Homeनागपूर मनपानागपूरकर ‘तळीरामांच्या’दारुचे कवित्व: मुंढे साहेबांवर संताप

नागपूरकर ‘तळीरामांच्या’दारुचे कवित्व: मुंढे साहेबांवर संताप

सोशल मिडीयावर व्यक्त झाली प्रचंड नाराजी

नागपूर,ता.५ मे: राज्य शासनाने आादेश काढल्यानंतर देखील नागपूर आणि विदर्भात दारुची दूकाने संपूर्ण: बंदच ठेवण्याचा निर्णय महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रविवार, दि. ३ मे रोजी रात्री जाहीर केला आणि नागपूरातील ‘तळीरामांच्या’४२ दिवस तग धरुन ठेवलेल्या संयमाचा चांगलाच तोल ढळला. रविवार रात्रीपासून सोशल मिडीया तसेच अनेक व्हॉटस ॲप ग्रूप्सवर मुंढे यांचा खरपूस समाचार घेतला जात आहे.

‘मद्य’हा अनेकांच्या जिवनाचा एक अविभाज्य भाग झाला आहे. हा खूप जूना शौक आहे. अगदी त्रेता,सत आणि द्वापर युगात देखील मद्याचा वापर होत असल्याचे इतिहासातील ग्रंथात दाखले आहेत. मग ‘कलियुगातच’का मद्यपींना या संकटाचा असा ’जीवघेणा’ सामना करावा लागत आहे?असे प्रश्‍न सोशल मिडीयावर उमटले आहे. तेव्हा ‘मुंढे नव्हते‘असे उत्तर देखील या प्रश्‍नाला मिळत आहे.
‘कोरोना’ने नाही मात्र किडनी,लिव्हरच्या आजारानेच ‘तळीराम’मरणार असा संताप देखील व्यक्त होत आहे.एवढ्या निकृष्ट दर्जाची दारु सध्या तळीरामांना प्यावी लागत आहे. कितीही ‘बंदी’असली तरी मध्य प्रदेशातून चोरट्या मार्गाने शहरात दारु येत असल्याची कबूलीही तळीराम देत आहे. ‘नवसागर’ही मोहफूलाची दारु जिला बनायलाच एका महिन्याचा कालावधी लागतो,ती दरराेज बनवली जात असल्याची चर्चा आहे.याचा अर्थ त्यात अतिशय घातक व विषारी द्रव्ये मिसळली जात आहे,विशेष म्हणजे ती ६०-७० रुपयात मिळाणारी दारु देखील आता ४५० रु.ची घ्यावी लागत आहे.

सर्वाधिक संताप मनपा आयुक्तांवर-
भाजी घेताना लोकांना कोरोना होत नाही मग मद्य विकत घेतानाच लोकांना कोरोना होणार आहे का?असा सवाल तळीराम उपस्थित करत आहेत. दिल्लीत जे घडले तेच नागपूरात घडवायचे नसेल तर दिल्लीसारखी अर्धीमुर्धी दूकाने उघडून नये, असे झाल्यास मद्यपींची गर्दी होणे स्वाभाविक आहे. एका भागातील ५ दूकाने सुरु ठेवल्यास गर्दी ही होते आणि ग्राहकांची लृट ही होते,असे अनुभव तळीराम सांगत आहेत. मोजकी दूकाने सुरु असल्यानेच आजपर्यंत दूकानदारांनी चढ्या दराने किराणा माल विकला,तसेच दारुचे देखील होईल.
एकदा राज्य सरकारने रेड झोन सोडून दारुची दूकाने सुरु करण्याचे निर्देश दिले असताना नागपूरात मनपा आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांनी दारु दूकानांना ‘नाही म्हणजे नाहीच’हे अनाकलनीय धोरण स्वीकारल्याने मद्यपींचा तीव्र संताप या दोघांवरही व्यक्त होत आहे.
गेले ४२ दिवस मद्यपींच्या ‘मेंदूनेच’ हे मनापासून स्वीकारले होते ३ मे पर्यंत त्यांना दारु मिळणारच नाही.परिणामी त्यांनीही तग धरली,चांगले नागरिक म्हणून शासनाला संपूर्ण सहकार्य केले.आता ही ३ मे रोजी, राज्य सरकारने दारु दूकाने उघडण्याची परवानगी दिली नसती तर मद्यपींनी सरकारचा हा आदेश देखील मान्य केला असता मात्र एकीकडे राज्य सरकार वेगळे आदेश काढते दूसरीकडे स्थानिक प्रशासन वेगळे नियम लादते,याबाबत मनपा आयुक्तांना मद्यपींच्या तीव्र रोषाला समाज माध्यमांवर सामोरे जावे लागत असल्याचे दृष्य उमटले आहे.

ऑन-लाईन व्यवस्था करा-
शहरातील मद्यपींनी आता आयुक्तांनी आॅन लाईन मद्य मागविण्यास परवानगी द्यावी अशी मागणी ही केली आहे. शहरातील सुशिक्ष्ति वर्ग ‘झोमॅटो’मधून ज्याप्रमाणे पार्सल मागवतात,अशी परवानगी मिळाल्यास शहरातील सुशिक्ष्ति वर्ग मद्य दूकानांवर गर्दी करणार नाही व रांग देखील मोठी होणार नसल्याचे ‘वास्तववादी’सल्ले देखील समाज माध्यमांवर आयुक्तांना दिले जात आहे.५० टक्के मद्यपी हे आॅन लाईनचाच उपयोग करेल,जेणेकरुन शासनाचा महसूल ही बुडणार नाही,काेरोनाची लागण होण्याची भीतीही राहणार नाही आणि मद्यपींना ‘नागपूरकर नागरिक’म्हणून प्रशासनाला सहकार्य केल्याचा दिलासाही मिळेल.

यासाठी प्रशासनाने हवे तर अटी ठेवाव्या. ७० रु.च्या निप चा ऑर्डर ऑन लाईनवर देता येणार नाही.५०० किवा १००० च्या खरेदीवरच आॅन लाईन बुकींग करुन घरपोचची सुविधा ग्राहकांना मिळेल,वाटल्यास असा नियम करावा,असाही सल्ला देण्यात आला.
याशिवाय शहरातील संवेदनशील झोन सोडून इतर सर्व मद्याची दूकाने एक साथ उघडल्यास मद्य दूकानदारांनी थोडे पैसे खर्च करुन बांऊंसर ठेवावेत. जेणे करुन सुरक्ष्ति अंतराची शिस्त पाळली जाईल.सुरवातीचे २-३ दिवसत मद्य दूकानदारांना त्रास होईल,यानंतर सर्व सुरळीत होईल,मात्र गर्दी हाेण्याचा व कोरोनाची लागण होण्याच्या भीतीने प्रशासन ‘कोरोनापेक्ष्ाही गंभीर प्रश्‍नावर प्रभावी उपायच शोधणार नाही,लॉक डाऊनच वाढवत राहील,तर ते योग्य नसल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.मुंढे यांनी पुणे शहराचे ‘आदर्श’ उदाहरण डोळयासमोर ठेवण्याचा सल्लाही अनेकांनी आयुक्तांना दिला. पुणे हे रेड झोनमध्ये असून आणि दररोज तेथील कोरोना बाधितांची संख्या वाढत असतानाही तेथील मनपा प्रशासनाने मद्यपींची तसेच सामान्य नागरिकांची समस्या योग्यरित्या हाताळली असल्याचे कौतूकही माध्यमात उमटली.

नशा तर मद्यपी आज ही करीत आहेतच. मेंदूला हव्या असणा-या झिंगसाठी कोणी सेनिटायझर पित आहेत कोणी कफ सिरप पित आहेत.४२ दिवसांचा संयम हा पुरेसा झाला. नागपूरात २७ लाख लोकसंख्येच्या पाठीवर ६० हजारच्या जवळपास पोलीसकर्मी कर्तव्य बजावत आहेत.आयुक्तांनी शहरातील मद्याची दूकाने शिस्तीत उघडली तर मद्यपी त्याचे पुरेपूर पालन करेल,कुठेही गर्दी न करता पोलिसांवरील ताण वाढू देणार नाही,मात्र ठराविक भागातील किवा काहीच दूकाने उघडण्याचा दिल्लीसारखा प्रयोग आयुक्तांनी नागपूरात करु नये,असा सल्ला देखील मुंढे यांना मद्यपींनी सोशल मिडीयावर दिला आहे.

याशिवाय अनेक ‘चमत्कारीक’सल्ले मुंढे यांना देण्यात आले आहे.नुकतेच नागपूरच्या काही मद्यपींनी मध्य प्रदेशमधील नातेवाईकांना फोन लावले,तिथून काही ‘व्यवस्था’होत असल्यास चाचपडून पाहीले,मात्र शिवराज सरकारने तेथील ठेकेदारांना साढे तीन कोटींचा ठेका घेण्याची सूचना केली असल्याची माहिती आहे. एवढ्ी मोठी रक्कम गूंतवूण दारु विकल्या न गेल्यास याचे नुकसान ठेकेदारालाच सहन करावे लागणार असल्याने त्यांनीही माघार घेतली.कारण गेल्या ४२ दिवसात अनेकांनी ‘दारु चा पिच्छाच’आधीच सोडला आहे,ते पुन्हा मद्याकडे परततील,याची शाश्‍वती तेथील ठेकेदारांना नसल्यामुळे नागपूरकर मद्यपींची येथेही निराशा झाली,व संपूर्ण रोष आयुक्तांवर निघाला.

हूंडाबळीत जीव जात नाही का?
मद्यपींच्या या संभाषणात एका महिलेचे ‘सुविचार’ही दखल घेण्यासारखे होते. मद्याची दूकाने सुरु झाल्यावर घरीच राहणारा नवरा हा बायकोला जास्त मारहाण करील,असा तर्क म्हणजे ’मुंगेरीलालचे सपने’सारखेच असल्याचे त्या म्हणाल्या. घरातील महिलाच सासू,नणद या हूंड्यासाठी सूनेला पेटवून टाकतात मग त्या काय दारु प्यायलाे असतात का?कौटूंबिक हिंसाचार आणि मद्याचे सेवन याचा संबध सध्या तरी अतार्कीक असल्याचे मत त्यांनी मांडले.एक वेळ पत्ते नाही खेळले तर चालते मात्र मद्यपींना मद्य हे गरजेचं असल्याच्या त्या म्हणाल्या.

मद्याच्या व्यसनाला उगाच ‘नैतिक-अनैतिक’च्या चौकटीत बंदिस्त करणे हे हास्यास्पद असल्याची चर्चा देखील सोशल मिडीयात चांगलीच रंगली.

पुढे १७ मे नंतर तरी मुंढे यांच्याकडे शहरातील मद्य दूकानांसह,खाजगी आस्थापने, परिवहन,बाजारपेठा,धार्मिक स्थळे,सरकारी कार्यालये सुरु करण्याबाबत काही ठोस योजना आहेत का?असा प्रश्‍न देखील उपस्थित करण्यात आला. पोलीसांच्या दंडूकांचा धाक दाखवून सामान्य नागरिकांकडून कायद्यांचे पालन करुन घेण्यापेक्ष्ा नागपूरकर नागरिक हे आतापर्यंत ज्याप्रमाणे स्वत:हून प्रशासनाला सहकार्य करीत आले आहे,तसेच पुढे ही करायला तयार आहेत मात्र प्रशासनाने आता मात्र सामान्य नागरिकांच्याही मानसिक,शारिरीक,भावनिक आणि आर्थिक गरजांचाही विचार संवेदनशीलतेने करणे गरजेचे असल्याचे मत मद्यपींनी व्यक्त केले

पोलिसांवर होणारे हल्ले हे वाढले आहेत,हे कशाचे द्योतक आहे?असा प्रश्‍न देखील उपस्थित केला जात आहे.नागरिक,पोलीस आणि प्रशासन मिळूनच ‘कोरोना’सारख्या विषाणूचा पराभव करु शकतात,असा आशावाद देखील माध्यमांवर उमटला.

Latest बातम्या