Homeनागपूर मनपामुंढेंच्या वाढदिवसाला विकास ठाकरे यांचा आमदार म्हणून सल्ला!

मुंढेंच्या वाढदिवसाला विकास ठाकरे यांचा आमदार म्हणून सल्ला!

’मुंढे पॅटर्न’:इमेज बिल्डींगसाठी भाड्याने उभारली यंत्रणा

नागपूर,ता.३ जून: ३ जून मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचा आज वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना काँग्रेसचे पश्‍चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी मात्र दूसरीकडे सोशल मिडीयावरील ’मुंढे पॅटर्न’वर जबरदस्त प्रहार केला.

नागपूर महानगरपालिकेतील आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागपूरातच नव्हे तर जिथे जिथे ते रुजू झालेत त्यांनी स्वत:च्या कामांचा गवगवा केला.स्वत:ची ‘ईमेज’ डेव्हलप करण्याची त्यांची शैली असून नागपूरात देखील आल्या बरोबर त्यांचा‘ कु’प्रसिद्ध’मुंढे पॅटर्न’जपला जाईल,याचीच काळजी घेतली,मूळात ते जे काही निर्णय घेतात त्यासाठी राज्य सरकार त्यांना त्या कामाचे पगार देते,सवलती देते,भत्ते देते,हा त्यांच्या कर्तव्याचा एक भाग असताना देखील ते सातत्याने प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी विविध कूलूपत्या शोधतात,विशेष म्हणजे आपल्या कामांचा ‘दरारा’‘मुंढे पॅटर्न’च्या नावावर खपवित असतात,असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे पश्‍चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी केला.

नागपूरात कोराेनाचा प्रादुर्भाव मार्च ११ पासून सुरु झाला. राज्यात साथरोग प्रतिबंधक कायद्याची अंमजबजावणी सुरु झाली व जनप्रतिनिधींचे सर्व अधिकार प्रशासकीय अधिका-यांच्या हातात आले. नागपूरात मुंढे यांनी याचाच ‘गैरफायदा’घेऊन येथील सर्व पक्ष्ाचेच आमदार,महापौर,लोकप्रतिनिधी,नगरसेवक यांच्या मतदार संघात त्यांना न विचारता मनमानी तो कारभार केला.गेल्या तीन महिन्यांपासून नागपूरची जनता हे सगळं बघत आणि सोसत आहे.

माझ्यामुळे कोराेना आटोक्यात असल्याचे बाता मारणारे मुंढे यांचे हे एकट्याचे श्रेय कसे? ६०० च्या पुढे बाधितांचा आकडा गेला,हे मुंढे यांचे अपयश नाही का?३७० बाधित बरे होऊन सुखरुप घरी गेलेत,याचेही श्रेय मुंढे यांनाच हवे? मेयो-मेडीकलचे अधिष्ठाता, वैद्यकीय अधिक्ष् क, वरिष्ठ चिकित्सक, संपूर्ण आरोग्य विभागातील कर्मचारी यांनी अहोरात्र या बाधितांची सेवा केली त्यामुळे ते बरे होऊन घरी गेले. मात्र प्रसिद्धीच्या हव्यासापोटी  मुंढे यांनी याला देखील ’मुंढे पॅटर्न’घोषित करुन सोशल मिडीयावर खोटी प्रसिद्धी लाटली.

या शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास पाेलीस आयुक्त डॉ.भूषणकूमार उपाध्याय व त्यांची संपूर्ण चमू,नागपूरच्या ४७ डिग्री सेल्सियससारख्या रणरणत्या उन्हात रस्त्यांवर कर्तव्य निभवत होती म्हणून शहरात बाधितांचा आकडा हा ५०० च्या खाली थांबला तर याचे देखील श्रेय मुंढे यांनीच ‘मुंढे पॅटर्न’च्या नावाखाली सोशल मिडीयावर लाटले. मूळात शासकीय अधिकारी या नात्याने ते कोणताही निर्णय घेतात त्याला ‘पॅटर्न’म्हणून प्रसिद्धी देण्यामागे त्यांचा काय हेतू आहे?असा सवाल आ.विकास ठाकरे यांनी पत्रकाद्वारे केला.

जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे हे शांतपणे संपूर्ण नागपूर जिल्ह्याचे काम बघत आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अनेक चांगले निर्णय जिल्ह्यात राबवले मात्र त्याची कुठेही चर्चा नाही. सगळे श्रेय मुंढे यांनाच हवे असल्यामुळे नागपूरात कुठेही ‘पोलीस आयुक्त भूषण उपाध्येय पॅटर्न’  जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे पॅटर्न इ.ची चर्चा का नाही?असा सवाल त्यांनी उपस्थित केला.राज्यात मग ’उद्धव ठाकरे पॅटर्न’नागपूरात मग ’पालकमंत्री पॅटर्न’का नाही प्रसिद्ध झाले?महराष्ट्राच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याही मंत्र्यांनी, नेत्यांनी किवा कार्यकर्त्यांनी आपल्या कामाचा असा ‘पॅटर्न’राबवला नाही,एक शासकीय अधिकारी जो शासनाचा दर महिन्याला भरघोष पगार घेतो तो ‘पॅटर्न’च्या नावाने कसा काय राज्यातील नागरिकांच्या डोळ्यात धूळ झोकू शकतो?सोशल मिडीयावर सर्रास फेकाफेकी करतो?

सोलापूरच्या पत्रकाराची पोस्ट केली रिट्वीट!

नुकतेच मुंढे यांनी फेसबूक लाईव्हद्वारे नागपूरकर जनतेसोबत संवाद साधला.यावर सोलापूर येथील एका पत्रकाराने बातमी केली व ती ट्वीटरवर पोस्ट केली,यात त्यांनी मुंढे यांना टॅग केले.मात्र एक आयएएस अधिकारी असणारे श्री.मुंढे हे त्यांच्या कौतूकाचा वर्षाव झालेली पोस्ट ही ’रिट्वीट’करतात.हे एका सरकारी अधिका-याला शोभतं का?महाराष्ट्रात हजारो आयएएस अधिकारी कर्तव्य बजावतात,त्यातील किती आयएएस अधिकारी हे सोशल मिडीयावर आपले वेगवेगळ्या ऐंगलचे फोटो टाकतात?

मुंढेंना दिल्लीचे ’केजरीवाल’व्हायचे असेल तर त्यांनी ते खूशाल व्हावे,आमची सदिच्छा त्यांच्यासोबत आहे. .केजरीवारल हे देखील शासकीय अधिकारी पदावरुन दिल्लीचे मुख्यमंत्री झालेत.यासाठी त्यांना राजकारणात यावं लागलं. मुंढे यांची ही ईच्छा असल्यास त्यांना काँग्रेस पक्ष्ाच्या श्रेष्ठींना सांगून निश्‍चितच पक्षाचे तिकीट दिल्या जाईल मात्र त्यांनी सोशल मिडीयाचा गैरवापर करुन नागपूरकर जनतेची फसवणूक करणे आधी बंद करावे,अशी मागणी आ.ठाकरे यांनी केली.

स्वयंसेवी संस्थांचे क्रेडीटही मुंढेंनी ’ढापले!’

मुंढे हे नेहमी शहरातील ४५ ते ५० स्वयंसेवी संस्थाच्या सहकार्यातून शहारातील लाखो नागरिकांपर्यंत दररोज अन्न पोहोचवण्याचे श्रेय घेत असतात,मूळात हे श्रेय मुंढे यांचे नसून शहरातील विविध स्वयंसेवी संस्थांचेच आहे,यात मग आमची ‘महालक्ष्मी फाऊंडेशनतर्फे’लॉक डाऊनच्या पहील्या दिवसापासून ६० हजार लोकांना करण्यात येणारे अन्नदान असाे,दिनदयाल थालीचा उपक्रम असो,मैत्री किवा तत्सम अनेक स्वयंसेवी संस्था या मनपाच्या कोणत्याही सहकार्य वा निधीशिवाय सातत्याने,दररोज शहरातील विविध भागात व प्रतिबंधित क्ष्ेत्रात अन्न दान करीत आहेत.

विशेष म्हणजे मुंढे हे आयुक्त पदी नसते तर शहरातील या सर्व स्वयंसेवी संस्थांनी नागरिकांप्रति आपले कर्तव्य पार पाडले नसते का?मुंढे नसते तर या सर्व स्वयंसेवी संस्था काय घरी बसल्या असत्या? मुंढे कसे काय इतर स्वयंसेवी संस्थानांचे श्रेय घेऊ शकतात?

जगात कुठेही नागरिकांना विलगीकरण केंद्रात कोंबण्यात आले नाही-

चीनमध्ये काेरोनाचा उद्रेग झाला,पुढे अमेरिका,ब्राजिल,इटली इ.अनेक पाश्‍चिमात्य देश कोरोनाच्या विळख्यात सापडले.या सर्व देशातील नागरिकांना घरातच राहण्याची सक्ती करण्यात आली.घराबाहेर पडल्यास कठोर दंड देण्यात आले. नागरिकांवर लक्ष् ठेवण्यासाठी पोलीस व इतर विभागांची मदत घेण्यात आली.नागपूरात देखील पार्वतीनगर असो,मोमीनपुरा,सतरंजीपुरा असो अनेक वस्तीतील लोकांनी मुंढे यांना विनंती केली,ते घराबाहेर पडणारच नाही मात्र त्यांना विलगीकरण केंद्रात नेण्यात येऊ नये.मात्र मुंढे यांनी शहरातील शेकडो नागरिकांना साथरोग प्रतिबंध कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत मिळालेल्या अर्निबंध अधिकारांच्या नावाखाली उचलून विविध विलगीकरण केंद्रात नेऊन कोंबले.

यातील शेकडो नागरिक हे निगेटीव्ह निघाले मात्र त्यांना विलगीकणाची शिक्ष्ा भोगावी लागली. पार्वतीनगरमध्ये तर बंद घरात भुरट्या चोरांनी चो-या केल्या तर मोहननगरमध्ये बंद घरात आग लागल्यामुळे निष्पाप नागरिकाच्या वाट्याला आयुष्यभराची उधवस्तता आली,याला जवाबदार कोण?प्रतिबंध क्ष्ेत्र घोषित करताना या क्ष्ेत्राची सुरक्ष्ा ही मनपाची जवाबदारी नव्हती का?एका आयएएस अधिका-याचे काम काय?त्याची वागणूक कशी असावी?सरकारी खर्चावर आणि सरकारी नोकरीच्या भरवश्‍यावर मुंढेंनी त्वरीत  ‘पॅटर्न उद्योग’बंद करावा. त्यांच्या अश्‍या वर्तवणूकीतून पुढे नागपूर जिल्ह्यात ‘जिल्हा पॅटर्न,तालूका पॅटर्न,शहर पॅटर्न‘असा चूकीचा पायंडा पडण्याची शक्यता आहे.

एवढीच त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याकडून अपेक्षा असल्याचा टोला आ.विकास ठाकरे यांनी हाणला.

 

Latest बातम्या