

आ.विकास ठाकरे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे
नागपूर,ता. २३: काही दिवसांपूर्वी ट्रस्ट ले – आऊट, अंबाझरी, नागपूर परिसरातील व्यक्ती कोरोना संक्रमित झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर २२ मे २०२० पर्यंत हा परिसर महानगरपालिकेतर्फे सील करून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते. मागील १५ दिवसांपासून हा परिसर पूर्णपणे सील करण्यात आला असून इथल्या नागरिकांच्या कारोनाच्या चाचण्या देखील निगेटिव्ह आल्या तरीसुद्धा हा परिसर अजूनपर्यंत उघडण्यात आला नाही. त्यामुळे नागरिकांना अनेक प्रकारच्या संकटाचा सामना करावा लागत होता. मात्र गेल्या १४ दिवसांपासून एकही कोरोना बाधित आढळल्या नसल्याने प्रतिबंधित क्ष्ेत्र मोकळे करावे हा शासन निर्देश असताना अद्याप नागपूर महानगरपालिकेने या भागातील प्रतिबंध काढले नसल्याने आज दूपारी येथील नागरिकांनी भर उन्हात मनपा विरोधात तीव्र आंदोलन छेडले.

प्रतिबंधामुळे येथील नागरिकांना दैनदिन वस्तू मिळणे देखील कठीण झाले आहे. याच्याच रोष म्हणून परिसरातील नागरिकांनी एकत्र होऊन मनपाच्या या मनमानी कारभाराचा निषेध केला व ट्रस्ट ले – आऊट अंबाझरी परिसरातील सील हटविण्याची मागणी केली.
स्थानिक नागरिकांनी काँग्रेस शहराध्यक्ष, आमदार विकास ठाकरे यांना फोन द्वारे ह्या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच विकास ठाकरे यांनी नागरिाकंच्या या आंदाेलनात सहभाग नोंदवला. नागरिकांची मागणी रास्त असून सर्वच रहदारीचे रस्ते बंद करुन ठेवण्यात आल्यामुळे येथील नागरिकांचा त्रास प्रशासनाने समजून घेण्याची मागणी त्यांनी केली. या ठिकाणी पोहोचून त्यांनी नागरिकांचीही समजून काढली व महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून ह्या परिसरातील निर्बंध लवकरात काढण्याची सूचना केली.

आज सायंकाळपर्यंत हा मार्ग मोकळा करण्यात येईल येईल असे नागरिकांना मनपा अधिका-यांनी आश्वासन दिले.प्रशासनाने घोषित केलेल्या चौथ्या लॉक डाऊनमध्ये नागपूरकर नागरिकांचा संयम आता ढासळत चालला असून आपल्या दैनदिन जगण्या-मरण्याच्या प्रश्नासमोर आज देखील आंदोलनकर्त्यांनी सामाजिक अंतराचे निकष धुडकावले असल्याचे दृष्य होते.कोरोनाची लागण होण्यापेक्ष्ाही दररोजचे जगणे-मरणे ही यातना येथील नागरिक बाेलून दाखवत होते.
विशेष म्हणजे मनपा प्रशासनातर्फे शहरातील अनेक भागाला प्रतिबंधित क्ष्ेत्र म्हणून घोषित केले असून लहान लहान गल्ल्या देखील बंद करुन ठेवण्यात आल्या आहेत. दैनदिन गरजेच्या वस्तूंसाठी देखील नागरिकांना यामुळे भरपूर पायपीट करावी लागत आहे. पार्वतीनगर व रामेश्वरी येथील भागात दोन काेरोना बाधित आढळल्याने हा परिसरदेखील टिन व बल्ल्लया टाकून पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
या भागात अनेक घरात लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांची संख्या असून रात्री-अपरात्री त्यांना दवाखान्यात घेऊन जाण्याची गरज पडते तेव्हा अश्या प्रकारच्या सीलमुळे नागरिकांना भरपूर मनस्ताप सहन करावा लागत आहे. रामेश्वरी व पार्वतीनगर भागातील देखील २०० हून जास्त नागरिकांचे अहवाल हे कोरोना निगेटीव्ह आले असल्याने व गेल्या १४ दिवसांपासून या भागात एक ही कोरोना बाधित आढळला नसल्यामुळे लवकरात लवकर या भागातील देखील सील काढण्यात यावे अशी मागणी आता या परिसरातील नागरिकांनी देखील मनपा प्रशासनाकडे केली असल्याचे सांगितले जात आहे.




आमचे चॅनल subscribe करा
