Homeनागपूर न्यूजमुंढेंचा सभागृहावर बहिष्कार!ज्या सभागृहात अपमान होतो त्या सभागृहात पुन्हा येणार नसल्याचे विधान

मुंढेंचा सभागृहावर बहिष्कार!ज्या सभागृहात अपमान होतो त्या सभागृहात पुन्हा येणार नसल्याचे विधान

मनपाच्या इतिसातील पहीलीच घटना:महापौरांनी पुन्हा दिली मंगळवारपर्यंत संधी

नागपूर,ता. २० जून: संपूर्णत: तीन महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर होणारी महापालिकेची सर्वसाधारण सभा ही मनपा आयुक्त तुकाराम मुंढे तसेच पदाधिकारी यांच्यातील ‘वाद-विवादातच’संपन्न होणार हे नागरिकांनीही गृहीत धरले होते मात्र,आयुक्त चक्क चिडून सभागृहच सोडून निघून जातील,हा आज शनिवार दि. २० जून २०२० च्या सभेत महापौरांसह संपूर्ण पदाधिकारी,प्रशासकीय अधिकारी,कर्मचारी तसेच पत्रकारांसाठीही अभूतपूर्व ‘धक्का’होता.

‘ज्या सभागृहात माझा अपमान होत असेल त्या सभागृहात मी पुन्हा येणार नाही’हे आयुक्तांचे विधान अप्पर आयुक्त राम जोशी यांनी महापौरांच्या आदेशाने सभागृहात वाचून दाखवले. प्रश्‍नोत्तराच्या काळात नगरसेवक हरीश ग्वालबंशी यांच्या पहील्याच प्रश्‍नावर हा संपूर्ण वाद उद् भवला.

ग्वालबंशी यांनी सभागृहात के.टी.नगर येथील कोव्हिड रुग्णालयाचा मुद्दा उपस्थित करताना जी इमारत शॉपिंग मॉलसाठी मंजूर करण्यात आली होती,तीच इमारात सभागृहाची परवानगी न घेता आयुक्तांनी कोव्हिड रुग्णालयात परिवर्तीत केली.हे करीत असताना त्यांनी निविदा काढल्या का?किती लाखांच्या निविदा होत्या?मूळात के.टी.नगर येथील रहीवासी हे एवढ्या दाटीवाटीच्या क्ष्ेत्रात कोव्हिड रुग्णालय बनत असल्याने भर उन्हात आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले. मी जनप्रतिनिधी असल्याने माझ्या घरावर मोर्चा आणला. आयुक्त हे कोणत्याही जनप्रतिनिधीच्या कोणत्याही समस्यांची दखलच घेत नाहीत. शहरात धारा १४४ लागू असताना मी आयुक्तांच्या घरावर मोर्चा घेऊन जाऊ शकत होतो का?जनतेच्या समस्यांचं काय?आम्ही कोणाकडे दाद मागावी?असे प्रश्‍न ग्वालबंशी यांनी उपस्थित केले.आयुक्त हे इंग्रजी राजवट नागपूरात राबवित असून आपल्याच देशाच इंग्रजी राजवटीचेही काही समर्थक होते,असा टोला त्यांनी हाणला.

यावर माजी महापौर व आमदार प्रवीण दटके यांनीही या इमारतीचे आरक्ष् ण बदलण्यात आले का?एखादी इमारत ही ज्या कामासाठी मंजूर करण्यात आली तीचे आरक्ष् ण बदलण्यासाठी कोणते नियम आहेत?अशी विचारणा केली. ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी आयुक्तांनी सुरवातीला उच्चार केलेल्या ‘हायपोटिकल’शब्दाचा मराठीत अर्थ विचारला. माझी इंग्रजी कच्ची आहे,असे सांगून के.टी.नगरच्या त्या इमारतीचे आरक्ष् ण कोणत्या नियमांर्तगत बदलण्यात आले,अशी विचारणा केली? यावर महापौरांनी प्रशासनाला उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले मात्र प्रशासनाकडे यावर कोणतेही उत्तर नव्हते. प्रशासकीय अधिकारी तालेवार हे मोघम उत्तर देत असल्याचे बघून दयाशंकर तिवारी यांनी यावर आक्ष्ेप नोंदवित आयुक्तांनी उत्तर द्यावे,अशी मागणी केली.

आयुक्त हे उत्तर द्यायला उभे राहून माहिती देत असताना,दयाशंकर तिवारी यांनी त्यांच्या माहितीवर आक्ष्ेप नोंदवित ‘पॉईंट ऑफ इन्फॉरमेशन’नोंदवले,यावर आयुक्तांनी चिडून ‘मला माझं बोलणं आधी पूर्ण करु द्या’असे म्हणाले.यावर दयाशंकर तिवारी यांनी चांगलाच संताप व्यक्त करीत ’तुम्हाला आता आमच्या अधिकारांवर चाबूक चालवायचे आहे का?’या सभागृहात आम्हाला बोलण्याचा संपूर्ण अधिकार असून,आम्ही तुमच्या उत्तरावर देखील महापौरांकडे आक्ष्ेप नोंदवू शकतो,अशी डरकाळी फोडली,महापौरांनी देखील सभागृहातील जनप्रतिनिधींना ‘आक्ष्ेप नोंदविण्याचा,माहिती विचारण्याचा’अधिकार असल्याचे आयुक्तांना सुनावले. यावर आयुक्तांनी ‘असंच जर चालत राहीलं तर मी सभागृहात राहणार नाही!’असे भाष्य केले.

महापौरांनी माईकवर आयुक्तांचे हे भाष्य उद् बोधीत केले. दयाशंकर तिवारी यांनी संताप व्यक्त करीत ’मी बोलतो तोपर्यंत माझ्यामध्ये बोलायचे नाही!’ही तुमची तानाशाही सभागृहात चालणार नसल्याचे ठणकावले,हा आमचा अधिकार आहे,तुमच्या चुकीच्या माहितीवर आक्ष्ेप नोंदवण्याचा आम्हाला १०१ टक्के अधिकार असल्याचे ते म्हणाले.ताबडतोब मुख्यमंत्र्यांना सांगून नागपूरातून चालते व्हा!असे बोलताच ग्वालबंशी यांनीही ’केवळ सभागृहच नव्हे तर नागपूरच सोडून निघून जावे’अशी पुश्‍ती जाेडली. तुम्ही संत तुकराम महाराज यांचे नाव कलंकित केले आहे,असे म्हणताच आयुक्तांचा संताप अनावर झाला आणि आयुक्तांनी टेबलवरील आपले कागद गोळा करीत ‘महापौरजी धन्यवाद’म्हणत सभागृहातून निघून गेले!

हापौरांनी सभागृह काही काळासाठी स्थगित करुन पुन्हा साधला आयुक्तांशी संवाद-
आयुक्त अश्‍या पद्धतीने निघून गेल्याने संपूर्ण सभागृह अवाक्‌ झाले. आयुक्तांच्या या अश्‍या बेजवाबदार वर्तवणूकीवर सभागृहात चांगलीच चर्चा रंगली.दयाशंकर तिवारी यांनी आयुक्तांनी आता जे सभागृहात ’कृत्य’केले यावर सभागृहाला कोणती कारवाई करण्याचा अधिकार आहे,याची माहिती देण्याची  विनंती केली.आयुक्त हे विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर न देता निघून गेले,हा सभागृहाचा अपमान नाही का?असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.

महापौरांनी आयुक्तांच्या या अश्‍या वर्तवणूकीवर सभागृहाला कोणती कारवाई करण्याचा अधिकार आहे,याची माहिती निगम सचिव यांनी द्यावी,असा आदेश दिला. मात्र निगम सचिव डॉ.रंजना लाडे यांनी ‘मनपाच्या इतिहासात पहील्यांदाज अशी घटना घडली त्यामुळे मला कारवाईविषयी माहिती नसल्याचे सांगितले’.यावर विधी अधिकारी यांच्याकडे ही उत्तर नव्हते.

महापौरांनी सभागृह १५ मिनिटांसाठी स्थगित करुन अति.आयुक्तांना फोनवर पुन्हा एकदा आयुक्तांशी संवाद साधून सभागृहात येण्याची विनंती  करावी,असे निर्देश दिले.मात्र आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अति.आयुक्तांना ’ज्या सभागृहात माझा अपमान झाला त्या सभागृहात मी पुन्हा येणार नसल्याचा ’निरोप दिला. महापौर संदीप जोशी यांनी देखील सभागृहाला सांगितले की त्यांनी देखील आयुक्तांशी संवाद साधला तेव्हा त्यांना देखील हेच उत्तर मिळाले!
मंगळवरी पुन्हा सभा-
महापौरांनी मंगळवार दि.२३ जून पर्यंत सभा स्थगित करत मनपाच्या इतिहासात पहील्यांदाज अशी घटना घडली असल्याचे सांगितले. सभागृहाचा अपमान केल्यास सदस्यांवर शिस्तभंगाची कारवाई होते मग आयुक्तांवर कोणती कारवाई करावी? काहीही झाले तरी ‘लोकशाहीचा खून नही होना चाहीये’असे महापौर म्हणाले. पुन्हा एकदा अति.आयुक्तांना निर्देश देतो त्यांनी मंगळवारी आयुक्तांना पुन्हा सभागृहात हजर राहण्याची विनंती करावी. आयुक्तांच्या मनात जे काही आहे,ते बोलण्याची,मांडण्याची त्यांना सभागृहात संपूर्ण संधी दिली जाईल.

याशिवाय प्रशासनाला महापौरांनी निर्देश दिले हरीश ग्वालबंशी यांनी जो विषय उपस्थित केला त्या प्रकरणात निश्‍चितच गडबड आहे. या पार्श्वभूमीवर स्थायी समितीचे अध्यक्ष्,बांधकाम समितीचे अध्यक्ष्,आरोग्य समितीचे सभापती,विधी समितीचे सभापती,बसपाच्या गटनेत्या यांच्या समितीने तात्काळ या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन तीन दिवसात मंगळवारी त्याचा अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवावा. या समितीने दटके, नगरसेवकिा परिणीती फूके तसेच ग्वालबंशी यांचे देखील म्हणने नोंदवून घ्यावे,असे निर्देश महापौरांनी दिले.

आज जी दूर्देवी घटना घडली त्याचे साक्ष्ीदार आपण झालोत.ही घटना इतिहासात कायमची नोंदवली गेली.कुठल्याही सदस्याच्या मनात आयुक्तांचा अपमान करण्याची भावना नव्हती,ते आपले म्हणने फक्त आक्रमकपणे मांडत होते.मात्र ‘प्रत्येक वेळेस मलाच बोलू दिलं पाहिजे, मी बोलत असलो की मध्ये कोणीही बोलायला नको’आयुक्तांचा हा अट्टहास हा अनाठायी होता.मी देखील त्यांच्या सभागृह स्थगित असताना संवाद साधला असता ’ज्या सभागृहात आयुक्तांचा मान राखला जात नाही त्या सभागृहात मला यायचे नाही’असे उत्तर मिळाले.
मी स्वत:विनंती केली सदस्यांचे म्हणने मनावर घेऊ नये मात्र त्यांनी स्पष्ट सांगितले ‘ज्या ठिकाणी माझा अपमान झाला त्या ठिकाणी मला यायचे नाही!

.हेच आयुक्त पदाधिकारी,ज्येष्ठ नगरसेवक,विरोधी पक्ष् नेते त्यांना भेटायला जातात तेव्हा तीन-तीन तास त्यांना बाहेर बसवून ठेवतात. हे जनप्रतिनिधी वयक्तिक काम घेऊन आयुक्तांकडे गेलेले नसतात तर शहरातील जनतेचे प्रश्‍न घेऊनच जात असतात. तेव्हा जनप्रतिनिधींचा तो अपमान चालतो का?आजची आयुक्तांची वर्तवणूक ही दू:खद,निषेधार्ह्य असून त्यांच्या या वर्तवणूकीप्रति मी तीव्र नाराजी व्यक्त करतो.मात्र तरी देखील सभागृहाच्यावतीने मी आयुक्तांना पुन्हा एकदा विनंती करतो,शहराच्या विकासाच्या प्रश्‍नावर राग बाजूला ठेऊन सभागृहात यावे. मंगळवारी सकाळी ११ वा.आयुक्त हे सभागृहात उपस्थित राहतील अशी आशा महापौरांनी व्यक्त केली.

सभागृहात वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून येतात नगरसेवक,आयुक्तांनी समजून घ्यावे-ज्येष्ठ नगरसेवक प्रफूल्ल गुडधे पाटील

सभागृहाचे कामकाज कसे चालावे यासाठी निश्‍चित अशी परंपरा निर्माण झाली आहे. कधीकधी परंपरेच्या बाबतीत काही चूका होऊ शकतात.मात्र लोकशाहीत सभागृह हे सर्वोच्च आहे.सभागृहाची उंची ही जनप्रतिनिधी व प्रशासन दोन्ही मिळून कुठपर्यंत गाठू शकतात हे त्यांच्या वागण्यावरु कळतं.याच सभागृहात विधी मंडळात होते त्या उंचीची चर्चा झाल्याचा इतिहास आहे. खरे तर आयुक्तांना ‘माननीय आयुक्त ’संबोधण्याची प्रथा नाही मात्र आपले सभागृह हे आयुक्तांना देखील मान देत ही उपमा लावते.

तरी देखील आज पहील्यांदाज असा दूर्देवी प्रसंग सभागृहाच्या इतिहासात घडला.यावर सभागृहातून ‘शेम शेम’असे स्वर उमटले.आयुक्त-पदाधिकारी संघर्ष हा काही नवा नाही.मात्र हे भांडण संपत्ती किवा सातबाराचे नसून खूर्चीवर आसनस्थ व्यक्तिप्रति नाही तर खूर्चीशी निगडीत अधिकारांप्रति आहे.आयुक्तांप्रति कोणत्याही जनप्रतिनिधीचा व्यक्तिक द्वेष नाही. आयुक्तांनीही समजून घ्यावे,सभागृहात येणारे हे वेगवेगळ्या पार्श्वभूमीवरुन येणारे असतात.त्यांची बोलण्याची पद्धत,मुद्दा मांडण्याची पद्धत वेगळी राहू शकते. आयुक्त हे काही दहावी,बारावी उत्तीर्ण नसून आयएएस अधिकारी आहेत.प्रत्येक गोष्ट त्यांच्याच मनासारखी घडली पाहिजे,हा त्यांचा दुराग्रह योग्य नाही.
आम्हीही सभात्याग करतो,निषेध व्यक्त करतो.माझे व दटके यांचे सभागृहात सतत खटके उडत राहतात. मात्र ते खटके मुद्दांसाठी असतात. आयुक्तांना जर एखादी गोष्ट आवडली नाही, तर त्यांनी नाराजी व्यक्त करायला हवी होती, कामकाजातून काढून टाकण्याची महापौरांना शिफारस करायला हवी होती,मात्र आयुक्तांनी असे न करता सभागृहाचाच त्याग केला,हा केवळ सभागृहाचाच नव्हे तर संपूर्ण नागपूरच्या नागरिकांचाच अपमान असून त्यांच्या या कृतीचा मी निषेध व्यक्त करतो.या संघर्षात ना आयुक्त ना पदाधिकारी यांचे काही नुकसान आहे, नुकसान फक्त या शहरातील जनतेचे होईल.

महाकाळकर यांनी सादर केलेला अविश्‍वास प्रस्ताव महापौरांनी फेटाळला-
सभागृहात आज तीन स्थगन प्रस्ताव मांडण्यात आले.यात शिवसेनेच्या नगरसेविका मंगला प्रसाद गौरे यांनी कामगार नगर तसेच रमणा मारोती भागात सभागृहाने मंजूर केलेल्या रस्ते,गडर लाईन,रसत्याचे डांबरीकरणाच्या कामाला आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्थगिती दिली. परिणामी आता नगरसेवकांच्या घरावर नागरिक चालून येत आहेत.कालच्या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले. आम्ही नगरसेवक हे अकार्यक्ष्म आणि ते आयुक्त किती कार्यक्ष्म ही खूबी आयुक्तांना शासनाकडे सिद्ध करायची आहे का?असा सवाल विचारित,महापौरांनी तातडीने हस्तक्ष्ेप करुन याची दखल घेण्याचे विनंती करण्यात आली.दुसरा स्थगन प्रस्ताव काँग्रेसचे नगरसेवक नितीन साठवणे यांचा असून यात मुंढे यांनी मनमानेल त्याप्रमाणे कोविड-१९च्या नावाने शहरातील अनेक क्ष्ेत्र हे प्रतिबंधित केले.यात नगरसेवकांना विश्‍वासात घेण्यातच आले नाही.शेकडो नागरिकांना विलगीकरणात नेण्यात आले.या विलगीकरण केंद्रात नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. मात्र या विरोधात आवाज उठवताच लकडगंज पोलीस ठाण्यात माझ्या विरोधात आयुक्तांनी तक्रार नोंदवली असून महापौरांनी याची दखल घेण्याची विनंती करण्यात आली.

तर तिस-या स्थगन प्रस्ताव हा काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक संजय महाकाळकर यांनी आयुक्तांच्या विरोधात अविश्‍वास प्रस्तावाचा ठेवला होता.मात्र महापौरांनी महाकाळकर यांच्या प्रस्ताव फेटाळीत उर्वरित दोन्ही स्थगन प्रस्ताव स्वीकृत केले.

दटकेंनी घेतला प्रशासकीय अधिकारी तालेवरांचा क्लास-

ग्वालबंशी यांनी सभागृहात उपस्थित केलेल्या के.टी.नगर येथील रचना सृष्टि या इमारतीचे आरक्ष् ण शॉपिंग मॉल मधून कोविड रुग्णालयात बदलण्याविषयी हे कोणत्या नियमात बसतं,यावर चांगलाच क्लास प्रशासकीय अधिकारी तालेवार यांचा घेतला.हे आरक्ष् ण बदलण्यासाठी निविदा काढल्या का?काढण्याआधी आरक्ष् ण तपासले का?दवाखान्यासाठी टेंडर नसताना असे टेंडर काढता येते का?नाईक तलाव तांडापेठ येथील अतिशय गरीब वस्तीत ई-लायब्ररीचा प्रस्ताव मांडण्यात आला असता त्या ठिकाणी बाजाराचे आरक्ष् ण असल्याचे तुम्हीच सांगितले होते व हा प्रस्ताव नाकारला होता.मग आता शॉपिंग मॉलचे आरक्ष् ण कोणत्या नियमांअंतर्गत बदलण्यात आले?या प्रस्तावार लेखा परिक्ष क पासून तर या बेकायदेशीर प्रस्तावाला मंजूरी देणा-या सांख्यिकी अधिका-यापर्यंत,बांधकाम विभागापासून तर आरोग्य विभागातील अधिकारी अश्‍या सर्वांवरच आरोप निश्‍चित करुन कारवाई करण्याची मागणी दटकेंनी महापौरांकडे केली.

२४ लाख ९६ हजारांचा निधी या कोविड रुग्णालयासाठी खर्च करण्यात आल्याची माहिती तालेवारांनी देताच पुन्हा दटके यांनी तालेवारांना नियम विचारले. यावर उत्तर देताना स्थायी समितीची पूर्व मान्यता घेणे आवश्‍यक असल्याचे तालेवारांनी सांगितले.दटके यांनी यावर बोलताना आरोग्य विभागावर परखड ताशेरे ओढत,आरोग्य विभागाची ‘चालबाजी’याकडे महापौरांचे लक्ष् वेधले.के.टी.नगर हा एकमेव दवाखाना नाही,तर गांधीनगर येथील दवाखान्यात देखील २४ लाख ९७ हजाराचा पहीला मजला,मग पुन्हा २४ लाख ९७ हजाराचा दुसरा मजला अशी बिले काढण्यात आली.आयसोलेशन दवाखाना बांधला त्यात शौचालयच बांधले नाही.पुन्हा मनपाच्या आरोग्य विभागाने आयुक्तांकडून बिल सेंशन करुन घेतले.आयुक्तांनी स्मार्ट सिटीचा ओएसडी काढला मात्र स्वत:साठी नवीन ओएसडी नेमला.हेच प्रशासकीय अधिकारी जनप्रतिनिधी नियमांप्रमाणे काम करतात तर त्यांचे फाईल नियमांवर बोट ठेऊन अडवतात,असे दटके म्हणाले.

नगरसेविका डॉ. परिणिता फूके यांनी आयसोलेशन दवाखान्यात संपूर्ण कामे हे स्थायी समितीच्या निधीतून झाली असून आयुक्तांनी फक्त या रुग्णालयात एक आयसीयू केबिन निर्माण करुन फेसबूकवर संपूर्ण श्रेय घेतल्याचा आक्ष्ेप नोंदवला.तर दयाशंकर तिवारी यांनी आयसोलेशन दवाखान्यात आयसीयू हवा हे पत्र कोणत्या अधिका-याने  दिले,अशी विचारणा केली.तालेवार यांनी असे पत्र आले नाही,फक्त चर्चेतून हा विषय पुढे आला असल्याचे सांगितले.दवाखान्याचे निरीक्ष् ण केल्यानंतर आयुक्तांनी हा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले.यावर दयाशंकर तिवारी यांनी आयुक्तांची ही कृती म्हणजे ‘नियमबाह्य कामे,कागदांमध्ये भ्रष्टाचार व जनप्रतिनिधींची बदनामी’करण्यासाठीच केली असल्याचा आरोप केला.या संपूर्ण कामांवर आयुक्तांकडे उत्तरच नव्हते त्यामुळेच त्यांनी सभागृहातून पळ काढला,असा घणाघाती आरोप देखील त्यांनी केला. मुंढे यांच्यामध्ये ‘श्रेष्ठतेच्या भावनेसोबतच न्यूनगंड’देखील असल्याचा घणाघात त्यांनी केला.यालाच ‘अहसासे कमजर्फी’असे म्हणतात,‘काहीच नसताना मी खूप काही आहे’हेच अशी माणसे दर्शवतात.

विरोधी पक्ष् नेते तानाती वनवे यांनी देखील तालेवारांना नंदलाल समितीचा नियम वाचून दाखवण्याची विनंती महापौरांना केली असता,या नियमाप्रमाणे सलग कामाचे तुकडे करता येत नाही मात्र आयुक्तांनी एकाच इमारतीमध्ये दोन वेगवेगळ्या निविदा काढून कामाचे तुकडे तर केलेच मात्र शासनाच्या निधीचा दुरुपयोग देखील केला असल्याचा दयाशंकर तिवारी यांनी केला.

महापौर ’जी’वर रणकंदन-
सभेच्या प्रारंभीच दयाशंकर तिवारी यांनी महापौरांना उद्देशून आयुक्तांच्या कक्ष्ेत एक प्रशासकीय अधिकारी भेटायला गेला असता त्या अधिका-याचे समर्थक आयुक्तांच्या कक्ष्ा बाहेरच त्या अधिका-यासाठी ‘जिंदाबाद,आगे बढो,हम तुम्हारे साथ है’अश्‍या घोषणा देतात तेव्हा आयुक्तांनी त्या अधिका-यावर कोणती कारवाई करणे अपेक्ष्ति आहे?असा सवाल विचारला. यावर आयुक्तांनी ’तुम्ही हायपोटिकल प्रश्‍न विचारला तर मी उत्तर देऊ शकणार नाही,मला तो कोण अधिकारी होता किंबहूना तुम्ही कोणत्या ईव्हेंटविषयी विचारता आहात, त्याचे नाव सांगा’असा प्रतिप्रश्‍न केला. दटके यांच्या मागणी वरुन निगम सचिव डॉ.लाडे यांनी कोणती कारवाई केली जाते याचे ‘लांबलचक ’वाचन केले. यावर ‘ईव्हेंट’हा आयुक्तांच्या डोक्यात गेलेला असल्याचा वार दयाशंकर तिवारी यांनी केला.आयुक्त स्वत:ला शिक्ष्ा देऊ शकत नाही परिणामी महापौरांनी आता राज्य शासनाकडे आयुक्तांच्या सर्व भोंगळ कारभाराविषयी कारवाईचे निर्देश द्यावे अशी मागणी केली.

भट सभागृहाबाहेर स्टार बसचे चालक हातात पाटी घेऊन मूक आंदोलन करीत आहेत मात्र आयुक्तांचे समर्थक हे जोरजारात बाहेर नारेबाजी करीत आहेत.विशेष म्हणजे आयुक्त हे उभे राहून उत्तर देताना ‘माननीय महापौर,माननीय सभागृह’एवढंच संबोधतात,सभागृहाची परंपरा ही माननीय ‘महापौर जी’असे संबोधण्याची असल्याचा टोला दयाशंकर तिवारी यांनी हाणला.हे देखील आयुक्तांना चांगलेच झोंबले. यानंतर मात्र त्यांनी प्रत्येकवेळी ’जी’या शब्दावर जाेर देऊनच उत्तराला सुरवात केली.

विशेष म्हणजे ही सभा कोविड-१६ च्या संदर्भात बोलावली होती मात्र सदस्यांच्या विनंतीवरुन आधी एक तास प्रश्‍नोत्तराचा तास घेण्याचे निर्देश महापौरांनी दिले असता हरीश ग्वालबंशी यांच्या पहील्याच प्रश्‍नावर सभागृहात एवढे रणकंदन माजले.नियमाप्रमाणे आयुक्तांनी कोविड संदर्भात जे काही निर्णय घेतले अथवा उपाय योजिले त्याची माहिती महानगरपालिकेला कळविले पाहीजे,हा दटके यांच्या मागणीवरुन निगम सचिव यांनी नियम वाचून दाखवताच पुन्हा ‘महापालिका’म्हणजे काय?महापालिकेचे काय अधिकार आहेत?यावर पुन्हा दटके व दयाशंकर तिवारी यांनी प्रश्‍ने उपस्थित करुन, आयुक्तांनी जे काही उपाय केले अथवा आदेश दिले,ते महापालिकेला कळवणे आयुक्तांवर बंधनकारक असताना त्यांनी ते कळवलेच नाही, त्यामुळे दोषी कोण?हा विषय अधिक महत्वाचा असून यावरच चर्चा करण्याची मागणी तिवारी यांनी केली.

संविधानाच्या प्रास्ताविकेचे अभिवाचन करुन महापौरजी तुम्ही खूप चांगलं केलं कारण सभागृहात अशी देखील माणसे आहेत ज्यांना संविधानाने दिलेले अधिकार व कर्तव्य माहीतीसुद्धा नाही,जे संविधानाचा नुसता अपमानच करीत नाही तर सर्रास उल्लंघन देखील करतात,अश्‍या शब्दात दयाशंकर तिवारी यांनी आयुक्तांचा निषेध नोंदवला.

परिणामी सभेच्या सुरवातीपासून ‘आयुक्त विरुद्ध पदाधिकारी ’ यांच्यात शाब्दिक चकमकी उडत जाऊन आयुक्तांच्या सहनशीलतेचा विस्फोट झाला व त्यांनी ‘न भूतो न भविष्यती’असे पाऊल उचलून,सरळ आपली कागदे उचलून सभागृहाचाच बहिष्कार करीत निघून गेले!

Latest बातम्या