
महापौरांनी घेतली आज दुस-यांदा बैठक
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता. १८ जून: शनिवार दि. २० जून रोजी होणारी महापालिकेची सर्वसाधारण सभा होणारच,ही सत्ता पक्षाची ‘मागणी ’आणि ‘अधिकार‘ आता अधिक टोळवता येणे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनाही शक्य नसल्याने त्यांनी राज्य शासनानीच सभेबाबत निर्णय घेण्याचे पत्र ठाकरे सरकारला पाठवले. यामुळे आता त्यांना सभेत अनुपस्थित राहण्याची जणू मुभाच मिळाल्याचे सांगितले जात आहे.सभा घेण्यासाठी मी अडवले नाही असे ते सांगतील,दूसरीकडे शासनाचा निर्णय झाला नसताना सभा घेण्यात आली त्यामुळे मी अनुपस्थित राहीलो,असे कारण देखील सांगायला आयुक्त ‘मोकळे’ झाले असल्याची चर्चा आता रंगली आहे.यालाच मनपातील कर्मचारी ‘दूर की कौडी’असा शब्द उच्चारीत होते! दूसरीकडे आज गुरुवारी पुन्हा महापौरांनी सभेबाबत मनपा मुख्याल्यात बैठक घेतली असून परवाची सभा ही फक्त भरणारच नाही तर चांगलीच‘ वादळी’होणार,यावर जणू शिक्कामोतर्ब झाले आहे.
या सभेत आयुक्त हे अनुपस्थित राहतील अशी चर्चा मनपात आज चांगललीच रंगली. आयुक्तांनी सभेचा निर्णय हा राज्य शासनाकडे टोळवल्याने शासनाकडून एवढ्या तातडीने उत्तर येणे अपेक्षित नसल्याने ’परवानगी नसताना तुम्ही तुमच्यास्तरावर सभा घ्यावी’असे आयुक्तांचे उत्तर सत्ताधा-यांना प्राप्त होण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे स्वत:आयुक्त या सभेला सत्ताधा-यांची ’बेकायदेशीर कृती’मानत असल्याने अनुपस्थितच राहतील असे सांगितले जात आहे.
आपल्या जागी ते अति.आयुक्तांना प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवतील. परिणामी दोन्ही ‘जोशींच्या’(महापौर संदीप जोशी,अति.आयुक्त राम जोशी)साक्ष्ीने ही सभा वादळी ठरणार असल्याची चर्चा आहे.
इतिहासातील पहिलीच घटना-
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आयुक्तांनी प्रशासनाचे प्रमुख म्हणून उपस्थित राहणे गरजेचे आहे. त्यांच्याच उपस्थितीत प्रशासकीय जवाबदारी ही स्वीकारली जाते. सभेत होणा-या निर्णयांची अंमलबजावणी करण्याची जवाबदारी ही आयुक्तांवर असते.मनपाची सर्वसाधारण सभा म्हणजे संपूर्ण शहराच्या प्रश्नांना वाचा फोडणारी अति महत्वाची सभा मानली जाते. यात सर्वच पक्षाचे नगरसेवक हे आपापल्या प्रभागातील समस्या पटलावर मांडतात. या समस्यांबाबत महापौर निर्देश देतात ज्याची अंमलबजावणी आयुक्त करीत असतात. सभेत जर काही नियमबाह्य ठराव पारित झालेत तर आयुक्त त्याचा अहवाल शासनाला पाठवतात मात्र सर्वसाधरण सभा ही शहरातील नागरिकांसाच्या समस्त समस्यांना,प्रश्नांना वाचा फोडणारी अत्यंत महत्वाची सभा असल्याने,या सभेला ‘शहराची सभा’,नगर सभा’असे देखील संबोधले जाते.
अश्या या सभेचं महत्व आएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांना देखील माहिती आहे मात्र ही सभा झाल्यास सभेत ‘काय होणार?’याची पूर्वकल्पना असल्यानेच त्यांनी ‘कोरोनाचे’ कारण देत ही सभा रद्द करण्याचे विनंती पत्र महापौरांना पाठवले. यानंतरही सत्ता पक्ष् सभेसाठी ठाम असल्यानेच,सभेचा प्रश्न शासनाकडे टोळवण्याची नेहमीचे ‘चातुर्य’आयुक्तांनी अंगिकारले असल्याचे बोलले जात आहे.आपलेच ‘वाभाडे’ऐवढे तास ऐकण्यात कोणाला स्वारस्य असतं?अश्या मानवी स्वभावाचे कांगोरे देखील आयुक्तांच्या या निर्णयामागे मनपात आज उलगडण्यात आले.
मात्र,असे असले तरी मनपाच्या इतिहासात हे पहिल्यांदाज घडेल असे देखील जाणकार सांगत आहे. आयुक्तांची ‘मर्जी’नाही म्हणून ते शहरात उपस्थित असताना देखील सभेला उपस्थित राहणार नसतील तर जनतेमध्येही फार चुकीचा संदेश जाईल,असे आता खासगीत बोलले जात आहे.महत्वाचे म्हणजे महापालिकेची शेवटची सभा ही २० फेब्रुवरी रोजी भरली होती,यानंतर २० मार्चची सभा रद्द करण्यासाठी आयुक्तांनी वेळेवर १९ मार्चरोजी महापौरांना पत्र पाठवले.शहरात कोरोनाची परिस्थती पाहता महापौरांनी आयुक्तांची विनंती मान्य केली होती.
यानंतर २० एप्रिल व २० मे रोजी ही महापौरांनी सभा घेण्याचा आग्रह धरला नाही व प्रशासनाला सहकार्य केलं मात्र तीन महिन्यात , मनपाची सर्वसाधारण सभा न भरल्यास मनपाच बर्खास्त केली जाऊ शकते,असा कायदा असल्याने महापौरांना यावेळी २० जून रोजी सभा घेणे हे घटनात्मकरित्या देखील गरजेचे आहे. या सभेत विषय पत्रिकेतील विषय हे गंभीर नसले तरी सभा होणे अपरिहार्य असल्यानेच महापौर संदीप जोशी यांनी ‘सभा होणारच’अशी डरकाळी फोडली आहे.मात्र सभा झाल्यास ‘किती जणांची तोंड बंद करु शकतील’हा प्रश्न आयुक्तांनाच भेडसावला असल्याने त्यांनी बुधवारी यावर तोडगा शोधून ,शासनाकडेच या सभेबाबत निर्णय घेण्याचा प्रस्ताव पाठवून मोकळे झाल्याचे सांगितले जात आहे.
आयुक्त नेमके जुमानतात तरी कोणाला?
आयुक्त तुकाराम मुंढे हे महापौरांना जुमानत नाहीत, स्वत: महापौर सांगतात मुंढे हे त्यांचे फोन देखील उचलत नाहीत किवा त्यांचे मॅसेज वाचून देखील उत्तर देत नाहीत. शहराचे प्रथम नागरिक असणा-या महापौरांनाच जर आयुक्त ‘ही अशी वागणूक’देत असतील तर ते नेमके कोणाला जुमानतात?असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
यामागे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे ‘संपूर्ण पाठबळ’असल्याची कुजबुज ऐकू येते. आयुक्त हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील ’जुमानत’नसल्याचे उदाहरणासह बोलले जात आहे. राज्यात महाविकासआघाडीची सरकार असून या सरकारमध्ये राष्ट्रवादी पक्ष्ाची तसेच राष्ट्रवादी पक्ष्ाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचीच संपूर्ण नियंत्रण’असल्याचे राज्याची जनता पहात आहे. मुख्यमंत्री हे शरद पवार यांना विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घेत नाही,असे बोलले जात आहे.

याच राष्ट्रवादीचे दिग्गज नेते जयंत पाटील तसेच हसन मुश्रीफ यांच्यासोबत आयुक्त मुंढे यांचा हास्यविनोदाचा एक फोटो चांगलाच व्हायरल झाला होता. नागपूरातील नागरिक हे देखील ‘प्रथमच‘मुंढे यांना एवढे ‘दिलखुलास’हसताना बघून आश्चर्यचकीत झाले होते. या फोटोवर महापौर संदीप जोशी यांनी देखील ’ते एवढे दिलखुलास हसतात,हे पहील्यांदाज कळले, थोडासा हास्यविनोद त्यांनी आमच्याशी देखील केला असता तर चांगला समन्वय जुळून आला असता!अशी कोटी केली होती. नागपूर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गड आहे याशिवाय नागपूर महापालिकेत गेल्या १३ वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. शरद पवार यांना हीच भाजपची सत्ता सातत्याने ‘डोळ्यात’खूपत असल्याने,मुंढे यांना ‘एड्स’विभागातून ‘डायरेक्ट’नागपूरात पाठविण्यात आले. ऑक्टोबरमध्ये महाविकासआघाडीचा ’संसार जुळला’व जानेवारीत लगेच महाराष्ट्रातील ‘बहूचर्चित‘ व ‘बहूवादादित’ नाव मुंढे यांना नागपूर महापालिकेत पाठविण्याचा निर्णय झाला.
नुकतेच महापौरांनी पत्र परिषदेत ’मुंढे हे पूर्वग्रह दूषित मानसिकतेतूनच नागपूरात आले‘असल्याचा आरोप केला,यामागे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष्ाच्या मोठ्या नेत्यांचे संपूर्ण पाठबळ मुंढे यांना असल्यानेच महापौरांच्या या विधानाला आणखी बळ मिळाले.
मात्र,महराष्ट्र असो किवा नागपूर महानगरपालिका,कोरोनाच्या या अति गंभीर संकटकाळात महाविकासआघाडीच्या या अश्या ‘कारभारामुळे’राज्यातील जनताच शेवटी हवालदिल होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तर महाराष्ट्राच्या जनतेलाच या कोरोना काळात ’प्रशासकीय’अधिका-यांच्या बेजवाबदार ’मेहरबानी’वर सोडले असल्याचा देखील संताप बुद्धिजीवी व्यक्त करित आहेत.

आमचे चॅनल subscribe करा