
(रविवार विशेष)

डॉ. प्रणय सुभाष चांदेकर यांचे प्रेरणादायी जीवनकार्य
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,२४ मे: महाराष्ट्राची भूमी ही अनेक संतांच्या पावनधुळीने पावन झाली आहे. आयुष्यभर या संतांनी मानवी जिवनाचे खरे मोल आपल्या साहित्यातून रयतेला समजावले.नश्वर,क्ष् णभंगूर जिवनालाच मानव हा सर्वस्वी समजून पैसा,प्रतिष्ठा,पद,सत्तेच्या मागे लागून आयुष्य मातीमोल करतो आणि शेवटी रिकाम्या हाताने मोक्ष धामात विसावा घेतो. वयाच्या १२ व्या वर्षीच प्रणय सुभाष चांदेकर या अवलियाला जिवनाची ही नश्वरता,क्ष् ण भंगूरता कळली आणि आपले संपूर्ण जिवन त्यांनी फक्त आणि फक्त गरिब,गरजू,पीडीत,दलित,शोषितांच्या जिवनात सेवेची समिधा वाहण्याचा संकल्प केला,नव्हे…कार्यारंभच केला.
प्रणयवर आपल्या आईच्या सेवाभावी संस्काराचा प्रभाव खोलवर पडला आहे. वडील हे तर स्वत: अनाथ होते त्यामुळे आयुष्य आणि माणसाचं जगणं कोणत्याही ग्रंथात शिकण्याची गरजच त्यांना पडली नाही. एका सर्वण कुटुंबाने त्यांचा सांभाळ केला.आपल्या पायावर उभे केले. प्रणयवर आई आणि वडील दोघांच्या सेवाभावी स्वभावाचा प्रभाव पडला. संकटांशी लढण्याची जिद्द ही वडीलांकडून आली,तर आपला जन्म हा ‘देण्यासाठी‘ झाला आहे,माया जमवण्यासाठी नाही,हा संस्कार आईने रुजवला. वयाच्या १२ व्या वर्षीच प्रणयने जिवनाची हीच यर्थाथता लक्ष्ात घेऊन ‘यर्थाथ वेलफेअर फाऊंडेशनची’स्थापना करुन समाजसेवेला सुरुवात केली.
‘टर्निंग पॉईंट’-
प्रणयने डॉक्टर होऊन रुग्णांची नि:शुल्क सेवा करण्याचा प्रण केला. डिगडोह येथील लता मंगेशकरमध्ये दातांच्या डॉक्टर हे पदवी शिक्ष् ण घेत असताना एक ‘टर्निंग पॉईंट’घडला. पदवी शिक्ष् णाच्या तिस-या वर्षीचे शिक्ष् ण घेताना एक वयोवृद्ध आजी ही रुग्णालयातील एका कक्ष्ाच्या बाहेरच रडत बसली होती.प्रणयने त्या आजीला रडण्याचे कारण विचारले,त्यांची नात या रुग्णालयात आजारपणामुळे भरती होती. गेल्या तीन दिवसांपासून सकाळी एक व सायंकाळी एक फक्त बिस्कीटच्या दोन पुड्यावर त्या दिवस काढत होत्या.इतर कोणी काही खायला दिले तर तेवढं पोटात जात होतं. प्रणयने पहीला ‘प्रण’इथेच केला. त्या आजीला सर्वतोपरी वैद्यकीय व आर्थिक मदत करुन मार्गी लावले. त्या रात्री…प्रणयला खूप गहीरी झोप आल्याचे तो सांगतो.
या सुखाची लागली चटक-
प्रणयने दातांचा डॉक्टर म्हणून पदवीप्राप्त केल्यावर बुटीबोरी येथे दत्त जयंतीच्या दिवशी एक लहानसा ब्लॉक भाड्याने घेऊन ‘चॅरिटेबल डेंटल क्लिीनीक’ची सुरवात केली.बुटीबोरी येथील अत्यंत गरीब मजूर,कामगार वर्ग आज डॉ.प्रणय यांच्या उपचाराचा लाभ घेत आहे. अनेकांकडे औषधांसाठीही पैसे नसतात.डॉ.प्रणय स्वत:कडूनच त्यांना औषधेही उपलब्ध करुन देतो.मोबदल्यात मात्र घेतो…..अमूल्य अशी त्यांची दूवा! रुट कॅनोलसाठी जिथे खाजगी दवाखान्यात अडीच ते चार हजार रुपये मोजावे लागतात तिथे हा डेन्टिस्ट फक्त १२०० रु.उपचार करुन देतो.
नागपूरातील डेंटिस्ट यांच्या संघटनेतर्फे डॉ. प्रणय यांना अनेकदा ‘ऑफर’ आली.संघटनेशी जुळून जा.मोठे पद घे..मोठमोठी तीन दिवसांच्या परदेशी पाहूणे असलेल्यांची शहरातील पंचतारांकित हॉटेल्समध्ये होणा-या कार्यशाळांबाबत त्याला ही होते विचारणा,याचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांकडून घेण्यात येणारे हजारोच्या घरातले शुल्क,यावर ही डॉ.प्रणय त्यांनाच तोडगा सुचवतो..फक्त ५०० विद्यार्थ्यांकडून ५०० रु शुल्क घ्या. एखाद्या सभागृहात ही कार्यशाळा भरवा,तुम्हाला ही नुकसान नाही,विद्यार्थ्यांनाही समाधान,कमी पैसात परदेशी अनुभव ऐकायला मिळाले म्हणून…पण?असं घडत नाही.
प्रणयने आणखी एक ध्यास घेतला राष्ट्रीय लोकसेवा आयोगाची परिक्ष्ा उत्तीर्ण करायची..शासकीय नोकरी मिळवायची..त्याचा उपयोग जनतेसाठी करायचा.या अभ्यासादरम्यान शासनाचा ‘महापोर्टल’घोटाळा ही लक्ष्ात आला आणि छेडले आंदोलन या महाभागाने सरकारविरुद्धच..!जिथे जिथे अन्याय दिसतो…तिथे तिथे हा अवलिया आपल्याच व्यवसायिक बंधूंशी..राजकारण्यांशी..शासनाशी ‘पंगा’ घेतो…सर्रास!
हिवाळा आला कि हा माणूस चक्क ठोकच्या भावेने उबदार ब्लँकेट्स खरेदी करतो.रात्रीच्या अंधरात आपल्या दूचाकीला किक मारतो आणि निघतो…शहरभर फिरत..थंडीने कुडकुडणा-यांच्या अंगावर ब्लँकेट्स पांघरत!एका वृत्र पत्राच्या छायाचित्रकाराला तो ब्लँकेट्स पांघरताना दिसला आणि…त्याच्या कॅम-याने तो क्ष् ण अचूक टिपला..दुस-या दिवशी त्याचे छायाचित्र ‘महाराष्ट्र टाईम्स’मध्ये झळकले…!
प्रसिद्धीपासून दूर पळणारा हा अवलिया दुस-यांना,माझ्या कामाचे ‘क्रेडीट’घ्या म्हणतो.मला माझ्या कामाचे आत्मिक समाधान मिळाले,की माझे काम संपले.मात्र प्रणयच्या जिवनात ‘तत्वांना’देखील तेवढेच महत्वाचे स्थान आहे.आयुर्वेेदिक महाविद्यालयाच्या अधिष्ठातासोबत घेतलेला पंगा हे अनेक वृत्तपत्राचां त्यावेळी ‘मथळा’ही बनला होता.एका काविळ झालेल्या विद्यार्थ्याला आणि त्याच्या मित्रांना त्या अधिष्ठाताने दिलेले अमानवीय वागणूक डॉ.प्रणयला सहन झाली नाही. त्याने त्या अधिष्ठाताविरुद्ध चांगलाच लढा पुकारला.स्वत:ला डॉक्टर म्हणून घेणारी हे काही व्यवसायिक..मूळात माणूस तरी आहेत का?असा संताप तो व्यक्त करतो.
महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षीत यांनी सर्कूलर काढला होता त्यानुसार महाराष्ट्रातील १० वी आयटीआय झालेल्यांना महामेट्रोमध्ये कमी पगारावर निम्न दर्जाच्या नोक-या मिळत होत्या तर मध्यप्रदेशमधील बी.ई. किवा एम.टेक झालेल्या माणसांना महामेट्रोमध्ये मोठ्या हुद्याच्या नोक-यांवर ठेवले जात होते.महाराष्ट्रात बी.ई किवा एम.टेक असणा-या विद्यार्थ्यांची कमतरता होती का?दीक्ष्ीत यांच्या या ‘हिंदी भाषिक’मानसिकतेवर कठोर प्रहार करुन याविरुद्ध देखील प्रणय यांनी मोठे आंदोलन छेडले. मनसेचे नेते राज ठाकरे यांनी नागपूरातील मनसेचे नेते हेमंत गडकरी यांना कॉल लावून बोलायला लावले.केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले होते…महामेट्रोमध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळेल….!
आमदार बच्चू कडू यांना ‘महापोर्टल‘ घोटाळ्यासंबंधी प्रकरणात नागपूरात बाेलावणारे महाभाग हे डॉ.प्रणयच होते.हे देखील नागपूरकर विसरले नाही. ८ नोव्हेंबर १९९१ साली जन्माला आलेला हा सळसळत्या रक्ताचा तरुण,भ्रष्टाचाराच्या विरोधात…देश बदलवायला निघाला आहे….व्यवस्था बदलवायला निघाला आहे..त्याच्या सहकार्यांच्या मदतीने…!
लॉक डाऊनच्या काळात बांधली माणूसकीची साखळी-
स्वामी समर्थच्या मंदिरात दर्शन घेताना प्रणयच्या सहज मनात आले आपण ५० किलो धान्याचे वाटप गरजूंना करावे.हा निश्चय करताच त्याला गरजू लोकं डोळ्याने दिसून लागले.डॉ.अक्ष् य मुलमूले, डॉ.पंकज जाने, डॉ.वाळूलकर या जिवाभावाच्या मित्रांकडे सहज विषय काढला आणि….लॉक डाऊनच्या काळात हा धान्य वाटपाचा उपक्रम नरसाळा,म्हाळगी नगर इ.भागात सुरु झाला.बघता बघता मदतीचा ओघ सुरु झाला आणि ३०० नाही तर ३ हजार गरजूंपर्यंत ही मदत पोहोचू लागली.समाजातील दानशूर व्यक्ति ही सहज ‘यर्थाथ’सोबत जुळत गेली…‘मैं अकेला ही चला था जानिब-ए- मंजिल मगर… लोग जुडते रहे कारवां बढता गया’रायपूरवरुन अचानक प्रणयला प्रियंका जैन यांचा फोन आला,प्रणयच्या सेवाभावी कार्याची महती रायपूरपर्यंत पोहोचली होती,प्रियंका यांनी प्रणयला कळवले,मी तुला दोन दानशूर व्यक्तिंचे नबंर देते त्यांनाही गरजूंना धान्य वाटप करायचे आहे…!
वाडीतून तीन मुलींची केली सूटका-
लॉक डाऊनच्या काळात तीन मुलींसह ३० विद्यार्थी हे वाडीत अडकले असल्याची माहिती कोराडी पोलीस ठाण्यातील माजी पीएअसआय बोंडे यांच्यामार्फत प्रणयला कळली.मनसेचे नेते अनिल पारखी यांच्या मदतीने या मुलींची आरोग्य चाचणी ते त्यांना सुखरुप गावापर्यंत पोहोचवण्याची संपूर्ण जवाबदारी प्रणय यांनी उचलली.स्त्रीचा सन्मान हा प्रणयसाठी जण्यातील आणखी एक ’मूल्य’आहे.जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातून परवानगी पत्र मिळवून फक्त या मुलींनाच नव्हे तर वाडीत अडकून पडलेल्या इतरही ३० विद्यार्थ्यांसाठी त्यांचा प्रणयदादा हा जणू ‘देवदूतच’बनला.
शेतकरी मुलांना करायचे आहे कायमचे जागरुक-
देशात सत्ता कोणाचीही असो आजही मरतो आहे तो फक्त शेतकरी.मला फक्त शेतक-यांच्या मुलांना कायमचे जागरुक करायचे आहे असा हा अवलिया सांगतो. लोकसेवा आयोगाच्या परिक्ष्ेची तयारी करताना मला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान,त्या संविधानाचे कलम(२१)चांगल्याने कळले..हे कलम भारताच्या प्रत्येक नागरिकाला प्रतिष्ठेने जगण्याचा हक्क प्रदान करतो..मग शेतक-यांच्या वाटेलाच ’आत्महत्या का?’मला जेवढे युवा शेतकरी विद्यार्थी यांची लिंक सापडेल,त्यांना मी त्यांच्या संवैधानिक अधिकारांप्रति जागरुक करेल.आता माझ्या जिवनाचे हे एकमेव लक्ष्य बनले असल्याचे तो सांगतो.
सुप्रसिद्ध उद्योजक टाटा यांनी नुकतेच पंतप्रधान कोव्हिड-निधीत ५२ कोटींचे दान दिले…ते..तुला मिळाले असते तर?असा प्रश्न ‘सत्ताधीश’ने त्याला विचारले असता, त्या पैशांनी अत्याधनिक तंत्राने युक्क मोठे रुग्णालय उभारले असते..असा तो सांगतो. विदर्भातील सर्व ग्रामीण भागातून गरजू,गरीबांची सेवा मला करता आली असती,शेवटी टाटांनी ते पैसे गरजूंच्या सेवेसाठीच दान केले होते ना?दानात देण्यापेक्ष्ा त्या पैशांनी ग्रामीण भागातील दवाखाने अद्यावत करता आले असते..असा नवा दृष्टिकाणे समाजातील दानशूरांनाही देण्यास तो विसरत नाही.
आयुष्याच्या एकंदरीत वाटचालीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्ग संस्कारांचाही तेवढाच वाटा असल्याचे सांगण्यास तो विसरत नाही.
या अवलियाच्या या समाजसेवेच्या जज्ब्याला मानाचा मुजरा!
ऐ राही…
हर दिल तू अजीज बन जाओ,
हर गले की ताबीज बन जाओ,
जाओ ऐ राही तू कही जहां भी,
उस जहां की तस्वीर बन जाओ,
तुझमे पनप रहा,जन आराधना
हो फलित तेरी,ये कर्म साधना,
जाओ बनके नदी तूम बह जाओ..
बस नेता बनके गिर मत जाना
सेवा भाव से,तूम धर्म निभाना
डॉ.प्रणय सुभाष चांदेकर-8459296392




आमचे चॅनल subscribe करा
