
मानसेवींचा निर्णयही घ्यावा लागला मागे
नाशिक-सोलापूरकर चालवतात आहे मुंढेंची सोशल मिडीया मोहीम:नागपूरकरांना संशय
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता.१५ जून: महापालिकेच्या आरोग्य विभागात मानसेवींना(ऑनररी) महिना ५ हजार रु.मानधनावर आठवड्यातून दोन-तीन दिवस आरोग्य विषयक कामे आजवर मिळत होती.सनदी अधिकारी तुकाराम मुंढे हे नागपूर महानगरपालिकेत आयुक्त पदी रुजू झालेत आणि इतर अनेक निर्णर्यांसोबतच त्यांनी, या पुढे मानसेवींची सेवा घेणार नसल्याचे ‘फरमान’सोडले,मात्र मुंबईतून सूत्र हलली आणि मुंढेना अल्पावधीतच आपलाच निर्णय बदलून मानसेंवींच्या नियुकत्या करण्याचे आदेश चार दिवसांपूर्वी काढावे लागले,यावरुन मुंढे यांच्यावरील ‘मुंबईवरुन’ ‘वाढलेला’दवाब स्पष्ट दिसून पडतोय.
मानसेवींच्या नियुकत्या करण्याची फाईलच मुंढे यांनी बैठकीत फेकून दिली होती मात्र आता याच मानसेंवींच्या नियुकत्या तातडीने करण्याची ‘हतबलता’त्यांच्यावर ओढवली असल्याचे या निर्णयाने सिद्ध झाले. मानसेंवींची सेवा मुंढे यांच्या काळात गेल्या अनेक महिन्यांपासूनच पूर्णत: खंडीत करण्यात आली होती,मग असे काय कारण घडले ज्यामुळे मुंढे यांना आपला निर्णयच बदलावा लागला?
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याने आता या मानसेंवींची गरज निर्माण झाली,असे कारण असल्यास मग कोरोनाचे नियंत्रक पदावर मुंढे यांनी ज्यांना बसवले आहे,त्यांची कामगिरी आतातरी ते तपासणार आहेत का?असा प्रश्न आता दबक्या आवाजात मानसेंवींच विचारीत आहेत!मूळात नॅचरोपॅथी शाखेतील अधिका-यालाच चक्क काेरोना नियंत्रक पदाची जवाबदारी सोपवण्यात आली असून, ज्यांना कायद्याने ‘डॉक्टर’ही उपाधी देखील लावता येत नाही,त्यांनाच एवढया जवाबदारीचे पद देण्यात मुंढे यांनी धन्यता मानली.मनपातील हे कोरोना नियंत्रक २००९ पासून ते मनपात कंत्राटी पदावर कार्यरत होते.२०१५ मध्ये त्यांना सेवेत कायमस्वरुपी करण्यात आले मात्र शहरातील ‘कोरोना’सारख्या महामारीच्या विळख्यात सापडलेल्या नागपूरकरांचा जीव वाचवण्यासाठी मनपातील अति.आयुक्तांच्या अगदी ‘खास’अधिका-यांची वर्णी, पात्रता नसताना लागतीच कसे?असा प्रश्न कोरोनाच्या पहील्या टप्प्यापासूनच विचारला जात आहे.
कोरोनाने आजच शहरात हजारांचा टप्पा ओलांडला आहे. अर्थातच मुंढे यांनी अति.उपायुक्तांच्या ‘सल्ल्यानुसार’जी चमू तयार केली तिचेच हे ‘अपयश’म्हणावे लागेल,असे आता बोलले जात आहे.
नुकतेच विधान सभा अध्यक्ष् नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली नागपूरातील काही आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मुंढे यांच्या कारभारावर तीव्र नापसंदी जाहीर केली होती.यानंतर मुख्यमंत्री यांनी मुंढे यांचा चांगलाच ‘क्लास‘घेतल्याचे खासगीत बोलले जात आहे. विशेष म्हणजे,२८ फेब्रुवारी रोजी मुंढे यांनी आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरची देहबोली,भाषा,आवाजाचा चढ-उतार,आत्मविश्वास यात अचानक मोठे परिवर्तन घडून आताच्या मुंढे यांच्या आवाजात किवा देहबोलीत तो ’ व-हाडी ठसकाच’गायब असल्याचे निरीक्ष् ण हे खासगीतही अनेकांनी नोंदवले व ‘वो है जरा खफा..खफा’अशी एका प्रसिद्ध गाण्याची पुस्ती देखील त्याला जोडल्याचे दिसून आले.
मुंढेंची बदली रोखण्यासाठी ‘पीपल्स कॉन्फिडन्स मोशन’ मोहीम सोलापूर-नाशिककरांची!
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी राजकीय नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांवर दवाब निर्माण केला जात असल्याची माहिती सुनियोजित पद्धतीने सोशल मिडीयावर ‘व्हायरल’ झाली आणि…यानंतर सुरु झाले ‘पीपल्स कॉन्फिडन्स मोशन’ ची मोहीम. यात मुंढे यांना भाजप तसेच विरोधी पक्ष् काँग्रेसच्या नेत्यांचा विरोध असला तरी आयुक्तांना नागपूरकरांचे किती मोठ्या प्रमाणात समर्थन प्राप्त आहेत हे सिद्ध करण्यासाठी ही ऑन लाईन स्वाक्ष् री मोहीमच राबविण्यात आली.यात तीन दिवसात २२ हजार नागरिकांनी स्वाक्ष् -या केल्या. मात्र ही संपूर्ण मोहीम नागपूरकर राबवित नसून नाशिक-सोलापूरकर राबवित असल्याचा आरोप आता केल्या जात आहे.
मूळात या संबधीच्या अनेक पोस्टवर मराठी भाषेचा जो ‘बाज’उमटला आहे त्यात कुठेही वैदर्भिय किवा नागपूरी भाषेचा अंश दिसत नाही. तर मराठवाडा,नाशिक येथील बोलीभाषेचे प्रमाण हे अत्यधिक असल्याची चर्चा आता रंगली आहे. परिणामी मुंढे यांना आपले समर्थन सिद्ध करण्यासाठी नागपूरकर गवसलेच नाहीत का?असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. गेल्या सहा महिन्यात आयुक्त मुंढे यांनी शहराचा चेहरा बदलला. कोरोना साथीच्या रोगात त्यांची भूमिका महत्वाची आहे.अगदी कमी खर्चात विलगीकरण,मजूर व परप्रांतीय मजुरांसाठी निवारा,भिक्ष्ेकरी यांच्यासाठी कौशल्य विकास उपक्रम, शहराचे सर्वेक्ष् ण यामुळे कोरोनावर नियंत्रण शक्य झाले,त्यामुळे आमचा मुंढे यांच्यावर विश्वास असून अशा स्थितीत त्यांची बदली करु नये,असे ऑनलाईन पत्रच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आले आहे,मात्र या मोहीमेत मूळ ‘नागपूरकर’किती ?नाशिक आणि सोलापूरकर किती ?यावरच संशोधन करण्याची आता मागणी पुढे आली आहे.
ट्रस्ट ले आऊटसंबंधी निर्णयही घ्यावा लागला मागे-
मुंढे यांनी शहरातील प्रतिबंधित क्ष्ेत्राबाबत मनमानेल तसा निर्णय घेतला असल्याचा आक्ष्ेप भाजप तसेच काँग्रेसच्या आमदारांनीच घेतला असल्यामुळे या सबंधीच्या अनेक तक्रारी या मुख्यमंत्र्यांपर्यत पोहोचल्या होत्या. महत्वाचे म्हणजे जनप्रतिनिधी,आमदार,नगरसेवक यांना कोणतीही सूचना न देता हे निर्णय राबविण्यात आले परिणामी अनेक ठिकाणी शहरात आंदोलन झाले. ट्रस्ट ले आऊटमध्ये १४ दिवसांपासून एकही कोरोना पॉझिटीव्ह आढळला नसल्यामुळे तसेच या भागातील शेकडो नागरिकांचे अहवाल हे निगेटीव्ह आल्यामुळे या क्ष्ेत्राचे प्रतिबंधक तातडीने हटवण्याची मागणी येथील नागरिक करीत होते मात्र,मुंढे यांनी शासनाचे नियम यावर बोट ठेवीत २८ दिवसांनंतरच प्रतिबंध हटविले जातील,अशी ‘नेहमीचीच’आठमुठी भूमिका घेतली परिणामी आ.विकास ठाकरे यांनी ही तक्रार मुंबईपर्यंत नेली.
सध्या राज्यात महाविकासआघाडीची सत्ता आहे.यात काँग्रेसचीही भूमिका महत्वाची असल्याने काँग्रेस पक्ष्ाचेच आमदार मुंढे यांच्याविरोधात तक्रार करीत असल्याने मुख्यमंत्र्यांनी मुंढे यांना चांगलीच ’समज’दिली असल्याची चर्चा रंगली.मुख्यमंत्र्यांच्या कानपिचक्यांनंतर ट्रस्ट ले आऊटचे प्रतिबंध २८ दिवसांच्या आधीच काढण्याची नामुष्की आयुक्तांवर ओढवली.
एकीकडे सामान्य वस्तीतील सामान्य नागरिकांना प्रतिबंधित क्ष्ेत्रात महीनोनं महिने बंदिस्त ठेवायचे तर दूसरीकडे धनदांडग्यांनी दिलेल्या पार्टीनंतरही त्यांचे क्ष्ेत्र प्रतिबंधित न करता फक्त त्यांची ‘ईमारत’ प्रतिबंधित करण्याचा ‘अनोखा’ व ‘चमत्कारी’निर्णय आयुक्तांनी घेतल्याने नागपूरकरांच्या विश्वासाला आणखी तढा गेल्याची चर्चा सोशल मिडीयावर रंगली .शिस्तप्रिय,प्रामाणिक व कर्तव्यकठोर हेच ते मुंढे का?असा प्रश्न आता विचारला जात आहे.
ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनीही मुंढेंना घेरले-
नुकतेच भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी देखील पत्र परिषद घेऊन मुंढे यांनी प्रतिबंधित क्ष्ेत्रात कत्तलखाना कसा सुरु ठेवला यावर प्रश्नांची सरबत्ती केली.नाईक तलाव येथील एका तरुणाने मोमिनपुरासारख्या प्रतिबंधित क्ष्ेत्रातून बिर्याणी पार्टी साजरी केल्याचे वृत्त झळकले,या एका पार्टीमुळे २०० च्या वर कोरोना बाधित झाले तर ७०० च्या वर नागरिकांचे विलगीकरण करण्यात आले होते.आरोग्य आधिकारी डॉ.दासरवार यांनी शहरात मोमिनपुरा,गिट्टीखदान व भांडेवाडीत असे तीन कत्तलखाने असल्याची माहिती दिली होती.भांडेवाडीत मोठ्या जनावरांचा कत्तलखाना चालतो. कोरोना काळात हे दोन्ही कत्तलखाने बंद असताना प्रतिबंधित क्ष्ेत्रातीलच कत्तलखाना कसा सुरु आहे?असा प्रश्न दयाशंकर तिवारी यांनी उपस्थित केला होता,यावर प्रतिबंधित क्ष्ेत्रात कत्तलखाने सुरु ठेवण्याचा हा शासनाचाच आदेश असल्याचा खुलासा आयुक्तांनी पत्रकाद्वारे केला मात्र या प्रश्नावर देखील आयुक्त चांगलेच अडचणीत आलेत.
‘खास‘जनरल नर्स मिडवाईफना ट्रेनिंगपासून सूट!
मनपातील काही ‘खास’जनरल नर्स मिडवाईफ यांच्यावर अति.आयुक्तांची खास मेहरनजर असल्याकारणाने एका नामांकित रुग्णालयातर्फे सध्या मनपातील सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचा-यांचे कोव्हिड-१९चे प्रशिक्ष् ण सुरु आहे मात्र यातून त्यांना सूट मिळाल्याची देखील चर्चा मनपात चांगलीच रंगली आहे. अति.आयुक्तांची मेहर नजर असल्याकारणाने त्या परिचारिकांना प्रशिक्ष् णापासून सूट मिळाली,महत्वाचे म्हणजे ज्या ५ परिचारिकांना अशी सूट मिळाली त्यांच्यावरच इतरांची ‘यादी’बनवण्याची जवाबदारी सोपवण्यात आली होती!
एकीकडे मनपाच्या आरोग्य विभागात परिचारिकांची कमतरता यावर सातत्याने ओरड सुरु असताना दुसरीकडे अश्या जनरल नर्स मिडवाईफ यांच्यावर अशी ‘कृपा’ठेवण्याचे काय कारण आहे?असा प्रश्न आता विचारला जात आहे,विशेष म्हणजे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मनपात शिस्त निर्माण करण्यासाठी महिला व पुरुषांना जो ‘ड्रेस कोड’निर्धारित करुन दिला होता, त्याचेही सर्रास उल्लंघन करीत चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी शोभावे अश्या वेषभूषेत मनपात हजर होतात,यावर देखील बरीच टिका एका व्हॉट्स ॲप ग्रूपवर रंगली.

आमचे चॅनल subscribe करा