

बकरा मंडीमुळे वाठोड्यात तनाव
नागपूर,ता. ९ मे: मोमिनपुरा येथे आजपर्यंत बकरा मंडी भरत होती मात्र सध्या मोमिनपुरा हा कोरोना संसर्गाचा हॉट स्पॉट ठरला आहे परिणामी नागपूर शहराच्या लागून असलेल्या ग्रामीण भागातील गरीब,गरजू कास्तकार लाेकं हे त्यांच्या जवळील वृद्ध आणि निरुपयोगी ठरलेले बकरे विकण्यास असमर्थ झाले,त्यांना आर्थिक अडचणीतून काढण्यासाठीच महापालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले.आयुक्तांनी देखील दिलेल्या परवानगी पत्रात वाठोडा येथील ही बकरा मंडी ‘तात्पुरती’असल्साचे विदीत केले आहे. लवकरच ही बकरा मंडी कळमन्याला हलवली जाईल असे लिखित आदेश त्यांनी दिले असतानाही वाठोडा येथील रहीवाश्यांनी पराकोटीचा विरोध करणे यात निव्वळ राजकारण असल्याचा आरोप आमदार कृष्णा खोपडे यांनी केला आहे.

नागपूरातील वाठोडा परिसरातील सिम्बॉयसिस विद्यापीठात आधीच सतरंजीपुरा व मोमिनपुरा येथील ६०० च्या वर संशयितांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. अश्यावेळी मोमिनपुरा येथील सर्वात मोठी बकरा मंडी आज वाठोडा येथे सुरु करण्यात आल्याने आधीच धस्तावलेले नागरिक यांनी मोठ्या प्रमाणात या मंडीला विरोध केला.नागरिकांचा रोष एवढा होता की लॉक डाऊनचे नियम तोडून शेकडो लोक जमा झाले. परिणामी वाठोडा पोलीसाना सर्व काम बाजूला सारुन या ठिकाणी धाव घ्यावी लागली. बकरा मंडीला सर्व पक्ष्ीय स्थानिक नेत्यांचा विरोध असल्याने वाठोडा,चैतन्यश्वर नगर, राधाकृष्ण नगर, तरोडी,बिडगावचे नागरिक एकत्रित आले. या प्रकाराची माहिती होताच स्वामीनारायण मंदिराशी जोडलेले जैन समाजाचे प्रतिनिधीही या विरोधात सहभागी झाले.
यावेळी तनाव वाढत गेल्याने नेहरु नगरच्या सहायक आयुक्त स्नेहा करपे,वाठोडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्ष् क बापू ढेरे आपल्या सहका-यांसह घटनास्थळावर पोहोचले. याच परिसरातील हिवरीनगर येथील भाजप नगरसेविका कांता रारोकर तसेच त्यांच्या मुलगा बाल्या रारोकर यांचा मटण विक्रीचा व्यवसाय असल्यामुळेच या ठिकाणी बकरा मंडीला परवानगी देण्यात आला असल्याचा आरोप येथील स्थानिकांनी केला. रारोकर यांनी आमदार कृष्णा खोपडे यांच्या मदतीने आयुक्तांकडून परवानगी मिळवल्याचा रोष व्यक्त केला जाता होता.

या पार्श्वभूमीवर आ. कृष्णा खोपडे यांनी वरील स्पष्टीकरण देत,मूळात मटण मार्केट आणि बकरा मंडी या दोन्ही बाबींमध्ये पराकोटीची तफावत असल्याचे सांगितले. वाठोडा येथील सिमेंट रोडच्या बाजूला ३-४ मटणाची दूकाने आहेत. स्थानिकांनी आतापर्यंत मटण दूकानांना विरोध का नाही केला?असा प्रश्न खोपडे यांनी उपस्थित केला. त्या मटण दूकानांधील मटणावर तर रस्त्यावरची संपूर्ण धूळ उडते तरीही स्थानिकांनी त्या दूकानांना विरोध केला नाही. मूळात ही बकरा मंडी कोणत्याही वस्ती जवळ नसून ती वस्तीच्या फार दूर असल्याचे ते म्हणाले.
आयुक्तांनी या ठिकाणी कायमची मंडी भरवायला परवानगी दिली नसून तात्पुरती सवलत दिली असताना काही लोकं यामागे निव्वळ राजकारण करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
मात्र येथील शेकडो नागरिकांनी पहिल्याच दिवशी तीव्र विरोध केल्याने येत्या मंगळवारी भरणारी बकरा मंडी हाणून पाडू असा इशारा नागरिकांनी दिला . बकरा मंडी मुळे पूर्व नागपूरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मनपा नागरिकांना एकीकडे घरी राहण्याच्या सूचना देत असले तरी ,मनपाच्या अजब निर्णयाने नागरिकांना लॉक डाउन तोडून रस्त्यावर येण्याची वेळ आणली जात आहे, अशी भावना येथील नागरिक व्यक्त करीत आहे.




आमचे चॅनल subscribe करा
