीचे दिवस,नागपंचमी,राखी पोर्णिमा,गौरी गणपती यासारखे सण तोंडावर अाले असताना नागपूरात पुन्हा लॉक डाऊन किवा कर्फ्यू लादण्यात येऊ नये,अशी मंशा अनेकांनी व्यक्त केली.

आरोग्यसेवा कोलमडली,दोष कोणाचा?
मेडीकलच्या कोविड-सेंटरमधून आलेला एक व्हिडियो आज चांगलाच व्हायरल झाला.यात काही तरुण,ज्येष्ठ नागरिक व महिला या आपल्या व्यथा मांडीत आहेत. कालपासून त्यांचा अहवाल हा पॉझिटीव्ह आल्यामुळे मेडीकलमध्ये भरती करण्यात आले मात्र त्यांच्यात कोणतीही लक्ष् णे नाहीत, त्यांच्याकडे मेडीकल प्रशासनाचे कोणतेही लक्ष् नसल्याची तक्रार त्यांनी नोंदवली.एकाच वार्डात अतिशय गलिच्छ टाकीतल्या पाण्यााने संपूर्ण महिला, पुरुषांना तोंड धूण्यासाठी व शौचालयात वापरण्यासाठी सांगण्यात आले आहे.कोरोना पॉझिटीव्ह निघालो याचा अर्थ आयुक्त तुकाराम मुंढे आम्हाला काळ्या पाण्याची शिक्ष्ा देत आहेत का?असा मार्मिक प्रश्‍न त्या सुशिक्ष्ति महिला विचारीत आहेत.१४ दिवस आम्हाला व्हीएनआयटीमध्ये विलगीकरणात ठेवले,अहवाल पॉझिटीव्ह आला तर मेडीकलमध्ये आणून पटकले.या वाडॉत माणसे इतकी आणि शौचालये चार,एकच वॉश बेसिन,वरुन नळांची सोय नाही, काळया रंगाच्या घाणेरड्या पाण्याच्या टाकीतून मगने पाणी घेऊन तोंड धुवायचे आहे,शौचालयात टाकायचे आहे.हे १० दिवस आम्ही कोरोना राहीला दूर इतर आजारांनीच मरुन जाऊ,अशी व्यथा त्या तरुणांनी व महिलांनी व्हिडीयोमध्ये मांडली.

कोरोना विषाणू हा देखील एवढा ’क्रूर’नसावा जेवढे नागपूर मनपाचे हे प्रशासन आहे,असा संताप एका तरुणाने व्यक्त केला.

स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षात ग्रामीण भागात आरोग्यसेवा अद्यावत झालीच नाही,यात नागपूरकरांचा दोष आहे का?देशाच्या एकूण अंदाजपत्रकात आरोग्यसारख्या मूलभूत गोष्टसाठी सकल उत्पन्नातून फक्त २ टक्के बजेट सर्वच पक्षाच्या सरकारांनी ठेवले,यात नागपूरकरांचा दोष आहे का?१३० कोटी लोकसंख्या असणा-यांच्या या देशात आरोग्य सारख्या जीवनावश्‍यक बाबीची सत्ताधा-यांनी आजवर केलेली हेलसांड ’कोरोना’ने लक्ष्ात आणून दिले असल्याचे बोलले जात आहे. ग्रामीण भागातच तेथील ग्रामस्थांना चांगली आरोग्यसेवा मिळाली असती तर कोराेनासारख्या साथीच्या रोगात ग्रामीणचा भार नागपूर शहरावर पडला नसता,मेडीकलमध्ये अत्यधिक दुरावस्थेचा व्हिडीयो व्हायरल करण्याची वेळ काेरोना पॉझिटीव्ह रुग्णांवर आली नसती…!

 

Latest बातम्या