Homeनागपूर न्यूजआयुक्तांची तलवार म्यान:सभागृहात हजर:महापौरांनीही मानले आयुक्तांचे आभार

आयुक्तांची तलवार म्यान:सभागृहात हजर:महापौरांनीही मानले आयुक्तांचे आभार

स्थगन प्रस्तावावर चर्चा अपूर्ण: सभागृह उद्या दूपारी १२ वा. पर्यंत स्थगित

नागपूर,ता.२३ जून: नागपूरकरच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष् लागलेल्या आजच्या सभेत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे हे उपस्थित राहतील किंवा नाही! याकडे लागले होते.याचे ‘समाधानकारक’उत्तर शेवटी राज्यातील जनतेला मिळाले. आयुक्तांनी आपली तलवार म्यान केली व महापौरांच्या विनंतीला मान देऊन ते संपूर्ण वेळ सभागृहात उपस्थित ही राहीले,एवढेच नव्हे तर अतिशय ‘शांतपणे’त्यांनी स्थगन प्रस्तावावर झालेल्या चर्चेदरम्यान त्यांच्यावर झालेले शाब्दिक ‘वार’अतिशय संयतपणे झेलले,सभागृहाचे हे चित्र सत्ताधारी,विरोधी पक्षासह सर्वांचा ‘सुखावह’ठरले.

शनिवार दि.२० जून रोजी पार पडलेल्या सभेत आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर व्यक्तिगत टिका झाल्याचा कारणावरुन आयुक्त संतप्त होऊन सभागृहाचा त्याग करुन निघून गेलेत. ‘ज्या सभागृहात माझा अपमान होतो त्या सभागृहात मी परत येणार नाही’असा निरोप देखील त्यांनी महापौर तसेच अति.आयुक्तांना फोनवर कळवला.परिणामी महापौरांनी मंगळवार दि.२३ जून रोजी सभा भरविण्याचे निर्देश देत,आयुक्तांनाही माध्यमांच्या माध्यमातून विनंती केली की त्यांनी झालं-गेलं सगळं विसरुन जनतेच्या प्रश्‍नांसाठी आणि शहराच्या विकासासाठी सभागृहात यावे.

विशेष म्हणजे काल दि. २२ जून रोजी सायंकाळी महापौरांनी आयुक्तांच्या विरोधात स्मार्ट सिटी प्रकल्पातील कोट्यावधी निधीची अफरातफरचा आरोप करीत त्यांच्यासह वित्त व लेखा अधिकारी मोना ठाकूर तसेच अमृता देशकर यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीसांकडे केली.या पार्श्वभूमीवर तर आयुक्तांचे सभागृहात येणे हे अनेकांसाठी आश्‍चर्यजनक ठरले. महत्वाचे म्हणजे सत्ता पक्ष् व विपक्ष्ा तील नगरसेवक यांनी देखील आपली भाषा आणि आवाजाची पट्टी ही बरीच ‘संयत’ठेवली होती. एवढेच नव्हे तर ‘शालजोडीतील’मारताना त्यांनी कोराना संदर्भात आयुक्तांनी केलेल्या कामांची प्रशंसा देखील केली.

मात्र,ज्याप्रमाणे अजूर्नाने महाभारताच्या रणांगणात भावविवश होऊन आपली शस्त्रे खाली टाकली,नंतर मात्र तो गीतेचा उपदेश ऐकून युद्धासाठी सज्ज झाला,त्याचप्रमाणे आयुक्त मुंढे यांनी मुंबईवरुन कोणाचा ’उपेदश’ऐकून शस्त्रे खाली टाकली,अशी चर्चा आज सभागृहाबाहेर चांगलीच रंगली होती. आयुक्तांची ही युद्धापूर्वीची शांतता तर नव्हे! अशी देखील शंका उपस्थित केली जात होती. मात्र असे असले तरी महापौर संदीप जोशी यांनी उद्यापर्यंत सभागृह स्थगित करण्यापूर्वी ‘विनंतीला’ मान देऊन आयुक्त सभागृहात उपस्थित राहीले यासाठी आठवणीने आयुक्तांचे आभार मानले ,हे विशेष!

हरीश ग्वालबंशी यांचीही दिलगिरी-
प्रारंभी हरीश ग्वालबंशी यांनी देखील २० जूनच्या प्रसंगावर दिलगिरी व्यक्त करीत त्यांची केलेला आयुक्तांचा नामोल्लेख यामागे कोणतीही अपमानाची भावना नव्हती,असे सांगितले. या पूर्वी देखील २० फेब्रुवारीच्या सभेत मी आयुक्तांच्या नावाचा उल्लेख हा संत तुकाराम महाराज यांच्याशी जोडून त्यांच्याप्रमाणे ते सत्ता पक्ष् व विपक्ष्ातील नगरसेवकांसोबत सारखाच न्याय करतील अशी अपेक्ष्ा व्यक्त केल्याचे सांगितले. त्याच वेळी आयुक्तांनी आपल्या नावाचा केलेला उल्लेख यावर आक्ष्ेप नोंदवला असता तर २० जून चा प्रसंगही टाळता आला असता,असे ते म्हणाले. माझ्या फक्त नामोल्लेख केल्याने मी तर संपूर्ण महाराष्ट्रात बदनाम झालो,अशी व्यथा देखील त्यांनी मांडली.

सभा प्रारंभ होताच महापौरांनी २० जूनच्या सभेचा वाद लक्ष्ात घेऊन निगम सचिव रंजना लाडे यांना ‘पाँईट ऑफ इन्फोरमेशन’केव्हा घेतला जातो?या विषयीचे कोणते नियम आहेत?हे वाचण्यास सांगितले.तेव्हा अनेकांच्या काळजाचा ठोका चूकला! प्रारंभीच महापौरांची ही भूमिका बघता, ही देखील सभा वादळी ठरणार का?अशी शक्यता असताना आयुक्त मुंढे यांनी मात्र चेह-यावरील भाव ढळू दिला न देता ते नियम ऐकून घेण्यातच स्वारस्य दाखवले. या नियमाम सभागृहातील एखाद्या सदस्याने ‘पॉईंट ऑफ इन्फॉरमेशन’ नोंदवताच पालिकेतील प्रशासकीस सदस्याने खाली बसावे,असा नियम निगम सचिव यांनी वाचून दाखवले. पीठासीन अधिका-यांनी परवानगी दिल्यानंतरच आयुक्तांना बोलण्याचा अधिकार असल्याचे निगम सचिव यांनी स्पष्ट केले.

अश्‍या होत्या शालजोडीतील टिका-
आज दिवसभरात सत्ता पक्ष् व विपक्ष्ातील एकूण २५ सदस्यांनी स्थगन प्रस्तावावर मत मांडले. काँग्रेसचे नगरसेवक नितीन साठवणे यांच्यावर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोमीनपुरा येथील नागरिकांच्या विलगीकरणाच्या प्रश्‍नात हस्तक्ष्ेप केल्या प्रकरणी लकडगंज पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली,यावर सभागृहात आज स्थगन प्रस्तावाअंतर्गत चर्चा घडून आली. आयुक्तांनी साठवणे यांच्यावरील एफआयआर मागे घ्यावी,अशी मागणी साठवणे यांनी आपल्या प्रस्तावात केली आहे.

या प्रस्तावर चर्चा करताना नगरसेवक पुरुषोत्तम हजारे यांनी ‘आयुक्त इतर सर्वांना मुर्ख समजतात,मी एकटा शहाणा’अशी टिका केली.शिवसेना-काँग्रेस सरकारने मुंढे यांच्या रुपाने चांगला मोहरा नागपूरात पाठविल्याचे ते म्हणाले. आयुक्तांना वॉक आऊट करण्याचा संवैधानिक अधिकार नसताना त्यांनी सभागृहाचा त्याग केला. नगरसेविका प्रगती पाटील यांनी देखील आयुक्तांनी खूर्चीची गरिमा ठेवली नसल्याचे सांगितले.ही बाब अतिशय खेदजनक असून जनता आता आमच्याकडे संशयाने पाहते आहे,अशी खंत व्यक्त केली. माजी महापौर व केंद्रातील विभागाच्या सदस्य असणा-या मायाताई इवनाते यांच्यासोबत आयुक्तांना महत्वाच्या कामासाठी भेटण्यासाठी गेलो असता,आयुक्तांनी निरोप कळवला,१ तास थांबावे लागेल!महीला नगरसेविका तसेच माजी महापौर यांच्याप्रति आयुक्तांचा असा व्यवहार योग्य नसल्याचे त्या म्हणाल्या.

जुल्फिकार भूट्टो यांनी देखील मोमीनपुरा परिसराची झालेली अतोनात बदनामी यासाठी आयुक्तांना चांगलेच धारेवर धरले. आयुक्तांनी परिसराची नावे उघड न करता प्रत्येक परिसराला ‘आकडे ‘ दिले असते तर जनतेमध्ये एवढी कमालीची दहशत पसरली नसती.आयुक्तांच्या हाताखालील अधिका-यांनी देखील कोणतीच सुनवाई ऐकली नाही. ‘शोले’चित्रपटात आई मुलाला म्हणते ‘बेटा सो जा नही तो गब्बरसिंग आ जायेगा’दूर्देवाने मुंढेंनी नागपूरात असाच दरारा निर्माण केला. आता यांच्या नावानेच लोक घाबरु लागले आहेत.आयुक्तांचा उल्लेख त्यांनी ‘कभी फूल कभी शोला’असा केला. घोडेस्वार यांनीही ’परवा सभागृहात जी घटना घडली ती राष्ट्रीय एकात्मतेला व व्यक्तिच्या प्रतिष्ठेला ठेस पोहोचवणारी असल्याचे सांगितले. व्यक्तिगत टिपण्णी होत असेल तर कुठल्याही माणसाला वाईट हे वाटणारच,आता माझेच नाव ‘जितेंद्र ’आहे पण चित्रपटसृष्टितील जितेंद्रशी माझे काय घेणे-देणे आहे?मी त्यांच्यासारखा आहे का?असे म्हणून हास्य फूलवले.

नगरसेवक मनोज चापले यांनी चर्चेदरम्यान महापौरांवर जर ‘आयुक्तांनी माझ्या खूर्चीवर बसावे मी आपल्या पायाशी बसतो’अशी बोलण्याची वेळ येते तर ही आमच्या सगळयांसाठी अतिशय खेदजनक बाब असल्याचे सांगितले. प्रतिबंधक क्ष्ेत्रातून गर्भवती महिलेचा ऑटो देखील पोलीसांनी सोडला नाही,त्या महिलेच्या जीवावर बेतले होते मात्र पोलीसही मुंढे यांच्या कडक नियमांकडे बोट दाखवत असल्याचा संताप व्यक्त केला.शेवटी पोलीसांना विरोध करुन टिना काढून त्या महिलेला डागा रुग्णालयात पोहोचवल्याचे सभागृहाला सांगितले.अशी व्यवस्था आहे का मुंढेची?लोकांना वाचवण्यासाठी कि मारण्यासाठी?असा खोचक सवाल उपस्थित केला.गेले साढे तीन महिने महापालिका अस्तित्वात आहे तरी का?की बर्खास्त झाली अशी शंका येऊ लागली होती. प्रशासकीय अधिकारीच संपूर्ण कार्यभार चालवित राहीले. मनपाचे अधिकारी हे प्रामाणिक आणि नगरसेवक हे चोर!अशी प्रतिमा आज आयुक्तांनी आपल्या संपूर्ण कारभारातून निर्माण केल्याचे ते म्हणाले.

काँग्रेसचे नगरसेवक मनोज सांगाेले यांनी देखील ‘आमचाही मान सन्मान आहे,माय बापांनी आम्हाला फूकट पैदा नाही केले,नगरसेवकांचं जर काही चूकत असेल तर फांशी नाही सरळ भर चौकात एसिड टाकून जाळा,पण नगरसेवकांचाही आत्मसन्मान जपण्याचे त्यांनी सूचित केले.मुंढेंचे काेरोना महामारीचे नियोजन असे होते की कमी शिकलेले हे जास्त घाबरले,असा टोला त्यांनी हाणला.नगरसेवक साठवणे यांनी आदरणीय चित्रकार‘अश्‍या शब्दात आयुक्तांना संबोधित केले.कोविड-१९ चं चित्र मुंढेंनी कसे रंगवले,यावर बरेच भाष्य केले.मुंढे यांनी तर कोविड-१९ च्या काळात नगगरसेवकांचे प्रश्‍नच एकून घेतले नाही,‘आय एम नॉट पब्लिक सर्वेंट’असे मुंढे यांचेच विधान आहे.माझ्या प्रभागात जवाहर नगर येथे तर २८ दिवस प्रतिबंधक क्ष्ेत्र होते.कितीही करोडपती असला तरी त्याच्या घरी ८ दिवसांचच रेशन भरलं असतं.माझ्या प्रभागातील जनतेचे हाल सांगायलाही आयुक्तांनी फोन उचलले नाहीत. त्यांचे असिसटंट यांनी साहेबांना एसएमएस करा असा सल्ला दिला.८४ वर्षांच्या ज्येष्ठांनाही घराबाहेर पडून दूध,भाजी,किराणा आणावा लागला.प्रतिबंधक क्ष्ेत्र असल्यामुळे नगरसेवक असूनही आम्ही धान्याची किट ही नाही पोहोचवू शकलो.तुम्ही कितीही काम उत्तम केले असलेतरी जनता तुम्हाला एसएमएस करणार नाही, ती आमच्या अंगावर धावून येते.आयुक्तांनी महापौरांशी समन्वय ठेवला असता तर नगरसेवकांवर अशी वेळ नसती ओढवली.

नगरसेवक सुनील हिरणवार यांनीही वनामती येथील विलगीकरणातील हाल यावर भाष्य करीत ’तू प्यार है किसी और का तुझे चाहता कोई और है’अशी स्थिती नगरसेवकांची केली या बद्दल आयुक्तांचे आभार मानले. मुंढे जेव्हा आले तेव्हा आमच्या मनात ‘दूर से देखा मौसम हंसी था’अशी आता अवस्था झाली. प्रकाश भोयर यांनी मुंढेंच्या जनता दरबारात येणा-या लोकांचे काम होत होते का? असा सवाल उपस्थित करताच,महापौरांनी प्रश्‍न-उत्तर होणार नसल्याचे सदस्यांना बजावले.सर्वांचे प्रश्‍न लेखी स्वरुपात प्रशासनाकडे सोपवल्या जातील,यानंतर आयुक्त सर्व प्रश्‍नाचे उत्तर देतील,अशी सूचना केली. माझं नशीबच खराब दक्ष्णि-पश्‍चिमचा नगरसेवक असल्यामुळे विकास कामांसाठी मला स्थायी समितीच्या अध्यक्ष्ांकडून पैसाच मिळाला नाही,मोठ्या प्रयत्नाने तीन कामे काढली,जी मंजूर झाली मात्र माझ्या दूर्देवाने मुंढे हे आयुक्त म्हणून नागपूरात आले,अाणि सगळ्याच कामांना स्थगिती दिली! मुंढे यांनी आपल्या आतून ’मीपणा काढावा’असा सल्ला ही त्यांनी दिला. माजी उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी देखील नाईक तलाव-बांग्लादेश येथील रात्री-अपरात्री शेकडो नागरिकांच्या केलेल्या विलगीकरणाचा प्रश्‍न उपस्थित केला. नगरसेविका परिणीता फूके यांनी शासानाच्या नियमावलीप्रमाणे नागपूरात कोविड-१९चे नियम राबविण्यात आलेत का?असा प्रश्‍न उपस्थित केला.एका कोरोना बाधिताच्या मागे हजार नागरिकांना विलगीकरणात डम्प केले,असा आरोप त्यांनी केला.हाय रिस्क,लो रिस्कच्या रुग्णांमध्येही फरक करण्यात आला नाही.एनसीडीसीच्या अगदी सुस्पष्ट मार्गदर्शक तत्वे असताना नागपूरात त्याचे पालन करण्यात आले नाही.आयुक्तांनी कोविड-१९च्या संदर्भात काही चांगली कामे नक्कीच केली मात्र चुकीच्या पद्धतीने,असा टोला देखील त्यांनी हाणला.आयुक्तांच्या कोविड-१९ चा कारभार म्हणजे ’कोरोना से डर नही लगता साहब क्वारंटाईन से लगता है’अशी नागपूरकरांची परिस्थिती झाली असल्याचे त्या म्हणाल्या.

ज्येष्ठ नगरसेवक व माजी स्थायी समितीचे अध्यक्ष् अविनाश ठाकरे यांनी देखील आयुक्तांना चांगलेच फैलावर घेत मनपाच्या सर्वात उच्च पदस्थ अधिका-याच्या कार्यशैलीवर सभागृहात स्थगन प्रस्ताव आणला जातो,हीच अतिशय वेदनादायी व क्लेषकारक बाब असल्याचे सांगितले.‘प्रशासन वर्सेस जनप्रतिनिधी’असे चित्र आज माध्यमात तसेच सोशल मिडीयावर उमटले आहे. एका वाहिनीवर दिलेली मुलाखत यू-ट्यूबव बघत असता त्यावर एका नागरिकाने कमेंट केली ’नागपूर मनपामध्ये भाजप व काँग्रेसचे सगळे नगरसेवक हे चोर आणि भ्रष्टाचारी आहेत’माझ्या साढे बारा वर्षाच्या नगरसेवक पदाच्या कारकीर्दीवरील हा सर्वात मोठा प्रहार होता.महापौरांना घटनेप्रमाणे राज्यमंत्र्यांचा दर्जा असताना आयुक्तांनी अशी वागणूक महापौरांना दिली. याच सभागृहातील अनेक चांगले निर्णय केंद्र व राज्याने त्यांच्या शासनासाठी राबविले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे नागपूरला आले असताना मी त्यांना एका कामाच्या संदर्भात मेल पाठवला,त्यांनी लगेच दुस-या दिवशी मला बोलावून घेतले.राज्याचा मुख्यमंत्री यांनी नागपूर मनपातील स्थायी समितीच्या अध्यक्ष्ांना वेळ दिला मात्र आयुक्तांकडे जनप्रतिनिधींसाठी वेळच नाही.

मनपाची प्रतिमा आयुक्तांनीच मलीन केल्याची जळजळीत टिका अविनाश ठाकरे यांनी केली.नागपूर शहराचा गौरवाशाली इतिहास हा पुसला जाऊन या नंतर जेव्हा कधी भविष्यात कोविड-१९सारख्या भयंकर महामारीच्या काळाचा इतिहास लिहल्या जाईल त्यात नागपूर मनपात आयुक्त आणि जनप्रतिनिधी यांचे भांडणे याचीच आता नोंद होईल,अशी निराशा त्यांनी व्यक्त केली. असीम गुप्ता हे आयुक्त पदी असताना कर वाढीवर सभागृहात असाच संताप अनावर झाला होता मात्र त्यांनी अतिशय खेळकर पद्धतीने ते गांर्भीय हुशारीने हाताळले. येथे तर महापौरच आयुक्तांच्या भेटीला जातात,त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. म्हणून सभागृह वैयक्ति अारोप करण्यासाठी नसून आतातरी आयुक्तांनी जनप्रतिनिधींसोबत संवादाची सुरवात करावी,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

नितीन साठवणे यांच्या गर्भवती पत्नीच्या जीवावर बेतले-
आपल्या स्वीकृत झालेल्या स्थगन प्रस्तावरील प्रस्तावनेत काँग्रेसच्या नितीन साठवणे यांनी सभागृहात सतरंजीपुरा येथील प्रतिबंधक क्ष्ेत्रातील धगधगते वास्तव विशद केले. लहान मुलांना दूध ही मिळाले नाही. सर्वात जास्त भोग माझ्या क्ष्ेत्रातील लोकांनी भोगले. गायी,जनावरे राखायला देखील आयुक्तांनी वस्तीत माणसे सोडली नाही. त्यांच्यावरही उपाशी मरण्याची वेळ आली. २७ आणि २९ एप्रिल रोजी तर १७०० नागरिकांना उचलून नेण्यात आले. शासनाचे विलगीकरण केंद्र रिकामे राहू नये म्हणून आम्हाला उचलून घेऊन जात असल्याची चुकीची भावना या भागातील नागरिकांमध्ये पसरली. २६ मे रोजी तर वयोवृद्ध महिला हीला वेळेवर उपचारच मिळाले नसल्याने रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. येथील नागरिकांनी अर्धा अर्धा किलोमीटरपर्यंत खांद्यावर सिलेंडर उचलून आणलेत.

१३ एप्रिल रोजी तर माझ्याच पत्नीला प्रसव वेदना सुरु झाल्यावरही आम्हाला बाहेर पडण्याचा पोलीसांनी विरोध केला. पराकोटीचा वाद घालून पत्नीला रुग्णालयात नेले असता एका तासात ति बाळंतपण झाले. थोडा देखील उशिर झाला असता तर याला जवाबदार कोण राहीले असते? माझ्या क्ष्ेत्रातील नागरिकांनी ८१ दिवसांचा कारावास भोगला.चक्कीवर दळण देखील ते दळून आणू शकले नाहीत.कारण गल्लोगल्ली टिना टाकून रस्ते बंद करण्यात आले. माझ्या भागातील गर्भवती महिलांना खासगी असो किवा सरकारी रुग्णालये भरतीच करुन घ्यायला तयार झाली नाहीत. २४ तासात कोविडची चाचणी करुन अहवाल आणा तेव्हाच भरती करु,असा अध्यादेशच जणू शहरातील रुग्णालयांनी काढला.मेयोत देखील २४ तास आधी भरती राहणे बंधनकारक केले.दिव्यांग लोकांना वस्तीत निराधार सोडून देण्यात आले.या सर्व परिस्थितीला कारणीभूत कोण आहे?विलगीकरणाचा विरोध केल्यास वीज कापू,पाणी कापू,अशी भाषा प्रशासनाच्या अधिका-यांनी वापरली.या सर्वाचा विरोध केल्यामुळेच आयुक्त मुंढे यांनी माझ्यावर लकडगंज पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली असून माझी सभागृहाला विनंती आहे त्यांनी ती रद्द करण्याचे निर्देश आयुक्तांना द्यावे,अशी मागणी नितीन साठवणे यांनी केली.

आयुक्तांनी लिहून घेतले अनेक मुद्दे-
आज एकूण २५ नगरसेवकांनी स्थगन प्रस्तावरील चर्चेत सहभागी होऊन आपले मनोगत मांडले.यातील अनेक मुद्दे हे आयुक्त हे मध्ये मध्ये लिहून घेतानाचे दृष्य सभागृहात उमटले.अनेक नगरसेवकांचा संताप आयुक्तांच्या सभोवताली असणा-या अधिका-यांवरही उमटला.भाजपचे नगरसेवक डॉ.रवींद्र भाेयर यांनी तर आयुक्त मुंढे वर निशाना साधत आयुक्तांनी शहरात कोविड-१९चा सामना करण्यासाठी ज्या डॉ. विजय जोशी यांची कोविड सेंटरचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली मूळात तेच डॉक्टर नसून नॅचरोपॅथीचे पदवीधर असल्याची जळजळीत टिका केली.अश्‍या प्रमुखावर संपूर्ण शहराला महामारीपासून बचावासाठी सोडून देण्यात आले. राधास्वामी सत्संंग मंडळाच्या केंद्रावर पाच हजार रुग्णांची व्यवस्था ही अतिशय उत्तम होती मात्र प्रत्यक्षात ती तितकीच फोल होती कारण पीपीई किट घालून काेणत्या डॉक्टरला नागपूरच्या ४७ डिग्रीच्या उन्हात एका तासापेक्षा जास्त वेळ उपचार करता आले नसते,असे भोयर म्हणाले.

दटके,दयाशंकर तिवारी उद्या काय बोलणार याकडे लक्ष्-
आज स्थगन प्रस्तावावरील चर्चेदरम्यान अनेक नगरसेवकांनी मते मांडली असली तरी उद्या बुधवारी अद्याप माजी महापौर व भाजप आमदार प्रवीण दटके तसेच माजी स्थायी समिती अध्यक्ष् दयाशंकर तिवारी हे कोणते मत मांडतात याकडे आता सभागृहाचे लक्ष् लागले आहे. दटके-मुंढे यांच्यातील विळा-भोपळ्याचे सौख्य हे सर्वविदीत आहे.दयाशंकर तिवारी यांनी देखील व्हिीडीयोच्या माध्यमातून २० जूनच्या सभेनंतर आयुक्तांवर विशेष रोष व्यक्त केला होता. उद्याच्या सभेत या सर्व धुरंधर सदस्यांच्या प्रश्‍नांवर प्रशासनातर्फे आयुक्त तुकाराम मुंढे कोणते उत्तर सादर करतात,याकडे आता सर्वांचे लक्ष् लागले आहे.याशिवाय बंटी शेळके यांनी उघडपणे आयुक्तांच्या समर्थनार्थ गेल्या दोन दिवसांपासून मोठे आंदोलन उभारले आहे.त्यांच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष् लागले आहे.

 

Latest बातम्या