फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजमी कोणती स्टंटबाजी केली?मुंढेंचा विरोधकांना सवाल

मी कोणती स्टंटबाजी केली?मुंढेंचा विरोधकांना सवाल

Advertisements

फेसबूक लाईव्हवर काढले उट्टे

नागपूर,ता. ३० मे: चौथ्या लॉक डाऊनची मुदत उद्या रविवार दि.३१ मे रोजी संपत आहे.या पार्श्वभूमीवर शहरासाठी कोव्हिड संदर्भात नागपूर महानगरपालिकेचे पुढील काळात कोणते नियोजन असणार आहे या संदर्भात माहिती देण्यासाठी मनपा आयुक्तांचा ‘फेसबूक लाईव्ह’उपक्रम शेवटच्या टप्प्यात वेगळ्यात मोडवर चालला गेला.यात प्रश्‍न विचारणा-या महिलेने मुंढेंना तुम्ही काम कमी स्टंटबाजी जास्त करता! तुम्ही बोलबच्चन आहात!पक्ष्ाची सुपारी घेऊन तुम्हाला मनपात पाठविण्यात आले आहे का?तुमचं कोणाशीही पटत नाही,तुम्ही हूकूमशाही गाजवता!कोणाच्या पक्ष्ाच्या जनप्रतिनिधींना विश्‍वासात घेऊन तुम्ही काम करीत नाही इ.असे ‘चमत्कारिक’ आणि तेवढेच ‘अनपेक्षित’प्रश्‍न विचारला आणि मुंढे यांनी या ‘फूल टॉस‘बॉलवर सिक्सर हाणायचाच,अश्‍या ‘पूर्वतयारीतून’ शब्दांमधूनच नव्हे तर ‘देहबोलीतून’ही विरोधकांना चांगलेच उत्तर दिले.

सुरवातीला मुंढे यांनी नागरिकांच्या सामाजिक समस्या,आरोग्य,कोव्हिडपासून सुरक्षा,विलगीकरण केंद्रांविषयी मनपाची भूमिका,विलगीकरण केंद्रात दिले जाणारे चांगले जेवण,विलगीकरणाची गरज इ. विवेचन वाचून आणि सांगून झाल्यानंतर,हूकूमशाहीवरील प्रश्‍न हा आधीपासूनच ‘स्क्रीप्ट’मध्ये असल्याने तो त्यांना विचारण्यात आला. विशेष म्हणजे त्यांच्या संपूर्ण पावणे दोन तासात त्यांच्या फेसबूक लाईव्हदरम्यान एकाही नेटीझनने त्यांना असा प्रश्‍न विचारला नव्हता.तरीही मुंढेंना आपल्या या लाईव्ह उपक्रमात, विरोधकांना त्यांच्या हूकूमशाहीविरोधात उत्तर देण्याची ‘खूमखूमी‘का आली?हे मात्र ‘स्क्रीप्ट राइटर्स‘च सांगू शकतील. नुकतेच मुंढे यांच्याविरोधात सत्तापक्ष् व विरोधीपक्ष् नेत्यांनी मिळून पत्रकार परिषद घेतली होती.यात मुंढे यांच्याविरोधात हूकूमशाह,स्टंटबाजी इ.सारखे शब्द वापरण्यात आले होते.याचेच प्रतिउत्तर मुंढे यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून देण्याची पूर्वतयारी केली होती,अशी चर्चा आता रंगली आहे

या अपेक्षीत प्रश्‍नावर सविस्तर उत्तर देताना मुंढे म्हणाले की,फक्त नागपूर मनपातच नव्हे तर आजवर जिथे कुठे काम केले तिथेही माझ्यावर हेच सर्व आरोप लागत होते.मूळात जे माझ्यावर हूकूमशाहीचा आरोप करतात त्यांना तरी ‘हूकूमशाहीचा अर्थ माहिती आहे का?’हूकूमशाही म्हणजे जो व्यक्ति कोणत्याही कायद्याला धरुन चालत नाही.स्वत:च्या लाभासाठी वाटणारे निर्णय घेतो मग ते निर्णय नागरिकांच्या हिताच्या विरोधात का नसो!जी व्यक्ति कायद्यांचे पालन करते आणि इतरांकडूनही करवून घेते,ती व्यक्तिी हूकूमशहा कशी होऊ शकते?मी लोकप्रतिनिधींच्या नव्हे तर जनतेच्या हिताला प्राधान्य देतो म्हणून मी हूकूमशहा!कमीत कमी आर्थिक खर्चात जास्तीत जास्त विकासाची कामे झाली पाहिजे,जे टेंडर वाढीव होते ते मी कमी दरात आणले,टेंेडरमधील अनेकांची एकाधिकारशाही होती ती मोडून काढली,त्यांचा इंटरेस्ट जपला नाही,म्हणजे मी हूकूमशहा झालो का?

माझ्यावर हूकूमशहा असल्याचा आरोप करणाारे त्यांनीच ‘हूकूमशाही’पद्धतीचा शास्त्रीय अभ्यास करावा व सिद्ध करावे माझे वागणे हे हूकूमशहा पद्धतीचे आहे तरच मी माझे वागणे बदलेल.

दूसरा आरोप माझ्यावर होतो मी प्रतिबंधित क्षेत्रात फिरकतही नाही. मी दररोज सकाळी ८ ते ११.३० दरम्यान शहरातील सर्व प्रतिबंधित भागात फिरतो व व्यवस्थेची,जनतेच्या त्रासांची पाहणी करतो.चिकन-मटणची दूकाने बंद करतो,नागरिकांना सोशल डिस्टंसिंगसाठी जागृत करतो.हे सर्व कोव्हिड काळातील भटकंती नसून इतर वेळीही मी माझ्या कर्तव्याचा भाग म्हणून शहरात फिरतो.केंद्र सरकारच्या चमूचाच अहवाल आहे नागपूरात मनपाने समूह संसर्गाची साखळी तोडली.मनपाने योग्य वेळी प्रभावी निर्णय घेऊन संस्थात्मक विलगीकरण, करोना योद्धांचे ट्रेनिंग, बाधितांवर उपचार,जनजागृती,आपातकालीन व्यवस्था इ.कामाचे याच चमूने कौतूक केले आहे. या चमूमध्ये एम्सचे डॉक्टर सहभागी होते.हा अहवाल तुकाराम मुंढेंनी तर नाही तयार केला ना?

नागपूरात आज करोना बाधितांचा मृत्यूदर फक्त २ टक्के आहे.८ टक्के बरे होण्या-यांचा आकडा आहे. देशातील १० लाख लोकसंख्या असणा-या इतर कोणत्याही शहराशी नागपूरची तुलना केल्यास ४९ दिवसात बाधित व मृत्यूदराचा आकडा तपासून बघावा.हे सगळे ‘स्टंटबाजीमुळे ’घडले का?परिस्थितीचा विपर्यास करु नये,असा टोमणाही मुंढेनी या उपक्रमात विरोधकांना मारला.एेकीव माहीतीवर नव्हे विश्‍वास करु नका,कोणतीही शंका असल्यास माझ्याशी येऊन चर्चा करा.

माध्यमांशी बोललोच नाही-
मी नागपूर मनपात रुजू झाल्यावर मी माध्यमांशी बोललोच नाही. मला त्याची गरज वाटत नाही.मात्र शहरात कोव्हिड-१९ चा प्रकोप सुरु झाल्यावर जनजागृतीसाठी व उपक्रमांची,आयुक्त म्हणून मनपासंबंधी निर्णयांची माहिती देण्यासाठी माध्यमांशी संवाद साधला.गेल्या ३ महिन्यातच नव्हे तर १४-१५ वर्षातही मला मिडीया समोरस्टंटबाजी करण्याची गरज वाटली नाही.मी मिडीयासाठी काम करीत नाही.माझ्या मनपाच्या करोना योद्धांपैकी एकही बाधित निघाला नाही.माझ्या कर्मचा-यांची काळजी घेणे,याला हूकूमशाही नाही म्हणून शकत.

स्टंट हवेत असतात रिजल्ट मिळत नाही….
मी स्टंट करतो असा अारोप करणारे यांनी लक्ष्ात घ्यावे स्टंट हे हवेत केले जातात,त्यातून रिजल्ट मिळत नाही.स्टंटबाजी केली असती तर मला कोणाचेही सहकार्य मिळाले नसते.मी कोणत्याही व्यक्ति,संस्थांना समाधान देण्यासाठी काम करीत नाही.किंवा त्यांच्या विरुद्धही काम करीत नाही,मी फक्त कायद्यात जे आहे त्याचे पालन करतो आणि करवून घेतो. माझ्यातही अनेक उणिवा आहेत मात्र माझ्यात प्रामाणिकपणाही आहे. तो मी कधीही सोडणार नाही. जनतेप्रति दायित्वाचे काम मी करत राहील. इतक्या वर्षांच्या नोकरीमध्ये मी कधीही असे बोललो नाही ‘माझ्यामुळे हे झाले’अपयश आले तर मी जवाबदारी घेतो,यश हे तुमचे आहे,असे मी अधिकारी व कर्मचा-यांना सांगतो.

लांबलेले कौतुक…
‘जय महाराष्ट्र’ केल्यानंतरही प्रश्‍न विचारणा-या महिलेला मुंढेंवर कौतूकवर्षाव करण्याचा मोह आवरला नाही आणि मुंढे यांनी आपले कागदं आवरते घेत असतानाही ’तुमच्यासाठी ज्या पॉझिटीव्ह कमेंट आल्या आहेत ते मी वाचून दाखवते’म्हणत,नेटीझन्सचा चांगलाच भ्रमनिरास केला. पॉझिटीव्ह कमेंन्टससोबत अनेक नकारात्मक कमेंट देखील फेसबूक वॉलवर झळकत होते.सर्वात जास्त आक्षेप हे मुंढे यांच्या हिन्दी बोलण्यावर आले होते. मनपामधून मुंढेंनी ५६ कर्मचा-यांना काढले,यावर देखील प्रश्‍न विचारण्यात येत होते.एकाने तर मुंढेंचे संपूर्ण संभाषण हिंदीत झाल्यावर,हूकूमशाहीवर उत्तर देताना मुंढेंनी ते मराठीत दिले असता ’धन्यवाद सर मराठीत बोलल्याबद्दल’म्हणून मुंढेंना चांगलेच खिजवले.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या